आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरचा सहकार देशासाठी मॉडेल बनवला

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ साध्या पद्धतीने काल गुरूवारी करण्यात आला. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार बाळासाहेब थोरात यांनी सर्व कार्यक्रम रद्द केल्याने ते या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आणि कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांच्या … Read more

अशोक सहकारी साखर कारखान्याचे यंदाच्या सात लाख टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याचे यंदाच्या गळीत हंगामात सात लाख टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली तसेच सर्वांच्या सहकार्याने हंगाम यशस्वी होईल, असा विश्वास व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सन २०२३- २४ च्या … Read more

Ahmednagar News : रब्बीच्या आवर्तनाबाबत त्वरीत नियोजन जाहिर करणे गरजेचे

Ahmednagar News

Ahmednagar News : धरणातील पाण्याचे रब्बीच्या आवर्तनाचे नियोजन जाहिर करावे. त्यासाठी शासनाने त्वरीत कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन रब्बीतील धरणातील पाण्याचे आवर्तने तसेच संभाव्य उन्हाळ्यातील आवर्तनाचे वेळापत्रक त्वरीत जाहिर करावे, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हा काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या माहितीनुसार, भंडारदरा व निळवंडे धरण पूर्ण … Read more

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींची तिरडी बांधण्याचा कार्यक्रम

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी येथे मराठा आरक्षण आंदोलाचा काल गुरुवारी चौथा दिवस असून वांबोरी, कात्रड, गुंजाळे, कुक्कडवेढे येथील ग्रामस्थांच्या वतीने बाजार पेठ बंद ठेवत सहभाग नोंदवला. या आंदोलना दरम्यान राहुरी येथे मराठा आरक्षण साखळी उपोषणा दरम्यान मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींची तिरडी बांधण्याचा कार्यक्रम वाजत गाजत साजरा करण्यात आला. याप्रसंगी मराठा बहुउद्देशिय संस्था संचलित मराठा … Read more

तुम्हाला माहीत आहे विमानाचा हॉर्न कधी वाजवतात ?

Marathi News

Marathi News : सायकलपासून मोठ्या जहाजांना वेगवेगळ्या आवाजामधील ‘हॉर्न’ असतात, हे बहुतेकांना माहीत आहे; पण आकाशात भिरभिरणाऱ्या विमानांना असे हॉर्न असतात का? आणि असले तरी वैमानिक कोणत्या क्षणी वाजवतात? त्याचा आवाज किती मोठा असतो ? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होतात. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी सावधगिरीचा इशारा म्हणून ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. अलीकडे जास्त प्रमाणात अपघात … Read more

कोपरगाव तालुका देखील दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : कमी पर्जन्यमान झाल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या ४० तालुक्याच्या यादीत कोपरगाव तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नाही. त्याबाबत कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांची भेट घेवून या ४० तालुक्याबरोबर कोपरगाव तालुका व मतदार संघातील पुणतांबा महसुल मंडलातील गावे देखील दुष्काळग्रस्त जाहीर करावे, अशी मागणी करणार असल्याचे आ. … Read more

Ahmednagar News : कारखाना टिकला तरच आपण शेतकरी जगू शकू ! तरच तालुक्यातील कारखानदारी जिवंत…

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखाना या दोन्ही कारखान्याच द्यावा, असे आवाहन शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा उपप्रमुख हरिभाऊ शेळके त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले. याबाबत पत्रकारांशी बोलतानी शेळके म्हणाले की, ज्ञानेश्वर कारखान्याने नेवासा तालुक्यातील … Read more

Kopargaon News : निळवंडेच्या डाव्या कालव्यात पाणी ! पाच दशकांपासून जिरायती भागातील शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण

Kopargaon News

Kopargaon News : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याची गरज असताना कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर निळवंडे धरणातून डाव्या कालव्यात काल गुरुवारी पाणी सोडण्यात आले आहे. निळवंडेच्या डाव्या कालव्यात पाणी सोडल्यामुळे तालुक्यातील काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, वेस, सोयगाव, बहादरपूर, रांजणगाव देशमुख, अंजनापूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबादसह मतदारसंघातील वाकडी, चितळी, धनगरवाडी या … Read more

HDFC Bank Rule : एचडीएफसीच्या ग्राहकांनी व्हा सावधान, बंद होतीये ही सर्विस, जाणून घ्या..

HDFC Bank Rule : HDFC बँकेने आपला एक नियम बदलला असून, HDFC बँकेने आपल्या Regalia क्रेडिट कार्डचे नियम बदलले आहेत. हा नवीन नियम १ डिसेंबरपासून लागू होणार असून, जाणून घ्या या बदललेल्या नियमांबद्दल. HDFC बँकेने आपल्या Regalia क्रेडिट कार्डचे काही नियम बदलले आहेत. हे नियम कार्डच्या लाउंज वापराबाबत आहेत. १ डिसेंबरपासून लाउंजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी काही … Read more

Pathardi News : सणासुदीच्या दिवसात पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची नागरिकांवर वेळ

Pathardi News

Pathardi News : विज बिल थकल्याने पाथर्डी शेवगाव जायकवाडी नळ पाणीपुरवठा योजनेचा विजपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. शहरांमध्ये ऐन सणासुदीच्या दिवसात पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची नागरिकांवर वेळ आली आहे. शहराला कोणी वाली आहे की नाही अशी स्थिती पालिकेच्या कारभारावरून निर्माण झाली आहे. पाथर्डीसह ग्रामीण भागातील २५ गावे या योजनेवर जोडलेली आहेत. चार ते सहा … Read more

Mobile Recharge Plan : मोबाईल युजर्सना मोठा झटका, महाग होणार रिचार्जे, जाणून घ्या..

Mobile Recharge Plan : सध्या मोबाईल हा एक रोजच्या जीवनातील एक घटक आहे. दूरसंचार उद्योगातील वाढती स्पर्धा पाहता आपल्या उद्योगाला उत्तम चालना मिळवा यासाठी काही कंपन्या आपले रिचार्जे महाग करण्याच्या विचारात आहेत. मात्र याचा फटका हा सर्व सामान्य जनतेला बसणार आहे. दरम्यान, आपल्या कंपनीचे फाइनेंशियल हेल्थ वाढविण्यासाठी आणि त्यांचे ARPU ( (प्रति वापरकर्ता सरासरी महसूल)) … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : उद्योजकावर हल्ला; गाव बंद ठेवून ग्रामस्थांकडून निषेध

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील युवा उद्योजक साई सात्रळ डेअरीचे संचालक चंद्रकांत डुक्रे हे संगमनेर तालुक्यातील धांदरफळ शिवारात ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री अंत्यविधी वरून येताना एका हॉटेलवर जेवणासाठी थांबले असताना सात्रळ, सोनगाव येथील समाज कंटकांनी त्यांच्यावर ड्रायव्हर व सहकारी यांच्यावर हल्ला केला. या घटनेने सात्रळ, सोनगाव, धानोरे पंचक्रोशी मध्ये तीव्र पडसाद उमटले. … Read more

Loan Payment : कर्जाचं आहे टेंशन, तर EMI भरण्यासाठी या टिप्स ठेवा लक्षात, होतील हे फायदे..

Loan Payment : पैश्याच्या कमतरतेमुळे आपण कर्ज घेतो. त्यामुळे आजकाल कर्ज घेणे ही फार सोपी गोष्ट झाली आहे. मात्र अवघड आहे ते कर्ज घेतल्यानंतर EMI चा परतावा करणे. ज्यामुळे अनेकांना खूप त्रास होतो. तर जाणून घ्या कर्जाचा परतावा करण्याच्या काही सोप्या टिप्स. EMI चा दबाव कर्ज घेतल्यावर रक्कम तर येते, पण काही काळानंतर आपण पुन्हा … Read more

Ahmednagar Politics : मुळा धरणाचे पाणी सोडण्याऐवजी निळवंडे धरणाचे पाणी जायकवाडीला सोडा !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : मुळा धरणाचे पाणी जायकवाडीला सोडण्याऐवजी निळवंडे धरण काठोकाठ भरलेले आहे त्याचे उजवे व डावे कालवे अपूर्ण आहेत. या कालव्याचे काम पूर्ण करण्यासाठी हे धरण रिकामे असणे गरजेचे आहे. त्यामुळे निळवंडे धरणाचे पाणी जायकवाडीला सोडावे व धरणाचे काम मार्गी लावावे. निळवंडे धरणाचे पाणी सोडण्यास उत्तरेतील पुढारी राजकीय भावनेतून विरोध करतील. परंतु त्यांनीही हा … Read more

Mula Dam : मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडू नये

Mula Dam

Mula Dam : मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत निर्णय झाला आहे. मात्र मुळा धरणातून पाणी सोडू नये, तसेच मुळा नदीवरील सर्व केटीवेअर बंधारे पूर्ण क्षमतेने भरून द्यावेत, अशी मागणी राहुरी तालुका पूर्व भाग मुळा नदी परिसर समस्या निवारण समितीचे अध्यक्ष उत्तमराव म्हसे, सचिव बाळासाहेब पेरणे तसेच समितीच्या सर्व सदस्यांनी तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे … Read more

Denomination Banknotes : दोन हजारच्या नोटा जमा करण्यासाठी सरकारने दिला सगळ्यात सोपा उपाय !

Denomination Banknotes

Denomination Banknotes : दोन हजार रुपयाच्या नोटा आपल्या बँक खात्यात जमा करण्यासाठी विमा पोस्टद्वारे रिझर्व्ह बँकेच्या नियुक्त प्रादेशिक कार्यालयांना पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयांपासून दूर राहणाऱ्या लोकांसाठी हा एक सुलभ पर्याय ठरणार आहे. यासाठी रिझर्व्ह बँक लोकांना त्यांच्या बँक खात्यात दोन हजाराच्या नोटा जमा करण्यासाठी टीएलआर (ट्रिपल लॉक रिसेप्टॅकल) … Read more

दुष्काळ दबक्या पावलांनी येतो. सरकारने सतर्क राहायला हवे !

Maharashtra News

Maharashtra News : ‘दुष्काळ दबक्या पावलांनी येतो. सरकारने सतर्क राहायला हवे, ‘ असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला असून, दुष्काळग्रस्त तालुके जाहीर करताना त्याकडे सरकारने अधिक सहानुभूतीने, कणवेने पाहावे, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांत निर्माण झालेली परिस्थिती पाहून राज्य सरकारने या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यांत दुष्काळ … Read more

वीज वितरण कर्मचाऱ्यांचे मोबाईल बंद आंदोलन !

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्र राज्य वीज वितरण लाईन्स स्टाफ बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांचे क्रमबद्ध आंदोलन सुरू असून आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात कर्मचाऱ्यांनी महावितरण कंपनीने दिलेले मोबाईल नंबर पुन्हा परत केले आहेत. लाईन कर्मचाऱ्यांच्या मोबाईल बंद आंदोलनामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार आहे. याबाबत वीज वितरण तिसगाव कक्षाच्या वतीने सहाय्यक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात … Read more