ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करून बिबट्यांचा शोध घ्या ; मंत्री विखे पाटील, वर्पे यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन

Ahmednagar News : सध्या सर्वच भागात बिबट्यांचा संचार वाढत आहे. रात्री तसेच भरदिवसा देखील बिबट्यांचे हल्ले होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यामध्ये सुध्दा भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे वनविभागाने जादा यंत्रणेचा वापर करत या भागात बिबट्यांचा बंदोबस्त करावा. असे निर्देश पालकमंत्री विखे पाटील यांनी दिले. निमगाव टेंभी येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या श्रीमती संगिता … Read more

शनिवारी नगरच्या बाजार समितीत कांद्याला मिळाला ‘इतका’ विक्रमी भाव

Ahmednagar News : सध्या भारताच्या शेजारी असलेल्या बांगलादेशात उद्‍भवलेल्या अस्थिरतेमुळे राज्यातील कांद्याला पुन्हा चांगला भाव मिळत आहे. नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सरासरी कांद्याला साडेपाच हजार रुपयांचा भाव मिळाला. शनिवारी २५१ ट्रक म्हणजे २७ हजार ६२७ क्विंटल कांदा विक्रिसाठी आणला होता. मागील काही दिवस राज्यभर संततधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे अनेक भागातील वाहतूक ठप्प झाली … Read more

उमेदवारीच्या अफवा पसरवून लोकांमध्ये बुद्धिभेद करण्याचा डाव ; ढाकणे यांची आ. राजळे यांच्यावर टीका

Ahmednagar News : राजकीय जीवनात अपयश आले तरी कधीच दुसऱ्याला दोष दिला नाही. भवितव्याकडे पाहून वाटचाल करत आलो संघर्षाला तोच पात्र असतो जो लढायला तयार आहे. संघटनेला मी परिवार मानत आलोय. ३० वर्ष विचारांची लढाई लढतोय आमदारकी मिळून स्वतःचा प्रपंच मला मोठा करायचा नाही. सध्या उमेदवारीच्या अफवा पसरवून लोकांमध्ये बुद्धिभेद करण्याचा डाव काही मंडळी जाणीवपूर्वक … Read more

पावसाचा फटका ; भाजीपाल्याचे दर वाढले; अनेक भाज्या ताटातून झाल्या गायब

Ahmednagar News : पावसाचा खरिपाच्या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. त्याबरोबर पावसाने भाज्यांची अवाक देखील कमी होत असल्याने भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढले आहेत. सध्या मेथी, कोथिंबीर यांचे भाव पाहून अनेकजण ती घेण्याचे टाळतात. त्याचसोबत इतर भाजीपाल्याचे दर देखील चांगलेच वाढले आहेत. मागील गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून राज्यभर चालु असलेल्या रिमझिम व संततधार पावसामुळे शेतीचे … Read more

आमदार रोहित पवार यांच्या ‘त्या’ मागणीची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने घेतली दखल ; नागरिकांना होणार टोलमाफी

Ahmednagar News : अहिल्यानगर-करमाळा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांना टोलमाफी व सुरक्षिततेच्या दृष्टीने नागमठाण व मांदळी या ठिकाणी अंडरपास किंवा ओव्हरपास करण्याच्या कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मागणीची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने दखल घेतली आहे. याबाबत धोरणात्मक निर्णयानुसार आणि सुरक्षिततेचा विचार करुन पुढील प्रक्रिया करण्याच्या सूचना ‘केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालया’च्या तांत्रिक सल्लागारांनी ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’च्या (एनएचएआय) … Read more

गर्दी वाढल्याने श्रीगोंद्यात कार्यकर्ते अन नेते मंडळी देखील ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत

Ahmednagar News : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्यामुळे अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र कोण कोणत्या पक्षाकडून उभे राहणार हे चिन्ह स्पस्ट होत नसल्यामुळे कार्यकर्ते देखील सैरभैर झाले आहेत. दरम्यान अनेकजण वरिष्ठ नेत्यांच्या गाठी भेटी घेत आहेत मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणताच निर्णय देण्यात आला नसल्याने कार्यकर्ते अन … Read more

कॅफेच्या नावाखाली चालत होता भलताच प्रकार; पोलिसांच्या कारवाईत आले धक्कादायक सत्य समोर

Ahmednagar News : सध्या कॅफेच्या नावाखाली अनेक चुकीचे उदयोग केले जात आहेत. अशीच घटना संगमनेरमध्ये समोर आली आहे. शहरातील अकोलो रस्त्यावरील एका व्यापारी संकुलात तरुणांचे अधील चाळे सुरू असणाऱ्या कॅफेवर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यामध्ये अवील चाळे करताना आढळलेल्या मुला-मुलींना समज देऊन सोडण्यात आले. याप्रकरणी कॅफेचालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या … Read more

तिन्ही लेकीनंतर मुलाची देखील झाली पोलिस दलात निवड ; ‘त्या’ कुटुंबाची झाली वेगळी ओळख…

Ahmednagar News : गरीबी पाचवीलाच पुजलेली, काम करेल तेव्हा चूल पेटायची, अशा परिस्थितीत घरात शिक्षणाचा कसलाही गंध नसताना हलाखीच्या परिस्थितीत वाट काढत परिस्थितीचा बाऊ न करता आलेल्या संकटांना सामोरे जात परिस्थितीला जिद्द बनवत एकाच कुटुंबातील तीन बहिणी आणि एक भाऊ पोलीस दलात भरती झाल्याने गावामध्ये व पंचक्रोशीमध्ये या कुटुंबाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सोनाली … Read more

पत्नी नांदायला येत नसल्याने पतीने मेहुण्याच्या तीन वर्षीय बालकासोबत केले असे काही धक्कादायक …

Ahmednagar News : सासरी गेलेली पत्नी नांदायला परत येत नसल्याने रागाने बेभान झालेल्या पतीने पत्नीच्या भावाचा तीन वर्षाच्या मुलाला नायगाव येथे जाऊन घरासमोर खेळत असताना उचलून आणले होते. दरम्यान मेहुण्याच्याच तीन वर्षीय बालकाचा खून करून मृतदेह आतेमामाने गारज (ता. वैजापूर) शिवारात फेकून दिल्याचे समोर आले आहे. दरम्यान श्रीरामपूर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीने नशेत मृतदेह फेकल्याने … Read more

सरकार देतेय ना? मग कशाला वावड्या उडवतात; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची टीका

Ahmednagar News : महिलांना लाडकी बहिणी योजनेचे पैसे आले ना, शेतकऱ्यांकडे साडेसात एच. पी. चे बील मागायला कुणी आले का? सरकार देतेय ना? मग कशाला वावड्या उडवतात. सरकार कोणत्या दिशेने चालले,यापेक्षा आपण कोणत्या दिशेने चाललो आहे, याला महत्व आहे. अशी टीका आमदार डॉ. किरण लहामटे यांनी विरोधकांचे नाव न घेता केली. केवळ बॅनर फाडून राजकारण … Read more

चहापावडरमध्ये आढळली प्रमाणापेक्षा जास्त किटकनाशके ; राज्यभरात छापे टाकून २८ लाख रुपयांचा साठा जप्त

Ahmednagar News : चहा पिणाऱ्यांसाठी एक महत्वाची व धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण तुम्ही जो आवडीने चहा पिता त्या चहात विहित प्रमाणापेक्षा जास्त किटकनाशके (पेस्टीसाईडस) आढळून आली असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे . चहा हे भारतातीलच नव्हे तर जगातील अनेकजणांचे आवडते पेय आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येकजण सकाळी उठल्यावर एक कप चहा पिऊन दिवसाची … Read more

ठरले मग ; अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीकडून ‘हेच’ असतील आगामी उमेदवार ; दादांनी दिले ‘ते’ आदेश

Ahmednagar News : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील काँग्रेसचे जिल्ह्यातील जेष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आमचे उमेदवार ठरले आहेत असे वक्तव्ये केले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठकीतून मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे २५ उमेदवार ठरले आहेत. विशेष म्हणजे अजित पवार हे बारामती विधानसभा … Read more

‘ई-पीक’ पाहणी शेतकऱ्यांसाठी ठरतेय ‘डोकेदुखी’ ; मनस्तापामुळेअवघ्या ‘इतक्या’ शेतकऱ्यांनी केली ‘ई-पीक’ पाहणी

Ahmednagar News : जिल्ह्यात १४ लाख ४६ हजार ९२४ शेतकरी संख्या असून ७ लाख ४६ हजार ३२६.७१ खरीप हंगामाचे क्षेत्र आहे. त्यापैकी आतापर्यंत ३ लाख १३ हजार २८१.०५ क्षेत्रावर ई-पीक पाहणी शेतकऱ्यांनी केली आहे. उर्वरित क्षेत्राची पाहणी अद्यापही झालेली नाही. तांत्रिक अडचणींमुळे ई-पीक पाहणी शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत आहे. ई-पीक पाहणी नोंदविताना शेतकऱ्यांना सर्व्हरडाउन, नेटवर्क, अँप … Read more

आर्मीत भरतीचे बनावट नियुक्तीपत्र देऊन शेकडो युवकांची केली फसवणूक ; पोलिसांनी केली अशी कारवाई

Ahmednagar News : महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरीयाणा व नवी दिल्ली येथील भरतीपूर्व प्रशिक्षण सेंटरशी संपर्क करुन युवकांना देहराडून व अहमदनगर येथील आर्मी परिसरात बोलावून घेत. त्या युवकांना प्रशिक्षण देतो असे सांगून व पैसे देणाऱ्या उमेदवारांना सैन्य दलातील मुख्य अभियंता अधिकारी आणि सेवानिवृत्त दक्षिणी कमान मुख्य अधिकारी यांच्याकडील बनावट नियुक्तीपत्र देत त्यांची … Read more

भांडी विक्री करणाऱ्या चार परप्रांतीयांना ग्रामस्थांनी दिला चोप ; मोठे कारण आले समोर

Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथे एका चिमुरड्याला पळवून नेताना आजूबाजूच्या रहिवाशांनी सतर्कता दाखवत संशयित आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. ही घटना ताजी असतानाच गितेवाडी येथे (दि.१२) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास प्राथमिक शाळेमध्ये घुसून मुलांना आमिष दाखवून पळविण्याच्या प्रयत्नात असलेले संशयित चौघेजण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सतर्क ग्रामस्थांनी या … Read more

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमाद्वारे नगर जिल्ह्यातील ‘इतक्या’ उमेदवारांना मिळणार रोजगार

Ahmednagar News : शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला असून नगर जिल्ह्यातून १ हजार ७०१ जागांसाठी २ हजार ६८० उमेदवारांनी अर्ज केले आहेत. दि.१३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री … Read more

कोपरगावात साठवण तलावाच्या जलपूजनावरून राजकारण तापले; दिलेला शब्द पूर्ण केल्याने आ. काळे यांचे पारडे जड

Ahmednagar News : कोपरगाव येथील पाच नंबर साठवण तलावाच्या जलपूजनावरून सध्या या तालुक्यात चांगलेच राजकारण तापले आहे. हा तलाव आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच मार्गी लागला असल्याचे सांगत आमदार काळे यांचे म्हणणे असून, त्यामुळे या तलावाचे जलपूजन देखील आपणच करणार आहे. तर दुसरीकडे विरोधक मात्र हा तलाव आपल्याच पाठपुराव्यामुळे झाला असून, आमदारांचा याच्याशी काहीच संबंध नसल्याचे सांगत … Read more

जिल्ह्यासह राज्यभरात साथीच्या आजारांचा धुमाकूळ ; विविध आजारांनी घेतला ‘इतक्या’ जणांचा बळी

Ahmednagar News : यंदा जूनमध्येच मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावत शेतकऱ्यांसह सर्वांनाच सुखद धक्का दिला. वेळेवर पाऊस झाल्यामुळे सर्वजण आनंदात होते. मात्र नंतरच्या काळात अनेक ठिकाणी संततधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरात देखील मोठ्या प्रमाणात दलदल झाली. ग्रामीण भागात अद्याप देखील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून राहिल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचसोबाबत या … Read more