‘या’ तालुक्यात झळकले सरकार विरोधात ‘असे’ पोस्टर; शहरासह तालुक्यात एकच चर्चा

Ahmednagar news : सध्या वाढत्या महागाईने सर्वसामान्य पुरते वैतागले आहेत. त्यामुळे सरकारविरोधात रोष वाढत आहे. दरम्यान श्रीगोंदा शहरात भाजप सरकारवर टीका-टिपण्णी करणारे पोस्टर्स विविध ठिकाणी पाहायला मिळाल्याने या पोस्टरची शहरासह तालुक्यात दिवसभर चर्चा रंगली होती. राज्य व केंद्रातील सरकारवर निशाणा साधणारे पोस्टर्स संपूर्ण शहरात लावल्याचे दिसून आल्याने नागरिक आवर्जून थांबत या पोस्टरकडे पाहत होते. या … Read more

इंदोरीकर महाराज म्हणतात; मी नेहमी सत्य बोलतो परंतु माझ्या बोलण्याचा उलटा अर्थ लावतात

Ahmednagar news : मी सातत्याने सत्य बोलत असतो. धर्मासाठी सत्य बोलले पाहिजे. दहा वर्षापूर्वी मी जे बोललो ते आता खरे झाले आहे. श्रावण महिन्यात महिनाभर उपवास करणाऱ्यांची मला किव येते. एवढे उपवास करून शरीराला त्रास का करून घेता? कर्म हिच खरी पूजा आहे. हिंडून फिरून देव भेटत नसतो. सावता महाराजांना त्यांच्या मळ्यात देवाने दर्शन दिले. … Read more

विधानसभा निवडणुकीपूर्वीच मंत्री विखे पाटील यांच्‍यावर पक्षाने दिली ‘ही’ विशेष जबाबदारी

Ahmednagar news : राज्यात विधानसभेच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने देखील लाभार्थ्‍यांशी चांगला संपर्क व्‍हावा या दृष्‍टीने मंत्री विखे पाटील यांच्‍यावर विशेष जबाबदारी सोपविली आहे. लाभार्थ्‍यांच्‍या संपर्कासाठी निवडणूक व्यवस्थापन समिती जाहीर केली आहे. या समितीच्‍या माध्‍यमातून विशेष कार्यक्रम आयोजित केले जाणार असून, या समितीमध्ये महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण … Read more

‘हा’ ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारमुळेच, कामगारांना दिलेल्या शब्दाची ‘वचनपूर्ती’ : मंत्री विखे पाटील

Ahmednagar news : साईबाबा संस्थानमधील ५९८ कामगारांसह आऊट सोर्सिंग कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला. याची अंमलबजावणी त्रिसदस्यीस समितीने करुन कामगारांना नियुक्तीपत्र देण्याचाही निर्णय घेतला. मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत कामगारांना प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले कि,श्री साईबाबा संस्थानमधील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या निर्णयासाठी … Read more

दोन वर्षापूर्वी अतिवृष्टीमुळे नुकसान: नगर जिल्ह्यातील ‘त्या’ शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मिळणार २६ कोटी

Ahmednagar news : मागील दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२२ मध्ये जिल्ह्यात अनेक भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. यात सतत पडणाऱ्या पावसाने जोमात आलेल्या पिकांची पूर्णपणे नासाडी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली होती. मात्र सरकारने २०२२ च्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे मात्र अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील … Read more

डीटीएड धारकांसाठी खुश खबर ! ‘या’ महिन्यात होणार टीईटी परीक्षा

Ahmednagar news : शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकारने शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा घेतली. टीईटी परीक्षा राज्य सरकार आणि सीटीईटी परीक्षा केंद्र सरकार घेते. या परीक्षेत उत्तीर्ण होणारे उमेदवार पात्र मानले जातात आणि सरकारी शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी नियुक्त केले जातात. त्यानुसार यंदा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. यात परीक्षेत … Read more

नगरकरांनो खबरदारी घ्या; गणेशोत्सवात साथीचे आजार वाढले, वैद्यकीय तज्ञांनी केले ‘हे’ आवाहन

Ahmednagar News :सध्या वातावरणातील बदलाचा आरोग्यावर परिणाम झाल्याने साथीचे आजार वाढले आहेत. ऐन गणेशोत्सवामध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून ऐन गणेशोत्सवात नगर शहरात घसा, सर्दी, खोकला व तापाची साथ सुरू झाली आहे. सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये रूग्णांची गर्दी वाढली आहे. मागील काही दिवस जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत होता त्यामुळे अनेक धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. … Read more

रावणाला मानणाऱ्या आमदाराला महायुतीमध्ये उमेदवारी देऊ नका ; ‘या’ तालुक्यातील कार्यकर्त्यांची मागणी

Ahmednagar Politics: महायुतीच्या जागा वाटपात अकोले हा विधानसभा मतदार संघ भाजपाला मिळावा, तसेच आम्ही रामाला मानणारे आहोत. मात्र येथील आमदार रावणाला मानतात. त्यामुळे रावणाला मानणाऱ्या आमदाराला महायुतीमध्ये उमेदवारी देऊ नका. अशी मागणी कार्यकर्त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री खा. डॉ. अनिल जैन यांच्याकडे केली. नुकतीच अकोले मतदार संघातील बुथ केंद्र प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि संघटनात्मक पदाधिकाऱ्यांची … Read more

तूर्तास अहमदनगरचे जिल्हा विभाजन होणार नाही; मोठे कारण आले समोर …

Ahmednagar News : अहमदनगरचे विभाजन करावे ही खूप जुनी मागणी आहे. मात्र विभाजनानंतर जिल्ह्याचे मुख्यालय श्रीरामपूर, शिर्डी की संगमनेर हा कळीचा मुद्दा राहिलेला आहे. या तीनही ठिकाणच्या नागरिकांनी आपल्याच शहरामध्ये जिल्हा मुख्यालय असावे. यासाठी आग्रही मागणी करत आंदोलने केलेली आहेत. तसेच तेथील स्थानिक नेत्यांचा आंदोलकांना पाठिंबाही मिळाला आहे. मात्र अद्याप पर्यंत जिल्हा विभाजनाला सरकारने मंजुरी … Read more

शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण : बाजरीच्या कणसाला फुटले अंकूर तर कपाशीची पातेगळ

Ahmednagar News : मागील आठवड्यात जिल्हाभर पडलेल्या संततधार पावसामुळे कपाशीची पातेगळ होऊन मोठे नुकसान झाले आहे. तर बाजरी,सोयाबीन, मूग तसेच उडदाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. मात्र त्यानंतर असलेल्या ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर मावा, तुडतुडे व बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव झाल्याने कपाशी पीक देखील हातचे जाण्याचा धोका असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रत झाला आहे. मागील आठवड्यात पावसाने जिल्ह्यात … Read more

बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना न करणाऱ्या शाळांबाबत मनसेने घेतला ‘हा’ निर्णय

Ahmednagar News : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शाळा आणि महाविद्यालयांची झाडाझडती घेणार असून बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना न केलेल्या शाळा तात्काळ बंद पाडण्याचा इशारा राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी दिला आहे. बदलापूरचे प्रकरण दुर्दैवी असले तरी त्याला प्रशासकीय गोष्टी पण जबाबदार आहेत ही नाण्याची दुसरी बाजू देखील समजून घेतली पाहिजे. शाळा आणि महाविद्यालयात पालक आपले … Read more

विरोधकांनी वकीलांची फौज उभी केली तरीही आपण आमदार होण्यापूर्वी दिलेला ‘तो’ शब्द पूर्ण केला ; आमदार काळे

Ahmednagar News : मी आमदार होण्यापूर्वी कोपरगावच्या पाण्यासाठी संघर्ष करीत ९ दिवस उपोषण करून शासनाचे लक्ष वेधले होते. त्याच वेळी नागरीकांना शब्द दिला होता की मला आमदार केले तर पाणीप्रश्न सोडणार आज तो शब्द पूर्ण करीत कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथे नवीन पाचव्या साठवण तलावाची निर्मिती केली. हे नवीन तलाव पूर्ण होवू नये, यासाठी विरोधकांनी सुरुवातीपासून … Read more

एकमेकांचे विरोधक असलेले ‘हे’ तीन नेते एकाच व्यासपीठावर; मात्र तिघांनीही एकमेकांबाबत केले असे काही

Ahmednagar Politics : आ. प्रा. राम शिंदे, आ. रोहित पवार व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर राळेभात हे तीनही एकमेकांचे राजकीय विरोधक. तसे हे तिघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याची सोडत नाहीत. त्यामुळे हे तिघे एकाच व्यासपीठावर येणे तसे दुर्मिळच मात्र हा दुर्मिळ योग जुळून आला तो म्हणजे सिताराम गडावर आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात … Read more

सरकार आणि विमा कंपनीच्या घोळात शेतकरी भरडला जातोय ; विमा योजनेत पात्र ठरूनही अनेक शेतकरी मदतीपासून वंचित

Ahmednagar News : निसर्गाचा लहरीपणा,अतिवृष्टी, रोगराईचा सामना करत असताना अनेकदा शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो. कधी कमी पावसामुळे तर कधी अतिवृष्टीमुळे पीक डोळ्यादेखत नष्ट होते. मात्र शेतकऱ्याला काहीच करता येत नाही. त्यामुळे सरकारने मागील दोन वर्षांपासून अवघ्या १ रुपयात पीक विमा हि योजना आणली. या योजनेत शेतकऱ्याला कोणताच हफ्ता भरावा लागत नाही. मात्र सध्या … Read more

दैव बलवत्तर म्हणून शेतकऱ्यासह २० म्हशींचे प्राण वाचले ; मात्र चौघींचा ‘त्या’ तुटलेल्या तारेने घेतला बळी

Ahmednagar News : शेतकऱ्याने वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे स्वतः शेतकऱ्यासह १५ ते २० म्हशींचे प्राण वाचले. मात्र तरीदेखील पाणी पिण्यासाठी गेलेल्या चार म्हशींचा पाण्यात तुटून पडलेल्या वीजतारेमुळे उतरलेल्या वीजप्रवाहाचा धक्का लाहून मृत्यू झाला. ही घटना कर्जत शहरातील लेंडी नदीवर असलेल्या समर्थ बंधाऱ्यात घडली. मात्र या दुर्घटनेत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, … Read more

नागरिकांचा आ. पाचपुते यांना सवाल: ३५ वर्षे आमदार ११ वर्षांच्या मंत्रिपदाच्या काळात जे जमले नाही ते आता काय करणार?

Ahmednagar News : आमदार पाचपुते यांनी विधानसभा आल्या की श्रीगोंदा तालुक्यात एमआयडीसी करण्याची घोषणा करतात. मात्र प्रत्यक्षात ती केवळ घोषणाच ठरते. आता सुद्धा पाचपुते हे एमआयडीसीचे गाजर दाखवत आहेत. तसेच ती एक वर्षात होईल असे सांगत आहेत. मात्र ते पूर्ण होणार की पुन्हा गाजर दाखवणार हा देखील मोठा प्रश्न आहे. मात्र दुसरीकडे श्रीगोंदा तालुक्यात ३५ … Read more

तर तुम्ही भाजपमध्ये येऊन ‘त्यांची’ अडचण दूर करा; आमदार थोरात यांच्यावर टीका

Ahmednagar Politics : सोयीनुसार राजकारण करण्याची आ. थोरात यांची नीती संपूर्ण राज्याने पाहिली आहे. एकीकडे काँग्रेसचा निष्ठावान म्हणून मिरवून घ्यायचे आणि दुसरीकडे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या नेत्यांबरोबर हातमिळवणी करायची, तेव्हा भारतीय जनता पक्ष त्यांना अडचणीचा वाटत नाही. अशी टीका भाजपाचे संगमनेर शहराध्यक्ष ऍड. श्रीराम गणपुले यांनी माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर केली आहे. नुकतीच … Read more

‘लाडकी बहीण’नंतर आता ‘लखपती दीदी’ : जिल्ह्यातील ‘इतक्या’ हजार महिलांची झाली निवड

Ahmednagar News : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना आणली. तिला मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे. मात्र आता या पाठोपाठ लखपती दीदी योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील ७९ हजार ३५७ महिलांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या सुकाणू समितीची आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातील अकोले … Read more