अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अहिल्यानगर- जिल्ह्यातून सहा महिन्याकरिता हद्दपार असलेल्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस सावेडी उपनगरातून जेरबंद केले. योगेश नागनाथ पोटे (वय ३०, रा. काळुबाई मंदिराजवळ, वाणीनगर, पाईपलाईन रोड, सावेडी, ता. जि. अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात माती तपासणीसाठी १५ प्रयोगशाळा उभारल्या जाणार, दीड लाखांचे अर्थसाहाय्य मिळणार, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

अहिल्यानगर- राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटरिया अंतर्गत मृद आरोग्य व सुपीकता कार्यक्रम २०२५/२६ साठी २ लाख २२ हजार मृद नमुने तपासणीसाठी ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहेत. यासाठी सन २०२५/२६ चे राज्याच्या वार्षिक कृती आराखड्यामध्ये मान्यता आहे. सन २०२५/२६ च्या राज्यस्तरीय वार्षिक कृती आराखड्यामध्ये राज्यासाठी एकूण ४४४ नवीन ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी … Read more

अहिल्यानगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबांना १५ हजाराचा भाव, मोसंबीला मिळाला प्रतिक्विंटल ६ हजाराचा भाव

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सोमवारी विविध फळांची ३४४ क्विंटल आवक झाली होती. यावेळी मोसंबीला प्रतिक्विंटल ६ हजार रुपये, तर डाळिंबांना १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. दरम्यान, कालच्या तुलनेत डाळिंबांच्या भावात वाढ झाली. संत्र्यांना १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. अहिल्यानगर बाजार समितीत डाळिंबांची ४७ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील संशोधकांनी लावला नवीन प्रजातीचा शोध, नवीन प्रजातीची युरोपियन जर्नलमध्ये नोंद

अहिल्यानगर- अहमदनगर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागातील संशोधक प्रा. डॉ. अविनाश वंजारे आणि प्रा. प्रशांत कटके तसेच कॅनडामधील शास्त्रज्ञ डॉ. समीर पाध्ये यांनी सह्याद्रीमधून गोड्या पाण्यातील प्राण्याची (क्रस्टेशिया खेकडा, कोळंबी) एक नवीन प्रजाती शोधून काढली. अहिल्यानगर जिल्हा तसेच अहमदनगर महाविद्यालयासाठी हे अभिमानास्पद संशोधन आहे. पालघरमधील जव्हार पठारावर आढळणाऱ्या क्रस्टेशिया गटातील ही प्रजाती आहे. यास ‘फेअरी श्रिम्प’ असेही … Read more

अहिल्यानगरमध्ये थार गाडीतून बनावट नोटा घेऊन व्यवहार करायला निघालेल्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून पकडले

वाळकी- भारतीय चलनाच्या पाचशे रुपयांच्या हुबेहूब बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा तरुणांना नगर तालुका पोलिसांच्या पथकाने पकडले आहे. त्यांच्याकडून बनावट नोटा, महिंद्रा कंपनीच्या थार गाडीसह सुमारे १७ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नगर-सोलापूर महामार्गावर रुईछत्तीसी गावच्या शिवारात २७ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. … Read more

अहिल्यानगरमध्ये कारमधून गुटखा वाहतूक करणाऱ्याला पोलिसांनी पकडले, तीन लाख ९९ हजाराचा मुद्देमाल केला जप्त

अहिल्यानगर- कोतवाली पोलिसांनी रविवारी (दि. २७) रात्री मार्केट यार्ड आनंदधाम परिसरात सुगंधीत तंबाख व गुटख्याची विक्री करण्याचे उद्देशाने स्वतःचे कब्जात बाळगणाऱ्या एकाला पकडले. त्याच्याकडून साधारण ९० हजारांची सुगंधीत तंबाखू व गुटख्यासह मोटारकार असा सुमारे तीन लाख ९९ हजार ७१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रताप … Read more

शनिशिंगणापूर देवस्थानच्या माजी विश्वस्ताने गळफास घेत केली आत्महत्या, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

सोनई- शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी व माजी विश्वस्त नितीन सूर्यभान शेटे (वय ४२) यांनी राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सोमवारी, २८ जुलै रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. नितीन शेटे सध्या शनिशिंगणापूर देवस्थानाचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. … Read more

कुकडी प्रकल्पात १६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा, विसापूर १०० टक्के भरले तर घोड धरणात ९२ टक्के पाणीसाठा

अहिल्यानगर- यंदाच्या हंगामात शनिवारपर्यंत कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये १६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. सध्या धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणीसाठा येत्या काही दिवसात वाढेल. कुकडीच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत, पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा सुरवातीपासूनच पावसाचा चांगला जोर राहिला आहे. त्यामुळे धरणांतील डिंभे, … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील निळवंडे व मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात एकाच दिवसात १ टीएमसी पाण्याची आवक

अहिल्यानगर- नगर जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असल्याने निळवंडे व मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात दिवसभरात १ टीएमसीवर पाण्याची आवक झाली होती. भंडारदरा धरणात २४ तासांत ९३२ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. मुळा धरणात सध्या २१ हजार ७९६ दशलक्ष घनफूट म्हणजे ८१.५२ टक्के पाणीसाठा होता. धरणात कोतूळ येथून पाण्याची आवक ६५९२ … Read more

पाणलोटात पावसाचे तांडव सुरूच ; भंडारदरा धरण ८९ टक्के भरले: भात पिकाची झाली वाताहात

अहिल्यानगर : अहिल्यानगरची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या भंडारदरा पाणलोटात पावसाचे तांडव सुरुच असून भंडारदरा धरणामधून पाण्याचा विसर्ग आणखी वाढविण्यात आल्याची माहिती धरण शाखेकडून दिली.६ मे पासून भंडारदरा पाणलोटात सुरू झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नसून शनिवारी व रविवारी भंडारदऱ्याला पावसाने झोडपून काढले. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा हा ९८०० दलघफूट झाला असून भंडारदरा धरण ८८.७८ % भरले आहे. … Read more

जमिनीतून सोनं पिकवणारा जादूगार जगवा ; अन्यथा पिझ्झाप्रमाणे भाकरीही ऑनलाईन ऑर्डर करावी लागेल ?

अहिल्यानगर : शेतकरी म्हणजे कष्टाने माळरानात धान्य पिकवून जमिनीतून सोनं पिकवणारा जादूगार! मात्र, त्याची व्यथा व त्याचे कष्ट शेतकऱ्याच्या घरी जन्माला आल्याशिवाय समजत नाहीत. प्रॉपर्टी नव्हे तर जीव गहाण ठेवून केला जाणारा व्यवसाय म्हणजे शेती ! कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस असो वा ओल्याचिंब धारा. अशावेळीदेखील आपला हा सर्जा राजा शेतात राबत … Read more

आज पहिला श्रावण सोमवार ; नाथ संप्रदायाचे उगमस्थान असलेल्या श्रीक्षेत्र वृद्धेश्वर या स्थानाबद्धल जाणून घ्या तुम्हाला माहित नसणाऱ्या ‘या’ खास बाबी

अहिल्यानगर : श्रावण महिन्यानिमित्त नाथ संप्रदायाचे उगमस्थान असलेल्या श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे सध्या भाविकांच्या स्वागताला निसर्ग सर्व बाजूंनी फुलला असून निसर्गाशी मुक्त संवाद साधण्याला व स्वयंभू महादेवाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी सुरू झाली आहे. दुर्मिळ वनौषधींसाठी वृद्धेश्वर डोंगररांगांचा परिसर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. नाथ संप्रदायाचे उगमस्थान म्हणून वृद्धेश्वराकडे बघितले जाते. येथे स्वयंभू शिव पिंडी असून पिंडीच्या मध्यभागातून अहोरात्र … Read more

अशोक आहुजा आणि अरुण मुंढे यांचे मनोमिलन : आमदार मोनिका राजळे यांची डोकेदुखी वाढली

अहिल्यानगर : भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर तसेच शेवगाव शहर व तालुक्यावर लोकप्रतिनिधींकडून अन्याय होत असून शहर व तालुक्याला कोणी वाली राहीलेला नाही. त्यामुळे आगामी काळात शेवगावचे प्रश्न व मुळ भाजप कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आपसातील मतभेद विसरुन एकत्र काम कऱण्याचा निर्णय घेतल्याचा माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक आहुजा व भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंढे यांनी … Read more

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक बिनविरोध ;दुधापासून इतर पदार्थ निर्मिती करून दूध संघाला बळकटी देणार : नागवडे

अहिल्यानगर : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून दुधापासून इतर पदार्थांची निर्मिती करून दूध संघाला बळकटी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संघाचे मार्गदर्शक संचालक व सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी जाहीर केले. राजेंद्र नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी दूध उत्पादक संघाच्या सन २०२५ ते … Read more

टोमॅटो उत्पादक शेतकरी ‘लालेलाल’; शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे मोल मिळाले

अहिल्यानगर : टोमॅटोच्या भावात मात्र चांगलीच वाढ झाल्याचे दिसून आले आहे सध्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना शेतात उभा शेतमाल विक्रीसाठी बाजारात आणणे शक्य होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मालाचे नुकसान देखील होत आहे. मात्र खूप कालावधीनंतर शेतकऱ्यांना समानाधारक भाव मिळाला आहे . नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी विविध भाजीपाल्याची २३५३ … Read more

पंतप्रधान मोदीनी मन की बात मधून ऐतिहसिक घटनेचा आनंद द्विगुणीत केला-ना.विखे पाटील

अहील्यानगर दि.२७ प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमात राज्यातील गड किल्ल्यांची जागतिक वारसा स्थळांमध्ये झालेल्या ऐतिहसिक नोंदीचा उल्लेख राज्यातील शिवप्रेमीचा आनंद द्विगुणीत करणारा असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम मंत्री विखे पाटील यांनी अहील्यानगर येथे जनसंपर्क कार्यालयात पदाधिकारी आणि … Read more

सेवा सहकारी सोसायट्यांचे सक्षमीकरण हेच 2047 च्या विकसित भारताचे सूत्र : राधाकृष्ण विखे पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर झालेल्या राष्ट्रीय सहकार धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी आणि सचिवांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी सरकार पूर्ण पाठबळ देईल, अशी ग्वाही जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. अकोले येथे स्वाभीमानी विविध कार्यकारी सहकारी सेवा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा खंड, श्रावणातही पावसाने फिरवली पाठ, शेतकरी दुबार पेरणीच्या चिंतेत

अहिल्यानगर- श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या असल्या, तरी पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा खूपच कमी राहिले आहे. २५ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी १८६.८ मिमी पावसाची नोंद अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ १२४.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे सुमारे ६२ मिमी इतकी तूट निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेतही यंदा कमी पाऊस गेल्या वर्षी श्रावण … Read more