अहिल्यानगरच्या सहा आमदारांसह 3,000 जणांकडे शस्त्र परवाना ! शस्त्र परवान्यासाठी काय करावे लागते ?

अहिल्यानगर: नगर जिल्ह्यात शस्त्र परवान्यांची संख्या वाढत असून, 3,087 व्यक्तींनी आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना घेतला आहे. यामध्ये वकील, राजकारणी, व्यापारी, उद्योजक, फायनान्स व्यावसायिक आणि शेतकरी यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सहा आमदारांकडेही अधिकृत शस्त्र परवाना असल्याची नोंद आहे. नगर जिल्ह्यात शस्त्र परवान्यांचा वापर वाढत असून, 3,087 नागरिकांनी अधिकृत शस्त्र परवाने घेतले आहेत. यामध्ये वकील, राजकारणी, व्यापारी, उद्योजक, … Read more

देशातील एक नंबरचा धबधबा : विकासाच्या प्रतीक्षेत, स्थानिक संतापले

साताऱ्यातील भांबवली-वजराई धबधबा, देशातील एक नंबरचा धबधबा म्हणून प्रसिद्ध असला तरी, आजही मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. २०१८ साली ‘क’ वर्ग दर्जा मिळाल्यानंतरही धबधब्याच्या विकासासाठी कोणताही ठोस प्रयत्न झालेला नाही. परिणामी, पर्यटक आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यातून नाराजीचा सूर उमटत आहे. सोयींचा अभाव पर्यटकांना धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन किलोमीटरचा रस्ता जंगलातून चालत पार करावा लागतो. मात्र, रस्ता व्यवस्थित … Read more

सिद्धटेकला जे घडले ते अहिल्यानगरमध्ये घडेल – आमदार संग्राम जगताप

अहिल्यानगर: आपल्या मंदिरांसमोर थडगे उभारायचे आणि हळूहळू पाय पसरायचे आणि नंतर वक्फ बोर्ड हक्क सांगणार. सिद्धटेक नंतर बालिकाश्रम रस्त्यावरील थडगे काढण्यासाठी महापालिकेकडे पत्र व्यवहार केला आहे. ३१ तारखेच्या आत काढले नाही तर सिद्धटेकला जे घडले ते अहिल्यानगरमध्ये देखील घडेल. आपल्या धर्माचा योग्य विचार व प्रचार समाजामध्ये घेऊन जाण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे. धर्माच्या माध्यमातून … Read more

Ladki Bahini Yojana : अहिल्यानगरच्या १२ लाख महिलांसाठी महत्वाच्या बातमी ! पडताळणीचे आदेश…

अहिल्यानगर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्ह्यातील सुमारे १२ लाख महिलांसाठी मोठा दिलासा ठरली आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर अर्जांची फेरपडताळणी होणार असल्याच्या चर्चांमुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, योजनेच्या अर्जांची फेरपडताळणी करण्याचे कोणतेही अधिकृत आदेश नाहीत. त्यामुळे लाभार्थी महिलांना नियमीत हप्ता मिळतच राहणार आहे. महिलांसाठी महत्त्वाची योजना माझी लाडकी … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात जलजीवन मिशन अपूर्ण ! आगामी निवडणुकीत…

‘हर घर नल से जल’ हे उद्दिष्ट गाठण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जलजीवन मिशन योजनेचा जिल्ह्यात अद्याप अपूर्ण कारभार उघडकीस आला आहे. मार्च २०२४ पर्यंत ही योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असले, तरी ८३० पैकी फक्त २१० योजना पूर्ण झाल्या आहेत. कामांमध्ये प्रगतीचा अभाव आणि सततच्या तक्रारींमुळे या योजनेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता जिल्हा परिषद (झेडपी) … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील एक गाव जिथे मागील ३० वर्षांपासून निवडणुका होतायेत बिनविरोध

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिरापूर हे सुमारे ४ हजार लोकवस्तीचे गाव, गेल्या ३० वर्षांपासून शांततेचा आणि एकतेचा आदर्श निर्माण करत आहे. ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध होणे ही या गावाची खासियत ठरली आहे. गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे निवडणुकांमुळे होणारे वाद, भांडणं किंवा द्वेषभावना येथे आढळत नाहीत, यामुळे शिरापूरमध्ये सलोख्याचे वातावरण आहे आणि विकासाला प्राधान्य दिले … Read more

अहील्यानागर हादरले !अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या ! पोलिसात हजर होऊन खुनाची…

श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे तरुणाने अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची लाकडी दांडक्याने मारहाण करत हत्या केली तर मारहाण करताना मधे पडलेल्या आईला देखील बेदम मारहाण केल्याची घटना शनिवार दि. १८ रोजी रात्री उशिरा घडली. प्रियंका करण दिवटे (वय २२) असे मारहाणीत मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर आशा नवनाथ दिवटे (वय ४५) ही महिला जखमी झाली. … Read more

शिर्डी येथे होणारे राष्ट्रीय अधिवेशन दिशा देणारे ठरेल : आ. दाते

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात महायुतीचे चांगले वातावरण निर्माण झाले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महायुतीची सत्ता यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कटिबद्ध होत आतापासूनच नियोजन करावे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढावी, संघटन वाढावे यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. शिर्डी येथे होणारे राष्ट्रीय अधिवेशन हे पक्ष विस्तारासाठी नवी दिशा देणारे ठरेल. असे प्रतिपादन पारनेरचे … Read more

‘त्या’ परिसरात अजूनही चार बिबटे ! वनविभागाने लावले पुन्हा दोन पिंजरे

अहिल्यानगर : नगर तालुक्यातील भोरवाडी गावच्या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वावर असलेल्या पाच बिबट्‌यांच्या पैकी एक बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी (१५ जानेवारी) रात्री जेरबंद झाला आहे. जेरबंद झालेला हा बिबट्‌याचा अंदाजे दीड वर्षाचा बछडा असून अजूनही या परिसरात नर, मादी बिबट्यासह दोन बछड्यांचा वावर असल्याचे वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात दिसून आले आहे. त्यामुळे … Read more

साईच्या नगरीत आजपासून राष्ट्रवादीचे मंथन शिबीर ! अजित पवार यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकारी यांची उपस्थिती

दिशा विकासाची.. पुरोगामी विचाराची हे ब्रीदवाक्य व नवसंकल्प घेऊन २०२५ या वर्षभरात सामाजिक समता, विकासाच्या वेगवेगळ्या दिशा, पक्ष संघटन मजबूत करणे यासह इतर विषयांवर मंथन करण्याकरिता साईबाबांची पुण्यभूमी शिर्डी नगरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय पदाधिकारी शिबिर आजपासून सुरू होत आहे. या शिबिरास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासह पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार … Read more

Ahilyanagar News : नरभक्षक बिबट्या जेरबंद, हल्ल्यात मुलीचा मृत्यू

टाकळी ढोकेश्वर : संगमनेर येथील वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने खडकवाडी येथील नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे. बिबट्या नर जातीचा आहे. खडकवाडी गावातील गणपती मळा परीसरात या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वन विभागाने शुक्रवारी सकाळपासून युद्धपातळीवर मोहीम सुरु केली होती. अखेर दुपारी ३.३० वाजता त्यास जेरबंद करण्यात यश आले. दरम्यान, त्या अगोदर काल खडकवाडी येथे … Read more

Plastic Tea Cup : प्लास्टिक कपातून चहा पिणे योग्य आहे का ? वाचा काय आहेत परिणाम ?

प्लास्टिक कपामध्ये चहा किंवा कोणतेही गरम पेय प्यायल्याने प्लास्टिकचे कण त्यात विरघळू लागतात. काही प्लास्टिक कप बिस्फेनॉल सारख्या हानिकारक रसायनांचा वापर करून तयार केले जातात, जे पेयांमध्ये विरघळतात व थेट शरीरात जाऊ शकतात. त्यामुळे प्लास्टिक किंवा पेपर कपमध्ये कोणतेही गरम पेय पिणे आरोग्यास हानिकारक आहे. कोणत्याही स्टॉल व बऱ्याच ठिकाणी सध्या प्लास्टिक कप्सचा वापर केला … Read more

शेवगाव तालुक्यातील १२ गावांमध्ये आनंदोत्सव, शेतकरी सुखावले

शेवगाव तालुक्यातील जवळपास १० ते १२ गावांना वरदान ठणाऱ्या पैठण उजवा कालव्यातून बुधवार (दि. १६) रोजी कालवा समितीने ठरवून दिलेले चालू हंगामातील दुसरे आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जायकवाडी पैठण धरणाची निर्मिती होताना शेवगाव तालुक्यातील असंख्य गावांना विस्थापित व्हावे लागले असून तालुक्यातील शेकडो हेक्टर जमिनीचे काळे भोर क्षेत्र धरणामध्ये गेले असून सुद्धा … Read more

राहुरी तालुक्यात बिबट्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक ! २५० पेक्षा जास्त बिबट्यांचा वावर

Ahilyanagar News : राहुरी तालुक्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे मानवहानी व पशुधन हानीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजीत पवार तसेच तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना पत्र लिहून जिल्हा नियोजन समितीकडून निधी मंजूर करण्याची मागणी पूर्वीच केलेली आहे. सद्यस्थितीत राहुरी तालुक्यात २५० … Read more

Jal Jeevan Mission :जलजीवन योजनेचे भवितव्य धोक्यात ! राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक अडथळे

Ahilyanagar News : राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द-चिंचोली जलजीवन योजना सातत्याने अडचणींचा सामना करत असल्याने योजनेचे भवितव्यच पाण्यात गेल्यासारखे वाटत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे ही योजना राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेची बळी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे कोल्हार खुर्द-चिचोली संयुक्त पाणीपुरवठा योजना केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेतून … Read more

‘एमआयडीसी’मध्ये उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणार – आमदार हेमंत ओगले

श्रीरामपूर : एमआयडीसी मधील प्रश्नाबाबत आपण गंभीर असून मोठे उद्योग श्रीरामपूरात कसे येतील, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केले. येथील एमआयडीसीतील कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत नुकतेच उद्योजकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आमदार ओगले म्हणाले की, २२० केव्हीचे उच्च दाब वीज स्टेशनचे काम लवकरच चालू होणार असून यासाठी आपण महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव … Read more

Ahilyanagar Crime : युवकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime : जुन्या भांडणाचा मनात राग धरून ८ जणांनी एका युवकास दुचाकी आडवी घालून शिवीगाळ दमदाटी करीत लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने व दगडाने बेदम मारहाण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना भिंगार परिसरात घडली. याप्रकरणी फिर्यादीनुसार पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अक्षय संजय हांपे (वय २९, रा. सौरभनगर, भिंगार) हा १० जानेवारीला … Read more

दिल्लीत विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास देऊ – केजरीवाल मेट्रोत ५० टक्के सूट देण्यासाठी मोदींना लिहिले पत्र

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजप व सत्तारूढ आम आदमी पक्षाकडून (आप) अक्षरशः आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे. यात, महिलांना दरमहा आर्थिक मदत, ३०० युनिट वीज मोफतसह अनेक आश्वासनांचा समावेश आहे. याच घटनाक्रमात आता आपने दिल्लीची सत्ता मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास देण्याचे वचन दिले आहे. तसेच मेट्रो रेल्वेत विद्यार्थ्यांना ५० टक्के सूट … Read more