जमावाच्या हल्ल्यात सख्ख्या भावांचा मृत्यू पोलिसांकडून सहा संशयित ताब्यात

आष्टी : जमावाने लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने तीन सख्ख्या भावांवर जीवघेणा हल्ला केला. यात दोन भावांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. खळबळ उडवून घेणारी ही घटना तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत … Read more

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी भू-सर्वेक्षणाचे आदेश ! नाशिक जिल्ह्यातील २१ गावांमध्ये सुरू होणार प्रक्रिया

नाशिक  विलास पवार: मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी संपादित करावयाच्या जमिनींसाठी नांदगाव आणि मालेगाव तालुक्यातील २१ गावांत सर्वेक्षण सुरू करण्याचे निर्देश रेल्वे विभागाने दिले आहेत. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणारा हा रेल्वेमार्ग नाशिक आणि धुळे जिल्ह्यातून जाणार असून, पहिल्या टप्प्यात बोरविहीर-नरडाणादरम्यान जमिनींचे भूसंपादन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात नांदगाव आणि … Read more

बांगलादेशने लादले १० टक्के आयात शुल्क लासलगावी लाल कांदा घसरला

बांगलादेशमध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने बांगलादेश सरकारने स्थानिक कृषीमालास योग्य दर मिळावा, यासाठी कांदा आयातीवर १० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांद्याचे दर आणखी पडण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. कांदा दरातील घसरण थांबवण्यासाठी शेतकरी आणि निर्यातदार कांद्याच्या निर्यातीवरील २० टक्के शुल्क रद्द करण्याची मागणी करीत आहेत. भारतातून एकूण … Read more

गुड न्यूज ! दोन नवीन वंदे भारत ट्रेनची घोषणा, मुंबई आणि पुणेसाठी…

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण लवकरच मुंबई आणि पुणेसाठी दोन नवीन वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने या प्रस्तावाला केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवले आहे. या दोन ट्रेनमुळे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि जलद होणार आहे. लवकरच अमरावतीहून मुंबई आणि पुणेसाठी दोन नवीन वंदे भारत … Read more

MSRTC News : दरवर्षी 5000 नवीन लालपरी बसेस ! प्रत्येक आगारात चार्जिंग स्टेशन उभारणी,असे आहेत महत्वाचे निर्णय

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळ दरवर्षी 5000 नवीन लालपरी बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली. या खरेदीसाठी पंचवार्षिक योजना तयार करण्यात येईल. प्रवासी सेवेतून स्क्रॅप होणाऱ्या बसेसच्या जागी नवीन बसेसची भर घालण्यावर भर दिला जाणार आहे. भाडेतत्त्वावर बसेस न घेण्याचा महत्त्वाचा निर्णय महामंडळाने भविष्यात भाडेतत्त्वावर बसेस घेणार नाही, असा ठोस निर्णय बैठकीत … Read more

8th Pay Commission: मोदींचा अनपेक्षित निर्णय, कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी देत सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय अजेंड्यावर नव्हता, तरीही या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. 50 लाख कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा निर्णय केंद्र सरकारच्या 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांच्या पगारवाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सरकारी … Read more

Shirdi Breaking : शरद पवार गटाला मोठा धक्का ! शिर्डीत होणार ‘त्या’ आमदारांचा पक्षप्रवेश

शरद पवार गटाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण पुन्हा अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण याआधीच विधानसभा निवडणुकीच्या काळात सतीश चव्हाण यांनी अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केला होता. आता मात्र ते पुन्हा अजित … Read more

एक महिना चहा पिलं नाही तर शरीरात काय काय बदल होतात ?

चहा हा तसा सर्वांच्याच आवडीचा विषय आपल्या देशात जवळपास ९० टक्के लोक चहा हे आवडते पेय म्हणून सेवन करतात. पहाटे उठल्यापासूनच काहींना गरमागरम चहाची तलफ लागते, तर अनेक जण दिवसाला दहा-दहा कप चहा घेतात. दिवसभर ऊर्जा मिळवण्याचे साधन म्हणून चहाकडे पाहणे काही अंशी योग्य असले तरी, या पेयात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्याला धोका निर्माण … Read more

Tata IPO 2025 : देशातील सर्वात मोठा IPO आणणार टाटा ग्रुप

टाटा समूहाची होल्डिंग कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाटा सन्स ने आपल्या NBFC (Non-Banking Financial Company) नोंदणी रद्द करण्यासंबंधी अर्ज दाखल केल्याचे बँकिंग नियामक आरबीआय ने सांगितले आहे. यामुळे टाटा सन्सच्या आयपीओबाबत पुन्हा चर्चेला वेग आला आहे. कारण, जर टाटा सन्सची NBFC अप्पर लेयर वर्गवारी रद्द झाली नाही, तर नियमानुसार कंपनीला सप्टेंबर २०२५ पर्यंत होल्डिंग कंपनीचे … Read more

Vinod Kambli Wife : विनोद कांबळीची पत्नी काय काम करते ? वाचून बसेल धक्का

भारतीय क्रिकेटमधील वादग्रस्त आणि तितकेच चर्चित नाव म्हणजेच विनोद कांबळी त्यांच्या पहिली पत्नी कोण, त्या आता काय करतात, याबद्दल अनेकांना कुतूहल आहे. काही दिवसांपासून विनोद कांबळीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा रंगल्या आहेत. विनोदचे नाते दुसऱ्या पत्नीशी असल्याने पहिली पत्नी वेगळी राहते. पण पहिली पत्नी तरी सध्या काय करते, याबद्दलची माहिती आता समोर आली आहे. विनोदने धर्मपरिवर्तन … Read more

Property Card : अहिल्यानगर जिल्ह्यातील ८ हजार मालमत्ता पत्रक ! ड्रोनच्या सहाय्याने सर्व्हेचे कामकाज पूर्ण

अहिल्यानगर : स्वामित्व योजनेच्या अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील ८ हजार मालमत्ता पत्रकाचे अभासी वितरण शनिवारी (दि. १८) पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह, अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे. विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे व राज्याचे जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती भूमिअभिलेख प्रभारी जिल्हा अधिक्षक अविनाश … Read more

पैसे दिले नाही म्हणून सासरच्या लोकांकडून मारहाण ! पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime News : मिळालेले पैसे पत्नीला दिले नाहीत, या कारणावरून राहुरी तालुक्यातील मानोरी येथे ७ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास किरण कारभारी मकासरे (वय ३०) यांना सासरच्या लोकांनी शिवीगाळ करत लोखंडी टामी, लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे किरण मकासरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी ७ जानेवारी … Read more

Ahilyanagar BJP :कोण होणार अहिल्यानगर भाजपचे अध्यक्ष ? ही नावे आहेत चर्चेत

Ahilyanagar News : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपमध्ये आता संघटनात्मक बदलावर भर दिला जात आहे. शहर जिल्हाध्यक्षांसह दक्षिण व उत्तर जिल्हाध्यक्ष बदलण्याची तयारी सुरू असून, या पदांसाठी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. सत्ता स्थापनीनंतर भाजपने ‘संघटनात्मक पर्व २०२५’ हाती घेतले आहे, ज्याअंतर्गत नव्या निवडी केल्या जाणार आहेत. पहिल्यांदाच शहर व जिल्हा पातळीवरील नियुक्तीनंतर थेट … Read more

अहिल्यानगरसह राज्यात १८ नवी रुग्णालये ! आरोग्य सेवा आणखी मजबूत होणार

Ahilyanagar News : राज्यातील कामगारांसाठी आरोग्यसेवा पुरवणारी राज्य कामगार विमा सोसायटी (ESIC) पुढील काळात १८ नवी रुग्णालये उभारणार आहे. या रुग्णालयांसाठी जमीन संपादन प्रक्रिया सुरू झाली असून, रायगडमध्ये सर्वाधिक चार, तर छत्रपती संभाजीनगर व पुणे येथे प्रत्येकी दोन अशा रुग्णालयांचा समावेश आहे. त्याचबरोबर पालघर, सातारा, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, वर्धा, अमरावती, सांगली, रत्नागिरी व चंद्रपूर येथे … Read more

हवामान बदलाचा फटका गावरान आंब्याला, मोहोर कमी झाल्यामुळे उत्पादनावर परिणाम

Ahilyanagar News.: गेल्या तीन-चार वर्षांच्या तुलनेत यंदा गावरान आंब्याला म्हणावा तसा मोहोर आला नाही. सतत बदलत्या हवामानामुळे आणि अवकाळी पाऊस व धुक्यामुळे मोहोर गळून गेला, तर काही ठिकाणी मोहर जागीच जळाला. त्यामुळे गावरान आंब्याची फूट कमी झाली असून, यंदा आंब्याची चवही कमी प्रमाणात मिळणार आहे. धुक्याचा बसला फटका डिसेंबर महिन्यात विशेषतः ढगाळ हवामान व धुके … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चांदी ! ४५ रुपये किलोने विकतायेत संत्री

Ahilyanagar News :पाथर्डी तालुक्यातील संत्री उत्पादक शेतकऱ्यांना सध्या उत्तम दर मिळत आहेत. विदर्भातील व्यापाऱ्यांनी या भागातील संत्री खरेदी करून केरळ, बेंगळुरू, चेन्नई, कर्नाटक, गुजरात आदी राज्यांमध्ये पाठवण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक व्यापारी २५ ते ३० रुपये किलो दराने संत्री घेत असताना, विदर्भातील व्यापारी मात्र ४० ते ४५ रुपये किलो दराने माल खरेदी करीत आहेत. त्यामुळे … Read more

Tata Punch EMI : एक लाख भरा आणि घरी न्या टाटा पंच ! पहा किती भरावा लागेल EMI

टाटा मोटर्सची लोकप्रिय SUV, टाटा पंच सध्या भारतीय ऑटोमोबाईल बाजारात हिट ठरली आहे. दमदार फीचर्स, सुरक्षितता आणि आकर्षक किंमत अशा अनेक कारणांमुळे ग्राहकांच्या मनावर ‘टाटा पंच’ने अधिराज्य गाजवले आहे. जर तुम्हीही टाटा पंच खरेदीचा विचार करत असाल, तर केवळ ₹1 लाख डाऊन पेमेंट करून कार कशी मिळवता येईल आणि किती EMI लागेल, याबद्दल जाणून घेऊया. … Read more

Railway Stocks : अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठ्या घोषणा होणार ! रेल्वे कंपन्यांच्या शेअरमध्ये झाले बदल

Railway Stocks : केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी रेल्वे क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार असून, रेल्वेसाठी 15 ते 18 टक्क्यांनी वाढीव तरतूद केली जाऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे 2.9 ते 3 लाख कोटी रुपयांपर्यंत निधीची घोषणा होण्याची शक्यता आहे, … Read more