सोने-चांदी का महागले आहे ?

१४ जानेवारी २०२५ : चीनमध्ये महागाई शून्य टक्क्यावर जाऊनही मागणी वाढत नाही. अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विविध देशांसंदर्भात आक्रमक वक्तव्य करत आहेत. अशा परिस्थितीत जागतिक तणाव वाढण्याच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीचे खरेदी करीत आहेत. मागणीत वाढ झाल्याने सोन्याच्या दरात बरीच वाढ होत आहे. नजीकच्या भविष्यात शेअर बाजारातून सकारात्मक परताव्याची लक्षणे … Read more

शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करा ! मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, पर्यटन व धार्मिक स्थळांना जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे सूचित

१४ जानेवारी २०२५ मुंबई : राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी त्याचसोबत पर्यटनाला व्यापक प्रमाणात गती देणाऱ्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे आगामी शंभर दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला.त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देशित … Read more

जागतिक बाजारपेठेमुळे खाद्यतेलाच्या किमतीत वाढ

१४ जानेवारी २०२५ मुंबई : वाढलेले कर आणि जागतिक बाजारपेठेच्या प्रभावामुळे खाद्य तेलाच्या किमती १३ टक्के वाढल्या आहेत.देशांतर्गत उत्पादनाला प्राधान्य देणे आणि नागरिकांना विविध उत्पादने परवडण्यासारख्या दरात मिळावीत, या दोन बाबींचा काटेकोर समतोल साधत देशाच्या अर्थव्यवस्थेला पावले टाकावी लागतात.खाद्य तेलावरील आयातकरात नुकतीच झालेली वाढ हे अशा समतोल साधण्याचे उत्तम उदाहरण आहे. कारण देशातील शेतकऱ्यांना साह्य … Read more

मोदींच्या हस्ते आज ‘मिशन मौसम ‘चे उद्घाटन

१४ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या (आयएमडी) १५० व्या स्थापना दिनाच्या औचित्यावर ‘मिशन मौसम’चे उद्घाटन करणार आहेत.हवेच्या गुणवत्तेबाबतची आकडेवारी गोळा करण्यात या मिशनमुळे मदत होणार आहे. दिल्लीतील भारत मंडपमध्ये सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ‘मिशन मौसम’चे उद्घाटन केल्यानंतर मोदी उपस्थितांना संबोधित करतील.शिवाय याप्रसंगी ते हवामान विभागाने तयार … Read more

पंतप्रधान उद्या मुंबई दौऱ्यावर ; मोदींच्या हस्ते होणार तीन युद्धनौका, एका पाणबुडीचा नौदलात समावेश

१४ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : नौदलात १५ जानेवारीला दोन स्वदेशी युद्धनौका आणि एक डिझेल-विद्युत पाणबुडी यांचा समावेश करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यात मुंबईतील नौदलाच्या गोदीत या तीन युद्धनौका देशाला समर्पित करतील.स्वदेशी संरक्षण साहित्य निर्मिती आणि सागरी सुरक्षेच्या बाबतीत आघाडी घेण्याच्या भारताच्या वाटचालीतील हा मैलाचा दगड असेल. आयएनएस सुरत … Read more

४ मुले जन्माला घाला, २ लाख रुपये बक्षीस देतो ! मध्य प्रदेश सरकारच्या परशुराम कल्याण मंडळाच्या अध्यक्षांची अजब घोषणा

१४ जानेवारी २०२५ इंदौर : मध्य प्रदेश सरकारच्या परशुराम कल्याण मंडळाचे अध्यक्ष पंडित विष्णू राजोरिया यांनी ब्राह्मण समुदायाला चार मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे.चार मुले जन्माला घालणाऱ्या दाम्पत्याला १ लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा देखील त्यांनी केली. मात्र यावरून वाद निर्माण होताच ही सरकारी योजना नसून आपण वैयक्तिकरीत्या बक्षीस देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. … Read more

…तर राज्य बंद पाडू : जरांगे पाटील ; मस्साजोगमध्ये दाखल होत मनोज जरांगेंनी काढली धनंजय देशमुख यांची समजूत

१४ जानेवारी २०२५ केज : प्रशासनाने आणि सरकारने आरोपी नव्हे तर देशमुख कुटुंबाला सांभाळायला हवे.मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आणि धनंजय देशमुख कुटुंबीयांना शब्द दिला होता की, खंडणीतील आणि खुनातील आरोपींना सोडले जाणार नाही.आता मुख्यमंत्र्यांनी थेट कारवाई करून दाखवावी.या प्रकरणातील आरोपी सुटले तर आम्ही त्यांचे जगणे मुश्कील करू,राज्य बंद पाडू,असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. मस्साजोग … Read more

जलजीवन योजना जनतेसाठी की अधिकारी, ठेकेदारांसाठी ? खा. लंकेंचा कारवाईचा इशारा

१४ जानेवारी २०२५ राहुरी शहर : जलजीवन योजना ही जनतेच्या सेवेसाठी आहे की अधिकारी ठेकेदारासाठी आहे, हेच समजत नाही. त्यासाठी या प्रश्नावर संसदेच्या येत्या २९ जानेवारी रोजी होणाऱ्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असून जलजीवन योजनेची चुकीची बिले काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी खासदार निलेश लंके यांनी दिला. राहुरी तालुक्यात घेतलेल्या आढावा बैठकीत … Read more

शिर्डीत अज्ञात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

१४ जानेवारी २०२५ शिर्डी : शहरातील नगर-मनमाड रस्त्याजवळ असलेल्या फुल मार्केट जवळील एका शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन एका अज्ञात इसमाने आत्महत्या केल्याची घटना १३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली.याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी,की मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५० ते ५५ असून त्याने पांढरा हाफ शर्ट आणि पॅन्ट परिधान केली होती. त्याच्या हातावर ‘सुवर्णा’ असे … Read more

महाविकास आघाडीतील नेत्यांचा समन्वयावर भर ; संवादाचा अभाव असल्याच्या भूमिकेनंतर शरद पवार-संजय राऊतांची भेट

१४ जानेवारी २०२५ मुंबई : विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांत समन्वय व संवादाचा अभाव दिसून आला आहे.विधानसभा निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकही संयुक्त बैठक झालेली नाही. २०१९ मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती संवाद न झाल्यानेच तुटली होती,याची आठवण शिवसेनेने करून दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना (ठाकरे) … Read more

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण ? तरुण नेत्यांनी जबाबदारी स्वीकारण्यास दिला नकार

१४ जानेवारी २०२५ मुंबई : विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या अपयशानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी काँग्रेसला राज्यात नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.काँग्रेस हायकमांडकडून राज्यात नेतृत्व बदलाला मान्यता मिळाली असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव त्यासाठी आघाडीवर असल्याचे समजते. तरुण फळीतील नेत्यांनी अडचणीच्या काळात राज्याची जबाबदारी … Read more

मित्राशी बोलून बाहेर गेला तरुण ; त्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून

१३ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : पत्नीशी भांडण झाल्यामुळे मित्राच्या रुमवर राहत असलेला एक तरुण मित्रासोबत बोलून बाहेर गेला.तो परत आलाच नाही. त्याचा दगडाने ठेचून निघूण खून झाल्याचे दुसऱ्या दिवशी सकाळी समोर आले.ही घटना नागापूर एमआयडीसी परिसरात शनिवारी (दि.११) सकाळी उघडकीस आली. अश्विन मारुती कांबळे (वय ३२, रा. गणेशनगर, एमआयडीसी, मूळ रा. निपाणी, बेळगाव, कर्नाटक) असे … Read more

आघाडी कशीही लढो,आम्हाला चिंता नाही ! विखे पाटील यांचा आत्मविश्वास ; निगेटिव्ह नॅरेट अल्पकाळ टिकले

१३ जानेवारी २०२५ शिर्डी : विधानसभेला महाविकास आघाडीतील तीनही पक्षाला जनतेने नाकारले आहे.ते आता निवडणुका स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, त्याची आम्हाला चिंता नाही,अशा शब्दांत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या स्वबळाच्या घोषणेवर भाष्य केले.शिर्डीत भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे.अधिवेशन स्थळाचा आज विखे पाटील यांनी आढावा घेतला.त्या वेळी ते बोलत होते. … Read more

सौंदाळा येथील महादेव मंदिरातून मूर्त्यांची चोरी

१३ जानेवारी २०२५ भेंडा : नेवासे तालुक्यातील सौंदाळा आणि परिसरात आजपर्यंत विविध ठिकाणी अनेक चोऱ्या झाल्या आहेत.त्यात घरफोड्या, मोबाईल चोऱ्या, दुचाकी चोऱ्यांचा समावेश असून,अशा अनेक घटना घडत असतानाच चोरांनी महादेव मंदिरात गणपतीची मूर्ती आणि शिव लिंगावरील पार्वती माता या दोन मूर्तीची मंदिरातून चोरी झाली. या मूर्तीची चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला आहे व … Read more

कुकडीचे पाणी पठारी भागावर आणा दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांचे विखे यांना साकडे

१३ जानेवारी २०२५ निघोज : कुकडीचे पाणी पठारावर आणण्यासाठी गेल्या ५० वर्षांपासून प्रयत्न करणाऱ्या पारनेर तालुक्यातील पठार भागातील दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.कान्हूर पठार परिसराला कायम पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने सातत्याने दुष्काळी परिस्थिती असते. उन्हाळ्यात राज्य सरकार टँकरच्या माध्यमातून पिण्याचे पाणी उपलब्ध करून देते.त्यासाठी आज अखेर शासनाने कोट्यवधींचा … Read more

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजितदादा भडकले ; माध्यम प्रतिनिधींना सुनावले खडेबोल

१३ जानेवारी २०२५ पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून केल्याच्या प्रकरणात राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापलेले पाहावयास मिळाले. पुण्यातील स्वस्तिक पॉलिक्लिनिक अॅण्ड डायग्नोस्टिक सेंटरचा उद्घाटन समारंभ रविवारी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे झाला.याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या … Read more

सरकार राज्यात परवडणारी घरे बांधणार : एकनाथ शिंदे

१३ जानेवारी २०२५ ठाणे : राज्यात सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे बांधण्याचा आमच्या सरकारचा संकल्प आहे,असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले.रेमंड कंपनी आणि सुपर क्लब आयोजित ‘ऑटोफेस्ट-२०२५’ या ऑटो कार फेस्टिव्हलचे उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.त्या वेळी ते बोलत होते.परदेशातील वाहनांच्या पूर्णनिर्मितीचे काम आपल्या येथे सुरू होईल. यामुळे येथील नागरिकांना नोकऱ्या आणि रोजगार उपलब्ध होईल,असे … Read more

आता पुढील महाविजयासाठी लढा ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी फडणवीसांचा कार्यकर्त्यांना सल्ला

१३ जानेवारी २०२५ शिर्डी: लोकसभेला ४८ पैकी १७ जागा मिळून आपण काठावर पास झालो होतो; परंतु मनात मात्र नापास झाल्याची भावना होती. हे अपयश पुसण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी काम केले, म्हणून महायुती राज्यात विक्रमी २३७ जागा मिळवू शकली. यात महायुतीला ८२ टक्के मते तर भाजपला ८९ टक्के मते मिळाली.हा महाविजय जनता जनार्दनाबरोबर कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे साकारला आहे.आता … Read more