बाळासाहेब थोरात व अभिषेक कळमकर यांचाही ईव्हीएम पडताळणी अर्ज मागे

८ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : विधानसभेच्या राहुरी मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी ईव्हीएम पडताळणीचा अर्ज मागे घेतल्यानंतर आता संगमनेर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि अहमदनगर शहर मतदार संघातून पराभूत झालेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांनी देखील ईव्हीएम पडताळणीचा अर्ज मागे … Read more

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला ! साईभक्तांबद्दल प्रचंड आदर : माजी खा. डॉ. सुजय विखे

८ जानेवारी २०२५ शिर्डी : साईभक्तांबद्दल मनात प्रचंड आदर आहे. आपण साईभक्तांमध्ये साईबाबांना बघतो, साईभक्तांविषयी मनात कधीच चुकीची भावना नसते, माझा आक्षेप साईभक्तांवर कधीच राहिला नाही. माझ्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला.मात्र, बाहेरून अनेक जण येतात शिर्डीत भिक्षेकऱ्यांचे सोंग घेऊन प्रसादालयात मोफत जेवतात आणि नशापाणी करून साईभक्तांना व नागरीकांना त्रास देवून गुन्हेगारी वाढवतात, त्यावर माझा … Read more

काकडी, शेवगा, लसुण तेजीत ! फळांच्या किंमतीत वाढ ; पालेभाज्या झाल्या स्वस्त

८ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : अनेक दिवसांपासून पालेभाज्यांच्या भावात सतत घसरण होत आहे.काकडी तसेच शेवगा व लसणाच्या भावातही वाढ झालेली आहे.कडधान्याच्याही भावात काही प्रमाणात वाढ झाली आहे.एकूनच पालेभाज्या उत्पादक शेतकरी संकटात सापडलेले आहेत.कमी अधिक प्रमाणात फळांच्या किंमती वाढल्या आहेत. भाजीपाल्याच्या तुलनेत काही फळांच्या किंमती जशाच्या तशा टिकून आहेत.दोन आठवड्यानंतर पुन्हा थंडी सुरू झाली आहे.याचा परिणाम … Read more

एसटीची ट्रेलरला धडक ; चालकासह ८ जखमी

८ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : नगरहून पुण्याकडे चाललेल्या भरधाव वेगातील एसटी बसने पुढे चाललेल्या ट्रेलरला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात बस चालकासह ७ प्रवासी असे एकूण ८ जण जखमी झाले.या अपघातात बसचे प्रचंड नुकसान झाले आहे.नगर – पुणे महामार्गावर चास (ता. नगर) गावच्या शिवारात भारत पेट्रोल पंपासमोर रविवारी (दि.५) सायंकाळी हा अपघात झाला. या … Read more

शेतजमिन, पोल्ट्रीशेडवर ताबा; व्यापाऱ्याला धमकी

८ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : नगर शहरातील व्यापाऱ्याच्या बाबुर्डी घुमट (ता. नगर) गावच्या शिवारात असलेल्या शेत जमिनीत अनोळखी ४ ते ५ जणांनी अतिक्रमण करत पोल्ट्री शेडवर ताबा मारल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या शेतमालकालाच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत दमबाजी करण्यात आली. या प्रकरणी त्या अनोळखी ४ ते ५ जणांवर नगर … Read more

रब्बी पीक उत्पादनात जिल्ह्यात अव्वल येण्याचा तरुणाचा दावा

८ जानेवारी २०२५ जामखेड : महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत रब्बी पिकांच्या उत्पादनाबाबत स्पर्धा आयोजित केली जाते.गहू, हरभरा, ज्वारी या रब्बी पिकांसाठी ही स्पर्धा असणार आहे.चौंडी येथील योगेश ज्ञानोबा देवकर या उच्चशिक्षित तरुणाने त्यात भाग घेतला आहे. मागील तीन वर्षांपासून त्यांनी एका एकरात गव्हाचे चांगले उत्पादन घेतले आहे. यावर्षी त्यांना पीक स्पर्धेविषयीची माहिती कृषि सहाय्यक वैभव … Read more

बायकोला नको त्या अवस्थेत पाहून पतीने घेतला गळफास

८ जानेवारी २०२५ देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे २८ डिसेंबर रोजी एका ३० वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.मात्र, आता पोलिस तपासात त्याच्या आत्महत्येला त्याच्या बायकोच जबाबदार असल्याचे समोर आले आहे.आपल्या बायकोला दुसऱ्या पुरुषाबरोबर नको त्या अवस्थेत पाहून या तरुणाने गळफास घेतल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी … Read more

वकील हत्याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर

८ जानेवारी २०२५ देवळाली प्रवरा : राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्याच्या हत्येपूर्वीचे राहुरी येथील न्यायालयाच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आले.सीसीटीव्ही फुटेजधमील आरोपींची ओळख पटली असून साक्षीदार अॅड. रामदास बाचकर यांची उलट तपासणी होणार आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या समोर राहुरी येथील वकील दाम्पत्य राजाराम व मनीषा आढाव खून खटल्याची … Read more

आमदारांकडून आरटीओ अधिकारी धारेवर ; सोयाबीन नेणाऱ्या वाहनावर ३५ हजारांचा दंड केल्याने अधिकाऱ्याचा सत्कार करीत गांधीगीरी

८ जानेवारी २०२५ श्रीरामपूर : शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या प्रोड्यूसर कंपनीच्या वाहनांवर आरटीओ अधिकाऱ्यांनी ओव्हरलोडच्या नावाखाली सोयाबीनची गाडी पकडून ३५ हजार रुपयांचा दंड केला.ही बातमी कानावर येताच आमदार हेमंत ओगले आणि युवा नेते करण ससाणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत आरटीओ कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना धारेवर घरले. जी तत्परता शेतकऱ्यांच्या वाहनांवर कारवाई करताना दाखवली, त्याबद्दल उपस्थितांनी गांधीगिरी करीत … Read more

लग्नाच्या आमिषाने मुलीला पळवणाऱ्या दोघांना अटक

८ जानेवारी २०२५ शेवगाव : लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीला पळवून नेताना शेवगाव पोलिसांनी पाठलाग करून आरोपीस जेरबंद केले.याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अजिंक्य संजय खैरे (रा. शेवगाव) व ऋषीकेश दत्तात्रय थावरे (रा. शेवगाव) अशी या आरोपींची नावे आहेत. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.त्यानुसार, आरोपी अजिंक्यने … Read more

ईव्हीएमवरच होणार निवडणुका, हॅकिंगचे दावे आयोगाने फेटाळले!

८ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : महाराष्ट्रासह काही राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर घेतले जात असलेले विविध आक्षेप मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी फेटाळून लावले. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएम आणि मतदार यादीत छेडछाड करण्याच्या दाव्यांमध्ये कुठलेही तथ्य नाही. ईव्हीएम मशीन या कोणत्याही स्थितीत हॅक करता येत नाहीत,असे स्पष्ट करत राजीव कुमार … Read more

राज्यातील सर्व चारचाकी वाहनांना फास्टॅग अनिवार्य ; फास्टॅग नसल्यास १ एप्रिलपासून दुप्पट पथकर

८ जानेवारी २०२५ मुंबई : राज्यातील सर्व चारचाकी वाहनांना १ एप्रिल २०२५ पासून फास्टॅग लावणे अनिवार्य करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रि मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.सर्व वाहनांचा पथकर (टोल) त्या दिवसापासून केवळ फास्टॅगद्वारेच भरावा लागणार आहे.या निर्णयामागे वाहतूक कोंडी कमी करण्याचा तसेच इंधनाची व वेळेची बचत करण्याचा विचार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सध्याच्या सार्वजनिक खासगी सहभाग … Read more

निवडणूक निकालाचा मुद्दा आता उच्च न्यायालयात ; महाविकास आघाडीचा कायदेशीर लढा !निवडणूक निकालाचा मुद्दा आता उच्च न्यायालयात ; महाविकास आघाडीचा कायदेशीर लढा !

८ जानेवारी २०२५ मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त करत महाविकास आघाडीने कायदेशीर लढा सुरू केला आहे. महाविकास आघाडीमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या राज्यातील ११ उमेदवारांनी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केल्या आहेत.या याचिकांवर लवकरच एकत्रित सुनावणी होण्याची … Read more

बीडमधील लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका, पोलीस संरक्षण द्या – शरद पवार

७ जानेवारी २०२५ मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही घटना केवळ एकच नसून यापूर्वी हत्या, अपहरण, खंडणी, खोटे गुन्हे दाखल होणे अशा अनेक घटना बीड-परळी भागात घडल्या आहेत.त्यामुळे त्या घटनांची पाळेमुळे खणून काढावीत,अशी मागणी सर्वपक्षीय स्थानिक आमदार-खासदार करत आहेत. अनेक घटनांचा परस्परसंबंध असल्याने अनेक प्रकरणांची मालिका तपासात समोर येण्याची … Read more

धनंजय मुंडेंचे मंत्रीपद कायम राहणार ? अजित पवार-मुंडेंमध्ये तासभर खलबते; दोषी आढळले तरच कारवाईचे संकेत

७ जानेवारी २०२५ मुंबई : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सध्या अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदास तूर्तास कोणताही धोका नसल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांचे म्हणणे आहे.देशमुख हत्येप्रकरणी मंत्री मुंडे यांच्याविरोधात जोपर्यंत पुरावे आढळत नाहीत,सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन चौकशीचे अहवाल येत नाहीत आणि त्यात मुंडेंना दोषी ठरवत नाहीत तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत … Read more

‘टोरेस’चा गुंतवणूकदारांना गंडा ; ५०० कोटी घेऊन मालक पसार

७ जानेवारी २०२५ मुंबई : पैसे दुप्पट, तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवत एका चिटफंड कंपनीने लाखो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला.या प्रकारानंतर सैरभैर झालेल्या गुंतवणूकदारांनी कंपनीचे कार्यालय गाठले.चिटफंड कंपनीच्या या आमिषाला मुंबईतील जवळपास एक, दोन नाही, तर तब्बल तीन लाख लोक बळी पडल्याची चर्चा आहे. संबंधित कंपनीकडे गुंतवणूकदारांचे ५०० कोटी … Read more

चिनी व्हायरस भारतात ; कर्नाटक, तामिळनाडूतील प्रत्येकी दोन तर गुजरातमधील एका बालकाला बाधा

७ जानेवारी २०२५ नवी दिल्ली: चीनमध्ये उद्रेक झालेल्या ह्युमन मेटान्यूमो व्हायरसचा (एचएमपीव्ही) भारतातही शिरकाव झाला असून, सोमवारी एकाच दिवसात कर्नाटक आणि तामिळनाडूत प्रत्येकी दोन, तर गुजरातमध्ये एक असे एकूण पाच रुग्ण आढळले आहेत.उल्लेखनीय बाब म्हणजे हे तीनही रुग्ण लहान बालके आहेत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी देशाबाहेर कधीही प्रवास केलेला नाही. देशातील संसर्गाचा चीनमधील उद्रेकाशी संबंध नसल्याचे … Read more

स्मशानातील सोन्यासाठी राखेची चोरी ! कुळधरण परिसरातील घटना : विधीसाठी गेल्यानंतर प्रकार समोर

७ जानेवारी २०२५ कुळधरण : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘स्मशानातील सोनं’ ही कथा प्रसिद्ध आहे. या कथेतील नायक स्मशानातील राख उकरून त्यातील सोनं काढून त्याची विक्री करत असतो.अगदी असाच काहीसा प्रकार कर्जत तालुक्यातील कुळधरण परिसरातील एका गावात सोमवारी (दि.६) उघडकीस आला. स्मशानभूमीतील अस्थिराखेची सोन्यासाठी चोरी झाल्याची घटना या गावात घडली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेत … Read more