प्रेम विवाहातून तरुणाचे अपहरण !

७ जानेवारी २०२५ अकोले : प्रेम विवाहाच्या कारणातून एका तरूणाचे तरुणीच्या नातेवाईकांनी अपहरण केले. मात्र मित्राने तत्परता दाखवत ११२ ला फोन केल्याने पाऊण तासात पोलीस घटनास्थळी पोहचले आणि अपहृताला मारहाण करतांना पोलीसांनी आरोपीना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतल्याची घटना तालुक्यातील वाघापूर येथे घडली. बीड जिल्ह्यातील मस्साजोगच्या घटनेमुळे अहिल्यानगर पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. ३१ डिसेंबरच्या व्हिडिओ … Read more

विहिरीत पडून नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू

घारगाव : विहिरीत पडून नऊ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ६) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास संगमनेरातील खंदरमाळवाडी शिवारातील करंजेकर मळा येथे घडली. याप्रकरणी घारगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्रीराज बाळू लेंडे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्रीराज त्यांच्या विहिरीत पाय घसरून पडला. त्यानंतर … Read more

फेब्रुवारीत होणार शिर्डी महापरिक्रमा माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची उद्घोषणा

शिर्डी ग्रीन अँड क्लिन शिडी फाऊंडेशन आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १३ फेब्रुवारीपासून शिर्डी महापरिक्रमा २०२५ हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.या पार्श्वभूमीवर शिर्डी महापरिक्रमेचा उद्घोषणा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह परिसरातील असंख्य नागरिक व भाविक उपस्थित होते. माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते … Read more

Ahilyanagar Breaking: राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षकांची आत्महत्या

राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेते प्राथमिक शिक्षक व सारोळा कासार (ता. नगर) येथील रहिवासी नामदेव सखाराम धामणे (वय ५०) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी घडली. दरम्यान शिक्षक धामणे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शिक्षक धामणे यांनी गळफास घेतल्याचे समजताच त्यांना जिल्हा … Read more

रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी संकटात ; नवीन वर्षात शेतकऱ्यांना आर्थिक झळ

६ जानेवारी २०२५ देगाव : रासायनिक खतासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीत वाढ केली आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कधी अस्मानी, कधी सुलतानी, कधी अवकाळी संकटाने शेतकरी व्यापला आहे. शेतमालाला दर नसल्याने आर्थिक संकटात असणारा शेतकरी अद्याप सावरलेला नसताना नवीन … Read more

मी आधीच सांगितले होते २०० आमदार निवडून आणू

६ जानेवारी २०२५ ठाणे : मी निवडणुकीपूर्वीच सांगितले होते की, महायुतीचे २०० आमदार निवडून आणू नाहीतर शेती करायला जाऊ. त्यानुसार, आम्ही २०० हून अधिक उमदेवार निवडून आणले आहेत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले. टेंभीनाका येथील आनंद आश्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवी मुंबईचे माजी जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांच्यासह नाशिक, धुळे, पालघर, … Read more

तुम्ही मला चुना लावू नका ! पालखी महामार्गाच्या कामांवरून नितीन गडकरी यांनी अधिकारी, ठेकेदारांना झापले

६ जानेवारी २०२५ पुणे : पालखी महामार्गाच्या कामांवरून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. दिवेघाट ते लोणंद आणि पाटस ते पंढरपूर येथील पालखी महामार्गाचे येत्या मे महिन्यापर्यंत काम पूर्ण करा, अन्यथा कारवाई करावी लागेल, असा थेट इशारा राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदाराला पुण्यात दिला. गडकरी म्हणाले की, ठेकेदार तुम्हाला चुकीची … Read more

औषध दुकानांमध्ये मिळणार स्वदेशी ‘पॅरासिटामॉल’

६ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी संलग्न असलेल्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेद्वारे (सीएसआयआर) ‘पॅरासिटामॉल’ हे औषध स्वदेशात विकसित केले आहे. पॅरासिटामॉल सामान्यतः वेदनाशामक तसेच ताप यासारख्या आजारांवर वापरले जात आहे. कर्नाटकस्थित सत्य दीपथा फार्मास्युटिकल्स लिमिटेड ही औषध निर्माण कंपनी या तंत्रज्ञानाचा उपयोग परवडणाऱ्या पॅरासिटामॉलचे देशांतर्गत उत्पादन करणार आहे.सध्या, … Read more

जनतेला ‘आप’त्ती नव्हे, तर विकास हवा ! पंतप्रधानांनी फुंकले दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग

६ जानेवारी २०२५ नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारचा ‘आप’त्ती असा उल्लेख करत जनतेला आपत्ती नव्हे तर विकास हवा, असे वक्तव्य केले. यंदा दिल्ली विधानसभा निवडणुकीत कमळ फुलणार आणि सुशासन येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपची सत्ता आल्यानंतर जनकल्याणाच्या कोणत्याही योजना बंद करण्यात येणार नाहीत, असे आश्वासनही मोदींनी … Read more

निवडून द्या… प्रियंका गांधींच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते बनवतो ! भाजप उमेदवार रमेश बिधुडींच्या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेस संतप्त

६ जानेवारी २०२५ नवी दिल्ली: दिल्लीतील कालकाजी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रमेश बिधुडी यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. कालकाजीमधील रस्ते प्रियंका गांधींच्या गालासारखे बनवू, असे वक्तव्य बिधुडी यांनी केले. काँग्रेसने यावर संताप व्यक्त करत भाजप हा महिलांविरोधी पक्ष असल्याची टीका केली. बिधुडी यांच्या वक्तव्याचा एक व्हिडिओ काँग्रेस … Read more

नितीश कुमार शुद्धीवर नाहीत, ते निर्णय घेण्यास अपात्र : तेजस्वी

६ जानेवारी २०२५ मोतिहारी : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे शुद्धीवर नाहीत. त्यांना हायजॅक करण्यात आले आहे. सध्या ते प्रचंड थकले आहेत. केवळ निवृत्त अधिकाऱ्यांच्या मदतीने आपल्या फायद्यासाठी ते सरकार चालवत आहेत,असा जोरदार हल्ला राज्याचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी रविवारी चढवला आहे. नितीश कुमार यांची खालावत जाणारी प्रकृती पाहता त्यांनी मुख्यमंत्री पद सोडावे,असे सांगत … Read more

भाजपने आधी जुनी आश्वासने पूर्ण करावी – केजरीवाल

६ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : भाजपने नवी आश्वासने देण्याऐवजी यापूर्वीच्या निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने आधी पूर्ण करावी,असे आव्हान दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिले.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीत ज्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले, ते केंद्र व आप सरकार यांच्या समन्वयातून साकारले आहेत,असा दावाही त्यांनी केला. पंतप्रधानांनी रविवारी दिल्लीत १२ … Read more

चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा ; पोलीस शहीद

६ जानेवारी २०२५ दंतेवाडा : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बस्तर भागातील चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले.या धूमश्चक्रीत जिल्हा राखीव दलाचा एक पोलीस जवानही शहीद झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. दक्षिण अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाकडून शुक्रवारपासून नक्षलविरोधी अभियान राबविले जात आहे.शनिवारी सायंकाळी नारायणपूर व दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेजवळील जंगलात या पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्याला … Read more

मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू, दोघे अटकेत

शेवगाव : पैशांच्या व्यवहारावरून वरखेड (ता. शेवगाव) येथे मागील महिन्यात झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या चालकाचे नगरमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. भुजंग शामराव मडके (वय ४०) असे मृताचे नाव आहे. त्यांच्यावर सोनेसांगवी (ता. शेवगाव) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेतील दोन आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मृताची पत्नी योगीता भुजंग मडके (वय ३४) यांनी ३१ डिसेंबर … Read more

पेमेंट अॅप वापरता ?

४ जानेवारी २०२५ : आज जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असल्याने ऑनलाइन पेमेंटचे प्रमाण वाढले आहे. स्मार्टफोनच्या एका क्लिकवर अगदी काही सेकंदांत कोणालाही पैसे पाठवणे आणि रिसिव्ह करणे शक्य आहे. यासाठी गुगल पे, पेटीएम आणि फोन पे सारखे डिजिटल वॉलेट देखील उपलब्ध आहे. ऑनलाइन पेमेंटसाठी अशा अॅप्सचा वापर केला जातो. मात्र, असे अॅप्स वापरताना काळजी न … Read more

सोशल मीडियावरच्या ललना करतील घात

४ जानेवारी २०२५ : सोशल मीडियावर आता अर्ध्याहून अधिक जग दिवस रात्र काही ना काही करत असते. लाईक्स, कमेंट्स, पोस्ट असा खेळ सुरू असतो. या अभासी जगात अनेक अनोळखी लोक एकमेकांना भेटतात.पण सोशल मीडियावरील एक चूक महागात पडू शकते. सुंदर मुलीच्या रिक्वेस्टवर अनेकांना आकाश ठेंगणे होते. पण कदाचित येथूनच Honey Trap सुरू होतो. हा सुंदर … Read more

सुरकुत्यांना रामराम… आरोग्यदायी सवयी लावून करा नियंत्रण

४ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : वृद्धत्व ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि प्रत्येक व्यक्तीला त्याचा सामना करावा लागतो.मात्र काही वेळा आपल्या दैनंदिन तसेच खाण्या-पिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे वृद्धत्वाची प्रक्रिया गतिमान होते आणि आपण आपल्या वयापेक्षा मोठे दिसू लागतो. काही गोष्टी अशा आहेत की, वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यास मदत करू शकतात.या सवयींच्या मदतीने आरोग्यही सुधारते … Read more

प्राजक्त तनपुरे यांचा ईव्हीएम पडताळणी अर्ज मागे

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर: विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर ईव्हीएम मशीन संदर्भात शंका उपस्थित करीत त्याच्या पडताळणी करिता जिल्ह्यातील दहा उमेदवारांनी मतदान केंद्रांची सूची स्वतंत्ररीत्या सादर करीत तपासणीचे अर्ज निवडणूक शाखेकडे केले होते. यापैकी राहुरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी सादर केलेला अर्ज लेखीपत्र देऊन मागे घेतला आहे. … Read more