नव्या रूपात साकारणार माळीवाडा बसस्थानक ; जुने झाले भुईसपाट !

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर: पहिली एसटी बस नगरहून पुण्याकडे पहिल्यांदा जेथून धावली त्याच परिसरात ७० वर्षांपूर्वी ऐतिहासिक माळीवाडा बस स्थानकाची निर्मिती करण्यात आली.सात दशकांचे उन्हाळे-पावसाळे झेललेले हे माळीवाडा बसस्थानक काळाच्या ओघात जीर्ण झाले.आता या ऐतिहासिक बसस्थानकाची नवनिर्मिती सुरु झाली असून त्यासाठी जुने बसस्थानक मागील आठवड्यातच भुईसपाट करण्यात आले आहे. नवनिर्मितीनंतर देखण्या स्वरूपात माळीवाडा बसस्थानक प्रवासी … Read more

कोपरगावच्या तलाठ्यासह दोघे लाचलुचपतच्या जाळयात

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : तक्रारदार यांनी कोपरगाव येथील साई रेसिडेन्सी या नावाचे इमारतीमधील पहिल्या मजल्यावर सदनिका दि. 28/9/2022 रोजी खरेदी केलेली आहे. सदर सदनिकेच्या खरेदी खताची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्याकरीता तक्रारदार यांनी त्यांचा अर्ज व खरेदी खताची सूची क्र.2 ची छायांकित प्रत तलाठी गणेश वैजीनाथ सोनवणे, (वय- 40 वर्ष, धंदा-नोकरी, तलाठी सजा कोपरगाव, वर्ग-3, … Read more

दिलीप सातपुते पुन्हा शिवसेनेत ; एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत प्रवेश, ठाकरेंचे शिवबंधन तोडले

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्रीगोंदा येथे झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत ठाकरे सेनेत दाखल झालेल्या माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी शिवबंधन तोडत आता पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे माजी शहरप्रमुख असलेले दिलीप सातपुते हे शिवसेनेतील आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. नगर शहरातील राजकारणात सातपुते … Read more

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना पदोन्नती

नगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती मिळाली. या पदोन्नतीमध्ये राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसा आदेश राज्य शासनाच्या गृहविभागाने काढला काढला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला हे २०१२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सलग १३ वर्षे सेवा बजावल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्यांना भारतीय पोलीस सेवेच्या निवड श्रेणीत पदोन्नती देण्यात … Read more

ग्रामस्थांनी केली उचलबांगडी, न्यायालयाने सुनावली कोठडी

४ जानेवारी २०२५ जामखेड : तालुक्यातील एका गावात एक ते दीड महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्या दोन रोडरोमिओंना ग्रामस्थांनी चांगलाच धडा शिकविला. ग्रामस्थांनी पाळत ठेवून या रोडरोमिओला पकडून पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या रोडरोमिओला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मेहबूब गणी शेख (रा. जवळा, ता. जामखेड) … Read more

पन्हाळगड : चार दरवाजाच्या भिंती झाल्या अखेर खुल्या

४ जानेवारी २०२५ पन्हाळा : रामचंद्र काशीद केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून ऐतिहासिक पन्हाळगडाच्या संवर्धनाचे काम चालू आहे. गडाचे मुख्य प्रवेशद्वार चार दरवाजाच्या उत्खननाचे काम प्रगतिपथावर आहे. या दरम्यान चार दरवाजाच्या पूर्वीच्या भिंती आणि कमानींचे अवशेष उजेडात येऊ लागले आहेत.संपूर्ण उत्खननानंतर गडाचे मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या चार दरवाजाचे स्वरूप आणि त्याचे महत्त्व समजणार आहे. ‘भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश’ … Read more

मुंबई पालिकेसाठी उद्धव ठाकरेंनी कसली कंबर ; ‘डोअर टू डोअर’ गाठीभेटी घेण्याचा पदाधिकाऱ्यांना आदेश

४ जानेवारी २०२५ मुंबई: विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली असून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी त्यांनी ‘मातोश्री’वर बैठक घेतली. ‘सर्व प्रभाग पिंजून काढा, डोअर टू डोअर गाठीभेटी घेऊन मतदारांच्या अपेक्षा जाणून घ्या,’ असे आदेश ठाकरे यांनी … Read more

MSRTC News : ५०० एसटी बसेस भंगारात, नव्या येणार फक्त १००

४ जानेवारी २०२५ मुंबई: मागच्या वर्षी आयुर्मान संपलेल्या ५०० एसटी बसेस स्क्रॅपमध्ये गेल्या असून, नव्याने ताफ्यात केवळ १०० बसेस येणार असल्याची माहिती समोर आली आहे. एसटी महामंडळासाठी १३१० बसेस भाडेतत्त्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच स्थगिती दिली आहे. या बसेसचा व्यवहार वादाच्या भोवऱ्यात असून, नव्या बसेस येणार की नाही ? की जुन्या, जीर्ण … Read more

चीनमध्ये नव्या महामारीची भीती ; भारतात खबरदारी ! सर्वात जास्त धोका बालकांना आणि वयोवृद्धांना

४ जानेवारी २०२५ बीजिंग : राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राकडून (एनसीडीसी) देशातील श्वसन आणि हंगामी इन्फ्लूएंझा रुग्णाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तसेच चीनमधील कथित एचएमपीव्ही आजाराच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर एनसीडीसी आंतरराष्ट्रीय संस्थांच्या संपर्कात आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी शुक्रवारी दिली. परिस्थितीचे काळजीपूर्वक निरीक्षण सुरू ठेवले जाणार आहे. आवश्यकतेनुसार माहिती व घडामोडींचे प्रमाणीकरण केले जाईल, असे … Read more

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या एनयुएलएम अभियानातून महिला बचत गटांना ५३ लाखांचे कर्ज

अहिल्यानगर – अहिल्यानगर शहरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, त्यांच्या व्यवसायांना चालना देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्याचे काम महानगरपालिका करत आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त केंद्र महानगरपालिकेने स्थापन केलेल्या महिला बचत गटांना शासनाच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या ५३ लाख रुपये कर्ज मंजूर करत त्यांना मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच, … Read more

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची माहिती देणाऱ्यास बक्षीस

३ जानेवारी २०२५ बीड : मस्साजोग (ता. केज) येथील संतोष देशमुख हत्याकांडातील फरार तीन आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवून योग्य बक्षीस देण्याचे पोलीस प्रशासनाने जाहीर केले आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निघृणपणे हत्या केल्याची घटना ९ डिसेंबर रोजी घडली होती.या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सुदर्शन चंद्रभान घुले, कृष्णा शामराव आंधळे, सुधीर … Read more

एकाच सरणावर तिघा बाप-लेकांवर अंत्यसंस्कार

३ जानेवारी २०२५ डोणगाव (बुलढाणा) : जालना जिल्ह्यातील महाकाळा फाट्याजवळ उभ्या ट्रकवर कार आदळून शेलगाव देशमुख येथील भागवत चौरे यांच्यासह मुलगा व मुलगी तसेच नात्यातील कुटे परिवारातील त्यांची मामी अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने अख्ख्या जिल्हा हळहळला असून, शेलगाववासीय शोकाकूल झाले आहेत. १ जानेवारीच्या रात्री बाराच्या सुमारास वडील भागवत यांच्यासह मुलगी सृष्टी आणि … Read more

शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग आणि आंतरराष्ट्रीय उड्डाण लवकरच

३ जानेवारी २०२५ शिर्डी: शिर्डी विमानतळावर उडाण योजनेअंतर्गत लवकरच नाईट लँडिंग विमानसेवा सुरू होणार असून, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानसेवा देखील सुरू करण्याची योजना आहे,अशी माहिती केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी दिली. गुरुवारी साई समाधीचे दर्शन घेतल्यानंतर मोहळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी … Read more

जलद दर्शनाच्या नावाखाली त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची लूट !

३ जानेवारी २०२५ नाशिक : नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी राज्यातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातही दर्शनासाठी परराज्यातील भाविकांनी अलोट गर्दी केली असून जलद दर्शनाच्या नावाखाली त्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी … Read more

सावधान ! नोरोव्हायरसने अमेरिकेत केला कहर !

३ जानेवारी २०२५ लॉस एंजेलिस: अमेरिकेत पोटाच्या संसर्गाची चिंता वाढत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ९० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. हा आजार आता जगभरात चिंता वाढवत असल्याचे समोर आले आहे. नोरोव्हायरस म्हणजे काय ? नोरोव्हायरस, ज्याला बऱ्याचदा ‘विंटर व्होमीटिंग बग’ म्हणतात, हा पोटाचा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणू आहे, जो मुख्यतः तोंडावाटे किंवा विष्ठेच्या मार्गाने, दूषित … Read more

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला वर्षभरात ४७.२७ कोटींचे उत्पन्न ! भाविकांच्या संख्येतही झाली वाढ, देणगी दर्शनातून सर्वाधिक १६ कोटी ९६ लाखांचे उत्पन्न

३ जानेवारी २०२५ तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मागील वर्षभरात मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे.मंदिर संस्थानच्या तिजोरीत विविध माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मागील एक वर्षात एकूण ४७ कोटी २७ लाख ३२,२०६ रुपयांचे दान जमा झाले आहे. श्री तुळजाभवानी भक्तांच्या एकूण संख्येपैकी सर्वाधिक गर्दी ही श्रवण मास ते दीपावली या … Read more

आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी !

३ जानेवारी २०२५ मुंबई : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्यातील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी,अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरूवारी केली. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुंडे यांनी बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाबाबत आपली भूमिका मांडली. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन … Read more

सीआयडीकडून तीन फरार आरोपींचा शोध सुरू

३ जानेवारी २०२५ बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींचा घटनेच्या तीन आठवड्यांनंतरही पोलिसांना व नंतर सीआयडी पथकाला शोध लागलेला नाही.खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडची सीआयडी कोठडीत रवानगी करण्यात आल्यानंतर दोन दिवसांपासून अधिकारी त्याची चौकशी करत आहेत. असे असतानाच मस्साजोग येथे बुधवारी ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन करत फरार आरोपी तत्काळ पकडण्याची मागणी केली. … Read more