अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, जिल्हा परिषद फवारणी ड्रोन खरेदी करण्यासाठी देणार ५ लाखांचे अर्थसहाय्य

अहिल्यानगर- पिकांवर फवारणी करताना वेळ, श्रम आणि खर्च या तिन्ही बाबींचा शेतकऱ्यांना मोठा सामना करावा लागतो. पारंपरिक फवारणी पद्धतीमुळे अनेकवेळा अपुऱ्या कामगारांची अडचण भासत असून वेळेवर फवारणी न झाल्याने उत्पादनावर परिणाम होतो. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा परिषदेने एक क्रांतिकारी निर्णय घेतला असून शेतकऱ्यांसाठी फवारणीसाठी ड्रोन खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील पहिलाच उपक्रम … Read more

नागरिकांना उगाच चकरा मारायला लावू नका, कागदपत्रे पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्या, आमदार काळेंच्या सूचना

कोपरगाव-“ज्या योजनांसाठी जे पात्र असतील, त्यांचेच अर्ज भरा. गरज नसताना कोणालाही चकरा मारायला लावू नका. कार्यकर्त्यांनी व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी समाजातील गरजवंत, पात्र लाभार्थी शोधून त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा” अशा ठाम सूचना आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या. कोळपेवाडी येथील सुरेगाव महसूल मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत शुक्रवार, २५ जुलै … Read more

संगमनेर तालुक्यात एमआयडीसी सुरू करणारच, आमदार अमोल खताळांचा ठाम निर्धार

संगमनेर- तालुक्यात एमआयडीसी सुरू करावी, ही अनेक वर्षांपासूनची मागणी लवकरच प्रत्यक्षात उतरणार असून, संगमनेर तालुक्यात एमआयडीसी सुरू करणारच, असा ठाम आत्मविश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे. एमआयडीसी सुरू झाल्यानंतर हजारो युवकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना आ. खताळ यांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्द्यांवर भाष्य केले. संगमनेर तालुक्यात एमआयडीसी सुरू … Read more

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचाच झेंडा फडकणार, शिर्डीतील भाजप मेळाव्यात पालकमंत्री विखेंचे प्रतिपादन

शिर्डी- देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाला मोठा जनाधार मिळत असून, कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊ शकले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपच यशस्वी ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत केले. शिर्डी शहर भाजप मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप सोहळा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाला. शिर्डी शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी … Read more

श्रीरामपूर शहरात आठवडे बाजारावरून विक्रते आणि बाजारकरूची सुरूय हेळसांड, नगरपालिकेकडे स्वतंत्र जागा नसल्याने बाजाराबाबत संभ्रम

श्रीरामपूर- काल शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास काही विक्रेत्यांनी म्हाडा कॉलनीतील मोकळ्या रस्त्यावर चटया अंथरूण आपले सामान व भाजीपाला मांडण्यास सुरुवात केली. मात्र, जुन्या बाजातळावरही काही बाजारकरूंनी दुकाने थाटल्याची बातमी कानोकान झाल्याने या विक्रेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. तर जुन्या बाजारतळावरही चलबिचल सुरू झाली. त्यातच म्हाडातील रहिवाशी असलेल्या काही प्रतिष्ठीतांनी या बाजारकरूंना येथे दुकाने मांडू नका, असा … Read more

बेलापूर येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भामट्यांच्या पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून आवळल्या मुसक्या

श्रीरामपूर- काही दिवसांपूर्वी दोन वेळा कोल्हार चौकातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारे संशयीत आरोपी बेलापूर पोलिसांनी बेलापूर ते कान्हेगाव असा सिनेस्टाईल पाठलाग करून शिताफिने ताब्यात घेतले. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की बेलापूर येथील कोल्हार चौकातील इंडिया वन एटीएम दोन वेळा फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. एका निळ्या रंगाच्या मारुती गाडीमध्ये आलेल्या काही इसमांनी हे एटीएम फोडण्याचे … Read more

नेवासा तालुक्यात रेशन धान्याचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदाराला ग्रामस्थांनी पकडले, पोलिसांनी केला गुन्हा दाखल

नेवासा- तालुक्यातील वाकडी येथील सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानातील मोफत रेशन गोण्या बदलून त्या धान्याची काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. या घटनेमुळे वाकडी ग्रामस्थांचे कौतुक होत आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की बुधवार, २३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता वाकडी येथील सरकारी रेशन दुकानातून मोफत वाटपासाठी असलेल्या धान्याच्या गोण्या … Read more

संगमनेर तालुक्यात बेकायदेशीर सुरू असलेल्या कत्तलखान्यावर मध्यरात्री पोलिसांचा छापा, ५५० किलो गोमांस जप्त

संगमनेर- तालुक्यातील कुरण गावात काटवाचा परिसर असलेल्या ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर काल मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून सुमारे ५५० किलो गोमांस आणि इतर साहित्य जप्त केले. या कारवाईत १ लाख ३७ हजार ५०० रुपये किमतीचे गोमांस तसेच दुचाकी व हत्यारांसह एकूण २ लाख ७ हजार ५०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. पोलिसांकडून मिळालेल्या … Read more

अहिल्यानगर येथील एन-९५ मास्क पुरवठा व्यवहारात फसवणूक प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय

अहिल्यानगर : येथील अवनप्रितिसिंग गोधरा व सचिन प्रकाश काटे यांच्या मध्ये एक लाख विशिष्ट दर्जाचे एन-९५ मास्क पुरवठा करण्याचा करार झाला होता.या प्रकरणात आरोपीने ५३ लाख ९५ हजार ६४१ रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केला. या विरोधात गोधरा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अँड. अक्षय चौधरी यांच्यामार्फत फौजदारी अर्ज दाखल केला. … Read more

श्रीरामपूरहून पुण्याला मोटारसायकलवर निघालेल्या मायलेकाला बिबट्याची धडक, धडकेत दोघेही जखमी

श्रीरामपूर- आंबी येथून पुण्याला जाण्याकरिता पहाटे निघालेल्या मायलेकाच्या मोटरसायकलला बिबट्याची धडक बसल्यामुळे दोघेही जखमी झाले असून त्यांचेवर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने दोघेही सुखरूप आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, आंबी येथील अलका भगवान वायदंडे (वय ४५) व त्यांचा मुलगा विशाल भगवान वायदंडे (वय २८) हे पुणे येथे जाण्याकरिता सकाळी साडेपाच … Read more

महायुती सरकारमुळे पुरोगामी महाराष्ट्राची अधोगतीकडे वाटचाल, तर हाणामारी करणाऱ्या गुंडाना सरकारकडून संरक्षण- मा.आमदार बाळासाहेब थोरात

संगमनेर-महायुती सरकार हे केवळ सत्तेसाठी एकत्र आलेले असून, त्यांच्या चुकीच्या कारभारामुळे महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे सुरू झाली आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटी सदस्य आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना केली. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत महिलांना २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती, परंतु अद्याप कोणालाही याचा लाभ मिळालेला नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत आश्वासने … Read more

संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र निझर्णेश्वर देवस्थानच्या विकासाला चालना देणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रतिपादन

संगमनेर- तिर्थक्षेत्र आणि निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून श्रीक्षेत्र निझर्णेश्वर देवस्थानच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले जात आहे. भाविक व पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता या परिसराचे आध्यात्मिक आणि नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. श्रावण महिन्याच्या निमित्ताने ना. राधाकृष्ण विखे पाटील व शालिनीताई विखे पाटील यांनी निझर्णेश्वर … Read more

सावता महाराजांनी समतेचा आणि प्रेमाचा संदेश दिला, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांचे प्रतिपादन

जेऊर- श्री संत शिरोमणी सावता महाराजांनी भक्ती, सामाजिक समता आणि प्रेमाचा संदेश दिला असल्याचे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी केले आहे. जेऊर येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त त्रिदिनी कीर्तन महोत्सवा बरोबर विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी बोलताना अक्षय कर्डिले यांनी सांगितले की, संत सावता महाराजांचे कार्य जगाला प्रेरणादायी ठरणारे आहे. … Read more

नेवासा तालुक्यातील एकही लाभार्थी घरकुलापासून वंचित राहणार नाही, आमदार लंघे यांची ग्वाही

नेवासा- शहरातील एकही पात्र लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिला. नेवासा नगरपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीनंतर धनादेशाचे वाटप आमदार लंघे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आ. लंघे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर मुख्याधिकारी संतोष लांडगे, भाऊसाहेब वाघ, विजयाताई अंबाडे, डॉ. … Read more

रस्ते अपघातप्रकरणी अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई करा, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी आणि रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने मोटार वाहन कायद्यातील नियम अधिक कठोर करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये दुप्पट व तिप्पट दंड, परवाना रद्द करणे यांसारख्या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. मात्र या प्रस्तावाला तीव्र विरोध करत ई-चलन विरोधी संघर्ष समितीचे अभय ललवाणी यांनी केंद्रीय मंत्री नितीन … Read more

नगर तालुक्यातील बहिरवाडी येथे घरफोडी, १० लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळवला

जेऊर- बंद घराच्या दरवाजाचे कुलूप उघडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने रोख रक्कम असा सुमारे १० लाख रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. ही घटना नगर तालुक्यातील बहिरवाडी येथे १८ जुलै ते २३जुलै दरम्यान घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नंदू बलभीम दारकुंडे (वय ४९, रा. बहिरवाडी, ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे औषधोउपचाराकरिता कोल्हापूर येथे … Read more

श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर पारंपारिक पद्धतीने वेदमंत्राच्या घोषात करण्यात आले दीपपूजन

पाथर्डी- हिंदू धर्मशास्त्रामध्ये सर्व सकारात्मक धार्मिक व अध्यात्मिक विधी दिव्याच्या साक्षीने केले जातात. शुभकार्याची सुरुवातही दीपप्रज्वलाने होते. विवाह सुद्धा अग्निसाक्षी झालेला पवित्र मानला जातो. आषाढ अमावस्येला दीपपूजन करत कल्याणाची प्रार्थना शक्तीपुढे केली जाते. तालुक्यातील मोहटा देवस्थान मध्ये आज पारंपारिक पद्धतीने दीपपूजन वेदमंत्राच्या घोषात करण्यात आले. मुख्य पुरोहित भूषण साकरे, भास्कर देशपांडे व बाळासाहेब क्षीरसागर यांनी … Read more

अहिल्यानगरमध्ये गणेश मुर्त्यांचे विद्रुपीकरण करण्यावर कठोर कारवाई करावी, मनसेच्यावतीने पोलिस अधिक्षकांना निवेदन

अहिल्यानगर- गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठपला आहे. गणेशोत्सवात गणेश मूर्तीचे विद्रुपीकरण व विटंबना होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारी घ्यावी. काही मूर्तिकार व सार्वजनिक गणेश मंडळे मूळ रूपातील गणपती सोडून काल्पनिक रूपातील गणेश मूर्ती स्थापन करत असतात. अशा काल्पनिक रूपातील गणेश मूर्त्यांमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे गणेश मूर्त्यांचे विद्रुपीकरण करणाऱ्या मंडळांवर व … Read more