शहरातील मार्केट यार्ड परिसरात उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, मार्केट यार्ड चौकातील वाहतूकीत बदल

अहिल्यानगर- शहरातील मार्केटयार्ड चौक येथील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व माळीवाडा वेस येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी चबुतरा उभारणे, परिसराचे सुशोभिकरणाचे भूमिपूजन २७ जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त तथा … Read more

भर पावसाळ्यात केडगावात पाणीटंचाई, प्रश्न सोडवण्याची नागरिकांची आयुक्तांकडे मागणी

अहिल्यानगर- केडगावमधील प्रभाग क्रमांक १६ मधील पाणीटंचाईचा प्रश्न उन्हाळ्यानंतर पावसाळ्यातही बिकट बनलेला असताना तातडीने नागरिकांचा पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे सुजय मोहिते यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले की, उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाला व प्रशासनाला सहकार्य केले. परंतु आता पावसाळ्यात मुबलक प्रमाणात पाणीसाठा शिल्लक असताना देखील सहा … Read more

अहिल्यानगरच्या विकासाचे व्हीजन डॉक्युमेंट तयार करा, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचना

अहिल्यानगर- लोकप्रतिनिधी व प्रशासनातील सर्व विभागांच्या आधिकऱ्यांमध्ये चांगला समन्वय राहिल्यामुळेच योजनांच्या अंमलबजावणीत अहिल्यानगर जिल्हा राज्यात अग्रस्थानी राहिला. भविष्यातही जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेचा वेग कायम राहण्यासाठी सुसंवादाने अधिक चांगले काम करण्याची अपेक्षा व्यक्त करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिडशे दिवसांच्या कृती कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्याच्या विकासाचे व्हीजन डॉक्युमेंट तयार करणाऱ्यांचे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी … Read more

शिर्डी येथील साईसच्चरित पारायण सोहळ्याला भक्तीमय वातावरणात प्रारंभ, हजारो भाविकांची उपस्थिती

शिर्डी- येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, नाट्य रसिक मंच शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत श्री साईसच्चरित पारायण सोहळा मोठ्या भक्तिभावाने सुरू झाला आहे. या पारायण सोहळ्यात सुमारे पाच हजारांहून अधिक महिला आणि दोन हजारांहून अधिक पुरुष अशा एकूण सात हजारांपेक्षा अधिक पारायणार्थीनी सहभाग घेतला. याबाबत साईबाबा … Read more

शासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांची भुमिका ही केवळ वाढप्याची : आमदार दाते

अहिल्यानगर : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना सातत्याने अडचणी येत असल्या तरी संबंधित लाभाच्या रकमा डिबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येत आहेत. मात्र यामध्ये येणाऱ्या अडचणींची चौकशी ऑनलाईन पद्धतीने करावी लागते. परीणामी लाभार्थ्यांची गैरसोय होत असल्याची जाणीव असुन त्यात लवकरच सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मत पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते … Read more

जिल्ह्यातील साडेसहा हजार घरांवर बसवले ‘ पीएम सूर्यघर’चे सोलर पॅनेल; नागरिकांची होतेय इतक्या रुपयांची बचत

अहिल्यानगर : ‘प्रधानमंत्री (पीएम) सूर्यघर मुफ्त वीज योजना’ अंतर्गत जिल्ह्यातील साडेसहा हजार नागरिकांनी घरावर सौर पॅनेल बसविले आहेत. यासाठी किलोवॅटनुसार केंद्र सरकार अनुदान देत आहे. एका कुटुंबाला किमान ३०० युनिटपर्यंत वीज मोफत मिळावी, यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे. त्यानुसार नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी नागरिकांना त्यांच्या घरांवर सौर पॅनेल … Read more

ग्रो मोअर; ११खाते अन अवघ्या तीन वर्षात ८६५कोटींची उलाढाल

अहिल्यानगर : शिर्डी येथील ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स’ कंपनीने ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवूणक केली. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे याला अटक केली. त्याच्या कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याच्या चौकशीत कंपनीच्या ११ खात्यांवर ८६५ कोटींची उलाढाल झाल्याचे समोर आले आहे. असे अनेक मोठे धक्कादायक खुलासे झाल्याने तपासी … Read more

जिल्ह्यात मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची तूट; ९३% खरिपाची पेरणी

अहिल्यानगर : जिल्ह्यात आतापर्यंत ९३.४१ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. विविध पिकांच्या ६ लाख ६९ हजार ११ हेक्टरवर खरीप पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक १ लाख ७४ हजार २३३ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १२३.९ मिमी पावसाची नोंद झाली. मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. मागील वर्षी जुलैपर्यंत ३३१.७ … Read more

आता स्कूल बसमध्ये देखील बसवावे लागतील सीसीटीव्ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचना

अहिल्यानगर : सध्या सर्व शाळा सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना स्कूल बसने ये जा करावी लागते. मात्र या स्कूल बसमध्ये अनेक आवश्यक सुविधा उपलब्ध नसतात.त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणारी बस व वाहने सुरक्षित असावीत यासाठी प्रत्येक वाहनामध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिल्या. पोलीस अधीक्षक कार्यालयात नुकतीच जिल्हा … Read more

हिरव्या मिरचीचा तोरा कायम : किलोला मिळतोय १०० रूपयांचा भाव भाजीपाल्याच्या भावांत घट:मेथीला १०, तर कोथिंबिर ६ रूपयांना जुडी

अहिल्यानगर : अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी हिरव्या मिरचीची १११ क्विंटलवर आवक झाली होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल ३००० ते ८००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. लसणाची १९ क्विंटल आवक झाली होती. लसणाला प्रतिक्विंटल ५००० ते १३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेवग्याची ८९ क्विंटलवर आवक झाली होती. शेवग्याला प्रतिक्विंटल १००० ते ४ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. … Read more

टिकटॉकवर झाली ओळख मग लग्नाचे आमिष दाखवुन लोणावळ्याला नेत विवाहितेवर अत्याचार

.अहिल्यानगर : टिकटॉकवर झालेल्या ओळखीने एका विवाहित महिलेच्या संसारात मोठे वादळ निर्माण झाले. टिकटॉकवर झालेल्या ओळखीतून पुढे भेटी गाठी वाढवत नंतर लग्नाचे आमिष दाखवुन विवाहित महिलेशी शारीरिक संबध ठेवुन तिची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने तिसगाव व लोणावळा येथील हॉटेलवर घेवून जात महिलेवर अत्याचार केलेला आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलिसात तिघा विरुद्ध गुन्हा दाखल … Read more

जिल्हा विभाजनापाठोपाठ आता महावितरणच्या मंडळ विभाजनाचा प्रस्ताव श्रीरामपूर, बाभळेश्वर, कोपरगाव, शिर्डीत नवीन कार्यालय उभारणीसाठी लागली रस्सीखेच

अहिल्यानगर : आजवर अनेकदा जिल्हा विभाजनाच्या बातम्या आल्या तसेच मुख्यालयावरून बरीच वादळे देखील उठली मात्र पुढे सर्व शांत झाले. आता महावितरणच्या अहिल्यानगर वीज मंडळाचे विभाजन करून आणखी एक मंडळ कार्यालय करण्याचा प्रस्ताव महावितरणच्या परिमंडळ कार्यालयाने वरिष्ठस्तरावर पाठविला आहे. वीजग्राहकांची वाढती संख्या व जिल्ह्याचा मोठा भौगोलिक विस्तार यामुळे महावितरणला ग्राहकसेवा देण्यात अडथळे येत आहेत.त्यामुळे महावितरणच्या अहिल्यानगर … Read more

अहिल्यानगर बाजार समितीत ४०६ क्विंटल फळांची आवक डाळिंब २५ हजार, सफरचंद २३ हजार तर ड्रॅगन फ्रूटला मिळाला १३ हजारांचा भाव

अहिल्यानगर : अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शुक्रवारी विविध फळांची १३९ क्विंटल आवक झाली होती. यावेळी मोसंबीला ५००० रुपये, तर डाळिंबांना २५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. पपईला प्रतिक्विंटल ८०० ते ३००० रु पयांपर्यंत भाव मिळाला. अहिल्यानगर बाजार समितीत शुक्रवारी डाळिंबांची ६८ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत … Read more

यंदा अकरावीच्या विद्यार्थ्यांची विज्ञान शाखेला पसंती अकरावीचे ६० टक्के प्रवेश पूर्ण: दुसऱ्या फेरीअखेर ३१४५३ विद्यार्थ्यांचे प्रवेश, १९६०५ विज्ञान शाखेला

अहिल्यानगर : जिल्ह्यात अकरावीच्या दुसऱ्या फेरीअखेर विविध कनिष्ठ महाविद्यालयात ३१ हजार ४५३ विद्यार्थ्यांनी विविध शाखांत प्रवेश घेतले आहेत. यामध्ये कला, वाणिज्य शाखेपेक्षा तीनपट १९ हजार ६०५ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला पसंती दिली. त्याखालोखाल ७ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी कला शाखेत, तर ४०२२ विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतले. प्रत्येक पालक आपल्या मुलाला विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी आग्रह धरीत … Read more

नगरच्या कांदा व्यापाऱ्यास पाच परप्रांतीय व्यापाऱ्यांनी साडे सव्वीस लाखांना गंडवले

अहिल्यानगर : येथील व्यापारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा घेवून तो परराज्यातील व्यापाऱ्यांना विक्री करतात. मात्र या कांदा खरेदी व विक्रीच्या व्यवहारात पाच परप्रांतीय व्यापाऱ्यांनी नगरच्या कांदा व्यापाऱ्यास साडे सव्वीस लाखांना गंडवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात २४ जुलै रोजी पाच जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कांदा व्यापारी राहुल रामदास … Read more

परप्रांतीय तरूणाचा मृत्यू भोवला : ‘त्या’ सहायक पोलिस निरीक्षकाची तडकाफडकी बदली

अहिल्यानगर : सुपा पोलिसांच्या ताब्यातील हितेशकुमार रवीश्वर प्रसाद या परप्रांतीय तरुणाचा मृत्यू मारहाणीमुळेच झाला असल्याचे शवविच्छेदनातून निष्पन्न झाले असल्याची खात्रीलायक माहिती आहे. दरम्यान या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवला आहे. या प्रकरणी सुपा पोलिस ठाण्याचे प्रभारी, सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना तडकाफडकी नियंत्रण कक्षात हलवले … Read more

शनिवारच्या शाळेची वेळ पूर्ववत खा. नीलेश लंके यांच्या पत्राची दखल

जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची शनिवारची वेळ पूर्वीप्रमाणेच सकाळी ७.३० ते ११ अशी करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. अलिकडेच ही वेळी सकाळी ९ ते दुपारी १.३० अशी करण्यात आली होती. खा. नीलेश लंके यांनी त्यासंदर्भात शिक्षक संघटना तसेच पालकांच्या मागणीचा विचार करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे शनिवारच्या शाळेची वेळ पूर्ववत करण्याबाबत पत्रव्यवहार … Read more

महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची राज्य सरकारवर टीका

संगमनेर ( प्रतिनिधी ) महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीसाठी 2100 रुपये देण्याची घोषणा केली. त्यांना काही दिले नाही. कर्जमाफी बाबत शेतकऱ्यांना फसवले. आमदारांच्या मारामाऱ्या सुरू आहेत.मंत्र्यांनी कसे वागावे हे सांगण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. अनेक मंत्री पैशांचे घोटाळे करत आहेत. मोठा भ्रष्टाचार झाला आहे. मुख्यमंत्री त्यांच्यावर पांघरून घालत आहेत. अशी राज्याची दयनीय परिस्थिती असून महायुती … Read more