राहुरी शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे व्यापारी त्रस्त, व्यापारी असोसिएशनने पोलिस प्रशासनाला निवेदन देत केली कारवाईची मागणी

राहुरी- शहरातील वाढती गुन्हेगारी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, व्यापाऱ्यांच्या मालमत्तेची चोरी आणि दरोडे या घटनांनी व्यापारी वर्गात असुरक्षिततेची भावना वाढली असून, या पार्श्वभूमीवर राहुरी शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीने २१ जुलै रोजी पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, २६ मार्च २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची … Read more

श्रीरामपूर शहरात नगरपालिकेने स्वतंत्र बाजारतळ उभारून आठवडे बाजार भरवा, स्थानिक रहिवाश्यांची मागणी

श्रीरामपूर- शहरातील मोरगे वस्ती, संजीवनी हॉस्पिटल परिसरात नियमित भरणारा आठवडे बाजार आजपासून म्हाडा कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर भरणार असल्याचे नगरपालिकेने सांगितले आहे. मात्र, आठवडे बाजार म्हाडा कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर भरविल्यामुळे तेथील रहिवासी भागात अनेक अडचणी निर्माण होणार आहे. त्यामुळे नगरपालिकेने पर्यायी जागा शोधून कायमस्वरुपी स्वतंत्र बाजारतळ उभारावा, अशी मागणी कॉलनीतील रहिवाशी नागरीकांची आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनासह … Read more

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्री कोकाटेचा राजीनामा घ्या, जिल्हाधिकाऱ्यांना छावा संघटनेचे निवेदन

अहिल्यानगर- मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर कडक कार्यवाही करुन वादग्रस्त कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले आहे. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव चव्हाण, छावा संघटनेच्या जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख सुरेखा सांगळे, शिव प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष बापू ठाणगे, इंटकचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कर्डीले, वारकरी संघाचे आबा … Read more

Ahilyanagar Politics : महायुती सरकारकडे राज्य चालवण्याची पात्रता नाही, मनमानी कारभारामुळेे ठेकेदार अडचणीत !

Ahilyanagar Politics : महायुती सरकारने मागील वर्षी कामांचे वाटप मनमानी पद्धतीने केल्याने ठेकेदार अडचणीत आले आहेत. राज्याचे अर्थसंकल्प व कामांचे प्रमाण यातील ताळमेळच सरकारच्या हातातून निघाला आहे. परिणामी ठेकेदारांची कामे पूर्ण होऊनही त्यांचे बिले निघत नाहीत. अशा परिस्थितीत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचा संदर्भ … Read more

दारू पिऊन नाही तर दूध पिऊन गटारी अमावस्या साजरी करा, अकोल्यात महिलांचा प्रेरणादायी उपक्रम, आमदाराचाही सहभाग

अकोले- गटारी अमावस्या म्हटली की दारूच्या पायर्यांची कल्पना सहजच डोळ्यापुढे येते. मात्र यंदा अकोले तालुक्यात या परंपरेला छेद देत एकल महिलांनी “दारू नको, दूध प्या” या घोषवाक्याखाली गटारीला दारूचा धिक्कार करत समाजप्रबोधनाचा अभिनव उपक्रम राबवला. अकोले तालुक्यातील एसटी स्टँड परिसरात ‘द दारूचा नव्हे, दुधाचा’ असा फलक लावण्यात आला होता. याच ठिकाणी आमदार डॉ. किरण लहामटे … Read more

Bhandardara Dam : भंडारदरा परिसरात पावसाची दमदार हजेरी, भंडारदरा ७७ टक्के तर निळवंडे धरण ७६ टक्के भरले

Bhandardara Dam : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे पुनरागमन झाल्याने धरणामधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गुरुवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत धरणाचा साठा ८६१० दलघफूट इतका झाला असून, साठा ७७.९९ टक्क्यांवर पोहोचला आहे. विजनिर्मिती केंद्रातून ८४० क्युसेकने प्रवरा नदीमध्ये पाणी सोडण्यात येत आहे, अशी माहिती भंडारदरा धरण शाखेकडून देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून भंडारदरा … Read more

संगमनेरमध्ये कुरेशी समाजाने कत्तलखाने बंद केल्याच्या निर्णयानंतरही शहरात खुलेआम कत्तलखाने सुरूच, पोलिसांकडून दुर्लक्ष

संगमनेर- कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय मुस्लिमांच्या राज्यस्तरीय संघटनेने घेऊनही संगमनेर शहरातील कत्तलखाने खुलेआम सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील कुरेशी समाजातील कत्तलखाना चालकांनी कत्तलखाने बंद केल्यानंतर याचा फायदा घेत अन्य नागरिकांनी शहरातील विविध भागात कत्तलखाने सुरू केले आहेत. पोलीस प्रशासनाचे मात्र या कत्तलखांन्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. राज्यात गोहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतानाही संगमनेर शहरांमध्ये … Read more

जेऊर परिसरात विद्यार्थीनींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओंना गावातील तरूण शिकवणार धडा

जेऊर – नगर तालुक्यातील जेऊर परिसरात रोडरोमिओंचा वाढता उपद्रव लक्षात घेता गावातील तरुणांनी एकत्र येत टपरींना धडा शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यालय तसेच विद्यालय परिसरातील रस्त्यांवर गस्त घालून विद्यार्थिनींच्या रक्षणासाठी तरुण एकवटणार आहेत. तरुणांच्या भूमिकेमुळे विद्यार्थिनी तसेच पालक वर्गामधून समाधान व्यक्त केले जात आहे. जेऊर परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रोड रोमीओंनी उच्छाद मांडला आहे. गावातील … Read more

वीजबिल थकल्याने शेवगाव-पाथर्डीच्या पाणी योजनेचा उडाला बोजवारा, नागरिकांची आठवड्यापासून पाण्यासाठी भटकंती

पाथर्डी- वीजबिल थकल्याने शेवगाव – पाथर्डी पाणीयोजनेचा वीजपुरवठा महावितरण कंपनीकडून बंद झाल्याने पाथर्डी शहरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, गेल्या सहा ते नऊ दिवसांपासून शहराच्या विविध भागातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळाले नाही. पिण्याच्या पाण्याचे जार, सांडपाण्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी भाव वाढ केली आहे. पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची नागरिकांवर वेळ आली आहे. पाथर्डी शहरासह शेवगाव … Read more

पारनेर तालुक्यात दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश, स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा

कान्हुरपठार- पारनेर तालुक्यातील पिंपळगाव तुर्क परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची एक मादी व तिचे एक पिलू अडकल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. याबाबतची माहिती अशी की, पिंपळगाव तुर्क येथील कन्हेर ओहळ परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात होते. अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, कोंबड्या, कुत्रे यांच्यावर बिबट्याने हल्ला केलेला होता. त्या अनुषंगाने पिंपळगाव … Read more

अकलूजच्या पैलवानाला नाकपट्टी डावावर चारीमुंड्या चित करत रविराज चव्हाण ठरला गोदड महाराज केसरीचा मानकरी, २ किलो चांदीची गदा भेट

कर्जत- येथील संत सद्‌गुरू गोदड महाराज रथयात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात आंतरराष्ट्रीय मल्ल पै. रविराज चव्हाण याने अकलूज येथील शिवनेरी तालीम संघाच्या पै. सतपाल सोनटक्के यास नाकपट्टी डावावर चारीमुंड्या चित करीत लोकनेते स्व. पै. रामभाऊ धांडे यांच्या स्मरणार्थ ठेवलल्या सद्‌गुरू संत श्री. गोदड महाराज केसरीचा मानकरी ठरला. त्याने दोन किलो चांदीची गदा पटकावली. या वेळी उपस्थित … Read more

अहिल्यानगरच्या मार्केटमध्ये कांद्याच्या दरात २०० रूपयांनी घसरण, गुरूवारच्या बाजरात प्रतिक्विंटल मिळावा एवढे रूपये भाव

अहिल्यानगर- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये गुरुवारी तब्बल २९ हजार ६९० क्विंटल कांद्याची नोंद झाली. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या कांद्यामुळे बाजारात पुरवठा वाढल्याने भावात प्रतिक्विंटल २०० रुपयांपर्यंत घसरण झाली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेच्या छायेत आले आहेत. प्रतिक्विंटल १२०० ते १६०० रुपयांचा दर कांद्याचे भाव त्याच्या गुणवत्तेनुसार निश्चित केले जातात. यामध्ये सर्वाधिक … Read more

शेवगाव तालुक्यात चोरट्यांच्या सुळसुळाट, सततच्या चोऱ्यांमुळे नागरिक त्रस्त, आंदोलनाचा दिला इशारा

शेवगाव- तालुक्यातील बालमटाकळी परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे व घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा तत्काळ बंदोबस्त व्हावा, या प्रमुख मागणीसाठी मंगळवार ((दि. २९) रोजी बालमटाकळी येथे ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशारा सरपंच राम बामदळे यांच्यासह गावातील विविध राजकीय पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पोलिस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. निवेदनात नमूद करण्यात आले … Read more

श्रीरामपूर शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या संदर्भात आमदार हेमंत ओगले यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

श्रीरामपूर- शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जागेसाठी रेखांकनाचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहे. शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या जागे संदर्भात आमदार हेमंत ओगले यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात काल मंगळवारी बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. सदर बैठकीकरिता माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे … Read more

शिर्डी येथील साईबाबा मंदिरात आजपासून साई सच्चरित पारायण सोहळ्याला होणार सुरूवात

शिर्डी- श्री साईबाबा संस्थान,नाट्य रसिक मंच व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने २५ जुलै ते १ ऑगस्टदरम्यान साईआश्रम शताब्दी मंडपात श्री साई सच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या पारायण सोहळ्याचे हे ३१ वे वर्ष असून, सकाळी ७ ते ११.३० या वेळेत पुरुष व दुपारी १ ते … Read more

कर्जत तालुक्यातील राशीन येथील चौकाला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले नाव, बैठकीत एकमताने निर्णय

कर्जत- कर्जत तालुक्यातील राशीन येथील चौकाला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले चौक, असे नाव कायम ठेवणे व तेथे भगवा ध्वज उभारण्याचा निर्णय काल झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू झालेला वाद अखेर मिटला आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी राशीन येथील जुन्या करमाळा चौकाचे महात्मा ज्योतीराव फुले चौक असे नामकरण करण्यात आले. तसा राशीन … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये २७ जुलैला होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या कार्यक्रमाचे आ.जगतापांनी अध्यक्षपद स्विकारावे

Ahilyanagar News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी आ. संग्राम जगताप यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी लोकार्पण सोहळ्याचे स्वागत अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा उभारणी समितीच्या वतीने निवेदनाद्वारे आ. संग्राम जगताप यांच्याकडे केली. यावेळी सुरेश बनसोडे, अजय साळवे, सुमेध गायकवाड, जलअभियंता परिमल निकम, विजय भांबळ, विलास साठे, विनीत … Read more

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी तसेच कृषीमंत्र्याचा राजीनामा घ्यावा, जामखेड तालुक्यात प्रहार संघटनेचा रास्तारोको

जामखेड- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल, असे वचन दिले होते. परंतु सरकार स्थापन होऊन बराच काळ झाला असतानाही अद्यापही राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी बाबत ठोस निर्णय झालेला नाही. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेच्या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर, विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी … Read more