नेवासा तालुक्यातील रस्तापूरच्या उपसरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर, मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप

नेवासा- तालुक्यातील रस्तापुर येथील उपसरपंचाविरोधात अविश्वास ठराव नेवासा येथील तहसीलदार संजय बिरादार यांच्या उपस्थितीत नुकताच सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रस्तापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अण्णासाहेब झुंबर अंबाडे होते. हे उपसरपंचपद रोटेशन पद्धतीने ठरले होते. परंतु त्यांची मुदत संपूनही ते पदाचा राजीनामा देत नव्हते व मनमानी पद्धतीने कारभार करीत होते. कोणालाच विश्वासात न घेता … Read more

संगमनेरमध्ये पोलिसांनी बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनातून ९२ हजारांचा गुटखा केला जप्त

संगमनेर- गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडून पोलिसांनी ९२ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. पोलिसांनी सोमवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास शहरातील एका विद्यालयाच्या परिसरात ही कारवाई केली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील ज्ञानमाता हायस्कूल समोर संजय सदाशिव उगलमुगले (रा. तिगाव, ता. संगमनेर) व सागर … Read more

कलियुगात गोमातेची सेवा केल्याने पुण्य प्राप्त होते, सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांचा भक्तांना उपदेश

धनगरवाडी- कलीयुगात गोमातेची सेवा करावी. त्याच्यातच पुण्य प्राप्त होते, असा उपदेश सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी दिला. राहाता तालुक्यातील धनगरवाडी हनुमान मंदिर येथील सप्ताहाच्या काल्याची कीर्तनसेवा महंत रामगिरी महाराजांनी दिली, यावेळी ते बोलत होते. यावेळी मधुकर महाराज, गायनाचार्य रामभाऊ महाराज, आदित्य महाराज आदमाने, वैभव महाराज भराडे, चंद्रकांत महाराज रक्टे, मृदुंगाचार्य अशोक महाराज ठेंग, विक्रम … Read more

श्रावण मासानिमित्त गोदावरी नदी काठी स्नान करणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याची मागणी

कोपरगाव- श्रावण मासानिमित्त महिला मोठ्या संख्येने स्नानासाठी येतात. गोदावरी नदीच्या काठी महिलांसाठी स्नानाची सोय उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तिथे त्यांच्यासाठी स्वतंत्र आणि सुरक्षित व्यवस्था असणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरपालिकेने ती व्यवस्था करावी, या मागणीचे निवेदन संजीवनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने कोपरगाव नगरपालिकेला काल देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, श्रावण मासात अनेक महिला येथील गोदावरी … Read more

नेवासा शहरात टारगट पोरांना आळा घालण्यासाठी छेडछाड विरोधी पथक नेमून ‘हेल्पलाईन’ सुरु करा, भाजपा महिला मोर्चाची मागणी

नेवासा- शहरातील शालेय विद्यार्थिनींना टारगट मुलांच्या त्रासाला आळा घालण्यासाठी छेडछाड विरोधी पथक नेमून ‘हेल्पलाईन’ सुरु करा, अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अमृता नळकांडे यांनी पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेवासा शहर परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थिनींना टारगट मुले त्रास देत असून हे प्रकार सातत्याने घडत आहेत. तसेच शहरातील बदामबाई गांधी … Read more

शासनाच्या विविध योजनांचे रखडलेले अनुदान लवकरच लाभार्थ्यांना मिळणार, आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या पाठपुराव्याला यश

नेवासा-विशेष सहाय्य योजनेतील कोणत्याही लाभार्थ्यांचे अनुदान बंद झालेले नसून केवळ तांत्रिक अडचणीमुळे ते थांबले आहे. ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी दोन दिवसीय विशेष शिबिराचे नेवासा तहसील कार्यालय येथे आयोजन केले आहे. तालुक्यातील श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ आणि इंदिरा गांधी दिव्यांग योजना या विशेष सहाय्य योजनेंतर्गत अनुदान वंचित लाभार्थ्यांसाठी उद्या २५ जुलै २०२५ … Read more

राहुरी रेल्वे स्टेशनवर महत्त्वाच्या रेल्वेंना थांबा द्या, लवकर निर्णय न घेतल्यास रेल रोको आंदोलनाचा इशारा

राहुरी- राहुरी रेल्वे स्टेशनवर महत्त्वाच्या रेल्वेंना थांबा द्यावा, अशी मागणी पुणे येथील रेल्वे सल्लागार समितीच्या सभेत निवेदन देऊन करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे रेल्वे विभागीय सल्लागार समितीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी सल्लागार समितीचे सदस्य रणजीत श्रीगोड व डॉ. गोरख बारहाते, ग्राहक पंचायतीचे दत्तात्रय काशीद यांनी पुणे विभागाचे विभागीय वाणिज्य रेल्वे व्यवस्थापक अनिल कुमार … Read more

ठेकेदाराने खंडणी न दिल्यामुळे तरूणांनी कोपरगाव तालुक्यातील उड्डाणपुलाचे काम पाडले बंद, नागरिकांमध्ये चर्चांना उधाण

कोपरगाव- सावळीविहीर ते कोपरगाव या रस्त्याच्या कामाने अद्यापही वेग न घेतल्याने खड्ड्यांचा त्रास संपता संपेना, त्यात भरीस भर म्हणून कोपरगावातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रस्त्याचा ठेका घेतलेल्या कंत्राटदाराने खंडणी न दिल्याने काही तरुणांनी पुणतांबा चौफुली येथील उड्डाण पुलाचे काम बंद पाडले आहे. खंडणी मागणाऱ्या तरुणांनी कोणाचे नाव न घेतल्याने या प्रकारात वेगवेगळ्या नावांच्या … Read more

अहिल्यानगरच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ‘बेंगलोर’ मार्केटने घातली भुरळ, कांदा विक्रीसाठी बेंगलोर मार्केटला शेतकऱ्यांची पसंती

एकरी लाखो रुपयांचा खर्च करून शेतीत घाम गाळत मोठ्या कष्टाने पिकविलेल्या कांद्याला योग्य बाजारभाव मिळालाच नाही तर शेतकरी आर्थिक ओझ्याखाली दबला जातो. आर्थिक खर्च मातीमोल झाल्याने शेतकऱ्याला पुन्हा उभारी घ्यायला बराच कालावधी लागतो. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकरी कांद्याला कोणत्या बाजारपेठेत योग्य बाजार भाव मिळेल याचा शोध घेऊनच कांदा विक्रीसाठी पाठविण्याचे धाडस करत आहेत. जवळच्या बाजारपेठेपेक्षा … Read more

कर्जत-जामखेड तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींना सभापती राम शिंदे यांच्या प्रयत्नातून मिळाला १ कोटी ५० लाखांचा निधी

जामखेड / कर्जत : केंद्र शासनाच्या पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानातून कर्जत तालुक्यातील भांबोरा, सिध्दटेक, गुरव पिंपरी आणि जामखेड तालुक्यातील हळगाव, साकत, अरणगाव या सहा ग्रामपंचायतींच्या कार्यालयीन इमारती व नागरी सुविधा केंद्र उभारण्यास सरकारने १ कोटी ५० लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. सदरचा निधी प्राप्त व्हावा याकरिता विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांनी सरकारकडे … Read more

पैसे डबल होण्याच्या नादापायी शेअर मार्केटच्या कंपन्यांमध्ये फसलेल्या गुंतवणूकदारांचा श्रीगोंद्यात मेळावा

श्रीगोंदा- शेअर बाजारात आमिष आर्थिक लाभाचे देऊन लुटणाऱ्या कंपनीच्या विरोधात आंदोलन सुरू केले तेव्हापासून संचालक नवनवीन व्हिडिओ, ऑडिओ प्रसारित करून गुंतवणूकदारांना आशेवर ठेवत आहे. खरच ते रक्कम परत करणारे असतील तर फरार का झालेत. सहा महिन्यांपासून ताराखा देऊन लोकांची दिशाभूल करत आहेत. वेगवेगळ्या नावाच्या कंपन्यांमार्फत शेअर मार्केटच्या नावाखाली महाराष्ट्रातील हजारो लोकांकडून रक्कम गोळा करून नवनाथ … Read more

शेवगाव तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, जाणून घ्या ग्रामपंचायतीनुसार आरक्षण?

शेवगाव- शेवगाव तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी ९४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षणाची सोडत काल बुधवारी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार आकाश दहाडदे, यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. या वेळी निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार राजेंद्र बकरे, महसूल सहाय्यक सुरेश बर्डे, श्रीकांत गोरे, आदी उपस्थित होते. यावेळी श्रीकृष्ण बर्डे या बालकाच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठया काढण्यात … Read more

Ahilyanagar News : विनापरवाना भंगार साहित्य वाहतूक करणारा मालट्रक नगर पोलिसांनी पकडला, १२ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

वाळकी- विनापरवाना मालट्रकमध्ये भंगार साहित्य वाहतूक करणारा मालट्रक नगर तालुका पोलिसांनी पकडला आहे. या कारवाईत भंगार साहित्य व ट्रक, असा १२ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई नगर पाथर्डी रोडवरील चांदबीबी महालाकडे जाणाऱ्या रोड जवळील सर्कल जवळ (दि.२२) जुलै रोजी सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. नगर तालुका पोलीस नगर- पाथर्डी रोडवर गस्त … Read more

Ahilyanagar News : शेंडी बायपास रोडवर बुलेटला ट्रकने दिली जोरदार धडक, धडकेत बुलेटस्वाराचा जागीच मृत्यू

जेऊर- भरधाव वेगातील मालट्रकने बुलेट मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शेंडी बायपास रोडवरील द्वारकादास श्यामकुमार मॉलसमोर दि.२२ जुलै रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. शैलेश मल्हारी झिंजुटें (वय ३८, रा. सोलापूर, हल्ली रा.चेतना कॉलनी, नवनागापूर) असे मयताचे नाव आहे. याबाबत प्रशांत रमाकांत राऊत (वय ४०, रा. गजानन … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरातील सर्व गणेश मंडळानी डीजे मुक्त व पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावेत, बारस्कर यांचे आवाहन

अहिल्यानगर- शहरातील व उपनगरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पारंपारिक हिंदू संस्कृती जपत डीजे मुक्त व पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावेत. यावर्षी पासून नगर शहराबरोबरच सावेडी व केडगाव उपनगर भागातील उत्कृष्ट देखाव्यांनाही पारितोषिके देण्यात येणार आहेत, अशी माहिती गणेशोत्सव देखावे स्पर्धा प्रमुख रवींद्र बारस्कर यांनी दिली. गणेशोत्सवानिमित्त उत्कृष्ट देखावा स्पर्धेची माहिती देण्यासाठी शहरातील व उपनगरातील सार्वजनिक … Read more

Ahilyanagar News : जामखेड तालुक्यातील अरणगाव ग्रामपंचायतीसाठी सभापती राम शिंदे यांच्या प्रयत्नातून २५ लाखांचा निधी मंजूर

जामखेड- तालुक्यातील अरणगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयीन विकासासाठी केंद्र सरकारच्या पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या मंजुरीसाठी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना आता यश लाभले असून, स्थानिक स्तरावर पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन ग्रामपंचायत इमारत आणि नागरिक सेवा … Read more

Ahilyanagar News : पाथर्डी तालुक्यातील ८६८ अदखलपात्र गुन्ह्यांतील संशयीत आरोपींविरुध्द होणार कारवाई, तहसिलदारांकडे शिफारस

पाथर्डी- तालुक्यातील ८६८ अदखलपात्र गुन्ह्यांतील संशयीत आरोपींविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाईसाठी शिफारस पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी तालुका दंडाधिकारी तहसिलदार यांच्याकडे केली आहे. अदखलपात्र गुन्ह्याची दखल घेतल्यास भविष्यातील मोठे गुन्हे घडण्याची शक्यता कमी होते, त्यामुळे बांधाची भांडणे, भावकीतील वाद, शेजाऱ्याचा वाद, व्यक्तिगत व्देषातून घडलेल्या घटना यांच्यामुळे होणारे मोठे गुन्हे रोखण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे पोलिस निरीक्षक विलास … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील आडसूळ आर्किटेक्चर महाविद्यालयास मिळाली शासकीय मान्यता

अहिल्यानगर- चास ता. अहिल्यानगर साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेच्या आडसूळ आर्किटेक्चर महाविद्यालयास कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर, नवी दिल्ली, महाराष्ट्र शासन, तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी, लोणेरे या सर्व नियामक संस्थेकडून मान्यता मिळाली, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिरूद्ध आडसूळ यांनी दिली. चास येथील साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध माणिक आडसूळ यांचे … Read more