केवळ व्यायाम पुरेसा नाही! खाण्याच्या ‘या’ सवयी तुम्हाला बनवतायत लठ्ठ, संशोधनातून धक्कादायक खुलासा

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वजन वाढणे, शरीर स्थूल होणे आणि लठ्ठपणाशी संबंधित आजार बळावणे हे सामान्यच झालं आहे. अनेकदा याचे कारण थेट व्यायामाचा अभाव मानले जाते. पण ताज्या संशोधनानुसार, केवळ व्यायाम न करणे हे लठ्ठपणाचे प्रमुख कारण नाही, तर चुकीच्या खाण्याच्या सवयी त्यामागे आणखी मोठी भूमिका बजावत आहेत. आजकाल लठ्ठपणा हा एक सार्वत्रिक प्रश्न झाला आहे. … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटबंना करणाऱ्याला लवकर शोधून काढा, अन्यथा हिंदू समाज शांत बसणार नसल्याचा इशारा

राहुरी- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची राहुरी शहरात विटंबना झाल्यापासून चार महिने उलटले तरीही आरोपी अद्याप मोकाट फिरत असून, पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. या प्रकरणाचा तपास परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्याकडे द्यावा, अशी मागणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी करत २६ जुलै रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनास … Read more

साप हा शेतकऱ्यांचा मित्र, त्यामुळे सापाला मारू नका त्याचे रक्षण करा- सर्पमित्र धनंजय मोहिते यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

अकोले- भारतात सापांच्या तीन हजारांहून अधिक जाती आढळतात, त्यापैकी महाराष्ट्रात सुमारे २६५ जाती आहेत. यामध्ये हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच विषारी सापांची संख्या असून उर्वरित साप बिनविषारी आहेत. अन्न साखळी टिकवायची असेल, तर फक्त साप नव्हे, तर जंगलही वाचवणे आवश्यक आहे. साप हा शेतकऱ्यांचा खरा मित्र असून, निसर्ग समतोल राखण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन सर्पमित्र … Read more

शहरातील दिल्ली नाका परिसरात उभारलेल्या पोलिस चौकीत अंधाराचे साम्राज्य, वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी

संगमनेर- मोठ्या प्रयत्नानंतर शहरातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या दिल्ली नाका परिसरात सुरू करण्यात आलेल्या पोलीस चौकीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वीज उपलब्ध नसल्याने या चौकीमध्ये अंधाराचे साम्राज्य आहे. त्यामुळे या चौकीला वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे. संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात हाणामाऱ्यांच्या घटना वारंवार घडत असतात, त्यामुळे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे … Read more

खरिप हंगामातील पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव, मका पिकांवर लष्करी अळी, सोयाबीनवर यलो मोझॅक तर कपाशीवर मावा अन् तुडतुड्यांचा हल्ला

टाकळीभान- खरीप हंगाम सुरु होऊन महिनाभराचा कालावधी उलटला असताना पावसाने पुन्हा दडी मारल्याने श्रीरामपूर तालुक्यातील पुर्व भागातील शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. त्यातच मका पिकावर लष्करी अळी, सोयाबीनवर यलो मोझॅक तर कपाशी पिकावर मावा, तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहीले आहे. श्रीरामपूर पुर्व परीसरातील टाकळीभान, खोकर, भोकर, कारेगाव, भेर्डापूर, कमालपूर, खानापूर, भामाठाण, … Read more

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट, कार्यालयीन कामकाजाची घेतली माहिती

  नेवासा- आमदार विठ्ठलराव लंघे यांनी नव्याने सुरू केलेल्या येथील जनसंपर्क कार्यालयास राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी ना. विखे पाटील यांचे स्वागत करून सत्कार केला. जनसंपर्क कार्यालय हे लोकप्रतिनिधी आणि जनतेतील संवादाचा एक महत्वाचा दुवा असून या ठिकाणी नागरिकांच्या अडचणी, समस्या यावर मार्गदर्शन … Read more

अकोले तालुक्यात सर्रासपणे होतेय दारू विक्री, पोलिस व उत्पादनशुल्क अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

अकोले- अकोले आणि राजूर पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच उत्पादनशुल्क अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केली असून, अवैध दारू विक्री तात्काळ बंद न झाल्यास १५ ऑगस्टपासून आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. अकोले तालुक्यातील २५ गावांमध्ये सर्रासपणे दारूविक्री सुरू आहे. संगमनेर, शेंडी, ठाणगाव येथून उघडपणे दारूची वाहतूक केली जाते. वीरगाव फाटा … Read more

ऐतिहासिक दारूबंदी ठरावचे इतिवृत्त राजूर ग्रामपंचायतीकडून गहाळ, ग्रामपंचातीचा कारभारावर प्रश्नचिन्ह?

अकोले- तालुक्यातील आदिवासी भागाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या राजूर गावात सन २००५ मध्ये ऐतिहासिक असा दारूबंदी ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला होता. मात्र, या ठरावाचे इतिवृत्त सध्या गहाळ झाल्याचे समोर आले असून, माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नावर राजूर ग्रामपंचायतीने लेखी स्वरूपात सदर माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते किरण माळवे यांना दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते … Read more

कोपरगाव शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिकेकडून लाखोंचा खर्च, मात्र अतिक्रमणाची परिस्थिती पुन्हा आहे तशीच

कोपरगाव- नगरपालिकेने काही महिन्यांपूर्वी शहरातील सुमारे ८०० अतिक्रमणे हटवण्यासाठी राबवलेल्या मोहिमेवर १० लाख १ हजार ७६१ रुपये इतका खर्च झाला; मात्र आज पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमणाची स्थिती ‘जैसे थे’ झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या संपूर्ण मोहिमेचा व्यर्थ खर्च जनतेच्या कररुपी पैशातून झाला असल्याने, ही मोहीम काही ठराविक अतिक्रमणधारकांनाच टार्गेट करण्यासाठीच होती का? असा … Read more

अकोले तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेत १४ वर्षीय विद्यार्थिनीचा शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापिकेकडून विनयभंग आणि छळ

अकोले- तालुक्यातील एका शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेतील शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापिका आणि महिला शिक्षकाविरुद्ध अश्लील वर्तन, छेडछाड आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करत अकोले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की पीडीत विद्यार्थिनी ही इयत्ता दहावीमध्ये … Read more

अहिल्यानगरच्या भूमीपुत्राने राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

वाळकी- अहिल्यानगर तालुक्यातील वाळकी येथील भूमीपुत्र तसेच मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले महेंद्र रावसाहेब बोठे यांनी रायपूर, छत्तीसगढ येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत ८४ किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत लाईट कॉन्टैक्ट गटामध्ये सुवर्णपदक पटकावले. वाळकी येथील महेंद्र बोठे यांना बालपणापसून मैदानी खेळाची आवड होती. कुस्तीमध्ये त्यांना जास्तच रस असल्याने लहानपणीच कुस्तीतील … Read more

नगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज पुन्हा होणार

अहिल्यानगर- सन २०२५- २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार नगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज दि. २३ जुलै रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार संजय शिंदे यांनी दिली आहे. नगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींसाठी २३ जुलै रोजी दुपारी १२ वा. नियोजन भवन, जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत आयोजित करण्यात … Read more

केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे थकवले पैसे, शेतकरी संघटनेकडून बेमुदत उपोषणाचा इशारा

निंबेनांदूर- केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाचे एक रकमी व्याजासह पेमेंट तत्काळ अदा करावे अन्यथा दि.५ पाच ऑगस्टपासून शेवगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात संबंधित ऊस उत्पादकांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेवगाव, गेवराई, पैठण या तालुक्यांसह परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यास … Read more

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे- भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय कर्डिले

करंजी- रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असून, रक्तदानामुळे अनेकांचा जीव वाचवते, त्यामुळे प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान केले पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिराला भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचासह तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अक्षय … Read more

शेवगाव तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आज आरक्षण सोडत

शेवगाव- सन २०२५ ते ३० या पंचवार्षिक कालावधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार शेवगाव तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत आज (दि.२३) रोजी जाहीर होणार असल्याची तहसीलदार आकाश दहाडदे व निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार राजेंद्र बकरे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, तालुक्यात सन २५ ते ३० या पंचवार्षिक कालावधीसाठी ९४ ग्रामपंचायतीच्या सरपंच … Read more

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या शेवगावचा बिग बूल साईनाथ कवडेला पोलिसांकडूनच वाचवण्याचा प्रयत्न

शेवगाव- शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून भरमसाठ परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या साईनाथ कवडे याला पोलिसांकडून व तपासी यंत्रणेकडून वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे त्यात फसलेल्या हजारो सर्वसामान्य गुंतवणूकदारांना रक्कम व न्याय मिळण्याची शक्यता मावळली असून, तालुक्यासह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास सीबीआय व आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात यावा, अशी … Read more

शेवगात तालुक्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी; नागरिकांची मागणी

शेवगाव- तालुक्यातील एरंडगावसह खानापूर परिसरात अनेक दिवसांपासून भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जायकवाडी धरणावरील पाण्याच्या मोटारी चोरीचे प्रमाण वाढले असून, शनिवार (दि. १९) रोजी मध्यरात्री चोरटे धरणाच्या कडेला असलेल्या पाण्याच्या मोटारी व वायर चोरून नेत असताना वस्तीवरील शेतकरी जागे झाले. यामुळे साडेसात एच.पी. पाण्याची मोटार व वायर रस्त्याच्या कडेला टाकून … Read more

कारमधून गुटखा घेऊन आला अन् अलगद तोफखाना पोलिसांच्या सापळ्यात सापडला, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर- शहरातील प्रेमदान हाडको परिसरात मोटारीतून गुटखा विक्री आणलेल्या एकास तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोटारीसह मोटारकारसह ५ लाख १२ हजार ४३६ मुद्देमाल जप्त केला. अनिकेत पोपट दळवी (वय २५, रा. न्यू प्रेमदान हाडको, सावेडी, ता जि अहिल्यानगर) असे ताब्यात घेतल्याचे नाव आहे. तोफखा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना २२ जुलै रोजी माहिती … Read more