शिक्षणात कामचुकारपणा करणाऱ्या शिक्षकांची गय केली जाणार नाही, प्राचार्य संजय म्हस्के यांची शिक्षकांना तंबी

करंजी- विद्यार्थी घडवता येत नसतील तर शिक्षकांनी कारवाईची वाट न बघता बाजूला व्हावे. कामचुकारपणा करणाऱ्या शिक्षकांची गय केली जाणार नाही, अशा शब्दांत श्री नवनाथ विद्यालयाचे प्राचार्य संजय म्हस्के यांनी शिक्षण क्षेत्रात काम चुकारपणा करणाऱ्या शिक्षकांना खडे बोल सुनावले तर चांगले काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीवर थापही मारली आहे. मंगळवारी श्री नवनाथ विद्यालयात पालक शिक्षक मेळावा पार … Read more

पुण्यात हरवलेली मुलगी पोलिसांना अहिल्यानगरमध्ये सापडली, मात्र तपासात पळवून आणल्याचे झाले उघड, एकजण ताब्यात

सोनई- खरवंडी येथील युवकाने पुणे, कोथरूड येथील २१ वर्षीय युवतीस पळवून आणले होते. या प्रकरणी शिंगणापूर पोलिसांनी संशयित इसमास व हरवलेल्या मुलीस कोथरूड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याबाबत शिंगणापूर पोलीस ठाण्याकडून समजलेली माहिती अशी की, कोथरूड, पुणे येथील २१ वर्षीय युवती हरवल्याची फिर्याद दाखल झालेली होती. पुणे पोलिसांनी सूत्रे हलवत हरवलेली मुलगी खरवंडी (ता. नेवासा) … Read more

शिर्डी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या खून प्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

राहाता- शिर्डी येथे पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या खुनाच्या प्रकरणाचा निकाल काल मंगळवारी लागला असून, आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या सखोल तपासामुळे आणि न्यायालयीन प्रक्रियेमधील प्रभावी युक्तिवादामुळे या गंभीर गुन्ह्याला योग्य तो न्याय मिळाल्याचे बोलले जात आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की मागील भांडणाच्या कारणावरून खून करणाऱ्या अक्षय उर्फ बजरंग सुधाकर थोरात … Read more

शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी यासाठी श्रीगोंद्यात चक्काजाम आंदोलन, प्रहार जनशक्ती पक्षाच्या इशारा

श्रीगोंदा- शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ कर्जफाफी द्यावी या मागणीसाठी दि.२४ जुलै रोजी श्रीगोंदे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे तालुका अध्यक्ष सुरेश सुपेकर यांनी निवेदनाद्वारे इशारा दिला. भाजप सरकारने विधानसभा निवडणुकीत आम्हाला मते द्या, आमची सत्ता आल्यास सरसकट कर्ज माफी करू असे आश्वासन दिले होते मात्र सरकार … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील एकल महिलांना सरकारी योजनांच्या माध्यमातून सक्षम करावे- जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

अहिल्यानगर- शासनाच्या विविध विकास योजनांच्या माध्यमातून एकल महिलांना प्राधान्य देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज प्रशासकीय यंत्रणेला केले. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात एकल महिला सक्षमीकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० या जयंती वर्षानिमित्त कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानिमित्ताने जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची … Read more

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

अहिल्यानगर- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी कृषिमंत्री हटावच्या जोरदार घोषणा दिल्या. या आंदोलनात शहर जिल्हा कार्याध्यक्ष अनिकेत कराळे, ज्येष्ठ नेते किसनराव लोटके, अशोक बाबर, प्रकाश पोटे, अथर खान, गौरव नरवडे, फरीन शेख, रुकैय्या शेख, अल्तमश जरीवाला, समीर … Read more

३१ जुलै पूर्वी शेतकऱ्यांनी खरिप पिक विमा भरून घ्यावा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांचे आवाहन

अहिल्यानगर- जिल्ह्यामध्ये खरीप २०२५ दरम्यान सरासरी ९४ क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये काही प्रमुख पिके आहेत. त्यात साधारणपणे कापूस दीड लाख हेक्टर, सोयाबीन दीड लाख हेक्टर तसेच सध्या मका पिकाखालील क्षेत्र देखील वाढत आहे. त्यात ९० हजार हेक्टर एक क्षेत्र आहे. बाजरी, मूग, तूर, उडीद यासारख्या पिकांची देखील पेरणी आपल्याकडे झालेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून खरीप … Read more

मुलीचा जन्मदर कमी असणाऱ्या गावांवर विशेष लक्ष देऊन व्यापक जनजागृती करा- जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

अहिल्यानगर- जिल्ह्यात मुलींच्या तुलनेत मुलांचा जन्मदर अधिक असून हे लिंग गुणोत्तर संतुलित करण्यासाठी प्रशासनाने गावपातळीवर विशेष मोहिम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यासंदर्भात स्पष्ट निर्देश देत, विशेषतः ज्या गावांमध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी आहे तिथे व्यापक जनजागृती व कृती आराखडा राबविण्यावर भर दिला. डॉ. आशिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य … Read more

अहिल्यानगरमधील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १२ विद्यार्थ्यांची सरकारी अधिकारीपदी निवड

अहिल्यानगर- विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या १२ विद्यार्थ्यांची विविध शासकीय विभागांत अधिकारीपदी निवड झाली. या यशामुळे महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा अधोरेखित झाला असून महाविद्यालयाच्या परिसरात आनंदाचे वातावरण आहे. महाविद्यालयास नॅशनल असेसमेंट ॲण्ड ॲक्रिडिटेशन कौन्सिल (नॅक) चे ए प्लस मानांकन प्राप्त असून स्थापत्य अभियांत्रिकी विभागास एनबीए नवी दिल्ली मान्यता प्राप्त … Read more

एमआयडीसी परिसरात बंगल्याच्या छतावर सुरू असलेला मावा कारखाना पोलिसांच्या विशेष पोलिस पथकाने केला उद्धवस्त

अहिल्यानगर- पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने नवनागापूर, एमआयडीसी परिसरात बंगल्याच्या छतावर पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेला माव्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुगंधी तंबाखू, तयार मावा, कच्ची मावा सुपारी व चारचाकी वाहनासह ८ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम … Read more

ट्रॅक्टर चोरणाऱ्या भामट्यास एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर- तालुक्यातील हिंगणगाव येथून ट्रॅक्टर चोरीच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी एकास अटक केली असून, त्याच्याकडून २ लाख २० हजारांचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. विठठल बबन गांडुळे (वय ४३ रा. देवटाकळी ता शेवगाव जि. अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे. हिंगणगाव येथून दि. १९ जुलै फिर्यादी एकनाथ दगडु झावरे रा हिंगणगाव ता. जि अहिल्यानगर यांच्या मालकीचा ट्रक्टर … Read more

नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी मोतीयानी यास अटक

अहिल्यानगर: नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळाप्रकरणी येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने मनोज वासुमल मोतीयानी (रा. सावेडी गाव, अहिल्यानगर) याला अटक केली आहे. त्याला बुधवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. बँकेचा तत्कालीन सहायक मुख्य व्यवस्थापक मनोज वसंतलाल फिरोदिया याने कुवत नसतानाही तारण मालमत्तांचे वाढीव दराचे मूल्यांकन अहवाल घेऊन कमाल मर्यादेचे कर्ज मंजूर करण्याची शिफारस केली. … Read more

तीन वर्ष अत्याचार अन शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांची पोलिस कोठडीत रवानगी

अहिल्यानगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किरण गुलाबराव काळे (रा. वैभव कॉलनी, रेणावीकर शाळेजवळ, सावेडी अहिल्यानगर) यांना कोतवाली पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात सोमवारी रात्री अटक केली. मंगळवारी दुपारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवासांची पोलिस कोठडी सुनावली. कोतवाली पोलिस ठाण्यात कर्जत येथील २१ वर्षीय पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून नगर शिवसेना शहरप्रमुख किरण गुलाबराव … Read more

स्वतःच्या गळ्यात माळ कपाळी गंध अन मुलाकडे दोन जेसीबी तरीही विकतात दारू ; पोलिसांनी उचलले ‘हे’पाऊल

अहिल्यानगर : पाथर्डी तालुक्यातील कोपरे येथील महिलांनी पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्याकडे गावातील दारुबंदी करावी, अशी मागणी केली होती. पोलिसांनी गावात दारूविक्री करणारे म्हातारदेव दादाबा वाघमोडे यांना पकडून पोलिस ठाण्यात आणले. पुजारी यांनी वाघमोडे यांचे समुपदेशन करून त्यांना दारू व्यवसाय बंद करण्यासाठी साकडे घातले. मी दारूविक्री करणार नाही. मात्र,महिलांनी त्यांचे नवरे सांभाळावेत, ते दुसरीकडे कुठे … Read more

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण जिल्ह्यातून ९०० रक्त पिशव्यांचे संकलन

अहिल्यानगर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नगर दक्षिण जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नगर दक्षिणेतील सर्वच तालुक्यांतील रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने दक्षिण जिल्ह्यात सुमारे ९०० रक्त पिशव्यांचे संकलन झाल्याची माहिती भाजपाचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी दिली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसानिमित्त नगर दक्षिण जिल्ह्यातील भाजपाच्या … Read more

नगरच्या व्यावसायिकास गुजरातमध्ये घातला ४० लाखांचा गंडा

अहिल्यानागर : गुजरातमधील अपना भारत या प्रायव्हेट फंडिंग कंपनीकडून हवाला मार्फत २० कोटींचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने नगर मधील हॉटेल व्यावसायिकाची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशाल रमेश भांबरे (वय ३३, रा. रुईछत्तीसी, ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे … Read more

प्रवरा नदीच्या पात्रातून घरकुलाच्या नावाखाली सुरूय बेकायदेशीर वाळू उपशा, तक्रार करूनही प्रशासनाकडून डोळेझाक

शिर्डी- विधानसभा मतदारसंघातील शिबलापूर (माळेवाडी) येथील प्रवरा नदीच्या पात्रातून घरकुल योजनेच्या नावाखाली सुरु असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात तक्रारी करूनही प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय तबाजी मुन्तोंडे हे लवकरच शिबलापूर येथील तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत. मुन्तोंडे यांनी आश्वी पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे की, शिबलापूर (माळेवाडी) येथे पंतप्रधान आवास योजनेच्या … Read more

पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिले भात लागवडीचे धडे

संगमनेर- कोंभाळणे (ता. अकोले) येथील पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्याच शेतात भाताच्या वाणाची निवड, पाणी व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करत भात आवणी कशी करावी याचे धडे वृंदावन कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिले. कृषी अभ्यासक्रम अंतर्गत समाविष्ट असलेल्या भात आवणी या प्रात्यक्षिकाचा प्रत्यक्ष अनुभवही विद्यार्थ्यांनी यावेळी घेतला. डॉ. आर. एस. गुंजाळ वेलफेअर फाउंडेशन संचलित वृंदावन कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक … Read more