तरूणीच्या संवेदनशिलतेमुळे राहुरी तालुक्यातील काटेरी झुडपात अडकलेल्या गिर गायीच्या वासराला मिळाले जीवनदान

राहुरी – एका युवतीने दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे आणि प्रयत्नांमुळे मरणासन्न अवस्थेतील एका निष्पाप गिर गायीच्या वासराचे प्राण वाचले. दि. २० जुलै २०२५ रोजी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास ऋतुजा कैलास कांबळे वय २५ वर्षे, रा. निर्मळ पिंपरी, ता. राहता, जि. अहिल्यानगर या पुणे येथून ताहाराबाद मार्गे कानडगावकडे जात असताना, ताहाराबाद ते कानडगाव दरम्यानच्या घाटामध्ये जंगलात त्यांना … Read more

शहिद संदिप घोडेकर यांच्या स्मृती आठवणीत राहण्यासाठी हेल्थ क्लब रोडला घोडेकर यांचे नाव देण्यात येणार- आमदार अमोल खताळ यांची माहिती

संगमनेर- वीर जवान मेजर संदीप घोडेकर यांच्या स्मृती कायमस्वरूपी जागृत राहाव्यात म्हणून हेल्थ क्लब, घोडेकर मळा रोडला मेजर संदीप घोडेकर यांचे नाव देऊन हेल्थ क्लब रोड प्रवेशद्वाराजवळ कमान उभारावी, अशी मागणी घोडेकर मळा मित्र परिवाराने आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली आहे. त्यावर योग्य तो निर्णय घेऊ, असा विश्वास आ. अमोल खताळ यांनी घोडेकर मित्रपरिवाराला दिला.दिल्ली … Read more

साईबाबांच्या शिर्डीत २५ जुलैपासून श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याला होणार सुरूवात, असे असणार आहे वेळापत्रक?

शिर्डी-श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डीत, दि. २५ जुलै २०२५ पासून श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा नाट्य रसिक मंच, श्री साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. २ ऑगस्ट २०२५ पर्यंत चालणाऱ्या या महापर्वासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नाट्य रसिक मंचाचे अध्यक्ष अशोक नागरे, कार्याध्यक्ष रमेशभाऊ गोंदकर, … Read more

येणाऱ्या निवडणुका सर्वांनी ताकदीने लढवायच्या आहेत, आपण सत्ताधारी पक्षाचे असल्यामुळे जनतेचे काम करू- माजी आमदार लहू कानडे

श्रीरामपूर- श्रीरामपूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्याचा स्नेह मेळावा अंतरवली (ता. नेवासा) येथील कानडे कुटुंबाच्या शैक्षणिक संकुलामध्ये नुकताच उत्साहात पार पडला. या बैठकीसाठी सर्व प्रमुख पदाधिकारी व मतदार संघातील श्रीरामपूर – देवळाली शहरासह प्रत्येक गावचे प्रमुख सहकारी उपस्थित होते. या मेळाव्याला माजी आमदार लहु कानडे यांनी संबोधित केले. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही निराश न होता … Read more

शिर्डीच्या वाढत्या पर्यटनामुळे निघोज गावच्या उत्पन्नात पडतेय भर, भूमिपुत्रांच्या योगदानामुळे गावची शहरीकरणाकडे वाटचाल

साकुरी- शिर्डीला लागून असलेल्या राहाता तालुक्यातील निघोज या गावाची ओळख आता केवळ शेतीप्रधान गाव म्हणून मर्यादित राहिलेली नाही. २०११ साली सुमारे साडेतीन हजार लोकसंख्या असलेले हे गाव आता १५ वर्षांतच साडेपाच हजारांच्या घरात पोहोचले आहे. शिर्डीच्या वाढत्या पर्यटनामुळे, गगनचुंबी इमारती, हॉटेल्स, गृहप्रकल्प व ग्रामपंचायतमार्फत झालेल्या पायाभूत सुविधा यामुळे हे गाव शहरी स्वरूपाकडे झपाट्याने वाटचाल करत … Read more

घोडेगावात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशनची नंबर प्लेट बसवण्यासाठी ५३१ रूपये दर असतांना उकळले जात आहेत ७०० रूपये, वाहनमालकांचा आरोप

घोडेगाव- परिवहन विभागाने एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांसाठी एचएसआरपी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन) प्लेट अनिवार्य केली आहे. वाहनमालकांच्या सोयीसाठी अधिकृत एजन्सीमार्फत ही सेवा दिली जाते. मात्र, घोडेगाव येथील एका एजन्सीमध्ये अतिरिक्त पैसे आकारले जात असल्याचा गंभीर आरोप वाहनमालकांकडून होत आहे. याबाबत वाहनमालकांनी पत्रकारांना सांगितले, की नियमित दरानुसार दुचाकी वाहनासाठी ४५० रुपये आणि जीएसटी मिळून एकूण ५३१ … Read more

अहिल्यानगर- अजमेर रेल्वे सुरू करण्याची शिवसेना शहरप्रमुख किरण काळे यांची मागणी, खासदार निलेश लंके यांना निवेदन

अहिल्यानगर- अहिल्यानगरमधून राजस्थान मारवाड जंक्शन, अजमेर या ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, या मार्गावर कोणतीही थेट रेल्वे नाही. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे या मार्गावर रेल्वे सुरू करण्याबाबत खा. निलेश लंकेंकडे ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख किरण काळे यांनी निवेदन देत मागणी केली आहे. खा. लंके नुकतेच पावसाळी संसदीय अधिवेशनासाठी दिल्लीकडे रवाना … Read more

अहिल्यानगरमधील आयुष रुग्णालयातील मेडिकलवाल्याचा खोडसाळपणा, रुग्णाला जाणीवपूर्वक चुकीचे औषध दिल्याची तक्रार

अहिल्यानगर- शहरातील आयुष रुग्णालयात औषधनिर्मात्याने जाणीवपूर्वक चुकीचे औषध दिल्याचा गंभीर आरोप श्रीगोंदा तालुक्यातील भापकरवाडी येथील ज्येष्ठ नागरिक भैरुशंकर भापकर यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्याकडे दाखल केली आहे. चुकीचे औषध देण्याचा प्रकार गंभीर असून, याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन डॉ. घोगरे यांनी दिले आहे. भैरुशंकर … Read more

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू, प्रभागनिहाय आढावा घेऊन बुथ सक्षम करण्यावर भर

अहिल्यानगर- महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) जोरदार तयारी सुरू केली आहे. शहरातील १७ प्रभागांमधील बुथ समित्या आणि शक्ती केंद्र सक्षम करण्यावर पक्षाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. दोन दिवसीय बैठकीत प्रभागनिहाय आढावा घेऊन इच्छुक उमेदवारांनी प्रभागातील राजकीय परिस्थितीचा लेखाजोखा मांडला. पक्षाने यावेळी बुथस्तरीय संघटन मजबूत करण्यावर भर दिला असून, गत निवडणुकीतील १४ नगरसेवकांच्या … Read more

शेतकऱ्यांनो कालव्याचे पाणी काळजीपूर्वक वापरा, अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या; आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या सूचना

नेवासा- मुळा उजवा कालव्याचे आवर्तन सुरू असताना कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त सिंचन झाले पाहिजे. यासाठी पाणी व्यवस्थित वापरणे व त्याचा अपव्यय होणार नाही, याची काळजी अधिकाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांनी देखील घ्यावी, अशी सूचना आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केली. मुळा पाटबंधारे विभागाच्या चिलेखनवाडी उपविभाग अंतर्गत कुकाणा सिंचन शाखा क्रमांक १ च्या नूतन कार्यालयीन इमारतीचे लोकार्पण आमदार विठ्ठलराव … Read more

श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावामध्ये रात्रीच्या अंधारात ड्रोनच्या घिरट्या, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

श्रीरामपूर- खंडाळा, नांदूर, ममदापूर, राजुरी आणि परिसरातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी ड्रोन फिरताना दिसत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी पहाटे खंडाळ्यातील नवाळे यांच्या भाडेकरूची मोटारसायकल चोरी गेल्याची घटना घडली. परिसरात रात्रीच्या वेळेस विविध ठिकाणी ड्रोन फिरताना दिसत आहेत. नागरिकांनी सांगितले की, हे ड्रोन संध्याकाळी उशिरा किंवा मध्यरात्री उड्डाण … Read more

कोपरगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींना 2 कोटींचा निधी वाटप, ग्रामीण भागातील प्रश्न सोडण्यासाठी कटीबद्ध असल्याची आमदार आशुतोष काळे यांची ग्वाही

कोपरगाव- ग्रामपंचायत प्रशासनाचा कार्यभार व्यवस्थितपणे होण्यासाठी त्या ग्रामपंचायतींना नवीन इमारतीची आवश्यकता होती. त्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींना प्रत्येकी २५ लाख रुपयाप्रमाणे एकूण दोन कोटी निधी मंजूर झाल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना स्वतंत्र, सुसज्ज कार्यालयीन … Read more

सर्वसामान्य जनतेने मला आमदारकी दिली, त्यामुळे जनतेसाठी नेवासा तालुका मला चांगला घडवायचा आहे- आमदार विठ्ठलराव लंघे

कुकाणा- माझे कार्यालय फिरते आहे. कुणालाही कुठेही भेटतो. शिक्षण व संस्कार हीच वडिलांकडून मला मिळालेली प्रॉपर्टी आहे. जनतेने आमदारकीचे शस्त्र माझ्या हाती दिले असून त्यातून सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून चांगला तालुका घडवायचा आहे, असे प्रतिपादन आ. विठ्ठलराव लंघे यांनी केले. कुकाणा येथे आमदार लंघे, माजी आमदार पांडुरंग अभंग, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा यांच्या उपस्थित … Read more

मिरजगाव बसस्थानकात सुविधांचा उडालाय बोजवारा, प्रवांशांची गैरसोय तर स्थानिक नागरिकांनी दिला उपोषणाचा इशारा

मिरजगाव- कर्जत तालुक्यातील मिरजगाव हे अहिल्यानगर – करमाळा राष्ट्रीय महामार्गावरील एक मोठे गाव असून, याठिकाणी असलेल्या परिवहन महामंडळाच्या बसस्थानकात दररोज शंभराहून अधिक एसटी बसेस ये, जा करत असतात. येथील बसस्थानकात कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रवाशांसाठी बांधण्यात आलेले सुलभस्वच्छतागृह येथील उपहारगृहाच्या अगदी जवळ अडचणीत व चुकीच्या पद्धतीने करण्यात आले असल्याचे ग्रामस्थांमधून सांगण्यात येत आहे. हे स्वच्छतागृह … Read more

संगमनेर तालुक्यातील दोन मंडल अधिकाऱ्यांसह तीन तलाठ्यांचे करण्यात आले निलंबन, नियमांच्या उल्लंघनाचा ठेवण्यात आला ठपका

संगमनेर- शासनाने तुकडा बंदी केलेली असताना देखील ग्रीन झोन आणि येलो झोनमध्ये तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी बेकायदेशीर तुकडे पाडून त्याचे स्वतंत्र सातबारा तयार केल्याप्रकरणी मंडल अधिकारी इरप्पा काळे, मंडल अधिकारी बाबाजी जेडगुले, तलाठी रोहिणी कोकाटे, तलाठी अलोकचंद चिंचुलकर, तलाठी धनराज राठोड, अशा पाच जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जागृत सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे संबंधित … Read more

कोपरगावमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिरंगी लढत होणार, निवडणुकीच्या तोंडावर नवे राजकीय समीकरण जुळण्याची शक्यता?

कोपरगाव- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून या निवडणुकीच्या तोंडावर कोपरगाव नगरपालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत नवे राजकीय समीकरणं जुळवून येण्याची शक्यता आहे. शनिवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्यसैनिक माधवराव कचेश्वर आढाव यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आ. आशुतोष काळे व … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात ९३.९८ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण, मात्र पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत

अहिल्यानगर- नगर जिल्ह्यात आतापर्यंत ९३.९८ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. विविध पिकांच्या ६ लाख ५० हजार ९८८ हेक्टरवर खरीप पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक १ लाख ७० हजार ६३१ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११३.६ मिमी पावसाची नोंद झाली. मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप पिकांचे … Read more

पाथर्डी तालक्यात चोरट्यांचा सुळसुळाट, मालेवाडी येथे घरफोडी करत पाच तोळे सोन्याचे दागिने केले लंपास

पाथर्डी- मालेवाडी येथील पांडुरंग लक्ष्मण खेडकर यांच्या घरातून पाच तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहेत. मालेवाडी येथील पांडुरंग लक्ष्मण खेडकर यांच्या घरी शनिवारी रात्री चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने मिळून पाच तोळे सोने किंमत पाच लाख रुपये, असे चोरट्यांनी चोरून नेले आहेत. खेडकर हे रात्री जेवण करून झोपले होते. रात्री दोन वाजण्याच्यादरम्यान त्यांना कुत्रे भुंकत … Read more