महाराष्ट्रात गुंडांना आणि वाचाळवीरांना भाजप सरकारकडून मोकळीक दिली जात आहे- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांचा आरोप

संगमनेर- महायुती सरकार सत्तेवर कसे आले, त्यांनी कोणते फंडे वापरले, पक्ष कसे फोडले, चुकीचे निकाल कसे दिले हे सर्वांना माहीत आहे. आज महाराष्ट्रामध्ये गुंडांना आणि वाचाळवीरांना सरकारकडून मोकळीक दिली जात असून, राज्यात निर्माण झालेली दहशत आणि गुंडगिरी ही भाजप पुरस्कृत असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. विधानसभेतील … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील भूमिहीन नागरिकांनाही आता घरकुल बांधता येणार, आमदार अमोल खताळ यांच्या मागणीला यश

जिल्ह्यातील भूमिहीन नागरिकांना स्वतःचे घरकुल उभारता यावे, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात भूमिहीन लाभार्थ्यांना हक्काची जमीन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो भूमिहीन कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. जिल्हा अधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, भूमिहीन … Read more

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विरोधानंतरही नेवासा तालुक्यातील वरखेड येथे पारंपरिक स्वरूपात पार पडला बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम

कुकाणा- वरखेड येथे दरवर्षीप्रमाणे पारंपरिक स्वरूपात बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम यंदाही उत्साहात पार पडला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या जीवघेण्या प्रकाराला विरोध करत आयोजकांवर कारवाईची मागणी केली होती. तरीही शुक्रवार दिनांक १८ जुलै रोजी लक्ष्मीदेवी मंदिर परिसरात भाविकांच्या प्रचंड गर्दीत १२ गाड्या ओढण्यात आल्या. वरखेड यात्रेतील १२ गाड्या ओढण्याचा प्रकार जीवघेणा असून, तो थांबवण्यासाठी आयोजकांवर प्रतिबंधात्मक … Read more

AMC News : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने आगरकर मळा परिसरामध्ये डेंगू मुक्त अभियान संपन्न

अहिल्यानगर : शहरातील नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी तसेच डेंग्यू व पावसाळ्यात उद्भवणारे विषाणूजन्य आजार रोखण्यासाठी महापालिका आरोग्य विभागामार्फत मागील वर्षापासून डेंग्यूमुक्ती अभियान सुरू करण्यात आले असल्याने नगरकरांमध्ये जनजागृती झाली आहे, शहरात दीड लाख लोक वस्ती असून मनपा कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरी जाणे शक्य नाही तरी नागरिकांनी आठवड्यातून एक तास स्वच्छता मोहीम … Read more

शिर्डी शहरातील फुटपाथावरील वाहने हटवून रस्ते मोकळे करा, महिलांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाकडे केली ठोस उपाययोजनांची मागणी

शिर्डी- शिर्डी शहरातील कनकुरी रोड परिसरात फुटपाथवर उभ्या वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक अडथळ्यांविरोधात महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी नगरसेविका वैशालीताई गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी प्रशासनाकडे अतिक्रमण हटवण्याची आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे. माजी नगरसेविका वैशालीताई वेणूनाथ गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या शिष्टमंडळाने शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस … Read more

कोपरगाव तालुक्यातील जलजीवन मिशनची कामे रखडल्यामुळे आमदार आशुतोष काळे ठेकेदारावर आक्रमक, अधिवेशनात कारवाई करण्याची केली मागणी

कोपरगाव- कोपरगाव मतदारसंघातील सहा पाणीपुरवठा योजनांची कामे तीन वर्षांनंतरही अर्धवटच राहिल्याने आमदार आशुतोष काळे यांनी पावसाळी अधिवेशनात तीव्र शब्दांत ठेकेदारांवर निशाणा साधला. या कंपन्यांवर कारवाई करण्यात येऊन नव्या टेंडर प्रक्रियेची त्यांनी मागणी केली. त्यांच्या या मागणीने खळबळ निर्माण झाली आहे. आ. काळे यांनी सभागृहात माहिती देताना सांगितले की, जल जीवन मिशन अंतर्गत कोपरगाव मतदारसंघातील धारणगाव, … Read more

ओबीसी समाजाशी जवळीक साधण्यासाठीच आमदार रोहित पवारांनी राशीनची घटना घडवली, भाजपचा आरोप

कर्जत- गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार रोहित पवार यांना राशीन जिल्हा परिषद गटातुन अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही म्हणून ओबीसी समाजाशी जवळीक साधण्यासाठीच राशीनची घटना घडवली. असा आरोप भारतीय जनता पक्षाचे कर्जत तालुकाध्यक्ष अनिल गदादे यांनी केला. कर्जत तालुक्यातील राशीन येथील घटने संदर्भात कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी गदादे … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातीाल कांदा उत्पादक शेतकरी सापडला दुहेरी संकटात, कांद्याचा भाव वाढत नसल्यामुळे चाळीतच सडायला लागलाय कांदा

कांद्याच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी यंदा फक्त नुकसानच आले आहे. चांगल्या भावाच्या अपेक्षेने चाळीत साठवलेला कांदा सडत चालला आहे आणि बाजारात दर कोसळले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. उत्पादनासाठी केलेला खर्चही वसूल होणार नाही, या भीतीने शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकरी ५० ते … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग : पिसाळलेल्या कोल्ह्याने केला नागरिकांवर हल्ला, कोल्ह्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी

श्रीगोंदा- तालुक्यातील पेडगाव परिसरात पिसाळलेल्या कोल्ह्याने नागरिकांवर हल्ला करून दोन जणांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिसाळलेल्या कोल्ह्याने संपत झिटे आणि ज्ञानदेव झिटे या दोघांना चावा घेतल्याने त्यांच्यावर श्रीगोंद्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वनविभागाने या घटनेची दखल घेतली असली, तरी … Read more

कृषी विभागाच्या योजना तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, ठिबक, कांदाचाळीचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा- खासदार निलेश लंके

अहिल्यानगर- जिल्ह्यातील केंद्र पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्यांचा लाभ पोहोचवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दिशा समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी समन्वय आणि सकारात्मक दृष्टिकोनातून योजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले, तर खासदार नीलेश लंके यांनी शेतकऱ्यांसाठीच्या कृषी योजनांचा लाभ तातडीने आणि थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यावर विशेष भर दिला. … Read more

कंत्राटी कामगारांनी खासदार लंके आणि वाकचौरे यांना विविध मागण्यांचे निवदेन देत मांडल्या व्यथा, सहकार्य करण्याचे आश्वासन

अहिल्यानगर- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित शासन सेवेतील समायोजनास विलंब होत आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढ व्हावी, आदी मागण्यांबाबतचे निवेदन खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार निलेश लंके यांना आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले. यावेळी त्यांनी विविध मागण्यांबाबतची व्यथा दोघांपुढे मांडली. दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार शासन … Read more

सरकारने हल्ले करण्यासाठी कितीही गुंड सोडले तरी आम्ही पुरोगामी विचार सोडणार नाही- माजी आमदार प्राजक्त तनपुरे

राहुरी शहर- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण करणाऱ्यांचा विरोध करणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर सरकारने गुंड पाठवून भ्याड हल्ला केला, असा आरोप माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, सरकारने कितीही गुंड सोडले तरी आम्ही आमचे पुरोगामी विचार सोडणार नाही. शुक्रवारी दुपारी राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारात या … Read more

जिल्हा परिषद शाळेतील तिसरीच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला लोकशाहीचा उत्सव, शाळेत रावबण्यात आली निवडणूक प्रक्रिया

श्रीरामपूर- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अशोकनगर येथे एका आगळ्यावेगळ्या उपक्रमात इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी लोकशाहीच्या मूलतत्त्वांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. वर्गशिक्षिका स्वाती पटारे – निमसे यांच्या संकल्पनेतून व मुख्याध्यापक पांडुरंग पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली तिसरीच्या वर्गात ६ मंत्र्यांच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. निवडणुकीसाठी विद्यार्थ्यांना प्रथम संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. ‘व्होटिंग अॅप’ चा वापर करून मतदानाची आधुनिक … Read more

शेवगाव तालुक्यात जनावरांची खरेदी विक्रीचा व्यवसाय करण्यास कुरेशी समाजाकडून बंदी, तहसीलदारांना निवेदन सादर

शेवगाव- तालुका व शहरातील कुरेशी समाज व व्यापारी संघटनांच्या संयुक्त बैठकीत जनावरांची खरेदी-विक्रीचा व्यवसाय बेमुदत बंद करण्याचा मोठा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. यासंदर्भात समाजातर्फे शेवगावचे तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले असून, भविष्यात कुरेशी समाजाच्यावतीने राज्य पातळीवरही आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या बैठकीत कुरेशी समाजातील सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत, सध्याच्या परिस्थितीत कायदेशीर परवानगी घेऊनही … Read more

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी बच्चू कडूंनी पुकारलेल्या आंदोलनाला खासदार निलेश लंकेंचा पाठिंबा

राज्यातील सर्वच शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी व्हावी, या प्रमुख मागणीसाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांनी सुरू केलेले आंदोलन आता संपूर्ण राज्यात पोहचले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कर्जमाफीसाठी त्यांनी पुकारलेले चक्का जाम येत्या गुरुवार दि.२४ जुलै रोजी असून त्यास खा.निलेश लंके यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. तशा प्रकारचे पत्र खा. लंके … Read more

पाथर्डी तालुक्यातील तीसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडले अडीच लाखांचे दागिने, नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

पाथर्डी- शाळकरी विद्यार्थ्यांच्या दप्तरांमध्ये आतापर्यंत खाऊ, जेवणाचा डबा, घरातील साहित्य, खेळणी, प्रसंगी प्राणघातक शस्त्र सुद्धा आढळून आली आहेत. मात्र तालुक्यातील निंबोडी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे अडीचशे ग्रॅम सोन्याचे दागिने आढळून आले. पालकांना बोलावून खात्री करून विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हाती दागिने सुपूर्त करण्यात आले. कल्याण विशाखापट्टण राष्ट्रीय … Read more

अहिल्यानगरमध्ये दुचाकीचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याने तृतीयपंथीयाने एका महिलेस केली बेदम मारहाण, नाकाचे हाडही तोडले

अहिल्यानगर- नगर-पुणे झेंडा चौकाजवळ पायी जाणाऱ्या महिलेला दुचाकीचा धक्का लागला. तिने दुचाकी नीट चालवता येत नाही का असे म्हणाल्याचा राग येऊन दोन तृतीयपंथी नागरिकांनी तिला बेदम मारहाण केली. ही घटना १५ जुलै २०२५ रोजी सायंकाळी घडली. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात दोन तृतीयपंथी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत जखमी महिलेने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात नवीन ७ पोलिस स्टेशन होणार तसेच ५५० नवीन पदे भरले जाणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

अहिल्यानगर- जिल्हा पोलीस दलामध्ये सध्या सुमारे ३२०० मनुष्यबळ आहे. जिल्ह्यात दरवर्षी २५ ते ३० हजार गुन्हे दाखल होता. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर ताण येत असल्याने सुमारे ५५० पदांची नव्याने निर्मिती केली जाणार आहे. तर, नव्याने सात पोलिस ठाण्याचा प्रस्ताव प्रशासनस्तरावर आला असून, नवीन पोलीस ठाणे निर्मिती केली जाणार असल्याचे आश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. श्रीगोंदा-नगर … Read more