नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या गैरकारभारासह विविध मागण्यांसाठी सुरू असलेले उपोषण मागे, मागण्या मान्य करत अधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश
अहिल्यानगर- बीपीसीएल कंपनीने ग्रामपंचायतीला नुकसान भरपाई पोटी वर्ग केलेल्या पैशाचा गैरव्यवहार थांबवावा, नागरदेवळे गावठाणमधील अमरधाम दुरुस्ती व्हावी, गावाला पूर्णवेळ ग्रामसेवक मिळावा, प्रशासक म्हणून ग्रामविस्तार अधिकारी यांची नियुक्ती व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हा परिषद येथे ग्रामस्थांनी अमरण उपोषण केले. या मागणीची दखल घेऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांनी लेखी आश्वासन दिल्याने उपोषण तिसऱ्या दिवशी मागे … Read more