मुल्ला कटर अत्याचार प्रकरणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते प्रकाश चित्ते यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्या, अन्यथा श्रीरामपूर बंद करू, शिष्टमंडळाचा इशारा

श्रीरामपूर- शहरात सध्या मुल्ला कटर अत्याचार प्रकरणामुळे तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणात हिंदुत्ववादी कार्यकर्ते प्रकाश चित्ते यांच्यावर साक्षीदार महिलेला धमकी दिल्याचा आरोप करत खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा यांनी केला आहे. त्यांनी हा गुन्हा राजकीय षड्यंत्राचा भाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणात सत्य बाहेर यावे … Read more

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचा कोपरगाव तालुक्यात छापा, अवैध वाळू, दारुसह ६२ लाखांचा मुद्देमाल पकडला

कोपरगाव- जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत कोपरगावात चार ढंपर व एक ट्रॅक्टरसह अवैध वाळूसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी पाच जणांवर काल बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पाथर्डी येथे देखील अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने काल बुधवारी … Read more

पारनेरची माती ही कसदार साहित्यिकांची खाण, खासदार निलेश लंके यांचे प्रतिपादन

पारनेर- पारनेरची माती ही कसदार साहित्यिकांची खाण असून, येथे दर्जेदार साहित्याची परंपरा लाभलेली आहे, असे प्रतिपादन अहिल्यानगर दक्षिणेचे खा. निलेश लंके यांनी केले. गटेवाडी येथे झालेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. गटेवाडी येथील नवोदित लेखक अशोक किसन पवार यांनी लिहिलेल्या ‘आणि रामा कलेक्टर झाला’ या कादंबरीचे प्रकाशन खा. लंके व आयकर सहआयुक्त विष्णू औटी … Read more

ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या नावाखाली अनेकांना कोट्यावधींचा गंडा घालणारा म्होरक्या भूपेंद्र सावळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अहिल्यानगर- जादा परताव्याचे आमिष दाखवून गुतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स’ कंपनीच्या मुख्य सूत्रधाराला येथील आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. भूपेंद्र राजाराम सावळे (वय २७, रा. श्रीकृष्णनगर, शिर्डी) असे त्याचे नाव आहे. तो नंदूरबार येथील कारागृहात होता. दरम्यान, त्याला राहाता पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करून त्याला बुधवारी राहाता येथील विशेष … Read more

अहिल्यानगरमधील ‘हे’ गाव होणार राज्यातील पहिले रोड मॉडेल व्हिलेज, मोजणीस प्रशासकीय मंजूरी

पारनेर- ग्रामसभेच्या ऐतिहासिक निर्णयानंतर शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून राज्यातील बाभुळवाडे गाव रोड मॉडेल व्हिलेज करण्यासाठी गावात विशेष ग्रामसभा घेऊन गाव नकाशावरील शेतरस्त्यांची अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी गावशिवार फेरी काढत पाहणी केली. यावेळी तालुका भूमी अभिलेखचे उपाधीक्षक माधवराव पाटील यांनी शेतरस्त्यांच्या मोजणीचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे बाभुळवाडे गाव ते लाणीमावळा शिवरस्ता, बाभुळवाडे गाव ते वडझिरे शिवरस्ता, … Read more

तू माझ्या स्वप्नात येते, मला तुझ्याशी लग्न करायचंय, असं म्हणत अहिल्यानगरमधील महाराजाने केला विनयभंग

अहिल्यानगर- एमआयडीसी परिसरात एका मठात कुटुंब देवदर्शनासाठी जात होते. तिथे संबंधित व्यक्तीची ओळख झाली. तो महाराज असल्याचे सांगता होता. त्याने मुलीच्या इंस्टाग्रामवर वारंवार लग्नाची मागणी करून विनयभंग केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कानिफ सुरेश राऊत (रा. नेवासा, जि. अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने कोतवाली पोलिस ठाण्यात … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात पावासाने उघडीप दिल्याने खरिप हंगाम धोक्यात, शेतकऱ्यांवर मोठं संकट

अहिल्यानगर- नगर तालुक्यासह विशेषतः जिल्ह्याच्या दक्षिणेतील शेतकऱ्यांसमोर खरीप पिकांबाबत मोठे संकट उभे ठाकले आहे. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने खरिपातील पिके कोमजण्यास सुरुवात झाली असून बळीराजासमोर संकट उभे राहिले आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे भवितव्य धोक्यात आले असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. मे महिन्यात अवकाळी पावसाने नगर तालुक्यासह जिल्हाभरात धुमाकूळ घातला होता. मान्सूनपूर्व पावसाच्या ओलीवरच … Read more

पारनेर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ, ९० वर्षाच्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील अन् कानातील सोनं ओरबाडत केली बेदम मारहाण

पारनेर- पारनेर शहरातील कावरे वस्तीवरील निवृत्त जवानाच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेसहा तोळे सोन्याचे दागिने व २५ हजार रुपये रोख, असा साडेसहा लाख रुपयांचा ऐवज लांबवला. पारनेर – सुपे रस्त्यावरील पठारे मळ्यातील शेवूबाई पठारे या ९० वर्षांच्या वृध्देच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची पोत तसेच पाच ग्रॅम वजनाची कर्णफुले ओरबाडून … Read more

नागपूरच्या मेकअप आर्टिस्टला लग्नाचे आमिष दाखवले, मात्र गर्भवती राहिल्यानंतर लग्न करण्यास नकार देणाऱ्या शेवगावच्या एकाविरोधात गुन्हा दाखल

अहिल्यानगर- नागपूर येथील मेकअप आर्टिस्टला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. पीडित महिला गर्भवती राहिल्याने आरोपीने लग्न करण्यास नकार दिला आणि तिला लाथाबुक्कक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. पीडितेच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा झाला आहे. संतोष देवराव गादे (वय ४२, रा. शहर टाकळी, शेवगाव, जि. अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे. पीडितेने फिर्यादीत म्हटले की, … Read more

अहिल्यानगरमध्ये भरधाव डंपरने एकास चिरडले, तरूणाचा जागीच मृत्यू तर डंपरचालक अपघातानंतर झाला पसार

अहिल्यानगर- शहराच्या दिल्लीगेट परिसरात बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता भरधाव डंपरने शहर बस थांबा येथे उभे असलेल्या व्यक्तीला चिरडले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांची गर्दी जमली असता डंपर चालक पसार झाला. प्रकाश नाना अवचर (वय ३५ रा. दातरंगे मळा, ता, जि. अहिल्यानगर) असे मयताचे नाव आहे. शहरातील दिल्लीगेट परिसरात एएमटी शहर बस थांबा असलेल्या ठिकाणी … Read more

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसिंचनाची क्षमता वाढवण्यात येणार- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर- महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांना दिलासा देण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी राज्य सरकार जलसिंचनाच्या क्षमतेत वाढ करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले की, दुष्काळग्रस्त भागांमध्ये पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी सरकार गंभीर आहे आणि त्यासाठी ठोस उपाययोजना राबवल्या जात आहेत. कृष्णा मराठवाडा प्रकल्प हा राज्य सरकारच्या दुष्काळमुक्तीच्या … Read more

अहिल्यानगरच्या महानगरपालिकेत तब्बल ३५० कोटींचा घोटाळा, आमदार संग्राम जगतापांचाही हात असल्याचा राऊतांचा आरोप

अहिल्यानगर- अहिल्यानगर महानगरपालिकेत वारंवार भ्रष्टाचार सुरू आहे. त्याबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, अँटी करप्शनकडे तक्रारी केल्या असून दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. मात्र, अद्यापि त्यावर कार्यवाही झालेली नाही. अहिल्यानगरमध्ये रस्ते जागेवर नाहीत. रस्ते शोधावे लागतात. पावसाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. प्रशासक, ठेकेदार व लोकप्रतिनिधींच्या संगनमतातून महापालिकेत घोटाळा झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुराव्यांसह … Read more

अहिल्यानगरमध्ये कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या, नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

वाळकी- नगर तालुक्यातील वाळकी येथील शेतकरी बाप्पू उर्फ अशोक पाटीलबा निमसे यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी दि.१५ जुलै रोजी घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून बाप्पू निमसे हे कर्जाच्या बोजाखाली वावरत होते. कर्जाला कंटाळून आत्महत्या करावी, असे वक्तव्य ते सातत्याने … Read more

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसिंचन क्षमता वाढविली जाईल – मंत्री राधाकृष्ण विखे–पाटील

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलसिंचनाची क्षमता वाढवण्यासाठी शासन गंभीर असून, त्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात येत आहेत, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अर्धा तास चर्चेत वाढत्या पाण्याची मागणी पूर्ण करण्याची सूचना केली होती, त्यावेळी मंत्री विखे पाटील यांनी माहिती दिली. विखे-पाटील म्हणाले की, कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी अंदाजे२१ … Read more

संगमनेरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू होणार, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांची बैठकीत माहिती

संगमनेर- तालुक्यातील आरोग्य सुविधांना बळकटी देण्यासाठी आणि विशेषतः महिलांच्या आरोग्य गरजांकडे लक्ष देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. संगमनेर नगरपालिका परिसरातील कुटीर रुग्णालयात १०० खाटांचे अत्याधुनिक सुविधायुक्त स्वतंत्र स्त्री रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबत सविस्तर चर्चा करताना … Read more

घराच्या बांधकामासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणण्यासाठी विवाहित तरूणीचा छळ, राहुरी पोलीस ठाण्यात सासरच्या पाच लोकांवर गुन्हा दाखल

राहुरी- घराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये आणावेत, यासाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला घरातून हाकलून देण्यात आले. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सासरच्या पाच लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निशाद आरिफ शेख (वय २७, रा. बारगाव नांदूर, हल्ली रा. मानोरी, ता. राहुरी), यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत … Read more

तरूणाने पहाटे घरात घुसून अल्पवयीन मुलीला मिठी मारत केला विनयभंग, राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

राहुरी- अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करण्यात आले. राहुरी तालुक्यातील एका परिसरात नुकतीच ही घटना घडली. या प्रकरणी आरोपी तरुणावर विनयभंगासह पोस्को अंतर्गत नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील अल्पवयीन मुलगी तीच्या कुटुंबासह एका शिवारातील एका गावात राहते. ६ जुलै रोजी पहाटेच्या दरम्यान पीडित मुलगी व घरातील इतर लोक घरात … Read more

फादरने दिलेले मंतरलेले तेल पिल्याने महिलेचा मृत्यू, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली कोपरगावला भेट

कोपरगाव- येथील खडकी परिसरात मंतरलेले तेल पिल्याने मृत्यू झालेल्या वनिता हरकळ प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष मधुकर आनाप यांनी काल मंगळवारी कोपरगावला जाऊन प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस व वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेवून चौकशी केली आहे. याबाबत त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पोलीस प्रशासनास निवेदन दिले आहे. यावेळी त्यांनी वनिता हरकळ उपचारासाठी गेलेल्या डॉ. … Read more