सरकारकडून शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सुरु आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत लढा थांबणार नसल्याचा शेतकरी संघटनेचा इशारा

श्रीरामपूर- शेतकऱ्यांची कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि तो मिळाल्याशिवाय शेतकरी संघटनेने सुरू केलेला लढा थांबणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांनी दिला. खोकर (ता. श्रीरामपूर) येथे शेतकरी संघटनेच्या नूतन शाखेचा प्रारंभ व कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव काळे तर … Read more

रेल्वे विभागाच्या तटबंदीमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप करण्याती मा.आ. स्नेहलता कोल्हेंची मागणी

कोपरगाव- रेल्वे मार्गालगत असलेल्या राज्य मार्ग, जिल्हा मार्ग, इरिगेशनचे रस्ते, ग्रामपंचायतीचे व शिवरस्ते या सर्वांवर रेल्वे विभागाकडून अलीकडे हद्द निश्चिती करत तटबंदीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन वापरात असलेले अनेक रस्ते अचानकपणे बंद झाल्याने मोठा वाहतूक आणि सार्वजनिक हिताचा प्रश्न निर्माण झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी माजी आमदार … Read more

तळेगाव दिघे मार्गे बसेस नसल्याने प्रवाशांची होतेय प्रचंड गैरसोय,अहिल्यानगर-नाशिक बस त्वरित सुरू करण्याची मागणी

तळेगाव दिघे- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे मार्गे नाशिक ते श्री क्षेत्र भगवानगड सुरु असलेली एकमेव एसटी बस वगळता नगर ते नाशिक अन्य बसेस फेऱ्या होत नसल्याने प्रवाशी, विद्यार्थी व ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तळेगाव दिघे मार्गे त्वरित बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब कारभारी दिघे … Read more

नेवासा तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार

नेवासा- आम आदमी पार्टी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज असून सामान्य जनतेच्या प्रश्नांवर लढणे हाच निवडणूक अजेंडा असणार आहे. तसेच कोणत्याही युतीशिवाय, पूर्णपणे स्वबळावर आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर निवडणूक लढवली जाणार असल्याचे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष अजितराव फाटके यांनी केले. रविवारी नेवासा येथे आम आदमी पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेश … Read more

बिबट्याने नातवावर अचानक झडप टाकली, आजोबानेही जीवाची पर्वा न करता बिबट्याला पळवून लावत नातवाचे प्राण वाचवले

कोपरगाव- बिबट्या आपल्या नातवाला ओढून नेत असतानाचे पाहून आजोबा मच्छिंद्र आहेर यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता बिबट्याला पळवून लावून नातवाचा जीव वाचवला. अशा शुरविर असणाऱ्या आहेर यांची कामगिरी कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेचे, बाभळेश्वर विद्यमान संचालक सिताराम खंडागळे यांनी केले. तालुक्यातील कोपरगाव येसगाव येथील शेतात ही थरारक घटना नुकतीच घडली आहे. … Read more

संगमनेरमध्ये उभे राहणार दिव्यांग भवन, लवकरच काम सुरू होणार असल्याची आमदार अमोल खताळांनी दिली माहिती

संगमनेर- शहरात दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज असे दिव्यांग भवन उभारण्याचे स्वप्न आता साकार होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित होती, परंतु आता नगरपालिकेने नेहरू गार्डनजवळ जागा उपलब्ध करून दिल्याने या प्रकल्पाला गती मिळाली आहे. आमदार अमोल खताळ यांनी या भवनाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. दिव्यांग बांधवांना समाजात समान … Read more

अतिक्रमणात विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांना पाच फुटांची जागा द्या, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

श्रीरामपूर- येथील नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये १३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता शहरातील नागरिकांच्या विविध अडचणी सोडविण्या संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी विस्थापित व्यापाऱ्यांना नेवासा शहराच्या धर्तीवर पोट भरण्यासाठी पाच फुटाची जागा द्यावी, अशी विनंती केली. त्यावेळी … Read more

सुजयने पाच वर्षात एवढी विकासकामे केली तरी जनतेने त्यांचा पराभव केला, मात्र साईबाबा आम्हाला आशीर्वाद आणि न्याय देणार- शालिनीताई विखे पाटील

करंजी- श्रद्धा आणि सबुरी या न्यायाने आमची वाटचाल सुरू असल्याने डॉ. सुजय विखे यांनाही कोर्टातून न्याय मिळेल, डॉ. सुजय यांचा पराभव जरी झाला असला तरी आम्ही मनाने खचलेलो नाही.’ घार फिरते आकाशी, तिचे लक्ष पिलापाशी’ या उक्तीप्रमाणे विखे परिवाराचे नगर दक्षिणेवर लक्ष आहे. अशा शब्दांत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी नगर लोकसभा … Read more

पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीला ७६ लाख रुपयांचा नफा, चेअरमन सुभाषराव बर्डे यांची माहिती

पाथर्डी- सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीला ७६ लाख रुपये नफा झाला असून, आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे सर्व संचालक यांच्या सहकार्याने तोट्यातील संस्था नफ्यात आणण्याचे काम केले असल्याचे चेअरमन सुभाषराव बर्डे यांनी म्हटले आहे. याबाबत अधिक माहिती देताना बर्डे यांनी सांगितले की, तिसगाव उपबाजार समिती आवारात नवीन ५० क्विंटल … Read more

कर्जत पोलिसांनी मराठा बांधवांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कर्जत- सकल मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कर्जत पोलिसांनी राशीन येथील घटनेप्रकरणी दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी काल कर्जत तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने अत्यावश्यक सेवा वगळता पुकारण्यात आलेल्या कर्जत बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रविवार (दि.१३) जुलै रोजी राशीन येथील महात्मा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत ११० मिमी पावसाची नोंद, धरणांत सुमारे ७० टक्क्यांवर पाणीसाठा, जाणून घ्या कोणत्या धरणात किती आहे पाणीसाठा?

अहिल्यानगर- धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पाऊस मंदावला आहे. दरम्यान, धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग घटला आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांत सुमारे ७० टक्क्यांवर पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा तीस टक्क्यांनी जास्त आहे. भंडारदरा धरणात सध्या ७४ टक्के, निळवंडे धरणात ८५.५४ टक्के, मुळा धरणात ७०.१० टक्के पाणीसाठा आहे. दरम्यान, आढळा, सीना व विसापूर ही धरणे तुडुंब भरली आहेत. … Read more

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात डाळिंबांना १५ हजार रुपयांपर्यंत भाव, जाणून घ्या इतर फळांचे आजचे बाजारभाव

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मंगळवारी २८० क्विंटल विविध फळांची आवक झाली होती. यामध्ये डाळिंबाची ६९ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबांना प्रतिक्विंटल १००० ते १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीची १७ क्विंटल आवक झाली होती. मोसंबीला प्रतिक्विंटल १००० ते ६००० रुपये भाव मिळाला. पपईची २३ क्विंटल आवक झाली होती. पपईला प्रतिक्विंटल १ … Read more

अहिल्यानगरमध्ये फर्निचरचे निकृष्ट दर्जाचे काम करुन केली ४ लाख ५१ हजार रुपयाची फसवणूक, तिघांविरोधात गुन्हा दाखल

अहिल्यानगर- घराच्या फर्निचरचे काम घेऊन लेखी करारनाम्या प्रमाणे काम न करता निकृष्ट दर्जाचे काम करुन कराराप्रमाणे निर्धारित वेळेत काम केले नसल्या बाबत विचारणा केली असता तुमचे काम करणार नाही असे सांगून पैसे माघारी न देता तिघांनी ४ लाख ५१ हजार रुपयाची फसवणूक केली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सिमरन संजय पंजाबी, … Read more

आठ वर्षापासून बंद असलेले अहिल्यानगर महापालिकेचे स्पर्धा परिक्षा केंद्र लवकरच होणार सुरू, मनपा आयुक्त यशवंत डांगे यांचा पुढाकार

अहिल्यानगर- महापालिका हद्दीतील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून चांगले करिअर करता यावे, यासाठी महापालिकेने २००७ मध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले होते. सुमारे ११ वर्षात केंद्रातून दीडशे विद्यार्थ्यांना नोकरीची दारे उघडली. स्पर्धा परीक्षा केंद्राने श्रेणी एकचे अधिकारी घडविले. साधारण आठ वर्षापूर्वी तत्कालीन पदाधिकारी आणि प्रशासनाच्या वादात केंद्र बंद पडले. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे … Read more

शनिशिंगणापूर देवस्थान घोटाळ्याची धर्मादाय आयुक्ताने घेतली दखल, चौकशीसाठी सर्वच विश्वस्तांना धर्मादाय आयुक्तांचने पाठवल्या नोटिसा

अहिल्यानगर- शनिशिंगणापूर देवस्थान घोटाळा आणि कर्मचारी भरतीचा विषय विधानसभेत गाजला. त्यामुळे देवस्थानच्या कारभारावरच प्रश्न उपस्थित झाले. शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये झालेल्या घोटळ्याच्या तक्रारीची राज्याच्या धर्मादाय आयुक्ताने दखल घेतली आहे. धर्मादायुक्तांना स्वतःहून देवस्थान विश्वस्तांना नोटिसा पाठवून चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. श्री शनिशिंगणापूर देवस्थान भक्ताचे श्रद्ध्द्धस्थान आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देवस्थान महाराष्ट्राच्या चर्चेचा मुद्दा ठरत … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात ८८ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या, तर सर्वाधिक १ लाख ६३ हजार ९८४ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी

अहिल्यानगर- नगर जिल्ह्यात आतापर्यंत ८८.२२ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. विविध पिकांच्या ६ लाख ३१ हजार ८२८ हेक्टरवर खरीप पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक १ लाख ६३ हजार ९८४ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११०.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात कमीअधिक प्रमाणात पाऊस होत असल्याने … Read more

काॅलेजहून घरी जाणाऱ्या विद्यार्थीनीला रस्त्यात आडवून तीचा हात पकडत ‘तू मला आवडतेस’ म्हणत केला विनयभंग, तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल

आहल्यानगर- बोल्हेगाव परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनीचा रस्त्यात पाठलाग करून एकाने रस्त्यात अडविले. तिचा हात पकडून अश्लिल भाषा वापरत विनयभंग केला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित विद्यार्थिनीच्या पालकाने पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले की, मुलगी नेहमीप्रमाणे कॉलेजला सकाळी ७ वाजता जाते व कॉलेज संपल्यानंतर दुपारी १२ वाजता घरी येते. दरम्यान, सोमवारी … Read more

अहिल्यानगरमध्ये पोलिसाच्या बायकोला सासू अन् दिराने शिवीगाळ करत केली लाकडी दांडक्याने मारहाण

अहिल्यानगर- पोलिस कर्मचाऱ्याचे पत्नीबरोबर किरकोळ वाद झाले. त्या पोलिस दादाच्या आईने आणि भावाने त्याच्या पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना तपोवन रस्ता पसिरात १४ जुलै रोजी दुपारी घडली. याप्रकरणी पोलिस दादाच्या पत्नीने तोफखाना पोलिस ठाण्यात सासू व दीर यांच्या विरोधात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले की, १३ जुलै रोजी रात्री पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले … Read more