शनि-शिंगणापूर बनावट ॲप घोटाळ्याप्रकरणी अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी, घोटाळ्यातील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता?

सोनई : शिंगणापूर येथे बनावट ॲप संदर्भात अहिल्यानगर सायबर शाखेने शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर काल सोमवारी (दि. १४) सकाळीच तपास अधिकारी पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी शिंगणापूर येथे घटनास्थळाची पाहणी करून चौकशी केल्याची माहिती मिळाली आहे. आमदार विठ्ठलराव लंघे व आमदार सुरेश धस यांनी शिंगणापूर येथे देवस्थानचे नाव वापरून कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा … Read more

भिंगारमधील मावा बनवणारा कारखाना पोलिसांनी केला उद्धवस्त, छापा टाकत ३ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत

अहिल्यानगर- भिंगार शहरातील माव्याच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा घालून मावा तयार करणाऱ्या मशिनसह सुगंधीत तंबाखू असा ३ लाख ६२ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केली. ही कारवाई १२ जुलै रोजी भिंगारमधील सदर बाजारातील शौचालयासमोर करण्यात आली. याप्रकरणी दोघे अटक केली असून, दोघे पसार आहेत. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्रान शमनूर सय्यद, … Read more

गुप्तपणे रेकॉर्ड केलेले नवरा-बायकोचे कॉल आता कायदेशीर ! घटस्फोटाच्या खटल्यात मोठा बदल

लग्नात सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं विश्वास. पण जेव्हा हा विश्वास तुटतो, तेव्हा नातं वाचवणं कठीणच होऊन बसतं. अशाच एका घटस्फोटाच्या खटल्यावर ऐतिहासिक निर्णय देत, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की, नवरा-बायकोने एकमेकांशी झालेला फोनवरचा गुप्त संवाद आता कायदेशीर पुरावा म्हणून मान्य केला जाईल. हा निर्णय म्हणजे वैवाहिक वादांमध्ये सत्याच्या शोधाला एक नवं वळण देणारा ठरतोय. पंजाब-हरयाणा … Read more

अकोलेत सापडलेल्या १ कोटीच्या गुटख्याचा मास्टरमाइंड निघाला अहिल्यानगर शहरातला…‘डॉन’ने पोलिसांना चकवा देण्यासाठी रचली भन्नाट योजना!

अकोले तालुक्यात नुकत्याच उघडकीस आलेल्या गुटखा प्रकरणाने सगळ्या जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. तब्बल १ कोटी रुपयांच्या या बेकायदेशीर गुटख्याच्या व्यवहारामागे भिंगारमधील दोन व्यक्तींचा हात असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी एका मास्टरमाइंडला अटक केली असली तरी दुसरा अद्याप फरार आहे आणि त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथकं दिवसरात्र काम करत आहेत. ही संपूर्ण कारवाई अहिल्यानगरजवळील कोतूळ गावात झाली. … Read more

भगवानगड झाला ‘वटवृक्षांचं देवस्थान’ ! सर्वाधिक वटवृक्ष असलेलं देवस्थान होणार भगवानगड! काय आहे या मागचं उद्दिष्ट ?

भगवान गड एक धार्मिक आणि निसर्गरम्य ठिकाण आता एका नव्या ओळखीने सर्वांच्या नजरेत भरू लागलं आहे. इथं नुकतीच १०० वडाच्या झाडांची लागवड करण्यात आली असून, त्यामुळे गडावरचं वातावरण आणखीनच प्रसन्न आणि शांततामय होणार आहे. वडाचं झाड म्हणजे आपल्या संस्कृतीत पूज्य, छायादार आणि दीर्घायुषी वृक्ष. अशा १०० झाडांनी सजलेला गड आता ‘सर्वाधिक वडवृक्ष असलेलं देवस्थान’ म्हणून … Read more

कष्टाने पिकवलेला भाजीपाला… शेवटी रस्त्यावर ! पाथर्डीतील शेतकऱ्यांची व्यथा

पाथर्डीच्या भाजी बाजारात सध्या एक वेगळंच चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेल्या पालेभाज्या बाजारात आणल्या, पण त्या विकायला ग्राहकच नाहीत. कष्टाने उगवलेली मेथी, शेपू, कोथिंबीर यांना आता कवडीमोल भाव मिळतोय, आणि तरीही कोणी घ्यायला तयार नाही. शेवटी हताश होऊन शेतकऱ्यांना आपला माल रस्त्यावर भटकणाऱ्या जनावरांसमोर टाकावा लागतोय. ही परिस्थिती पाहून कोणाच्याही मनाला चटका लागेल. पाथर्डीत … Read more

अकरावीच्या प्रवेशासाठी मोठी अपडेट ! तुमचं नाव यादीत आहे का ? अकरावीच्या दुसऱ्या फेरीसाठी अंतिम …

अकरावीच्या प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीची निवड यादी येत्या गुरुवारी, म्हणजेच १७ जुलैला जाहीर होणार आहे. ही यादी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार तयार केली जाणार आहे. त्याचबरोबर कोट्याअंतर्गत प्रवेशाची यादीही त्याच दिवशी प्रसिद्ध होईल. लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य ठरविणारी ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे राज्यातील अकरावी प्रवेशासाठी तब्बल १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एकूण २१ लाखांपेक्षा जास्त … Read more

श्रीरामपूर हादरलं ! सापडला कुजलेल्या अवस्थेतील तरुणाचा मृतदेह हत्या की आत्महत्या?

श्रीरामपूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, येथील खैरी निमगाव आणि भैरवनाथनगरच्या दरम्यान, झाडाझुडपांच्या आड एक तरुणाचा मृतदेह सापडला. वयाच्या ३५ च्या आसपास असलेल्या या तरुणाचा मृतदेह इतका कुजलेला होता की, पाहणाऱ्यांचं काळीज सुन्न झालं. चेहराही ओळखू येण्याजोगा नव्हता. ही घटना समजताच, गावात भीती आणि संभ्रमाचं वातावरण पसरलं. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एखाद्याने ही … Read more

अहिल्यानगर शहरात वैद्यकीय पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार, शस्त्रक्रिया करणाऱ्या तिघा बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर – वैद्यकीय पदवी नसताना, वैद्यकीय व्यावसायिक नसताना दवाखाना चालवून, रुग्णांवर शस्त्रक्रिया करणाऱ्या, अॅलोपॅथीची औषधे देणाऱ्या तिघा बोगस डॉक्टरांवर तपासणी करून महानगरपालिकेने कारवाई केल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. याप्रकरणी तिघाही बोगस डॉक्टरांवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत कायदेशीर फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पिंजारगल्ली येथील डॉ. ठाकूर क्लिनिक, … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील बाजरपेठेतील ह्या सराफाच्या दुकानावर दरोडा ! २५ तोळे सोने,२५ किलो चांदी घेऊन पसार

देवळाली प्रवरा : चारचाकी वाहनात आलेल्या अज्ञात भामट्यांनी आज (दि. १४) पहाटेच्या सुमारास राहुरी शहरातील भर बाजार पेठेतील सराफ व्यावसायिक राजेंद्र भन्साळी यांचे सोन्याचे दुकान फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. राजेंद्र सुरजमल भन्साळी यांचे राहुरी शहरातील जुनी पेठ येथील राहुरी मेडिकल समोर वर्धमान ज्वेलर्स नावाचे सोने, चांदीचे दुकान आहे. राजेंद्र भन्साळी … Read more

अहिल्यानगरमधील १ कोटी ७३ लाखांच्या फसवणुकीचा आर्थिक गुन्हे शाखा करणार तपास, तपासणीत मोठं घबाड बाहेर येण्याची शक्यता?

अहिल्यानगर- जादा परताव्याचे आमिष दाखवत ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स’ या बनावट आर्थिक कंपनीने शिर्डी परिसरातील २१ गुंतवणूकदारांची १ कोटी ७३ लाख रुपयांची फसवणूक केली. या कंपनीविरोधात शिर्डी व राहाता पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाला आहे. मोठ्या रक्कमेची फसवणूक असल्याने वरील दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. … Read more

शेतकऱ्यांनो! जमिनीतून भरघोस असं उत्पादन घ्यायचंय, तर जमिनीचं आरोग्य जपण्यासाठी ‘या’ सोप्या गोष्टी नक्की करा

रासायनिक खते व किटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे जमीन नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर विषमुक्त अन्नासाठी खते व किटकनाशकांचा पिकांवरील खर्च कमी करणे आवश्यक आहे. खतांच्या भरमसाठ वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत असून यासाठी माती परीक्षण करून जमिनीतील सुक्ष्म घटकांचा अभ्यास करून शेती करणे गरजेचे आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे शेती क्षारपाड व नापीक होत आहे. आवश्यकता … Read more

कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीला विकास निधी कमू पडू देणार नाही, सभापती राम शिंदेची ग्वाही

मिरजगाव- कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा लोकाभिमुख कारभार सुरू असून, तेथे शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही. शेतमालाला योग्य भाव मिळून शेती व शेतकरी समृद्ध व्हावा, हाच या मागचा उद्देश आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. मुंबई येथे कर्जत तालुका बाजार समितीचे सभापती काकासाहेब … Read more

धंदा करायचा असेल तर आम्हाला रोज पाचशे रूपये हप्ता दे नाहीतर गोळ्या घालू, धमकी देणाऱ्या दोन जणांविरोधात जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल

जामखेड- सध्या जामखेड शहरात बंदूकीची धमकी देण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. तुला जर फळविक्रीचा व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला पाचशे रुपये रोज दे, नाहीतर गोळ्या घालू अशी धमकी शहरातील एका फळविक्रीचा व्यवसाय करणाऱ्यास दिली. या प्रकरणी दोन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळाले माहिती अशी की, दि.११ जुलै रोजी रात्री … Read more

जामखेड नगरपरिषेदत ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव तर अनुसुचीत जमातीसाठी पहिल्यांदाच एक पद राखीव

जामखेड- नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी, जी गेल्या अनेक वर्षांपासून रखडली होती, अखेर प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक डॉ. प्रवीण गेडाम यांनी १० जुलै २०२५ रोजी जामखेड नगरपरिषदेच्या नगरसेवक पदांच्या आरक्षणासंबंधी आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, जामखेड नगरपरिषदेची एकूण सदस्य संख्या २४ असून, त्यापैकी ५० टक्के … Read more

अहिल्यानगर महानगरपालिकेकडे ६५ घंटागाड्या, ३५० कर्मचारी, दारोदारी क्यू आर कोड, मात्र तरीही शहरात जागोजागी कचऱ्यांचे ढीग

अहिल्यानगर- शहरातील कचरा संकलनामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी स्वच्छता अभियानांतर्गत प्रत्येक घराला क्यूआर कोड ढकविण्यात आला. त्यावरून घंटागाडीचे लोकेशन मिळणार होते. मात्र, प्रत्यक्षात येत्या योजनेला प्रारंभच झाला नाही. शासकीय योजनेच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण झाले. आता महापालिका कचरा संकलनाचा ठेकेदारच बलणार आहे. दरम्यान, शहरातील विविध भागात कचऱ्याचे ढीग साचले असून, घंटागाडी आठ ते दहा दिवस येत नसल्याची तक्रारी … Read more

अहिल्यानगर शहरात लवकरच महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती बसवण्यात येणार

अहिल्यानगर- महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. अनेक वर्षांपासून अहिल्यानगरमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा निर्माण व्हावा. त्यासाठी कृती समितीने मागणी केली होती. महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून नगरकरांचे स्वप्न पूर्णत्वास येत आहे. या कामी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले कृती समितीने महानगरपालिकेच्या माध्यमातून पाठपुरावा केला … Read more

अहिल्यानगर बाजार समितीत गवारीला मिळाला १५ हजारापर्यंत भाव, २१२३ क्विंटल भाजीपाल्याची आवक, जाणून घ्या दर?

अहिल्यानगर- नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी विविध भाजीपाल्याची २१२३ क्विंटल आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक ५५० क्विंटल बटाट्याची आवक झाली होती. यावेळी बटाट्याला ११०० ते २५०० रुपये भाव मिळाला. यावेळी टोमॅटोची ३९५ क्विंटल आवक झाली होती. यावेळी टोमॅटोला प्रतिक्विंटल ५०० ते २१०० रुपये भाव मिळाला. वांग्याची २३ क्विंटल आवक झाली होती. यावेळी वांग्यांना २५०० … Read more