अहिल्यानगर महानगरपालिकेकडे ६५ घंटागाड्या, ३५० कर्मचारी, दारोदारी क्यू आर कोड, मात्र तरीही शहरात जागोजागी कचऱ्यांचे ढीग

अहिल्यानगर- शहरातील कचरा संकलनामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी स्वच्छता अभियानांतर्गत प्रत्येक घराला क्यूआर कोड ढकविण्यात आला. त्यावरून घंटागाडीचे लोकेशन मिळणार होते. मात्र, प्रत्यक्षात येत्या योजनेला प्रारंभच झाला नाही. शासकीय योजनेच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण झाले. आता महापालिका कचरा संकलनाचा ठेकेदारच बलणार आहे. दरम्यान, शहरातील विविध भागात कचऱ्याचे ढीग साचले असून, घंटागाडी आठ ते दहा दिवस येत नसल्याची तक्रारी … Read more

निळवंडे पाईपलाईनच्या जवळ टाकण्यात येत असलेल्या विजेच्या खांबाची जागा बदला, मुख्याधिकाऱ्यांचे वीज वितरण कंपनीला पत्र

संगमनेर- वीज वितरण कंपनीकडून तालुक्यातील चिखली फाटा ते श्रमिक मिल्क अँड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री पर्यंत निळवंडे जलवाहिनीच्या जवळ विजेचे खांब टाकण्यात येत आहेत. सुरक्षिततेच्यादृष्टीने या खांबांची जागा बदलण्यात यावी, अशी सूचना संगमनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीला केली आहे. याबाबत त्यांनी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अधिकारी यांना पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले … Read more

समृद्धी महामार्गाला अवघ्या दोन महिन्यातच पडल्या भेंगा, २० वर्षे खड्डाच पडत नसल्याचा दावा ठरला खोटा

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः खुला होऊन अवघे दोन महिने झाले असतानाच महामार्गावर भेगा पडल्याचे समोर आले आहे. या महामार्गासाठी एमएसआरडीसीने एम-४० ग्रेडचे सिमेंट वापरल्याचा दावा केला होता. या सिमेंटने २० वर्षे खड्डे पडत नाहीत, असा दावाही त्यांनी केला होता. मात्र कोपरगावजवळील चांदेकसारे येथे भेगा पडल्याने तो दावा फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. … Read more

प्रधानमंत्री आवास योजनेचे रखडलेले १ कोटी ५४ लाखांचे अनुदान लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार

नेवासा- नेवासा नगरपंचायत हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांना दिलासा मिळाला असून तब्बल १ कोटी ५४ लाख रुपयांचे रखडलेले अनुदान लवकरच त्यांच्याकडे वर्ग होणार आहे. याबाबतची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली आहे. अनेक दिवसांपासून रखडलेले हे अनुदान अखेर आमदार लंघे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा व प्रयत्नांमुळे मोकळे झाले असून, शेकडो लाभार्थ्यांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळणार … Read more

ग्राहकांच्या तक्रारी व गैरसमज दूर करून BSNL उत्तम सेवा देणारी कंपनी म्हणून लवकरच प्रथम क्रमांकावर येणार

श्रीरामपूर- भारतीय दूरसंचार निगमच्या कारभाराबद्दल दूरध्वनी धारकांच्या असलेल्या तक्रारी व गैरसमज दूर करून उत्तम सेवा देणारी कंपनी म्हणून सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन टेलिफोन निगमचे नूतन संचालक ॲड. रवींद्र बोरावके यांनी केले. शहरातील माळी बोडींग येथे माळी बोर्डोंग, समता प्रतिष्ठान व अखिल भारतीय महात्मा फुले, समता परिषद आदींच्या संयुक्त विद्यमाने भारत संचार निगमच्या … Read more

कांद्याच्या दरात अपेक्षित वाढ न झाल्याने अहिल्यानगरमधील शेतकरी अडचणीत

अहिल्यानगर जिल्हा राज्यातील महत्त्वाचा कांदा उत्पादक भाग मानला जातो. येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. मात्र, २०२५ च्या पहिल्या सहामाहीत कांद्याच्या दरात फारशी वाढ न झाल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले आहे. परिणामी, कांदा थेट बाजारात विकण्याऐवजी चाळीत साठवण्याचा पर्याय अनेक शेतकरी निवडत आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये कांद्याच्या दराने चार हजार रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा गाठला होता. … Read more

डिग्री घेतल्याशिवाय लग्न नाही ! ६ हजार मुलींचा ऐतिहासिक निर्धार, संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा थक्क !

अहिल्यानगर जिल्ह्यात शिक्षणाच्या क्षेत्रात एक प्रेरणादायी आणि ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. मलाला दिनाचे औचित्य साधत, ‘स्नेहालय’ संस्थेच्या पुढाकाराने जिल्ह्यात एक प्रभावी शिक्षण जनजागृती अभियान राबवण्यात आले. यामध्ये तब्बल ६ हजारहून अधिक मुलींनी ‘मी पदवी घेतल्याशिवाय लग्न करणार नाही’ अशी शपथ घेत, शिक्षणासाठी आपली बांधिलकी दृढ केली. ‘अहिल्यानगर जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी’ स्नेहालयच्या उडान, बालभवन आणि … Read more

भोजापूर परिसरातील गावांना वर्षानुवर्षे जाणूनबुजून पाण्यापासून वंचित ठेवले, त्यांना आता हक्काचे पाणी दिले जाणार- आमदार अमोल खताळांचा शब्द

तळेगाव दिघे- भोजापूर पूरचारी परिसरातील गावांना वर्षानुवर्षे जाणूनबुजून पाण्यापासून वंचित ठेवले गेले. निवडणूका जवळ आल्या की फक्त टँकरने चारीमध्ये पाणी आणून दाखवले जात होते. मात्र, आता भोजापूर चारीत टँकरने पाणी न टाकता तळेगाव, निमोण या दुष्काळी भागातील जनतेला त्यांच्या हक्काचे भोजापूर धरणातील ओव्हर फ्लोचे पाणी दिले जाईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. … Read more

मन, शरीर व आत्म्याचा समतोल साधणारी जीवनपद्धती आत्मसात करणे काळाची गरज- विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे

अहिल्यानगर- आधुनिक जीवनशैलीत मन, शरीर व आत्म्याचा समतोल साधणारी सकारात्मक जीवनपद्धती आत्मसात करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. मानकन्हैया ट्रस्ट व आनंदऋषी हॉस्पिटल, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजयोगा जीवनपद्धतीच्या अभ्यासक डॉ. सुधाताई कांकरिया लिखित हृदय आरोग्याच्या गप्पागोष्टी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत … Read more

श्रीरामपूरकरांची वीज टंचाईपासून होणार सुटका, २२०/३३ केव्ही क्षमतेच्या वीज उपकेंद्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

श्रीरामपूर- तालुक्यातील वाढत्या वीज टंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून उभारल्या जाणाऱ्या २२०/३३ केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वीज उपकेंद्रामुळे श्रीरामपूरच्या विकासाला नवे बळ मिळणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. वीज उपकेंद्राचे भूमिपूजन नुकतेच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते श्रीरामपूर एमआयडीसी येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते. ५९ कोटी ६२ … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘ही’ शाळा शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यात ठरली अव्वल, १२१ विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये झळकले

कोपरगाव-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कोपरगाव येथील आत्मा मालिक सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुल, कोकमठाण यांनी अभूतपूर्व यश मिळविले आहे. या परीक्षेत शाळेच्या १२१ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून एक नवा इतिहास रचला आहे. विशेषतः इयत्ता ८ वीच्या ११३ … Read more

भूमिगत गटाराच्या चेंबरमध्ये मृत्यू झालेल्या तरूणाच्या कुटुंबाला ३० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे पत्र आमदार अमोल खताळांनी केले सुपूर्द

संगमनेर- भूमिगत गटारीतील चेंबरमध्ये साफसफाईचे काम करताना मृत्यू झालेल्या ठेकेदार आस्थापनेवरील अतुल पवार यांच्या कुटुंबीयांना ३० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे पत्र आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले. तसेच, त्यांना वाचविण्यासाठी पुढे सरसावलेले आणि मृत्युमुखी पडलेले रियाज जावेद पिंजारी यांच्या कुटुंबीयांनाही शासनाच्या वतीने भरीव स्वरूपाची मदत मिळवून देणार असल्याचा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त … Read more

शासकीय कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक होणार यांची काळजी घ्या, मंत्री विखे पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

शिर्डी- गावपातळीवरील सार्वजनिक प्रश्नांबाबत अधिकारी आणि ग्रामस्थांनी एकत्र बसून योग्य मार्ग काढावा. व्यक्तिगत प्रश्नांसाठी कार्यालयीन पातळीवर पाठपुरावा होईलच, मात्र कोणत्याही शासकीय कार्यालयात नागरिकांची अडवणूक होणार नाही, या दृष्टिकोनातून येणाऱ्या प्रत्येक अर्जावर तत्काळ कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना जलसंपदा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. प्रवरानगर येथील डॉ. धनंजय गाडगीळ सभागृहात मंत्री विखे पाटील यांचा जनता दरबार … Read more

लग्नासाठी नकार दिल्याने तरूणीला बळजबरीने गाडीत बसवलं, आळंदीला नेऊन खोलीत डांबलं अन् बलात्कार केला, शेवगाव पोलिसांत ५ जणांवर गुन्हा दाखल

शेवगाव- एका १९ तरुणीस बळजबरीने लग्न लावून देण्यासाठी चारचाकी वाहनामध्ये बसवून नेले. लग्नासाठी नकार दिल्याने तिला एका खोलीत डांबून तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुध्द शेवगाव पोलीस ठाण्यात कलम ६४,१२७(२), ८७,३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रवीण प्रल्हाद आंधळे, अनोळखी वाहन चालक (तिघे रा. सोनेसांगवी, … Read more

शनिशिंगणापूर येथे बनावट ॲपच्या माध्यमातून भाविकांची करोडोची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात अखेर गुन्हा दाखल

सोनई- शनिशिंगणापूर येथे शनिदेवाची पूजा, अभिषेक आणि तेल अर्पण केल्याचा खोटा मजकूर ऑनलाइन पसरवून भाविकांची फसवणूक केल्याप्रकरणी अहिल्यानगर सायबर शाखेच्या वतीने शिंगणापूर पोलीस ठाण्यात अज्ञात अॅपधारक, मालक व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सायबर पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकासाहेब काकडे (वय ३२) यांनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, शनैश्वर देवस्थानच्या अर्जावर … Read more

ग्रोे मोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या नावाखाली शिर्डीतील अनेकांना ३५० कोटींचा चुना लावणाऱ्या भामट्याच्या आलिशान महालाला पोलिसांनी ठोकले टाळे

शिर्डी- ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे ऊर्फ भूपेंद्र पाटील याला नंदुरबार पोलिसांनी अटक करून रविवारी शिर्डीत आणले. शेकडो ठेवीदारांची फसवणूक करून पलायन केलेल्या भूपेंद्रला शिर्डीत पोलिसांनी आणताच त्याच्या आलिशान बंगल्यावर कारवाई करत तेथे सील मारण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण शिर्डी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, … Read more

पुण्यातील महिलेच्या बँक खात्यातून पैसे काढणाऱ्या राहत्याच्या तरूणाला दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात, चौकशीसाठी घेऊन गेले दिल्लीला

राहाता- पुणे येथील एका महिलेच्या बचत खात्यातून आयएमपीएस (इमिजिएट पेमेंट सर्व्हिस) व यूपीआय (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) या ई बँकिंग प्रणालीद्वारे आर्थिक व्यवहार करून फसवणूक केल्याप्रकरणी राहाता येथील एका तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी की, जानेवारी २०२३ ते मे २०२५ पर्यंत ईशान लाहिरी यांच्या पुणे वानवडी येथील अॅक्सिस बँकेच्या शाखेतील बचत खात्यातून … Read more

नेवासा तालुक्यात डाळिंब चोरण्यासाठी चोरांचा सुळसुळाट, ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चोरटे करतात बागेची पाहणी

चांदा- नेवासा तालुक्यातील म्हाळस पिंपळगाव परिसरातील डाळिंबाच्या बागांकडे आता चोरट्यांच्या नजरा पडू लागल्याने शेतकऱ्यांना आता रात्रीचा पहारा सुरू केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हाळस पिंपळगाव हा परिसर बागायती क्षेत्र म्हणून तालुक्यात ओळखला जातो. या बागायती पट्टयामध्ये अनेक शेतकऱ्यांचा डाळिंबाचे उत्पादन घेण्याकडे कल आहे. झाडाला चांगले फळ येण्यासाठी महागडी औषध फवारणी, किटकनाशके, खते डाळिंब … Read more