पोलिसांची चाहूल लागताच मुळा धरणाच्या पाण्यात उडी मारलेल्या तरूणाचा तीन दिवसानंतर सापडला मृतदेह

राहुरी- दि. १० जुलै रोजी सायंकाळी पोलीस पथक पकडण्यासाठी येत असल्याची चाहूल लागताच दोन तरुणांनी राहुरी तालुक्यातील वावरथ परिसरात मुळा धरणाच्या पाण्यात उडी मारली. दोघांपैकी एकजण पोहून बाहेर आला. मात्र, रामा माळी या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. चार दिवसांनी, काल रविवारी त्याचा मृतदेह फुगून पाण्यावर तरंगताना आढळून आला. याबाबत पोलीस सूत्रांनी सागितले, की लक्ष्मीबाई … Read more

शेवगाव तालुक्यात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमाच्या जेवणातून ३० लहान मुलांना विषबाधा, डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

शेवगाव- गुरुपौर्णिमेनिमित्त वडुले खुर्द, ता. शेवगाव येथे आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात जेवणातून सुमारे ३० लहान मुलांना विषबाधा झाली होती; परंतू या मुलांवर वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशीलकुमार बडे, आरोग्य सहाय्यक संभाजी आव्हाड यांनी वेळेत उपचार केल्याने पुढील अनर्थ टळला. सरकारी डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला प्राथमिक आरोग्य केंद, ढोरजळगाव शे. अंतर्गत वडुले खुर्द येथे गुरुपौर्णिमेच्या दिवशी … Read more

बापरे! अकोले तालुक्यात पकडला तब्बल १ कोटी ७४ हजारांचा गुटखा, पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पोलिस पथकाची धडाकेबाज कारवाई

अकोले- तालुक्यातील कोतुळ परिसरात नाचणठाव रस्त्यालगत एका पत्र्याच्या शेडमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने रविवारी दुपारी साडेतीन वाजता छापा टाकून एकूण १ कोटी १ लाख ७४ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ५७ लाख २ हजार ४०० रुपयांचा अवैध गुटखा आणि ४४ लाख ७२ हजार ३५० रुपयांचा इतर मुद्देमाल पोलिसांनी … Read more

बँकेपेक्षा जास्त परतावा देतो” म्हणत शेअर मार्केटच्या नावाखाली वीस लाखांची फसवणूक

पैसे गुंतवा, तुम्हाला बँकेच्या व्याजापेक्षा जास्त पैसे मिळवून देतो, असे सांगून राशीन जवळील देशमुखवाडी येथील दाम्पत्याची वीस लाख रुपयांची फसवणूक केली. गुंतवलेले पैसे परत दिले नाहीत पण जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कर्जत पोलिसांत कानगुडवाडी येथील पिता- पुत्रा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील एक आरोपी जयेश कानगुडे याला अटक करण्यात आली आहे. … Read more

शिवकालीन किल्ल्यांना जागतिक वारसाचा दर्जा मिळणे अभिमानास्पद ! मंत्री विखे पाटील यांचे गौरवोद्‌गार

राहाता : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची देणाऱ्या राज्यातील १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान मिळाल्याची ऐतिहासिक घटना संपूर्ण देशासाठी आणि शिवप्रेमींसाठी अभिमानास्पद असल्याचे मत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. मंत्री विखे पाटील म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने सजलेले गड किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या शौर्याचा जाज्वल्य इतिहास आहे. हे किल्ले म्हणजे … Read more

निळवंडेच्या उजव्या कालव्यातून मंगळवारी पाणी सुटणार : आ. कर्डिले

राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून मंगळवार दि. १५ रोजी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आ. शिवाजीराव कर्डिले यांनी पत्रकात दिली. राहुरी तालुक्यातील निभेरे, तुळापूर, कानडगाव, गुहा, कणगर, तांदुळनेर, तांभेरे, वडनेर, चिंचविहिरे, गणेगाव या परिसरात पाऊस कमी झाल्याने जिरायती भागात पिकांना पाण्याची गरज … Read more

जिथे रावणाचे विचार होते तिथे वारकऱ्यांमुळे प्रभू रामांच्या विचारांची पेरणी : आमदार डॉ. किरण लहामटे

ज्या अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात रावणाचे विचार पेरण्याचे काम सुरू होते तिथे आज वारकरी मंडळी प्रभू राम यांचा विचार पेरत असून आदिवासी, गरीब लोकांचे धर्मांतर हे देखील एक आव्हान होते त्या घटनांना वेळीच अटकाव घातल्याने हे संकट तालुक्याने परतवून लावले त्याचा मला अभिमान वाटतो, असे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी म्हटले आहे. सालाबादप्रमाणे याहीवर्षी … Read more

पाथर्डीत मावा विक्रेत्यांवर खाडे यांचा धाडसी छापा; १.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

पाथर्डी शहरातील मावा व्यावसायिकांविरुद्ध धडक कारवाई करीत परिविक्षाधीन पोलिस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने १ लाख ३३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यामध्ये दोन जणांना ताब्यात घेतले आहे तर दोन जण पसार झाले आहेत. मावा, सुंगधी तवांखू व मावा तयार करण्याचे मशीन जप्त करण्यात आलेआहे. अवैध व्यावसायिकांनी खाडे यांच्या पथकाचा चांगलाच धसका … Read more

शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करा; उपोषणाचा इशारा

शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने, ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी (दि. २१) जुलै रोजी महसूल आयुक्त कार्यालय नाशिक नाशिक विभाग, नाशिक येथे उपोषणास बसण्याचा इशारा सचिन खंडागळे, अशोक दळवी, इलियास पठाण, समीर शेख, आदिल पठाण यांनी बहुजन मुक्ती संघटना व दहिगाव ने ग्रामस्थांच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे महसूल आयुक्त, नाशिक यांना दिला आहे. निवेदनाच्या पालकमंत्री, जिल्हाधिकारी, … Read more

वडिलोपार्जित जागेवर घर बांधणाऱ्यांवर कारवाई करा ! नगर परिषदेचा गलथान कारभार उघड

पाथर्डी शहरातील पगारे वस्ती येथील वंदना विनोद मगर व कैलास प्रभाकर पगारे यांच्या वडिलोपार्जित जागेत अतिक्रमण करून शासनाने मंजूर केलेले घरकुल बांधण्यात आले असून, सदर अतिक्रमण काढून टाकावे व संबंधितांवर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी वंदना मगर यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्याकडे केली आहे. मला न्याय न मिळाल्यास दि. १६ जुलै रोजी … Read more

MSRTC Bus : एसटीला पांडुरंग पावला ! वारीत ५२०० जादा गाड्या, एसटीला मिळाले ३५ कोटी

पंढरपूर येथे नुकतीच आषाढी एकादशी लाखो वारकऱ्यांचा साक्षीने साजरी झाली. देशभरातून पायी, रेल्वे, एसटी, खासगी वाहनांनी भाविकांनी पंढरपूर गाठत विठुरायाचे दर्शन घेतले. आषाढी यात्रेनिमित्त ५२०० जादा एसटी गाड्यांच्या माध्यमातून एसटीने तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविक-प्रवाशांची सुरक्षित ने-आण करून त्यांना विठ्ठल दर्शन घडवले. या सेवेतून एसटीला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये एवढे … Read more

विकासकामांत कुठेही कमी पडणार नाही आ. शिवाजीराव कर्डिले यांचा निर्धार

राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने आ. शिवाजीराव कर्डिले यांच्यावर मोठा विश्वास व्यक्त केलेला आहे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, या म्हणीप्रमाणे आ. कर्डिले यांनी नेहमी सर्वसामान्य जनतेला दिलेल्या शब्दाची पूर्तता केलेली आहे. जनतेच्या सुख-दुःखात धावून येणारा, विकास कामांचा दिलेला शब्द पूर्ण करणारा लोकप्रतिनिधी म्हणून आ. कर्डिले तीस वर्षांपासून जनतेची सेवा करत असून, यापुढेही … Read more

नितीन शेळके अपघात प्रकरणात धस कुटुंब मदतीसाठी पुढे; स्थानिकांकडून उड्डाणपूलाची मागणी

उद्योजक नितीन शेळके यांच्या परिवाराला वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्या कुटंबाला आवश्यक ती मदत केली जाईल, अशी ग्वाही आ. सुरेश धस यांनी दिली.दि.७ जुलै रोजी पुणे-नगर महामार्गावर जातेगाव फाटा येथे. आ. सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारच्य अपघातात पळवे येथील तरुण उद्योजक नितीन शेळके यांचा मृत्यू झाला होता. नितीन शेळके यांच्या परिवाराला धीर देण्यासाठी … Read more

भंडारदऱ्यात फिरायला जाताय ? आधी ही बातमी वाचाच… मस्तीत जगा, पण शिस्तीत वागा !

भंडारदरा : अहिल्यानगर जिल्ह्यातील निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या भंडारदरा पर्यटनस्थळी पर्यटकांकडून शांततेला गालबोट लावणारे प्रकार वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राजुर पोलिसांनी पर्यटकांना ‘मस्तीत जगा, पण शिस्तीत वागा’ असा इशारा देत कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. निसर्ग पर्यटनासाठी शिस्त आवश्यक भंडारदरा हे निसर्ग सौंदर्याने नटलेले पर्यटनस्थळ असून येथे येणाऱ्या पर्यटकांनी नैसर्गिक सौंदर्याचा … Read more

अहिल्यानगरच्या ह्या तालुक्यात रेशन घोटाळा ! सजग नागरिकांनी उघड केला प्रकार

अकोले तालुक्यातील खेतेवाडीगावासाठी शासकीय गोदामातून निघालेले रेशनचे धान्य बेकायदेशीरपणे अकोले विकास सेवा सोसायटीच्या गोदामात उतरवताना आढळून आले. सजग नागरिकांच्या तत्परतेमुळे हा प्रकार उघड झाला असून, या प्रकरणी दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की ७ जुलै रोजी दुपारी १२ वाजता खेतेवाडी गावातील लाभार्थ्यांसाठी शासकीय गोदामातून स्वस्त धान्य मालमोटारीत … Read more

ग्रामपंचायतीच्या ऑपरेटरवर फसवणुकीचा गुन्हा ! डिजिटल सही व बारकोडचा…

शिर्डी : तहसील कार्यालयाने पूर्वी इतर व्यक्तीसाठी जारी केलेल्या उत्पन्नाच्या दाखल्यावरील बारकोडचा गैरवापर करून दुसऱ्या व्यक्तीसाठी बनावट दाखला तयार करण्यात आल्याच्या प्रकरणी पिंपळवाडी ग्रामपंचायतीचा ऑपरेटर प्रविण गोरक्षनाथ रोठे याच्याविरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शासकीय यंत्रणेची फसवणूक झाल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितलेली माहिती अशी, की … Read more

वीस वर्षांची साडेसाती संपली ! शनिदेवाचे दर्शन घेऊन आमदार लंघे यांचा घणाघात

शनिशिंगणापूर देवस्थानातील कोट्यवधी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केला. त्यासह दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर, शिवसेना शिंदे गटाचे आमदार विठ्ठलराव लंघे शनिशिंगणापूर येथे आले आणि शनिदेवाला पुष्पहार अर्पण अर्पण करून दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भाविकांच्या २० वर्षांच्या साडेसातीचा शेवट झाला असल्याची प्रतिक्रिया दिली.घोटाळ्याविरोधात विधानसभेत … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात दुहेरी मृत्यूने खळबळ! पती घरात, पत्नी शेततळ्यात मृतावस्थेत सापडली

संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारात गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास रेवजी मुरलीधर गायकर (वय ६०) व त्यांच्या पत्नी नंदा रेवजी गायकर (वय ५५) यांचे मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा अपघात की घातपात याबाबत अद्याप निश्चितता नसल्याने आश्वी पोलीस तपासात गुंतले आहेत. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की गुरुवारी दि. १० … Read more