अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांत पाणीच पाणी! जाणून घ्या मुळा, भंडारदरा, निळवंडे धरणांत पाण्याचा साठा

अहिल्यानगर : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांत सुमारे ७० टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा दुप्पट आहे. भंडारदरा धरणात सध्या ६९.४५ टक्के, निळवंडे धरणात ८२ टक्के, मुळा धरणात ७० टक्के पाणीसाठा आहे. दरम्यान, आढळा, सीना व विसापूर ही धरणे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.अहिल्यानगर जिल्ह्यात … Read more

सोशल मीडियातून ओळख, गुंगीचे औषध आणि बलात्कार ! अहिल्यानगरच्या शिक्षिकेची कहाणी…

सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन ४२ वर्षीय शिक्षिकेस चहात गुंगीचे औषध टाकून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून वेळोवेळी सुमारे १४ लाख ७४ हजार ८०० रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना नगर कल्याण रोडवरील पेट्रोल पंपाजवळ घडली. याबाबत ४२ वर्षीय पीडित महिलेने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

अहिल्यानगर बाजारात कांद्याचे भाव कोसळले ! शेतकऱ्यांना फटका जाणून घ्या बाजारभाव

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये शनिवारी २६ हजार १५३ क्विंटल गावरान लाल कांद्याची आवक झाली होती. शनिवारी झालेल्या लिलावात एक नंबर गावरान कांद्याला प्रतिक्विंटल १३०० ते १७५० रुपये भाव मिळाला. अहिल्यानगर बाजार समितीत दोन नंबर कांद्याला प्रतिक्विंटल ९०० ते १३०० रुपये भाव मिळाला. तीन नंबर कांद्याला प्रतिक्विंटल ५०० ते ९०० रुपये भाव … Read more

संगमनेरात दुर्दैवी अपघात ! नाशिकच्या महिलेचा अपघातात मृत्यू, पती गंभीर जखमी

संगमनेर :तालुक्यातील शिबलापूर- संगमनेर या रस्त्यावर मोटारसायकल व टाटा झिपचा भिषण अपघात होऊन या अपघातात नाशिक येथील एका महिलेचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी रस्त्यावर दुपारी ३ वाजण्याचा सुमारास शेडगाव फाट्यावर हिरो कंपनीची मोटारसायकल- टाटा झिप यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मोटारसायकलवरील अलका भाऊसाहेब … Read more

Ahilyanagar market : डाळिंबाचे दर गगनाला भिडले! बाजारात मिळतोय तब्बल १८ हजारांचा दर!

Ahilyanagar market : अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शनिवारी ३५४ क्विंटल विविध फळांची आवक झाली होती. यामध्ये डाळिंबाची ३६ क्विंटल आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १००० ते १८ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. दरम्यान, कालच्या तुलनेत डाळिंबांच्या भावात १ हजारांनी वाढ झाली आहे. मोसंबीची ५ क्विंटल आवक झाली होती. मोसंबीला प्रतिक्विंटल १००० ते … Read more

संगमनेरमधील भूमिगत गटारात मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबाला ५० लाखांची नुकसान भरपाई द्यावी, आमदार सत्यजित तांबेंची मागणी

संगमनेर- शहरातील भूमिगत गटारीच्या कामादरम्यान झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेसाठी नगरपालिकेच्या अनधिकृत कृतीला जबाबदार ठरवत, आमदार सत्यजित तांबे यांनी मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. यासोबतच, या दुर्घटनेस कारणीभूत ठरलेल्या नगरपालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी विधान परिषदेत आक्रमकपणे मांडली. संगमनेर शहरात भूमिगत … Read more

जगातील एकमेव मंदिर असणाऱ्या अहिल्यानगरमधील शुक्राचार्य मंदिराला हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी भेट देत घेतले दर्शन

कोपरगाव- जगातील एकमेव मंदिर म्हणून ओळख असलेल्या येथील कोपरगाव बेट मधील गुरु शुक्राचार्य मंदिरात हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री, त्यांची मुलगी डॉ. आस्था मुकेश अग्निहोत्री तसेच हिमाचलचे इतर मंत्र्यांनी नुकतीच भेट देवून गुरू शुक्राचार्य महाराजांच्या चरणी नतमस्तक होत आशिर्वाद घेतले. यावेळी अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांच्यासह विश्वस्तांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना गुरु शुक्राचार्य महाराजांच्या कृपेचा आलेला … Read more

पुढील २५ वर्ष तुमच्या मुला-बाळांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही- माजी खासदार सुजय विखेंची शेतकऱ्यांना ग्वाही

राहाता- “गोदावरी कालव्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील २५ वर्षे आपल्या मुलाबाळांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही, असा शब्द मी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने देतो,” असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. राहाता तालुक्यातील एकरुखे येथे नाशिक पाटबंधारे विभागाच्या गोदावरी कालवे तुलाकरण उपविभाग क्रमांक १, नाशिक अंतर्गत उजव्या तट कालव्यामधून एकरुखे … Read more

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाऐवजी मोबाईल वापरण्याकडे वाढलाय कल, पालकांमध्ये चिंतेच वातावरण

सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला असला, तरी त्याचा अतिरेक विशेषतः शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम करताना दिसत आहे. विशेषतः इयत्ता दहावी व बारावीचे शैक्षणिक वर्ष हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अत्यंत निर्णायक ठरते. या काळात अभ्यासाकडे लक्ष देण्याऐवजी विद्यार्थ्यांचा मोबाईलमध्ये अधिक वेळ घालवण्याकडे कल वाढलेला असून, त्यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण … Read more

ज्या तत्परतेने नागरिकांचे अतिक्रमण काढले तेवढ्याच तत्परतेने पुनर्वसन का केले नाही? आमदार हेमंत ओगलेंनी सभागृहात सरकारला धरले धारेवर

श्रीरामपूर- ज्या तत्परतेने अतिक्रमण काढले तेवढ्याच तत्परतेने पुनर्वसन का केले नाही असा सवाल श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी सरकारला केला आहे. पावसाळी अधिवेशना दरम्यान झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याच्या चर्चेत आमदार हेमंत ओगले यांनी अनेक सवाल उपस्थित केले. मुंबईसारख्या शहरात झोपडपट्टी पुनर्वसनच्या नावाखाली वीस वीस वर्षापासून अनेक पुनर्वसनाचे प्रकल्प प्रलंबित आहे ग्रामीण महाराष्ट्रात देखील हीच अवस्था असून … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ गावातील गावकऱ्यांच्या एकजुटीचा विजय,महाराष्ट्र बँकेचे होणारे स्थलांतर अखेर थांबले, गावकऱ्यांनी फटाके फोडून केला आनंद साजरा

राहाता- तालुक्यातील वाकडी गावातील महाराष्ट्र बँकेचे चितळी येथे होणारे स्थलांतर अखेर थांबले असून, शेतकरी, व्यापारी, विविध खातेदार, महिला बचतगट, लाभार्थी आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्यांपासून काही वाकडीतील एकमेव राष्ट्रीयकृत बँक असलेली ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ चितळी येथे स्थलांतरित होणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र गावातील दक्ष आणि जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन या … Read more

चारचाकी वाहनाला धक्का लागल्याच्या कारणावरून एसटी चालकाला तिघांनी शिवीगाळ करत केली मारहाण, पोलिसांत गुन्हा दाखल

राहुरी- चारचाकी वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरुन तिघा जणांनी एसटी बस चालकाला शिवीगाळ व धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना राहुरी शहरातील नगर-मनमाड रस्त्यावर ग्रीन हॉटेल समोर काल दि. ११ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत राहुरी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत तात्याराम शिवाजी दहिफळे (वय ३६ वर्षे) यांनी म्हटले आहे की, मी बस चालक म्हणून नाशिक आगारामध्ये नोकरी … Read more

जामखेड तालुक्यातील जवळेश्वर रथयात्रा मोठ्या उत्साहात साजरी, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आणि खासदार निलेश लंकेंची उपस्थिती

जामखेड- गुरुपोर्णिमेनिमित्त तालुक्यातील जवळा येथे श्री जवळेश्वर रथयात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त हजारो भाविकांनी रथयात्रेला हजेरी लावली. श्री जवळेश्वर रथयात्रा राज्यात प्रसिध्द असून, गुरुपोर्णिमेनिमित्त साजऱ्या होणाऱ्या रथयात्रेला वेगळे महत्व आहे. रथयात्रेनिमित्त सकाळी जवळेश्वर मुकुटाची आरती करून, रथामध्ये प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. यावेळी भाविकांनी रथाचे दर्शन घेतानाच नारळाचे तोरण रथाला अर्पण केले. दुपारी एक वाजता … Read more

संगमनेरमधील गटार दुर्घटनेतील ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, पिडीत कुटुंबाला आर्थिक मदत करा- आमदार अमोल खताळ

संगमनेर- शहरातील कोल्हेवाडी रस्त्यावर भूमिगत गटारीच्या साफसफाईदरम्यान ठेकेदारांच्या बेजबाबदार व निष्काळजी कारभारामुळे दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत ठामपणे मांडली. या दुर्घटनेत अतुल रतन पवार आणि रियाज जावेद पिंजारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अतुल पवार याच्या कुटुंबीयांना शासनाकडून नियमानुसार ३० … Read more

…अन्यथा जातेगाव- नगर- शिरूर महामार्गावरील टोलनाका बंद करा, मनसेचे रविश रासकर यांचा प्रशासनाला इशारा

जातेगाव- नगर- शिरूर महामार्गावर वाहनधारकांना आवश्यक असणाऱ्या मूलभूत योग्य त्या सुविधा द्या अन्यथा टोल घेणे बंद करा. असा इशारा मनसेचे रविश रासकर यांनी दिला आहे. नगर- शिरूर महामार्गावर ठीक ठिकाणी डिव्हायडर फोडलेले आहेत व कुठल्याही अधिकृत डिव्हायडरवर रस्ता क्रॉस करताना लायटिंग पट्टी नाही. सूचना फलक नाहीत. गावच्या ठिकाणी जेथे अधिकृत डिव्हायडर आहे तेथे प्रत्येक ठिकाणी … Read more

पाथर्डी पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना दारूच्या बाटल्या अन साडी चोळी भेट देऊन आम आदमी पार्टीचे आंदोलन

पाथर्डी- पंचायत समितीच्या भ्रष्ट आणि दादागिरीच्या कारभाराविरुद्ध सामाजिक युवा प्रतिष्ठान व आम आदमी पक्षाच्यावतीने गट विकास अधिकारी यांना दारूच्या बाटल्या, साडी चोळी भेट देऊन अनोखे आंदोलन करण्यात आले. पंचायत समितीच्या प्रशासनाकडून शेतकरी, नागरी व लाभार्थ्यांची मिळवणूक करून आर्थिक शोषण केले जात आहे. सरकारच्या वेगवेगळ्या योजनेचा लाभमिळवण्यासाठी येथील काही अधिकारी व कर्मचारी लोकांकडून सर्रासपणे पैशाची मागणी … Read more

कर्जतचे ग्रामदैवत सदगुरू गोदड महाराजांची यात्रा उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून तयारी, उपायोजनांसाठी घेण्यात आली आढावा बैठक

कर्जत- ग्रामदैवत श्री संत सदगुरू गोदड महाराज यांचा रथयात्रा उत्सव कामिका एकादशीला सोमवार २१ जुलै रोजी संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत पंचायत समितीच्या सभागृहात शांतता कमिटीची आढावा बैठक तहसीलदार गुरु बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला तसेच सुचनांची नोंद घेण्यात आली. या बैठकीत रथयात्रेला मंदिरात तसेच रथावर … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात ८० टक्के खरिपाच्या पेरण्या, मात्र पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी संकटात, दुबार पेरणीची आली वेळ?

श्रीगोंदा- तालुक्यात मे महिन्यात जोरदार पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी करत २९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी तसेच लागवड केली. मात्र मागील २० ते २५ दिवसांपासून पावसाने आढे वेढे घेण्यास सुरुवात केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आगामी काही दिवसात पाऊस न झाल्यास खरीप धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरलेल्या कुकडी घोड … Read more