भिंगारमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपूल उभारण्याची खासदार निलेश लंकेंची मागणी, नितीन गडकरींची भेट घेत दिला प्रस्ताव

भिंगार शहर हे नगर जिल्ह्यातील ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध आणि लष्करी दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठिकाण असून, सध्या हे शहर गंभीर वाहतूक समस्यांनी ग्रस्त आहे. सततच्या वाहतूक कोंडीत व्यापारी, सामान्य नागरिक, विद्यार्थ्यांपासून रुग्णांपर्यंत सर्वांचेच जीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी सामाजिक जाणिवेतून पुढाकार घेत, केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. राष्ट्रीय महामार्गातून … Read more

पाथर्डी शहरात मोकाट गायीचा धुमाकूळ, नागरिकांना मनस्ताप, १५ दिवसांत २५ जणांना केले जखमी

पाथर्डी- शहरात गेल्या पंधरवड्यापासून नागरिकांना अक्षरशः दहशतीच्या सावटाखाली जीवन जगावे लागत होते. कारण, एका हिंसक गायीने शहरात धुमाकूळ घालत तब्बल २५ जणांना जखमी केले होते. केवळ एवढेच नव्हे, तर ती गाय ५० हून अधिक दुचाकींना नुकसान पोहोचवत फिरत होती. बुधवारी सकाळी या गायीने आणखी एका युवकावर जीवघेणा हल्ला केल्यानंतर, पालिका प्रशासनाने तत्काळ मोहीम राबवत तिच्यावर … Read more

अहिल्यानगर जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या घाटघर भागात भात आवणीचे काम पूर्ण

अहिल्यानगर- जिल्ह्याच्या सीमावर्ती आणि अतिदुर्गम भागात वसलेल्या घाटघर गावात यंदाचे भातशेतीचे काम विलंबाने आणि अनेक अडथळ्यांनंतर पूर्णत्वास गेले आहे. पावसाच्या वेळकाळाशी न जुळवता आलेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांना भात लावणीसाठी यावर्षी फार मोठे आव्हान पत्करावे लागले. आता, आवणीचे काम संपल्यानंतर ते आपल्या उदरनिर्वाहासाठी रोजंदारीच्या शोधात गावाबाहेर पडत आहेत. अवकाळी पावसामुळे वापसा नाही दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात … Read more

अकोले तालुक्यात ग्राम रक्षक दलाने उद्धवस्त केले गावठी दारूचे अड्डे

अकोले- अकोल्याचे तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या आदेशानंतर अवैध दारूला आळा बसावा यासाठी तालुक्यात ग्राम रक्षक दलांची स्थापना करण्यात येत आहे. काल तालुक्यातील म्हाळादेवी येथे बोलावण्यात आलेल्या ग्रामसभेतच ग्राम रक्षक दलाची स्थापना करण्यात आली. या ग्रामरक्षक दलाने स्थापना होताच गावातील अवैध देशी, गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला. म्हाळादेवी येथे ग्रामसुरक्षा दल स्थापन करणे संदर्भात काल … Read more

कोपरगाव तालुक्यातील उजनी उपसा सिंचन योजनेच्या ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल आणि तांब्याच्या कॉईलची चोरी

कोपरगाव- अज्ञात चोरट्यांनी चक्क उजनी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक एकच्या ट्रान्सफॉर्मर मधील ऑईल आणि तांब्याच्या कॉईलची चोरी केली. या प्रकरणी पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर शिर्डी पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात नुकताच गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी चक्क उजनी उपसा योजना टप्पा क्रमांक एकच्या विद्युत मंडळाच्या कार्यरत उजनी उपसा … Read more

साईबाबांच्या नाण्यांवरून मुक्ताफळे उधळणाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करा- पालकमंत्री

शिर्डी- साईबाबांच्या नऊ नाण्यांच्या संदर्भात मुक्ताफळे उधळणाऱ्या गायकवाड यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई झालीच पाहिजे, तसेच पुरातत्त्व खात्याकडून किंवा इतर सक्षम यंत्रणेकडून या नऊ नाण्यांची शहानिशा केली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना मांडली. शिर्डीत साईबाबांच्या नऊ नाण्यांच्या मुद्यावरून वातावरण चांगलेच तापले असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट … Read more

कोपरगाव नगरपालिकेचा गलथान कारभार चव्हाट्यावर, आधी कामे झाली मग काढल्या निविदा

कोपरगाव- येथील नगरपालिकेचा अजब कारभार समोर आला आहे. आधी कामे झाली, मग निविदा काढल्या. झालेल्या कामासाठी निविदा निघणे ही एक गंभीर बाब आहे. विशेषतः जेव्हा ते काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले असेल. या गैरप्रकाराची शहर परिसरात चर्चा सुरू आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विविध प्रभागातील भुयारी गटारींची २० लाखाची कामे झालेली आहे. आता कामानंतर त्याच कामांच्या … Read more

शेतकऱ्यांनो! ऊसावर कीड व बुरशीजन्य रोगांचा वाढतोय प्रादुर्भाव, रोगाच्या नियंत्रणासाठी कृषि तज्ज्ञांनी दिलेला हा सल्ला नक्की वाचा

शिर्डी- सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर वाढता किड व रोगांचा प्रादुर्भाव मोठे आव्हान ठरत आहे. उत्पादनात घट होण्याचा धोका लक्षात घेता, कृषि तज्ज्ञांनी वेळेवर नियंत्रण उपाययोजना राबविण्याचे आवाहन केले आहे. याबाबत पत्रकात म्हटले, की सध्या ऊस पिकांवर पांढरी माशी किडीचा आणि तपकिरी ठिपके बुरशीजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे. पांढरी माशी ही कीड उसाच्या … Read more

भोजापूर चारीच्या पाण्यासाठी दोन गावाने दिला रास्ता रोकोचा इशारा, ४० वर्षापासून पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांना न्याय देण्याची मागणी

श्रीरामपूर- भोजापूर चारीचे पाणी वडझरी खुर्द व वडझरी बुद्रूक येथील बंधाऱ्यांमध्ये सोडण्यात यावे, या मागणीसाठी दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी रास्तारोकोचा इशारा दिला आहे. याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले, की वडझरी गावातील शेतकरी निळवंडे व भोजापूरच्या पाण्यापासून गेली ४० वर्षे वंचित आहेत. भोजापूर चारीच्या पाण्याने टेलपासून म्हणजेच वडझरीपासून बंधारे भरणे अपेक्षित आहे; … Read more

श्रीरामपूरचे भाजपाचे नेते प्रकाश चित्ते यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, कुटुंबियांनी मुख्यमंत्री फडणविसांची भेट घेत मागितला न्याय

श्रीरामपूर- श्रीरामपूरमधील भाजपाचे नेते प्रकाश चित्ते यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी दिपाली व मुलगा प्रतिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीत संपूर्ण घटनाक्रमाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले की, संबंधित फिर्यादीने रात्री … Read more

पैठणच्या नाथसागर धरणाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन, आठवणींना उजाळा देतांना झाले भावूक

राहाता- नाथसागर धरणाच्या जलपूजनानिमित्त जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भावनिक आणि ऐतिहासिक आठवणींना उजाळा देत विकासाचे अनेक पैलू उलगडले. धरणाच्या निर्मितीपासून ते भविष्यातील नदीजोड प्रकल्पापर्यंतच्या या प्रवासात त्यांनी निसर्ग, इतिहास, विस्थापन आणि शासनाच्या दूरदृष्टीचा समतोल साधत विकासाचे वचन दिले व जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा आनंददायी क्षण अनुभवला. अनेक वर्षांनंतर नाथसागर भरल्याचा आनंद व्यक्त करत … Read more

श्रीरामपूर न्यायालयात वकिलावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ न्यायालयीन कामकाज बंद, आरोपीविरोधात ठोस कारवाईची मागणी

श्रीरामपूर- येथील न्यायालयात बुधवारी वकील दिलीप औताडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काल गुरुवारी श्रीरामपूर, राहुरी येथील न्यायालयीन कामकाज बंद ठेवून संताप व्यक्त करण्यात आला. तर राहाता न्यायालयातील वकील आज कामबंद ठेवणार आहेत. याबाबत राहाता येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश व राहुरी येथील तहसीलदार यांना काल राहाता व राहुरी तालुका बार असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले. … Read more

राहुरी तालुक्यात जमीनीच्या वादातून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, सात आरोपींविरोधात ॲट्रोसिटी व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

राहुरी- तालुक्यातील एका गावात मुलीचा विनयभंग करत तिच्या आई वडिलांना जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे, या प्रकरणी सात आरोपींविरोधात ॲट्रोसिटी व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे करीत आहेत. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितलेली माहिती अशी, की दि. ३१ जुलै २०२५ रोजी सकाळी … Read more

कर्जत तालुक्यातील खडी क्रेशरमुळे शेती, जनावरे आणि आरोग्यावर परिणाम, क्रशर कायमस्वरूपी बंद करण्यासाठी नागरिकांचे तहसिलदारांना निवेदन

कर्जत- तालुक्यातील येसवडी येथे सुरू असलेल्या खडी क्रशरमुळे शेती, जनावरे आणि आरोग्य, यावर दुष्परिणाम होत असल्यामुळे हे खडी क्रशर कायमस्वरूपी बंद करावे, अशी मागणी शेतकरी व रहिवाशांनी तहसीलदारांकडे निवेदनाव्दारे केली आहे. या परिसरातील बहुतेक नागरिक शेती, दुग्ध व्यवसाय व इतर लघुउद्योगांवर अवलंबून आहेत. मात्र, काही जमीनदारांनी खाजगीरित्या सुरू केलेल्या खडी क्रशर व उत्खननामुळे परिसरात मोठ्या … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या डाॅक्टरवर कारवाई करा, जिल्हा शल्यचिकित्सकांकडे मागणी

श्रीगोंदा- जिल्हा रुग्णालयाच्या नावाने ‘युडीआयडी’ क्रमांकाने दिलेले अनेक दिव्यांग प्रमाणपत्र चुकीची असल्याचे निदर्शनास आले आहे. शासकीय नोकरदारांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकऱ्यासह सरकारी कामात विविध लाभ घेतले असल्याचे निदर्शनात येत असल्याने दिलेली बोगस दिव्यांग प्रमाणपत्र रद्द करून अशी प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदनाद्वारे … Read more

मोबाईल व सोशल मिडीयाच्या आहारी न जाता तरूणांनी खेळाकडे लक्ष द्यावे- आमदार मोनिका राजळे

पाथर्डी- मानवी जीवनात खेळाचे विशेष महत्व आहे. खेळामुळे न्यूनगंड कमी होऊन आत्मविश्वास वाढतो. मोबाईल व सोशलमिडीयाच्या आहारी न जाता प्रत्येकाने किमान एका खेळात प्राविण्य मिळविल्यास खेळातूनही चांगले करियर घडू शकते. किमान आपल्या प्रतिभा शक्तीचा विकास होण्यासाठी तरी प्रत्येकाने खेळले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले. येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर पार्थ विद्या प्रसारक … Read more

कर्जत तालुक्यात श्री संत सद्‌गुरू गोदड महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा ४ ऑगस्टला होणार संपन्न, जोरदारी तयारी

कर्जत- कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सद्‌गुरू गोदड महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा दि. ४ ऑगस्ट रोजी कर्जत येथे जन्मस्थळी व समाधीस्थळी या दोन्ही ठिकाणी उत्साहात साजरा होणार आहे, या पार्श्वभूमीवर या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. यादिवशी कर्जत येथे लाखो भाविक भक्तांना कर्जतच्या शिपी – आमटी- चपाती या महाप्रसादाचा लाभ होणार आहे. कर्जतचे ग्रामदैवत श्री संत … Read more

नागपंचमीनिमित्त जामखेडमध्ये रंगला कुस्त्यांचा थरार, अतीतटीच्या लढतीत पै.कालीचरण सोनवलकर यानी पटकावली मानाची गदा

जामखेड- नागेश्वराच्या पावन भूमीत सालाबादप्रमाणे कै. विष्णू (उस्ताद) काशीद बाबा यांच्या स्मरणार्थ जामखेड येथे आयोजित केलेल्या विराट निकाली कुस्त्यांचे मैदान यशस्वीरित्या संपन्न झाले. यात पै.सतपाल सोनटक्के विरुद्ध पै. कालीचरण सोलनकर यांच्यात झालेल्या मानाच्या गदेसाठी अंतिम कुस्तीमध्ये पै. कालीचरण सोनवलकर यानी मानाची गदा पटकावली. यानंतर नावाजलेले पै. भैया धुमाळ (अकलूज) विरुद्ध पै. फैयाज हुसेन (इंदोर) यांच्यामध्ये … Read more