श्रीगोंदा तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या आरोपींना न्यायालयाने सुनावली ५ दिवसांची पोलिस कोठडी

श्रीगोंदा- शेअर बाजारात गुंतवणूक करून जादा परताव्याच्या आमिषाने इन्फिनाइट बिकन या प्लॅटफॉर्म वरून ७३ लाख ५० हजार रुपयांच्या केलेल्या फसवणूक प्रकरणातील रंगनाथ गलांडे, अनिल दरेकर या अटक आरोपींच्या गाड्या तसेच जमिनी जप्त करावयाच्या असल्याच्या कारणातून न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कर्जत तालुक्यातील नितीन अंबादास गांगर्डे यांनी शेअर बाजारात इन्फिनाइट बिकन या प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केल्यास … Read more

एसपी सोमनाथ घार्गे यांनी नेमलेल्या विशेष पथकात महिला पोलिसांचा समावेश करावा, सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी*

अहिल्यानगर- जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यात अवैध व्यवसायिकांवर कारवाईचा धडाका लावला आहे. यासाठी एसपींनी स्वतःचे विशेष पथक नियुक्त केले आहे. हे विशेष पथक अवैध व्यवसाय करणाऱ्यांना सध्या चांगलाच धडा शिकवत आहे, परंतु या विशेष पथकात अनेक वेळा कारवाई दरम्यान महिला पोलीस नसल्याने गुन्हेगारांवर कारवाई करताना या पथकाला मर्यादा पडत आहेत. त्यामुळे या … Read more

अहिल्यानगरमधील ‘या’ बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिला ‘शेड्यूल्ड बँक’चा दर्जा

अहिल्यानगर- अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अहमदनगर मर्चेंट्स को ऑपरेटिव्ह बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘शेड्यूल्ड बँक’चा दर्जा दिला आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बँकेला ‘शेड्यूल्ड बँक’चा दर्जा मिळाला आहे. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून बँक प्रयत्न शील होती. या दर्जामुळे बँकेची विश्वासार्हता, कार्यक्षमता वाढून व्यावसायिक विस्तारात मोठी वाढ होणार आहे, अशी माहिती बँकेचे संस्थापक चेअरमन हस्तीमल … Read more

पाथर्डी तालुक्यातील मिरी तिसगाव प्रादेशिक नळ योजनेच्या कामासाठी निकृष्ट दर्जाचे पाईप?, अधिकाऱ्यांनी तपासणी करण्याची मागणी

करंजी- पाथर्डी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मिरी तिसगाव प्रादेशिक नळ योजनेच्या नवीन पाईपलाईनचे काम विविध गाव वाडी वस्तीवर सुरू आहे. मात्र काही ठिकाणी आयएसआयट्रेड मार्क असलेले पाईप वापरले जात आहेत तर काही ठिकाणी आयएसआय ट्रेडमार्क नसलेले व वेल्डींगने जॉईंट केलेले पाईप वापरले जात आहेत. या मुख्य पाईपलाईनसाठी ठेकेदाराकडून काही ठिकाणी निकृष्ट पाईपचा वापर केला … Read more

श्रीरामपूर शहरात बेकायदेशीर गोवंश कत्तल करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई, २१०० किलो मांस जप्त करत ५ जणांना ठोकल्या बेड्या

श्रीरामपूर- शहरात बेकायदेशीर गोवंश कत्तलीच्या प्रकाराचा मोठा भांडाफोड झाला असून, शहर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल २१०० किलो मांस व अन्य साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे अवैध कत्तलीस आळा बसण्याची शक्यता आहे. दिनांक ११ जुलै २०२५ रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, … Read more

अहिल्यानगरमध्ये बनावट शासन निर्णय दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी भिंगार पोलिसांत दुसरा गुन्हा दाखल

अहिल्यानगर- ग्राम विकास विभागाच्या बनावट शासन निर्णय दाखवून शासनाची फसवणूक केल्याचा कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असता पुन्हा भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात ग्रामविकास विभागाचा बनावट निर्णय दाखवून कामे मंजूर केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाच्या अभियंता सुप्रिया गोरखनाथ कांबळे (वय २९, रा. चंद्र बिल्डिंग, गोविंदपुरा, अहिल्यानगर) यांनी फिर्यादीवरून अनोळखी … Read more

अहिल्यानगर शहरातील मंगलगेट परिसरातील मावा कारखाना पोलिसांनी धाड टाकत केला उद्धवस्त, २ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल केला जप्त

अहिल्यानगर- शहरातील मंगलगेट परिसरातील कोंड्या मामा चौकात सुरू असलेल्या माव्याच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हहे शाखेच्या पोलिसांनी छापा घालून २ लाख ८४ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर, एकाविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले. … Read more

शिर्डीतील गुरूपौर्णिमा उत्सावाची कितर्नानंतर दहिहंडी फोडून सांगता, हजारो साईभक्तांची उपस्थिती

शिर्डी- श्री साईबाबा संस्थानच्यावतीने ९ जुलैपासून सुरु असलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाची प्राची व्यास, बोरीवली यांच्या किर्तनानंतर दहिहंडी फोडून सांगता झाली. उत्सवाच्या सांगता दिनी सकाळी ६.५० वा. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा केली. तर सकाळी ७ वा. गुरुस्थान मंदिर येथे रुद्राभिषेक करण्यात आला. सकाळी १० … Read more

अहिल्यानगर बाजार समितीच्या मार्केट यार्डात डाळिंबासह पपईची मोठी आवक, प्रतिक्विंटल मिळावा एवढे रूपये भाव, जाणून घ्या सविस्तर?

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शुक्रवारी ३२४ क्विंटल विविध फळांची आवक झाली होती. यामध्ये डाळिंबाची ६५ क्विंटल आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १००० ते १७ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीची दीड क्विंटल आवक झाली होती. मोसंबीला प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये भाव मिळाला. दरम्यान, बाजार समितीत आंब्याची आवक घटली असून भावही … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात १०७ मिमी पावसाची नोंद, ८० टक्के खरिपाच्या पेरण्या मात्र शेतकरी अद्यापही समाधानकारक पावसाच्या प्रतिक्षेत

अहिल्यानगर- जिल्ह्यात जूनमध्ये ८०.१ मिमी, तर ११ जुलै अखेर २७.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दीड महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १०७.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी अद्यापही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. नगर जिल्ह्यात आतापर्यंत ८० टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या असून पिकांना पावसाची प्रतीक्षा आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात जून महिन्याची पावसाची … Read more

वृक्षारोपण व संवर्धनासाठी अहिल्यानगर शहरातून जय हिंद फाउंडेशनने काढली वृक्ष फेरी, वृक्ष लावण्याचा दिला संदेश

अहिल्यानगर- वृक्षारोपण व संवर्धनाचा संदेश देत शहरातून जय हिंद फाउंडेशनच्या वतीने वृक्ष फेरी काढण्यात आली. या वृक्ष फेरीमध्ये दहा वाहनांमध्ये १०० वडाची झाडे, वाहनाला तिरंगा ध्वज लाऊन फेरी काढण्यात आली. तर फेरीमधील वडाची झाडे भगवानगड या ठिकाणी लागवडीसाठी रवाना करण्यात आली. वृक्ष फेरीचा प्रारंभजिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते झाला. यावेळी निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गिते, … Read more

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्यांच्या भावात झाली वाढ, जाणून घ्या काय आहेत आजचे दर?

अहिल्यानगर- नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी विविध भाजीपाल्याची १९४१ क्विंटल आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक ४७८ क्विंटल बटाट्याची आवक झाली होती. यावेळी बटाट्याला १२०० ते २४०० रुपये भाव मिळाला. यावेळी टोमॅटोची ३९७ क्विंटल आवक झाली होती. यावेळी टोमॅटोला प्रतिक्विंटल ५०० ते २००० रुपये भाव मिळाला. वांग्याची ५३ क्विंटल आवक झाली होती. यावेळी वांग्यांना २००० … Read more

अहिल्यानगर शहरातील ‘या’ भागामध्ये अनधिकृत गॅस रिफिलिंग करणाऱ्या सेंटरवर पोलिसांनी टाकला छापा, मुद्देमाल जप्त करत आरोपीच्या आवळल्या मुसक्या

अहिल्यानगर- सावेडी उपनगरातील वैदुवाडी येथील अनधिकृत गॅस रिफिलिंग सेंटरवर तोफखाना पोलिसांनी छापा घालून २३ हजारांचा मुद्देमाल जप्त करुन एकास ताब्यात घेतले. ही कारवाई सावेडी परिसरातील वैदुवाडी येथे १० जुलै रोजी दुपारी केली. तोफखाना पोलिसांनी छापा टाकून वैदुवाडी येथील गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा टाकून संकेत दत्ता शिंदे (वय २१, रा. वैदुवाडी) याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून एक … Read more

अहिल्यानगरमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून एकाची तब्बल २८ लाखांची फसवणूक, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर – जादा परताव्याचे आमिष दाखवून ‘इनफिनाईट सर्व्हिसेस प्रा. लि.’ आणि ‘मास्टर सिनर्जी एड्युटेक एलएलपी’ या कथित फायनान्स कंपन्यांनी एकाची २८ लाख रूपयांची फसवणूक केली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सीईओ अगस्ती मिश्रा, संचालक राहुल काळोखे, गौरव सुखदेवे, प्रसाद कुलकर्णी, सचिन खडतरे, चेतन धर, ययाती मिश्रा, माकेटिंग डायरेक्टर नवनाथ आवताडे … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील २९१ कोटींचा घोटाळा झालेल्या ‘या’ बहुचर्चित बँकेची इडी’कडून चौकशी सुरू, ठेवीदारांना दिलासा

अहिल्यानगर- जिल्ह्यातील बहुचर्चित अर्बन बँकेत २९१ कोटींचा घोटाळा झाला असून, आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. या गुन्ह्यात संचालक, कर्जदार आरोपी असून, आतापर्यंत १७ जणांना अटक करण्यात आली होती. आता थेट ‘इडी’ने बँकेची प्राथमिक चौकशी सुरू केली असून, २९१ कोटींच्या घोटाळ्याची ‘इडी’कडून चौकशी सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समजली. नगर अर्बन बँकेच्या गैरव्यवहारप्रकरणी माजी संचालक … Read more

अहिल्यानगरमध्ये सावकारीचा परवाना रद्द असतांनाही सावकारकी करणं एकाला भोवलं, तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल

अहिल्यानगर- सावेडी उपनगरातील बालिकाश्रम रस्त्यावरील ताठे मळा परिसरातील एका व्यक्तीचा सावकारकीचा परवाना रद्द झालेला असताना तो सावकारकी करताना आढळून आला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सचिन आदिनाथ ताठे (रा. ताठे मळा, बालिकाश्रम रोड सावेडी) असे त्या परवाना रद्द झालेल्या सावकाराचे नाव आहे. याबाबत उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील मुख्य लिपिक विशाल पांडुरंग आळकुटे … Read more

नगर-मनमाड रस्त्यांसाठी खासदार निलेश लंके यांचं उपोषण सुरू, काम सुरू झाल्याशिवाय माघार न घेण्याचा दिला इशारा

अहिल्यानगर- विळद बायपास ते सावळी विहीर या 75 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या रुंदीकरण आणि दुरुस्तीच्या कामाला तात्काळ सुरुवात व्हावी, या मागणीसाठी खासदार नीलेश लंके यांनी 11 जुलै 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. गेल्या सहा वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या कामामुळे जनतेच्या संयमाचा अंत झाला असून, या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे झालेल्या अपघातांमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी … Read more

राहुरी तालुक्यातील तीन ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा, तिघांना घेतले ताब्यात

राहुरी- अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक ९ जुलै रोजी राहुरी तालुक्यातील वांबोरी, कुक्कडवेढे रस्ता आणि उंबरे शिवारातील तीन ठिकाणी छापेमारी करत १७ हजार रुपयांच्या आसपासची देशी-विदेशी दारू जप्त केली. या कारवाईत तिघांना ताब्यात घेऊन राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वांबोरी शिवारातील हॉटेल … Read more