भिंगार शहरातून जाणाऱ्या सर्व एसटी बसेस आता भिंगारमध्ये थांबणार, परिवहन अधिकाऱ्यांचे निर्देश

अहिल्यानगर- भिंगार शहरातून जाणाऱ्या सर्व एसटी बस गाड्यांना भिंगारमध्ये थांबा देण्याचे आदेश विभाग नियंत्रक अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच भिंगार येथील बसस्थानकाच्या दुरुस्तीसाठी विभागीय स्थापत्य अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असल्याचे लेखी पत्र अहिल्यानगर विभाग नियंत्रक अधिकारी यांनी भिंगार भाजापाचे मंडल अध्यक्ष सचिन जाधव यांना दिले आहे. भाजपाच्या भिंगार मंडलाच्या पाठपुराव्यास यश आले असून सर्व एसटी गाड्या आता … Read more

जामखेडच्या भूमिपुत्राची व्यापाऱ्याकडून फसवणूक, सभापती राम शिंदेंचा एक फोेन अ्न व्यापाऱ्याचे धाबे दणाणले,

जामखेड- येथील व्यापारी तुषार कुकरेजा यांची कोकणातील एका व्यापाऱ्याने मोठ्या रकमेची फसवणूक केली होती. कुकरेजा हे याबाबतची तक्रार भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांच्याकडे घेऊन गेले होते. प्रा.राळेभात यांनी जामखेड कर्जतचे भूमिपुत्र सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे जात संपूर्ण माहिती सांगितली. ना. शिंदे यांनी याबाबत तातडीने दखल घेऊन संबंधित व्यापाऱ्यास फोन करून … Read more

चांगल्या मित्राच्या मार्गदर्शन आणि सहकार्यानेच नगर शहराची विकासाकडे वाटचाल सुरू आहे- आमदार संग्राम जगताप

अहिल्यानगर- शहरात होत असलेल्या विकास कामांमुळे झालेला बदल हा अनेक मार्गदर्शक मित्रांच्या चांगल्या सूचनांनुसार करत आहे. कमलेश भंडारी यांच्या सारख्या अनेक सहकारी मला साथ देत आहेत. जीवनात अशा चांगल्या मित्रांची गरज असते. अशा चांगल्या मार्गदर्शक मित्रांच्या सहकार्यानेच मी नगरची बदलत्या विकसित स्वरूपाकडे वाटचाल करू शकत आहे. कमलेश भंडारी यांचे सामाजिक कार्य अनुकरणीय आहे. अशा चांगल्या … Read more

अहिल्यानगरच्या बाजारात कांद्याचे भाव पडलेलेच, गुरूवारच्या बाजारात प्रतिक्विंटल कांद्याला मिळाला एवढे रूपये भाव?

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये गुरुवारी २९ हजार १३ क्विंटल गावरान कांद्याची आवक झाली होती. यावेळी कांद्याच्या भाव पडलेले असल्याचे दिसून आले. व्यापाऱ्यांनी केलेल्या लिलावात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल १२०० ते १६०० रुपये भाव मिळाला. दोन नंबर कांद्याला ८०० ते १२०० रुपये भाव मिळाला. तीन नंबर कांद्याला ४५० ते ८०० रुपये … Read more

रक्षाबंधनाला अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींना राखी बांधून लव्ह जिहादविरोधी कायदा तात्काळ लागू करण्याची मागणी करणार

अहिल्यानगर- राज्यात रक्षाबंधनाच्या दिवशी सकल हिंदू समाजाच्या वतीने विशेष सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असून, राज्यातील विविध जिल्ह्यांसह अहिल्यानगर शहरात हिंदू समाजातील महिला आमदार, खासदार, नगरसेवक, स्थानिक पदाधिकाऱ्यांना राखी बांधून महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायदा तात्काळ लागू करण्याची मागणी करणार आहेत. राखी केवळ नात्याची नाही, तर हिंदू भगिनींच्या सन्मानाची आहेर अशा भावनिक पद्धतीने महिलांनी आपली भूमिका व्यक्त … Read more

अनेक वर्षांपासून रखडलेली श्रीगोंदा काष्टी -मांडवगण फराटा बस सेवा अखेर सुरू, संभाजी ब्रिगेडच्या पाठपुराव्याला यश

श्रीगोंदा- संभाजी ब्रिगेड पक्षाच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे आणि आग्रही पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेली श्रीगोंदा काष्टी -मांडवगण फराटा बस सेवा अखेर सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिक, विद्यार्थी व शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. बस सेवेचे काष्टी येथे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष इंजि. शामभाऊ जरे यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष … Read more

अवजड वाहनांमुळे दोन महिन्यांपूर्वी बांधलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्याची चाळण, अवजड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी

श्रीगोंदा- दोन महिन्यापूर्वी तयार झालेल्या लिंपणगाव – रेल्वे स्टेशन रस्त्याची चाळण या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विजय होके यांनी रस्त्याची पाहणी करत अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्याची होणारी दुर्दशा रोखण्यासाठी १० टन वहन क्षमता असलेल्या रस्त्यावरून ४०-४५ टन वजनाची अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी. अशी मागणी परिवहन विभागाकडे पत्राद्वारे मागणी करण्यात … Read more

नाना पाटील वस्ताद तालीम नगरची ऐतिहासिक तालीम, इथलच्या लाल मातीत शरीर संपदेसह संस्कारही मिळतात- आमदार संग्राम जगताप

अहिल्यानगर- नगर शहराचा खेळांमधील गौरवशाली वारसा जपणारी नाना पाटील वस्ताद तालीम ही केवळ व्यायामशाळा नसून, ती एका जिवंत परंपरेचे प्रतीक आहे. अनेक दशकांपासून इथल्या लाल मातीमध्ये घडलेल्या मल्लांनी राज्य आणि देशपातळीवर आपली छाप उमटवली आहे. याच ऐतिहासिक तालमीचे नूतनीकरण नुकतेच आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. तालमीतून घडलेली शिस्त, संस्कार व ताकद तालमीच्या नूतनीकरणप्रसंगी … Read more

खून, बलात्कार, कीडनॅपींग, विनयभंगासारखे गंभीर गुन्हे असणाऱ्या भोसलेच्या पाथर्डी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पाथर्डी- खुनाचा प्रयत्न करणे, बलात्कार, मुलीस फुस लावून पळवून नेणे, विनयभंग करणे, फसवणूक करणे व मोक्का (संघटित गुन्हेगारी) असे नऊ गंभीर गुन्हे दाखल असलेला विकी पोपट भोसले, (रा. कासारवाडी, ता. पाथर्डी), या सराईत गुन्हेगाराला पोलिस उपनिरीक्षक संदीप ढाकणे व सहकाऱ्यांनी अटक केली आहे. पाथर्डी पोलिसांचे या कामगिरीसाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. विकी पोपट … Read more

ज्योतिषशास्त्रानुसार ‘या’ राशीच्या लोकांनी सोनं घालू नये! पैसा आणि संबंधात होतो मोठा तोटा, कोणत्या आहेत या राशी?

भारतीय संस्कृतीत सोनं हे संपत्ती आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं. घराघरात आई-आज्जींच्या दागिन्यांपासून ते नवविवाहित वधूच्या साजशृंगारापर्यंत सोन्याला खास स्थान असतं. पण ज्योतिषशास्त्राच्या नजरेतून पाहिलं, तर हेच सोनं काही विशिष्ट राशींसाठी शुभ नसतं, उलट त्यांचे जीवन अडचणींनी भरून जातं. हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण अनेक ज्योतीषशास्त्रज्ञांचा यावर ठाम विश्वास आहे. वृषभ राशी वृषभ राशीच्या … Read more

तारकपूर येथील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यासह १ लाख ५० हजाराचा ऐवज केला लंपास

अहिल्यानगर- तारकपूर परिसरातील एक घराचे कुलूप तोडून चोरांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे एक लाख ५० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना तारकपूर येथील ख्रिश्चन कॉलनी येथे २८ जुलै रोजी रात्री घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत गौरव अल्फ्रेड गमरे (वय ३३, रा. ख्रिश्चन कॉलनी, तारकपूर, ह. रा. लोहगाव, पुणे) यांनी … Read more

आगामी काळात जनता त्यांची धुंदी उतरवल्याशिवाय राहणार नाही : आ. रोहित पवार

अहिल्यानगर : जामखेड येथील तहसीलदारांची गडचिरोली येथे बदली करण्यात आली असून या बदलीमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात मात्र राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीची गटरचना करताना विशिष्ट गटात सोयीच्या विशिष्ट गावांचा समावेश करण्याचा सत्ताधाऱ्यांचा आदेश न जुमानल्याने तहसीलदारांची गडचिरोलीला बदली करण्यात आल्याचा घणाघाती आरोप आमदार रोहित यांनी केला आहे. जामखेडचे तहसीलदार गणेश माळी … Read more

जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार १०९ कोटी ; पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता

अहिल्यानगर : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा २० वा हप्त शनिवारी, २ ऑगस्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेतून शनिवारी, २ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील ५ लाख ४९ हजार ५१७ शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे १०९ कोटी ९० लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू करण्यात … Read more

टोमॅटोपाठोपाठ डाळिंब १४ तर संत्रा १२ हजार ; कांदा मात्र गडगडलेलाच अहिल्यानगर बाजार समितीत ४३४ क्विंटल फळांची आवक

अहिल्यानगर : अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी विविध फळांची ४३४ क्विंटल आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. संत्र्यांच्या भावात वाढ झाली असून संत्र्यांना १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. एकीकडे सध्या फळांना चांगले भाव मिळत असताना दुसरीकडे कांद्याला मात्र कमी भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. … Read more

जास्तीचा परतावा दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर ‘सुमोटो’

अहिल्यानगर : शेअर ट्रेडिंग कंपन्याच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देण्याचा आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. त्यात ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये गुंतले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात जादा परताव्याचे आमिष दाखवून कंपन्या ठेवीदारांकडून रक्कम घेतात आणि पोलिसांच्या तावडीत येण्याआधीच पळून जातात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील अशा कंपन्यांचा शोध … Read more

चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीच्या डोक्यात घातले कुऱ्हाडीने घाव : संगमनेर तालुक्यातील घटना

अहिल्यानगर : चारित्र्याच्या संशयावरून ६५ वर्षांच्या पतीने आपल्या ६० वर्षाच्या पत्नीचा कुऱ्हाडीने वार करत निर्घृण खून केला. ही घटना संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव येथे बुधवारी मध्यरात्री घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडू लक्ष्मण खंदारे (वय ६५) हे घारगाव येथील रहिवासी असून शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवतात. बुधवारी संध्याकाळी त्यांच्या कुटुंबियांनी नेहमीप्रमाणे एकत्र जेवण … Read more

आकाशवाणीचे मोईन शेख, देविदास अवलेलु सेवानिवृत्त

अहिल्यानगर : आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे सहाय्यक अभियंता मोईन शेख आणि वरिष्ठ तंत्रज्ञ देविदास अवलेलु आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर आज (दि.३१ जुलै) सेवानिवृत्त झाले. मोईन शेख यांनी ३७ वर्षांच्या सेवा कार्यकाळात राजकोट, अहिल्यानगर, शिर्डी, सटाणा, संगमनेर याठिकाणी दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्रात आपली सेवा बजावली. शिर्डी येथील दूरदर्शन प्रक्षेपण केंद्राच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. देवीदास अवलेलु यांनी … Read more

रस्त्यावर पडलेले पैसे घेतल्यास नशिबावर होतो अशुभ परिणाम?, प्रेमानंद महाराजांचा सल्ला ऐकाच!

आपल्या आजूबाजूच्या जगात अनेक गोष्टी अनपेक्षित घडतात. एखाद्या दिवशी रस्त्यावरून जात असताना जर अचानक तुमच्या नजरेस काही नोटा पडलेल्या दिसल्या, तर तुमचं मन क्षणभर गोंधळून जातं, उचलावं की नाही? असा विचार बहुतेकांना होत असतो. अशाच एका साध्या पण खोल प्रश्नाला वृंदावनचे आध्यात्मिक संत प्रेमानंद महाराज यांनी दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर लोकांच्या हृदयाला भिडतंय. रस्त्यावरील … Read more