जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनुभवला जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा आनंदादायी क्षण

लोणी दि.३१ : नाथ सागर प्रकल्पाच्या पायाभरणी पासून ते ज्ञानेश्वर उद्यानाच्या निर्मीतीची वाटचाल.. पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचा धरणावर झालेला सत्कार… या धरणाच्या निर्मितीत बहीणीला विस्थापीत व्हावे लागल्याच्या आठवणींना उजाळा देत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा आनंदादायी क्षण त्यांनी अनुभवला! अनेक वर्षाच्या कालखंडानंतर नाथसागर भरले..याचा आनंद मंत्री … Read more

सिलेंडरमधील गॅस शिल्लक आहे की नाही?, ‘या’ सोप्या ट्रिकने सेकंदात समजेल किती गॅस उरलाय!

आपण सगळेच अशा क्षणांना सामोरे गेलो आहोत, जेव्हा संध्याकाळी कामावरून थकून आलेली व्यक्ती स्वयंपाकाला बसते, आणि अगदी त्या क्षणीच गॅस संपतो. पोळ्या अर्धवट भाजून राहतात, घरच्यांचा चेहरा उतरतो आणि मग सुरु होते आधी पोट भरण्यापेक्षा गॅसवाल्याला कॉल करण्याची धावपळ. हे चित्र अनेक घरांमध्ये वारंवार घडतं. पण तुम्हाला माहिती आहे का, की याचं एक अतिशय सोपं … Read more

शनैश्वर देवस्थानच्या आता आणखी एका कर्मचाऱ्याची आत्महत्या ; शेटेंपाठोपाठ आता शिंदे यानेही संपवले जीवन

शनी देवस्थानचा कंत्राटी कर्मचारी शुभम विजय शिंदे (वय २२, रा. बेल्हेकरवाडी, ता. नेवासा) याने बुधवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी सोमवारी आत्महत्या केली. त्यानंतर ही दुसरी घटना घडली आहे. शुभम शिंदे याचे आईवडील हे शेतात कामाला गेले होते. घराच्या वरच्या पत्र्याच्या खोलीत त्याने गळफास घेतला. शेजारील मुलांच्या … Read more

भिंगार शहरासाठी उड्डाणपूलाची गरज खा. नीलेश लंके यांनी वेधले मंत्री नितीन गडकरींचे लक्ष

अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक व लष्करी वारसा लाभलेले भिंगार शहर सध्या अत्यंत गंभीर आणि दिर्घकालीन वाहतूक समस्येच्या विळख्यात अडकले आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी म्हणून सामाजिक जाणीवेने काम करणारे खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांची भेट घेऊन भिंगार येथे उड्डाणपूल बांधण्याची आग्रही मागणी केली. यासंदर्भात खा. लंके यांनी मंत्री गडकरी … Read more

कोपरगाव तालुक्यातील गावठी हातभट्टयांवर पोलिसांचा छापा, १ लाखांचे दारू बनवण्याचे कच्चे रसायन केले नष्ट

कोपरगाव- येथील शहर पोलिसांनी मंगळवारी केलेल्या कारवाईमध्ये दोन वर्षांपासून फरार आरोपी मिळून आला. तसेच गावठी हातभट्टयांवर छापा टाकून हातभट्टया उद्ध्वस्त केल्या. यावेळी १ लाख १२ हजाराचे रसायन व दारुचा नाश केला. तर अजामीनपात्र वॉरंट मधील ८ आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी शहर … Read more

तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि पाठिंब्यामुळे तालुक्यात विविध विकासकामे सुरू- आमदार किरण लहामटे

अकोले- सर्वाच्या सहकार्याने व वैद्यकीय क्षेत्रातील मित्रांच्या सदिच्छेने माझी तालुक्यात विकासाची कामे सुरू आहेत. पर्यटन वाढीस प्रमुख ठरणारा आकर्षक रंधा फॉल येथे काचेचा पूल डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर देवीचा घाट फोडण्यासाठीचे काम मार्गी लावू, असा दावा आ. डॉ. किरण लहामटे यांनी केला. अकोले तालुका मेडिकल असोसिएशनचे वार्षिक पारितोषिक वितरण २०२४-२५ व अंतरंग सांस्कृतिक कार्यक्रम … Read more

नदीच्या पुलावर भेटा, तुम्हाला जीवच मारतो अशी धमकी देत वाळूच्या पैश्यापायी पती-पत्नीला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

राहुरी- आमचे वाळूचे पैसे द्या, असे म्हणून आरोपींनी पती-पत्नीला शिवीगाळ करुन लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच घरात घुसून घरातील एक लाख रुपये व पत्नीच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण तोडून नेल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथे घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनाबाई किरण चव्हाण (वय ३८) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या … Read more

गुंजाळ यांच्या समाजकार्यांची भाजपाने दखल घेतली, आमदार अमोल खताळ यांनी गौरव कार्यकमात केले कौतुक

संगमनेर- भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ यांनी सामान्य जनता, शेतकरी, कामगार आणि कष्टकरी वर्गासाठी सातत्याने लढा दिला. त्यांच्या या कार्याची दखल भाजपने घेऊन त्यांना राज्य परिषदेवर संधी देत त्यांचा पक्षाने खऱ्या अर्थाने सन्मान केल्याचे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले. तालुक्यातील कोल्हेवाडी येथील भाजप ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ यांची भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्यपदी … Read more

श्रीरामपूर येथे मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाला मंजुरी, आमदार हेमंत ओगले यांच्या पाठपुराव्याला यश

श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघातील मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. श्रीरामपूर शहरात २०० क्षमतेच्या शासकीय वसतिगृहाची मंजुरी मिळाली असून, याबाबतची माहिती आमदार हेमंत ओगले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीस अखेर मंजुरी मिळाल्याने स्थानिक विद्यार्थिनींसाठी शिक्षणाचे दार अधिक मोकळे झाले आहे. विद्यार्थिनींची राहण्याची चिंता मिटली श्रीरामपूर परिसरात मागासवर्गीय मुली मोठ्या … Read more

गावातील रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करा, अन्यथा ग्रामपंचायतीला टाळे ठोकू, पुणतांबा ग्रामस्थांचा इशारा

पुणतांबा- पुणतांबा गावातील अंतर्गत रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. यासंदर्भात पूर्वी ग्रामपंचायतीला मनसेच्या वतीने व अमृतेश्वर महिला मंच यांच्यावतीने अनेकदा निवेदने देण्यात आली. परंतु त्या निवेदनांना ग्रामपंचायतीने केराची टोपली दाखवली. अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करावी अन्यथा ग्रा.पं. ला टाळे ठोकू, असा इशारा माजी उपसरपंच संदीप धनवटे यांनी दिला आहे. चिखलमय झालेल्या रस्त्यांमुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण … Read more

अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू, जाणून घ्या सविस्तर

श्रीरामपूर- अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी विदेशात पदव्युत्तर पदवी व पीएच. डी. अभ्यासक्रमासाठी यापुढे शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची माहिती ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या योजने अंतर्गत शिष्यवृत्ती देण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष … Read more

शिर्डीच्या साईबाबाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे साईभक्त आक्रमक, गायकवाड विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

शिर्डी- साईबाबांचा डी.एन.ए. चेक करा, असे आक्षेपार्ह विधान करून धार्मिक भावना दुखावल्या तसेच वेगवेगळ्या वर्गामध्ये शत्रूत्व द्वेष भाव किंवा दुर्भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने वक्तव्य केल्याप्रकरणी लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अरुण गायकवाड यांच्याविरोधात शिर्डी येथील कैलासबापू कोते यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यावरून शिर्डी पोलिसांनी गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते … Read more

शिर्डीतील श्रद्धा सबुरी पतसंस्थेत ४२ कोटींचा घोटाळा, घोटाळ्याप्रकरणी संस्थेचे संचालक मंडळ करण्यात आले बरखास्त

साकुरी- शिर्डी लगत असलेल्या निमगाव कोऱ्हाळे येथील श्रद्धा सबुरी पतसंस्थेत ४१ कोटी ९७ लाख १७ हजार ४० रुपयांचा अपहार व गैरव्यवहार केला म्हणून २७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास गुन्हा अन्वेषण विभाग अहिल्यानगर यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून नुकतेच पतसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून राहाताचे सहाय्यक निबंधक नामदेव ठोबळ यांनी त्रिसदस्यीय समितीची … Read more

पाथर्डी बसस्थानकावरील चोऱ्या रोखण्यासाठी कॅमेरा बसवा, अन्यथा अधिकाऱ्यांवर कारवाई करू, पोलिसांकडून आगारप्रमुखांना नोटीस

पाथर्डी- शहरातील जुन्या बसस्थानकावर चोऱ्यांचे वाढते प्रकार लक्षात घेता पोलिसांनी आगारप्रमुखांना नोटीस बजावली असून, लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे न बसविल्यास गुन्हेगारांना प्रोत्साहन दिल्याच्या आरोपावरून संबंधित जबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी पाथर्डी आगाराला दिला आहे. या पत्रामुळे आगारातील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दि.२४ जुलै व ३० जुलै रोजी … Read more

शेवगाव तालुक्यातील दिंडेवाडी येथील नागरिकांची भर पावसाळ्यात पिण्याची पाण्यासाठी वणवण, प्रशासनाला निवेदन

शेवगाव- तालुक्यातील दिंडेवाडी येथील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हाल होत असून, त्यासाठी त्यांना इतरत्र भटकंती करावी लागत आहे. दिंडेवाडी येथील नागरिकांसाठी आव्हाणे बु. येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरून पाणी मिळावे व आव्हाणे बु. ते दिंडेवाडी नवीन पाईपलाईन करून मिळावी, अशा आशयाचे निवेदन जनशक्तीचे कार्याध्यक्ष राम पोटफोडे यांच्या अध्यक्षतेखाली दिंडेवाडी येथील ग्रामस्थांनी शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी … Read more

वांबोरी चारीचे पाणी तिसगाव परिसरातील गावापर्यंत पोहचवण्यासाठी लवकरच बैठक होणार- ज्येष्ठनेते काशिनाथ पाटील लवांडे

तिसगाव- लाभधारक शेतकऱ्यांनी मागणी करताच युवानेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते वांबोरी चारीसाठी मुळा धरणातून ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, या योजनेचे पाणी सातवड, घाटशिरस, तिसगावसह, मढीपर्यंतच्या तलावात पोहोचण्यास अनेक अडथळे येतात. मागील पाच वर्षांत या योजनेचे पाणी अनेक तलावापर्यंत पोहोचलेच नाही, त्यामुळे ना. राधाकृष्ण विखे पाटील व मुळा पाटबंधारे … Read more

अहिल्यानगरमध्ये चोरीतील पैश्यांच्या वाटणीवरून वाद झाला अन् चोरट्यानेच दारूच्या नशेत चोरीचा भांडाफोड केला

जेऊर- अहिल्यानगर तालुक्यात विविध ठिकाणी विविध प्रकारच्या चोऱ्यांचे प्रकार घडत असतात. चोरांना पकडण्यासाठी पोलीस यंत्रणेला कसरत करावी लागते. त्यात काही प्रमाणात यश मिळते तर काही गुन्ह्यांचा तपास सुरू राहतो. परंतु तालुक्यातील जेऊर येथे झालेल्या चोरीची गोष्टच ‘न्यारी’ असून चार चाकी वाहन व दोन म्हशींची चोरी करणाऱ्या चोरांची नावे ग्रामस्थांना निष्पन्न झाली आहेत. परंतु संबंधित घटनेबद्दल … Read more

शेतकऱ्यांनो! कांद्याच्या वांधा होतोय? तर अशा पद्धतीने लागवड करून योग्य नियोजन करा

जुलै-ऑगस्ट महिन्यात खरीप हंगाम पूर्ण जोरात सुरू असतो. याच काळात अनेक शेतकरी आपल्या शेतात कांदा लागवडीसाठी सज्ज होतात. खरीप हंगामात विशेषतः लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. काही शेतकरी थेट बियाण्यांची पेरणी करतात, तर काहीजण रोपे तयार करून लागवड करतात. भरघोस आणि दर्जेदार कांदा उत्पादनासाठी योग्य वाणांची निवड, वेळेवर लागवड, संतुलित खते, आंतरमशागत आणि … Read more