लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने पात्र ठरलेल्या महिलांसाठी अर्ज प्रकिया सुरू?, मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच होणार निर्णय

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२४ होती. त्यानंतर अनेक महिलांनी वयाची २१ वर्षे पूर्ण करून या योजनेसाठी पात्रता मिळवली आहे, तर काही महिलांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे नामंजूर झाले आहेत. मात्र, नवीन अर्ज प्रक्रिया सुरू न झाल्याने या महिलांना योजनेचा लाभ मिळणार की नाही, … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात २५ धर्मादाय रुग्णालये, रुग्णांवर केले जातात मोफत उपचार, जाणून घ्या सविस्तर माहिती

Ahilyanagar News: अहिल्यानगर – आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि गरजू रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात २५ धर्मादाय रुग्णालये कार्यरत आहेत. या रुग्णालयांमुळे गरीब आणि दुर्बल कुटुंबांना उपचारासाठी आर्थिक ओझे सहन करावे लागत नाही, तसेच त्यांना वेळेवर आणि मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळतात. धर्मादाय आयुक्तालयांतर्गत नोंदणीकृत या २५ रुग्णालयांद्वारे आर्थिकदृष्ट्या मागास रुग्णांना विनामूल्य किंवा … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरकरांनो सावध व्हा ! दुष्काळाची चाहूल… तब्बल 643 गावं आणि 2415 वाड्यांमध्ये पाणी टंचाई

एप्रिल महिन्याची तीव्र उष्णता आता चांगलीच जाणवू लागली असून अकोले, शेवगाव आणि कर्जत तालुक्यांतील अनेक गावांवर पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. परिणामी, या भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील 69 गावं आणि 362 वाड्यांमध्ये टंचाईची परिस्थिती उद्भवली आहे. एकूण 1 लाख 38 हजार नागरिकांसाठी 69 टँकर कार्यरत आहेत, त्यापैकी सर्वाधिक … Read more

Ahilyanagar : पारनेर तालुका ठरतोय सत्ता – कुस्त्यांचा हॉटस्पॉट ! सुजय विखे म्हणाले…

Ahilyanagar News : पारनेर तालुका केवळ ग्रामीण कुस्ती परंपरेसाठीच नव्हे, तर आता राजकीय कुस्त्यांसाठीही चर्चेचा विषय ठरतो आहे. नुकत्याच पार पडलेल्या गोरेगाव येथील अंबिका माता यात्रेच्या कुस्ती महोत्सवात हे प्रकर्षाने दिसून आलं. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी उपस्थित राहून स्पष्ट केलं की, त्यांच्या कुटुंबाचा आणि पारनेर तालुक्याचा संबंध हा परस्पर प्रेमाचा आहे. … Read more

मंत्रिमंडळ बैठकीसाठी चोंडीमध्ये प्रशासनाकडून जय्यत तयारी, तीन दिवसांत १५० कोटी खर्च करून भव्य शामियाना, ग्रीन रुम्स, स्टेजसह इतर सुविधा उभा करणार

Ahilyanagar News: अहिल्यानगर – येत्या २९ एप्रिल रोजी चोंडी येथे होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या बैठकीसाठी भव्य मंडप, स्टेज, ग्रीन रूम्स आणि इतर आवश्यक सुविधा उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सव्वा कोटी रुपयांची निविदा सोमवारी जाहीर केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आयोजित या बैठकीत अहिल्यादेवींच्या स्मारकाच्या विकास … Read more

अहिल्यानगर : मंत्रिमंडळ बैठकीतील मंत्र्याच्या जेवणासाठी खास नगरी बेत, शिंगोरी आमटी, शेंगुळे, वांग्याचं भरीत, ठेचा-भाकरीचा असणार मेन्यू

Ahilyanagar News: अहिल्यानगर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त २९ एप्रिल रोजी चोंडी येथे प्रथमच मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या विशेष प्रसंगासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली असून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांसह व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी खास खानदेशी आणि मराठवाडी पदार्थांचा मेन्यू तयार करण्यात आला आहे. यामध्ये शिपी आमटी, पुरणपोळी, डाळबट्टी, हुलग्याचे शेंगुळे, … Read more

Ahilyanagar Railway : अहिल्यानगर जिल्ह्यात होणार 3238 कोटींचा नवा रेल्वेमार्ग, 85 किमी लांबी, 10 स्थानके आणि ‘या’ धार्मिक स्थळांना जोडले जाणार

Ahilyanagar News : अहिल्यानगर- मराठवाडा आणि अहमदनगर जिल्ह्याच्या दळणवळणाला चालना देणारा आणि धार्मिक तीर्थक्षेत्रांना रेल्वे नकाशावर आणणारा छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर दरम्यानचा ८५ किलोमीटर लांबीचा नवीन रेल्वेमार्ग आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पासाठी ३२३८ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित असून, नेवासे तालुक्यातील देवगड, नेवासे, शिंगणापूर आणि उस्थळ दुमाला येथे चार नवीन रेल्वे स्थानके उभारली जाणार … Read more

सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ, सोने १ लाख रूपयांच्या उंबरठ्यावर! खरेदीसाठी नागरिकांची गर्दी !

Ahilyanagar News: अहिल्यानगर – शेअर बाजारात तेजी असताना सोन्याच्या किमतींनीही उच्चांक गाठला आहे. गेल्या एका महिन्यात सोन्याच्या दरात तब्बल ७ हजार रुपयांची वाढ झाली आहे, असे आंतरराष्ट्रीय सोने बाजाराच्या तज्ज्ञांनी सांगितले. सोमवारी अहिल्यानगरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ९६ हजार रुपये प्रतितोळा, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ८९,२०० रुपये होता. तज्ज्ञांचा अंदाज आहे की, अक्षय्य तृतीया … Read more

अहिल्यानगरमध्ये उष्णतेचा कहर, रस्ते ओस, बाजारात शुकशुकाट! तापमानाने गेल्या ३ वर्षातील तोडले सर्व रेकाँर्ड

Ahilyanagar News: अहिल्यानगर- सध्या उष्णतेचा प्रकोप वाढत चालला आहे. सोमवारी शहराचे तापमान ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचले, जे गेल्या तीन वर्षांतील एप्रिल महिन्यातील सर्वोच्च तापमान आहे. यापूर्वी एप्रिल २०२२ मध्ये तापमान ४३.६ अंशांवर गेले होते. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली असून, मंगळवारी (२२ एप्रिल) देखील तापमान ४३ अंशांवर कायम राहण्याचा … Read more

अहिल्यानगरमध्ये तीन तासांच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी ‘दीडशे कोटींचा’ शाही खर्च! उन्हापासून वाचण्यासाठी मंत्र्यासाठी उभारल्या जाणार १०० कोटींच्या ग्रीन रूम

अहिल्यानगर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक त्यांच्या जन्मगावी, चौंडी येथे पहिल्यांदाच २९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी तात्पुरत्या सुविधा उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे १५० कोटी रुपये खर्चाची निविदा जाहीर केली आहे. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चौंडीतील सभेसाठी केवळ १२ लाख रुपये … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात होणार्या ‘त्या’ मंत्रिमंडळ बैठकीतून जिल्ह्याच्या अनेक प्रश्नांवर तोडगा निघणार

Ahilyanagar News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी, चौंडी (ता. जामखेड) येथे राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक लवकरच पार पडणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत अहिल्यादेवी होळकर सृष्टी, संत ज्ञानेश्वर सृष्टी, भुईकोट किल्ल्याचे राज्य सरकारकडे हस्तांतरण आणि संवर्धन, तसेच श्रीगोंद्याच्या पेडगाव किल्ल्यावर … Read more

Ahilyanagar News : छत्रपती शिवरायांच्या ‘आग्रा’ मोहिमेपासून तर आग्र्यावरून सुटकेपर्यंत अहिल्यानगरमधील नेवाशाची होती महत्वपूर्ण भूमिका

नेवासे तालुक्यातील खेडले परमानंद गाव हरिश्चंद्रगडावरून उगम पावलेल्या मुळा नदीच्या काठावर वसलेले. या ठिकाणी असणाऱ्या शिवभारत ग्रंथाचे लेखक कवी परमानंद यांच्या ऐतिहासिक मठास पानिपत ग्रंथाचे लेखक विश्वास पाटील यांनी भेट दिली. त्यानंतर या ठिकाणचे महत्व आणखी अधोरेखित झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीच्या अगोदर उत्तर भारतातील स्थितीचा अभ्यास करण्यासाठी परमानंद यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी अगोदरच … Read more

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील आंब्याचा महाराष्ट्रभर बोलबाला! यंदा १ कोटी ८४ लाखांचं विक्रमी उत्पन्न

राहुरी- महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आंबा फळांच्या लिलावातून १ कोटी ८४ लाख रुपयांचं विक्रमी उत्पन्न मिळवल्याची माहिती बियाणे विभागाचे प्रमुख आणि कुलसचिव डॉ. नितीन दानवले यांनी दिली. विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील आंबा बागांमधील केशर, लंगडा, वनराज आणि तोतापुरी या वाणांच्या फळांनी बाजारपेठेत चांगली मागणी मिळवली. ई-निविदा प्रणालीद्वारे झालेल्या या विक्रीतून बियाणे विभाग आणि उद्यानविद्या विभागाच्या रोपवाटिकेने एकत्रितपणे … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरच्या सुपुत्राची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अंडर १४ संघात निवड

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अंडर १४, १६, १९ वयोगटातील मुलांची सध्या संघनिवड सुरू आहे. चौदा वर्षाखालील मुलांची संघनिवड मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एसएससीए कल्याण ग्राउंड वर गेले चार दिवस ट्रायल घेऊन करण्यात आली. संघात मूळचा राहाता तालुक्यातील खडकेवाके येथील रहिवासी असलेले सध्या डोंबिवली येथे स्थायिक असलेल्या शार्दूल अनिल मुरादे याची निवड करण्यात आली. शार्दूल हा अष्टपैलू खेळाडू … Read more

संत शेख महंमद मंदिराचा वाद चिघळला, वक्फ बोर्डाची नोंदणी रद्द होईपर्यंत चर्चा न करण्याचा आंदोलकांनी घेतला आक्रमक पवित्रा

श्रीगोंदा- संत शेख महंमद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आणि वक्फ बोर्डाकडे झालेल्या नोंदणीच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर सुरू असलेलं धरणे आंदोलन तिसऱ्या दिवशीही कायम आहे. गावकऱ्यांनी वक्फ बोर्डाकडे दर्गा म्हणून नोंद झालेली मंदिराची नोंदणी रद्द होईपर्यंत कोणतीही चर्चा न करण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. संत शेख महंमद महाराज हे श्रीगोंद्याचे ग्रामदैवत असून, त्यांच्या मंदिराशी संबंधित हा वाद … Read more

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांविरुद्ध श्रीरामपूर पोलिसांत तक्रार दाखल, गुन्हा दाखल करण्याची शेतकरी संघटनेची मागणी

श्रीरामपूर- शेतकरी संघटनेने राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचं आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या सरकारवर फसवणुकीचा आरोप केला आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचा दावा करत संघटनेने तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. तक्रार अर्ज** शेतकरी संघटनेचे … Read more

‘उद्योगीनामा’ म्हणजे नवउद्योजकांचा वाटाड्या सीए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे, माजी अध्यक्ष, सीए शाखा, अहिल्यानगर

प्रत्येक माणसाच्या आतमध्ये आणखी एक धडपडा माणूस असतो आणि तो त्याला स्वस्थ बसू देत नसतो. या आतल्या धडपड्या माणसाकडून अनेक जणांना नवा व्यवसाय-उद्योग करण्यासाठी सतत टोचण मिळत असते. मात्र, आयुष्यातील एखाद-दुसऱ्या अनुभवाला आपण चिकटून बसतो आणि हा विचार मनामध्ये मरतो. पण, या अनुभवातून धडा गिरवून स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज असणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे पुस्तक म्हणजे … Read more

अहिल्यानगरमधील पाण्याचा प्रश्न आता कायमचा मिटणार! गोदावरी खोऱ्यात चार नदीजोड प्रकल्प राबवले जाणार, राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

अहिल्यानगर- जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी पावलं उचलली आहेत. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारं पाणी तुटीच्या खोर्‍यात वळवण्यासाठी गोदावरी खोर्‍यात चार नदीजोड प्रकल्प राबवले जाणार आहेत, अशी माहिती जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणात्मक निर्णयामुळे हे प्रकल्प गतीमान होणार असून, यामुळे पाणीटंचाईवर मात … Read more