राहुरीमध्ये छत्रपतींच्या पुतळ्याची विंटबना करणारे आरोपी २० दिवस होऊनही अद्याप मोकाटच, प्राजक्त तनपुरेंच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू

राहुरी- शनि चौक परिसरात महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेला २० दिवस उलटूनही पोलिसांना आरोपी सापडलेले नाहीत. यामुळे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिस प्रशासनाला दोन दिवसांत आरोपींना अटक करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणी त्यांनी उपोषण सुरू केले असून, स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शवला आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेवरही त्यांनी टीका … Read more

मळगंगा देवीच्या यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या पाण्याची चिंता मिटली, कपिलेश्वर बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा जलसंपदा मंत्र्यांचा निर्णय

पारनेर- निघोज येथील मळगंगा देवी यात्रेसाठी पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी केलेल्या मागणीला यश आले आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी २० तारखेपासून पुष्पावती नदीपात्रात पाणी सोडून कपिलेश्वर बंधारा भरून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे यात्रेदरम्यान पाण्याचा प्रश्न सुटणार असून, लाखो भाविकांना दिलासा मिळणार आहे. पाण्याची टंचाई निघोजच्या मळगंगा … Read more

शिवणकाम करणाऱ्याचा मुलगा दुबईत प्रोजेक्ट मॅनेजर! अहिल्यानगरमधील तरूणाचा प्रेरणादायी प्रवास

नेवासा- सोनई येथील अतुल अशोक शिरसाठ याची दुबईतील पोलारीस इंटरनॅशनल इंडस्ट्रीज एलएलसी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून निवड झाली आहे. पुण्यातील निकमार युनिव्हर्सिटीच्या कॅम्पस प्लेसमेंटमधून त्याने ही संधी मिळवली. अतुलच्या यशामागे त्याच्या कुटुंबाच्या अथक परिश्रम आणि जिद्दीची कहाणी आहे. शिवणकाम आणि मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबाने अनेक अडचणींवर मात करत आपल्या मुलाला उच्च शिक्षण देऊन स्वप्नांना … Read more

अहिल्यानगरमधील ‘या’ साखर कारखान्याने कामगारांना कामावरून टाकले काढून, ‘हे’ कारण देत बसवलं घरी

श्रीगोंदा- नागवडे साखर कारखान्याने कामगारांना दिलेला तीन महिन्यांचा ले-ऑफ बेकायदेशीर आणि अन्यायकारक असल्याचा आरोप कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशवराव मगर यांनी केला आहे. कारखान्याच्या गैरव्यवस्थापनाला अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा मनमानी कारभार कारणीभूत असताना, कमी गाळपाचे खापर सभासद शेतकऱ्यांवर फोडले जात आहे. या निर्णयाविरोधात मगर यांच्यासह इतर नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ले-ऑफ तात्काळ रद्द करण्याची मागणी … Read more

महापालिकेचा स्थगिती आदेश धाब्यावर! अहिल्यानगरमधील या भागामध्ये बेकायदेशीर बांधकाम सुरूच, तक्रारदाराचा उपोषणाचा इशारा

अहिल्यानगर- अहिल्यानगरातील केडगाव लिंक रस्त्यालगतच्या सर्व्हिस रोडवर महापालिकेने बांधकामाला स्थगिती दिलेली असतानाही काम सुरू आहे. या बांधकामाला चुकीच्या पद्धतीने परवानगी मिळाल्याचा आरोप स्थानिक नागरिक राजेंद्र पठारे यांनी केला आहे. महापालिकेच्या नगररचना विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने ही परवानगी मिळवल्याचा दावा करत त्यांनी बांधकाम रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच, कारवाई न झाल्यास महापालिकेसमोर उपोषणाचा … Read more

महावितरणाचा सर्वसामान्यांना जोरदार झटका! अचानक वीज बिलात केली एवढ्या पैशांनी वाढ

Ahilyanagar News : अहिल्यानगरसह राज्यभरात १ एप्रिलपासून वीज दरात वाढ झाली आहे. प्रतियुनिट ६० पैसे जादा आकारण्यात येत असल्याने प्रत्येक ग्राहकाच्या बिलात २५ ते १०० रुपयांची वाढ होणार आहे. महावितरणच्या या निर्णयामुळे घरगुती ग्राहकांपासून व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांपर्यंत सर्वांनाच आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. ही वाढ मार्चच्या वीज वापरावर लागू होणार असली, तरी येत्या … Read more

आग लागली की अवघ्या २ मिनिटांतच अग्निशमनची गाडी होते हजर, अहिल्यानगरच्या ‘फायर वॉरियर्स’चं कसं असतं परफेक्ट नियोजन जाणून घ्या सविस्तर!

अहिल्यानगर- शहरात आग लागल्याची बातमी समजताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचण्यासाठी सज्ज होतात. ‘सावेडीत आग लागली आहे, त्वरित यावे,’ असा फोन १०१ या टोल-फ्री क्रमांकावर येताच कर्मचारी तात्काळ पत्त्याची नोंद करतात आणि अग्निशमन वाहन घटनास्थळाकडे रवाना होते. रस्ते मोकळे असल्यास पाच ते दहा मिनिटांत दल घटनास्थळी दाखल होते. रात्रंदिवस कार्यरत असलेल्या … Read more

महागाईचा भडका! गॅस-पेट्रोल पाठोपाठ वीजेची दरवाढ होणार, गृहिणींची डोकेदुखी वाढली

अहिल्यानगर- नुकतीच गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ झाली आहे, तर विजेच्या दरातही प्रतियुनिट ६० पैशांची वाढ होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या दरवाढीमुळे सामान्य नागरिक, विशेषतः गृहिणींवर आर्थिक ताण वाढला आहे. पेट्रोल-डिझेलच्या आधीच वाढलेल्या किमतींमुळे महागाईचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता नवीन आर्थिक वर्षात आणखी आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. गॅस सिलिंडर आणि वीज यांसारख्या … Read more

अहिल्यानगरमध्ये कडक उन्हाचा तडाखा; तापमान चाळिशीच्या उंबरठ्यावर, उन्हामुळे रस्ते पडले ओस

अहिल्यानगर: गत आठवड्यात तापमानाचा पारा ३९ अंशावर गेला होता. त्यानंतर ढगाळ हवामानामुळे पुन्हा एक ते दोन अंशांनी तापमानाचा पारा घसरला. मात्र सोमवारी पुन्हा तापमानाचा पारा ३९ अंशावर गेला. है दिवसभरातील कमाल तापमान होते. अवकाळी पाऊस आला तर पारा घसरण्याची शक्यता आहे, अन्यथा पारा ४० अंशाच्यापुढे जाईल, असे तज्ज्ञांनी सांगितले. अवकाळी पावसाचा अंदाज ढगाळ हवामानामुळे मध्य … Read more

अहिल्यानगरमध्ये काँग्रेस पक्षात राजकीय भूंकप, १०-१२ नगरसेवक काँग्रेसला डच्चू देत करणार भाजपमध्ये पक्षप्रवेश!

श्रीरामपूर- श्रीरामपूरच्या राजकारणात मोठा बदल घडणार असून, दिवंगत जयंत ससाणे यांचे विश्वासू सहकारी असलेल्या काँग्रेसच्या १० ते १२ माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे. माजी नगराध्यक्ष आणि ससाणे कुटुंबाचे जवळचे सहकारी संजय फंड … Read more

अहिल्यानगरमध्ये संत शेख महंमद मंदिराच्या जीर्णोद्धारावरून वाद पेटला! बेमुदत काळासाठी शहर बंद ठेवण्याचा नागरिकांचा निर्धार!

श्रीगोंदा- संत शेख महंमद महाराज मंदिराच्या नूतनीकरणाचा वाद चिघळला आहे. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी गुरुवारी (दि. १७) भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, त्याच दिवशी श्रीगोंदा शहर अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिराचे बांधकाम सुरू होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे. सोमवारी श्रीगोंद्यात मंदिराच्या नूतनीकरणाबाबत एक बैठक … Read more

सरकार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संवेदनशील ; माजी मंत्री तनपुरे यांचे आत्मक्लेश आंदोलन

राहुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना होऊन २० दिवसांचा कालावधी उलटून गेला, तरी अद्याप आरोपींचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. राहुरी पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्काळ आणि सखोल तपास करणे अपेक्षित होते. पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी चार दिवसांपूर्वी पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. काल सोमवारी … Read more

नेवासा तालुक्यातील 7 हजारांहून रेशनकार्ड रद्द होणार ! रेशनकार्ड धारकांसाठी अंतिम इशारा

Ration Card News

Ahilyanagar News : नेवासा तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे नेवासा तालुक्यात ७,१६३ नागरिकांची ई-केवायसी अद्याप बाकी आहे. ३० एप्रिल २०२५ ही अंतिम तारीख असून, यापूर्वी केवायसी न झाल्यास शिधापत्रिका बंद होण्याचा इशारा देण्यात आला आहे. आता ‘मेरा राशन’ अ‍ॅपद्वारे घरी बसूनही केवायसी करता येईल – पण अजूनही उशीर झाला तर धान्याचा हक्क … Read more

अहिल्यानगरचा ९ वर्षाचा चिमुरडा १५ किलोमीटर सागरी अंतर पोहून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना देणार अनोखी मानवंदना!

अकोले- मुंबईतील विक्रोळी येथील रहिवासी आणि मूळ अकोले तालुक्यातील खडकी खुर्द येथील मुरलीधर बांडे यांचा ९ वर्षांचा मुलगा मंथन मुरलीधर बांडे एक अनोखा उपक्रम राबवणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त १४ एप्रिल रोजी मंथन अटल सेतूपासून गेटवे ऑफ इंडिया पर्यंतचे सुमारे १५ किलोमीटरचे सागरी अंतर पोहून महामानवाला मानवंदना देणार आहे. हा केवळ एक … Read more

शेतात जायला रस्ता नसल्याने हेलीकॉप्टर खरेदीसाठी बीडच्या पठ्ठ्याने कृषीमंत्र्याकडे केली १० कोटींच्या कर्जाची मागणी !

बीड- जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील बंगालीपिंपळा गावातील शेतकरी राजेंद्र नवले यांनी आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याच्या समस्येमुळे एक अनोखी मागणी केली आहे. शेतीसाठी रस्त्याअभावी निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे हताश झालेल्या या शेतकऱ्याने थेट केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे हेलिकॉप्टर खरेदीसाठी १० कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली आहे. या मागणीमुळे स्थानिक पातळीवर चर्चा तर झालीच आहे, पण शेतकऱ्यांच्या … Read more

अहिल्यानगरमधील ‘या’ तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आरपारची लढाई लढणार! खासदार निलेश लंके यांचा निर्धार

अहमदनगर- जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील कुकडीच्या पाणीप्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते, जी कायमस्वरूपी सोडवण्यासाठी डिंभे ते माणिकडोह बोगदा हा एकमेव पर्याय असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी ठामपणे मांडले आहे. या बोगद्यासाठी जन आंदोलन उभारण्याची आणि आरपारची लढाई लढण्याची त्यांची तयारी असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. हा प्रश्न केवळ शेतकऱ्यांच्याच … Read more

शिकार शोधण्यासाठी गेला अन् विहिरीत पडला, वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढत केले जेरबंद

राहुरी- शहरालगतच्या तनपुरेवाडी शिवारात एका बिबट्याला विहिरीत पडलेल्या अवस्थेतून सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाच्या रेस्क्यू ऑपरेशन टीमला यश मिळाले आहे. भक्ष्याच्या शोधात भटकताना हा बिबट्या बाबासाहेब तनपुरे यांच्या विहिरीत पडला होता. विशेष म्हणजे, ही मोहीम अवघ्या तासाभरात यशस्वीपणे पार पडली. मंगळवारी रात्री विहिरीत पडलेला हा बिबट्या बुधवारी सकाळी शेतकऱ्यांनी मोटार चालू करण्यासाठी गेल्यावर त्यांच्या नजरेस … Read more

अहिल्यानगरमधील सरपंच आरक्षण सोडत १५ एप्रिलनंतर होणार, कसा असणार आहे आरक्षणाचा कोटा वाचा सविस्तर!

अहिल्यानगर- जिल्ह्यातील १ हजार २२३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची प्रक्रिया आगामी पाच वर्षांसाठी निश्चित करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. या प्रक्रियेसाठी २५ एप्रिल २०२५ पर्यंत सर्व काम पूर्ण करण्याचे निर्देश शासनाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. यामुळे निवडणूक यंत्रणेची धावपळ सुरू झाली असून, १५ एप्रिलपासून तहसील कार्यालयांमध्ये आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक … Read more