२४ तासांच्या आत ‘साई मिडास’चे वीज आणि पाणीपुरवठा बंद करा : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश

अहिल्यानगर : शहरातील महत्त्वाच्या अशा साईमिडास हा व्यावसायिक प्रकल्प कायमचा बंद होण्याकडे वाटचाल सुरु झाली आहे. या प्रकल्पाचे वीज मीटर आणि पाणी पुरवठ्याचे कनेक्शन तात्काळ तोडण्यात यावे असे आदेश त्या त्या खात्याना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाशिक विभागाचे प्रमुख एल. एस. भांड यांनी दिले आहेत . नगर मनमाड महामार्गावर दूध संघाच्या जागेमध्ये बेकायदेशीर रित्या साई मिडास … Read more

नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या – डॉ.जयश्रीताई थोरात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी डॉ. जयश्री थोरात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

संगमनेर तालुक्यातील काही भागांमध्ये काल अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक वाया गेले आहे. यामुळे शासनाने कोणतीही फार्सबाजी न करता त्वरित पंचनामे करून तातडीने जास्तीत जास्त मदत द्यावी अशी आग्रही मागणी संगमनेर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी केली आहे. सावरगाव तळ खांडगाव कवठे धांदरफळ यांचे पठार … Read more

सरकारी जागेवरील अतिक्रमण नियमित करण्यासाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय! अतिक्रमणधारकांना दिलासा?

राज्यातील छोट्या आणि मध्यम शहरांमध्ये सरकारी जमिनींवरील अतिक्रमण नियमित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्य सरकारने या संदर्भात ठोस धोरण ठरविण्यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती १५ दिवसांत आपला अहवाल सादर करणार आहे. या निर्णयामुळे महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना उत्पन्नाचा नवा स्रोत मिळण्याची शक्यता … Read more

शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा! राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा इशारा

राज्यातील हवामानात झालेला बदल आणखी काही दिवस कायम राहणार आहे. पुढील चार ते पाच दिवस ठिकठिकाणी अवकाळी पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात दोन दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी लागत असली तरी कमाल तापमानाचा कहर अद्याप कायम आहे. बुधवारी राज्यातील तापमान अहिल्यानगर: ३७ अंश, बीड: ३९.८ अंश, मालेगाव: ३८.४ अंश, मुंबई: ३६.९ अंश, … Read more

बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी, वर्षाला मिळणार १२ हजारांची पेन्शन! नेमक्या काय आहेत अटी आणि शर्थी वाचा सविस्तर!

अहिल्यानगर- जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कामगार कल्याण मंत्रालयाने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी नवीन पेन्शन योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत ६० वर्षे वय पूर्ण झालेल्या कामगारांना दरवर्षी १२,००० रुपये पेन्शन मिळणार आहे. बांधकाम क्षेत्रात आपले आयुष्य खर्ची घालणाऱ्या कामगारांना वृद्धापकाळात आर्थिक आधार मिळावा, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. … Read more

अहिल्यानगरमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना कपाट उचलण्यास सांगणे केंद्रप्रमुखांना चांगलेच भोवले! प्रशासनाने केली मोठी कारवाई

देवळाली प्रवरा: विद्यार्थ्यांना अवजड कपाट हलवण्यास सांगितल्याच्या प्रकरणी केंद्रप्रमुख निलीमा गायकवाड यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी त्यांची एक वेतनवाढ रोखण्याचा आदेश दिला आहे. काय आहे प्रकरण? लोकसभा निवडणुकीदरम्यान देवळाली प्रवरा जिल्हा परिषद शाळेत अवजड साहित्यासह कपाट हलवण्याचे काम सुरू होते. त्यावेळी विद्यार्थ्यांना हे कपाट हलवण्यास सांगण्यात … Read more

जिल्हाधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर! जामखेड येथील प्रगतशील शेतकऱ्याची या कारणांमुळे घेतली भेट!

जवळा : जामखेड तालुक्यातील चोंडी येथील प्रगतशील शेतकरी हरिभाऊ गणपत ढवळे यांच्या शेतीला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी भेट देत, कृषी योजनांच्या अंमलबजावणीचा थेट आढावा घेतला. यावेळी कर्जत उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी रवींद्र घुले, गटविकास अधिकारी शुभम जाधव, पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी अशोक शेळके तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते. हरिभाऊ … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात आई गमावली, दीड वर्ष लढा दिला, तरी वन विभागाने नुकसान भरपाई नाकारली

आढळगाव : बिबट्याच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या अजनूज (ता. श्रीगोंदा) येथील यमुनाबाई नानासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतरही निराशाच पदरी पडली आहे. वन विभागाने पंचनामा आणि शवविच्छेदन अहवालात वन्य प्राण्याच्या हल्ल्याची खात्री पटत नसल्याचे कारण देत नुकसानभरपाई नाकारली आहे. या निर्णयामुळे आपल्या आईला गमावलेल्या शिंदे कुटुंबीयांची वेदना अधिकच तीव्र झाली आहे. १ सप्टेंबर २०२३ रोजी … Read more

अहिल्यानगरमध्ये पोलिसांचा राहणार आता २४ तास पहारा, जिल्ह्यातील १२ महत्त्वाच्या चौकांमध्ये पोर्टेबल पोलिस चौक्या उभारणार

अहिल्यानगर- अहिल्यानगरमध्ये सतत घडणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा चोवीस तास पहारा असतो. मात्र, अद्यापही अनेक ठिकाणी या पोलिसांना योग्य निवाऱ्याची सोय नव्हती. अनेकदा त्यांना झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडखाली थांबावे लागते. यावर तोडगा म्हणून पोलिस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून, शहरासह जिल्ह्यातील १२ महत्त्वाच्या चौकांमध्ये पोर्टेबल पोलिस चौक्या उभारण्याचे ठरवले आहे. अहिल्यानगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात एकूण … Read more

काष्टी बाजार हलवण्याच्या निर्णयावरून वातावरण तापले, साजन पाचपुते यांनी दिला अतुल लोखंडेंना इशारा

काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील आठवडे बाजार राज्यभर प्रसिद्ध आहे. अनेक शतकांपासून हा बाजार भरत असून, त्यामागे गावातील नागरिकांचे मोठे योगदान आहे. मात्र, श्रीगोंदा बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी बाजार इतरत्र हलवण्याची भाषा केल्याने हा वाद चांगलाच पेटला आहे. बाजार हलवण्याचा विचार करणाऱ्यांनी प्रत्यक्ष तसे करून दाखवावे, असे खुले आव्हान काष्टीचे सरपंच आणि बाजार समितीचे … Read more

शनी अमावास्येला भक्तांनी शनी चरणी केले सव्वा कोटींचे दान, देवस्थानला बर्फी विक्रीतून मिळाले ४४ लाख रूपये

शनिशिंगणापूर- शनिवारी (२९ मार्च) शनी अमावास्या आणि शनिपालट योग एकाच दिवशी आल्याने राज्यभरातून लाखो भाविकांनी शनी दर्शनासाठी गर्दी केली. शनिदेवाला अभिषेक, पूजन आणि तेल अर्पण करताना भाविकांनी आपली श्रद्धा व्यक्त केली. भाविकांनी मोठ्या प्रमाणात दान देत शनी चरणी तब्बल १ कोटी २६ लाख ३१ हजार ६६२ रुपयांची रक्कम अर्पण केली. शनिवारी रात्रीपर्यंत झालेल्या दानाची देवस्थानतर्फे … Read more

शेतकऱ्यांना सुगीचे दिवस, ऐन सणासुदीत मोगऱ्याचा दर तब्बल ८०० रुपये किलो

केडगाव : सध्या सणासुदीचा हंगाम असल्यामुळे फुलांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. गुढीपाडवा, लग्नसराई आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर गुलाब, मोगरा, झेंडू आणि शेवंती यासारख्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अहिल्यानगर येथे गुलाब २०० रुपये किलो, तर मोगरा तब्बल ८०० रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या हंगामात चांगला लाभ मिळत आहे. … Read more

कर्जतच्या तुकाई उपसा सिंचन योजनेसाठी ७.५० कोटींचा निधी मंजूर, ५९९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

अहिल्यानगर : कर्जत तालुक्यातील तुकाई उपसा सिंचन योजनेसाठी ५९९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याच्या उद्देशाने ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून हा निधी वितरित करण्यात येणार असून, या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता होणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासनाने हा … Read more

बिबट्याच्या दहशतीतून होणार सुटका ! श्रीरामपूर-राहुरी परिसरात बिबट्या पकडण्यासाठी १३ पिंजरे मंजूर

श्रीरामपूर आणि राहुरी तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाने १३ नवे पिंजरे मंजूर केले आहेत, ज्यामुळे बिबट्यांच्या दहशतीपासून नागरिकांना दिलासा मिळण्याची आशा आहे. ही माहिती श्रीरामपूर-राहुरी मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांनी दिली आहे. या तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे शेतीचं नुकसान आणि हल्ल्यांच्या घटना वाढल्या असून, … Read more

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

शिर्डी, दि. २ – प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाचा पंचवार्षिक २०२५-३० साठीचा निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांनी जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार ९ मे २०२५ रोजी मतदान होणार असून १० मे रोजी मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाणार आहे. नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी शिर्डी यांचे … Read more

पालकांनो मुलाच्या करिअरची चिंता वाटतेय? तर मग ही चाचणी करून घ्या आणि मुलाचं करिअर सेट करा!

अहिल्यानगर: दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्या, निकाल लवकरच लागतील. या टप्प्यावर पालकांना मुलांच्या करिअरबाबत मोठी चिंता असते. “मुलाने कोणता अभ्यासक्रम निवडावा?”, “त्याचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे?”, “त्याची खरी क्षमता कशात आहे?” – असे अनेक प्रश्न त्यांना सतावत असतात. योग्य निर्णय घेण्यासाठी काही चाचण्या उपयुक्त ठरू शकतात. तज्ज्ञांच्या मते, योग्य चाचणी केल्यास मुलाच्या भविष्यासाठी योग्य दिशा निवडता येते. … Read more

अहिल्यानगरकर इकडे लक्ष द्या! 1 लाख रूपये कमवण्याची संधी, फक्त द्यावी लागेल ही माहिती

अहिल्यानगर – राज्यात गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात करणे कायद्याने गुन्हा असूनही, काही ठिकाणी हे प्रकार गुपचूप सुरू असल्याचे उघड झाले आहे. यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून कडक कारवाई केली जात आहे. सरकारने अशा अनधिकृत सोनोग्राफी केंद्रांबाबत माहिती देणाऱ्यांसाठी एक विशेष योजना आणली आहे. जर कोणी अशा बेकायदेशीर प्रकारांबद्दल माहिती दिली, तर त्याला १ लाख रुपयांचे … Read more

आमदारांचं असतंय परफेक्ट नियोजन, दिवसाला ५० कार्यक्रमांना अशाप्रकारे लावतात हजेरी!

अहिल्यानगर – ग्रामीण भाग असो की शहर, लग्न, वाढदिवस, साखरपुडा, बारसे, दुकान उद्घाटन असे विविध कार्यक्रम रोज ठरलेले असतात. या प्रत्येक कार्यक्रमाला आमदार आणि लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहावं, अशी जनतेची अपेक्षा असते. त्यामुळे दिवसभर धावपळ करत वेळेवर हजेरी लावण्याचं गणित आमदारांनी परफेक्ट जुळवलेलं असतं. यामुळेच त्यांची जनतेतली लोकप्रियता कायम राहते. आमदारांच्या स्वीय सहायकांशी संवाद साधला असता, … Read more