ठाणे आणि भिवंडीकरांसाठी महत्वाची बातमी ! आजपासून वाहतुकीतील बदल

Thane News : ठाणे-भिवंडी दरम्यान मेट्रोमार्गाचं काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) माध्यमातून जोमाने सुरू आहे. या अंतर्गत भिवंडीतील अंजूर चौक ते अंजूर फाटा या भागात लोखंडी खांबांवर गर्डर टाकण्याचं काम मंगळवारी, १ एप्रिल २०२५ पासून हाती घेण्यात आलं आहे. हे काम रात्रीच्या वेळी होणार असून, त्यासाठी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. मंगळवारी … Read more

अहिल्यानगरचे राजकीय वातावरण तापणार! थोरात आणि विखे साखर कारखान्यांची निवडणूक जाहीर

संगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ३ एप्रिलपासून सुरू होणार आहे. थोरात कारखान्यासाठी ११ मे तर विखे कारखान्यासाठी ९ मे रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील दोन दिग्गज नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी आमदार बाळासाहेब … Read more

पुढील वर्षी सर्व शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू होणार का? पालकांमध्ये संभ्रम, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम?

राज्यातील सर्वच शाळांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) अभ्यासक्रम लागू केला जाणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केल्यानंतर शिक्षण क्षेत्रासह पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व वर्गांसाठी हा अभ्यासक्रम लागू होणार का? असे अनेक प्रश्न पालक उपस्थित करत आहेत. शिक्षणतज्ज्ञ, पालक आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करताना विविध मुद्दे समोर आले. … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील MIDC ला ग्रामस्थांचा तीव्र विरोध, आमच्या काळ्या आईचा सौदा रद्द करा…

Ahmednagar News

अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील कोंभळी, खांडवी आणि रवळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी नियोजित एमआयडीसीला तीव्र विरोध दर्शवला आहे. सरकारने चुकीच्या पद्धतीने उताऱ्यांवर नोंद लावून शेतजमिनी अधिग्रहण करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याविरोधात शेतजमीन बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन छेडण्यात आले. कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीसाठी कोंभळी-थेरगाव आणि रवळगाव परिसरातील जमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली … Read more

शेतकरी झाले बांधावरूनच ऑनलाइन, घरबसल्या केले ४ कोटी ३५ लाख उताऱ्यांचे डिजिटल डाउनलोड

खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकऱ्यांची पीककर्जासाठीची धावपळ सुरू झाली आहे. पीककर्ज प्रक्रियेसाठी सातबारा, आठ-अ आणि फेरफार उताऱ्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. मात्र, या कागदपत्रांसाठी तलाठी कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज आता राहिलेली नाही. राज्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत डिजिटल स्वाक्षरीयुक्त उताऱ्यांचे ऑनलाइन डाउनलोड मोठ्या प्रमाणावर सुरू केले आहे. भूमिअभिलेख विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून मागील … Read more

नगरच्या कापड बाजारात पोलिस चौकीची मागणी, व्यापाऱ्यांचे पोलिस अधीक्षकांना निवेदन

अहिल्यानगर : कापड बाजारातील एका व्यापाऱ्याच्या मुलीला मारहाण झाल्याच्या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. या परिसरातील वाढत्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने कापड बाजारात स्वतंत्र पोलिस चौकी स्थापन करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. या मागणीसाठी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. … Read more

सभापती राम शिंदे यांनी खेचून आणलेल्या कर्जत तालुक्यातील एमआयडीसी अडचणीत ; स्थानिक शेतकऱ्यांनी दिला ‘हा’ इशारा

अहिल्यानगर: कर्जत – जामखेड तालुक्यातील एमआयडीसी सुरुवातीपासूनच कळीचा मुद्दा ठरलेली आहे. यावरून आमदार रोहित पवार व सभापती राम शिंदे यांच्यात चांगलीच रस्सीखेच सुरू होती. या दरम्यान शिंदे यांनी आपले राजकीय कसब वापरून ही एमआयडीसी जामखेड ऐवजी कर्जत तालुक्यातील कोंभळी-थेरगाव-रवळगाव या ठिकाणी उभारण्यास मंजुरी मिळवली. तसा सर्वे देखिल झाला. मात्र आता या भागातील स्थानिक शेतकरीच या … Read more

उशिराने जन्म व मृत्यू नोंदीसाठी केलेल्या अर्जांची एसआयटीकडून होणार चौकशी, बांगलादेशी घुसखोरी संशयामुळे सरकारचा निर्णय

अहिल्यानगर : राज्यात वाढत्या बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरीच्या तक्रारींमुळे सरकारने कठोर पावले उचलली आहेत. राज्यभरात उशिराने जन्म व मृत्यू नोंदीसाठी केलेल्या अर्जांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. परिणामी, पुढील आदेश येईपर्यंत राज्यातील सर्व जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रक्रिया थांबवण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत. गेल्या काही महिन्यांत विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर … Read more

जिल्हा न्यायालयाच्या द्विशताब्दी महोत्सवावरून वकिलांमध्ये वाद, ‘बार’ असोसिएशनने टाकला बहिष्कार

अहिल्यानगर : अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या द्विशताब्दी महोत्सवावरून वकिलांच्या दोन संघटनांमध्ये वाद उफाळला आहे. अहमदनगर बार असोसिएशनने मागील वर्षी महोत्सव साजरा केल्यानंतर, यंदा सेंट्रल बार असोसिएशनने स्वतंत्रपणे हा महोत्सव आयोजित केला आहे. मात्र, यावर अहमदनगर बार असोसिएशनने तीव्र नाराजी व्यक्त करत या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कोठारी यांनी या बहिष्काराला विरोध … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील गद्दारांना येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवू, उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांचा हल्लाबोल

केडगाव : उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी सोडले, पण तरीही ठाकरे गट मजबूत राहिला. मग नगर तालुक्यातील पाच लोकांनी गट सोडल्याने कोणताही फरक पडणार नाही. उलट आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अशा गद्दारांना जागा दाखवू, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केला. त्यांनी शिंदे गटात गेलेल्या … Read more

काळे-कोल्हे-विखे हे राजकीय शत्रू आता एकत्रित येणार ! नवं पण मोठं प्लॅनिंग, उत्तरेत राजकीय उलथापालथ

कोपरगाव येथे नुकताच एक कार्यक्रम पार पडला. कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव उपबाजार आवार मोर्विस (धामोरी फाटा) येथील जागेच्या भूमिपूजनाचा हा सोहळा होता. नववर्षांच्या अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशीच याचे भूमिपूजन झाले. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. परंतु हा सोहळा जरी भूमिपूजनाचा असला तरी काही महत्वाच्या घडामोडी घडल्यात. राजकीय शत्रू अर्थात … Read more

Ahilyanagar Politics : फडणवीसांची कृपा ! श्री गणेश कारखान्यास ७४ कोटी मंजूर, कोल्हेंचे अच्छे दिन सुरु?

सध्या माजीमंत्री थोरात आणि भाजपचे विवेक कोल्हे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्यासाठी एन.सी.डी.सी. अंतर्गत मार्जिन मनी लोन ७४ कोटी रुपये मंजूर झाले. हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून झाले आहे. या बद्दल माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वात श्री गणेश कारखाना संचालक मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र … Read more

संगमनेरच्या 50 लिटर दूध उत्पादन उपक्रमाने महाराष्ट्राच्या दूध उद्योगाला दिला नवा दिशा!

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूध संघाची स्थापना केली. 1980 नंतर आपण पुढाकार घेऊन तालुक्यात दूध व्यवसाय वाढविला. आज तालुक्यात 9 लाख लिटर दूध उत्पादन होत आगामी काळामध्ये कमी गाईंमध्ये जास्त दूध उत्पादन होण्याकरता राजहंस दूध संघाच्या वतीने 50 लिटर दूध उत्पादन करणाऱ्या क्षमतेच्या गाई निर्माण करण्याचा घेतलेला उपक्रम हा … Read more

AMC News : अहिल्यानगर महानगरपालिकेचे १०० कोटींहून अधिक कर वसुलीचे उद्दिष्ट ! आयुक्त स्पष्टच बोलले…

मागील आर्थिक वर्षात महानगरपालिकेची विक्रमी कर वसुली वर्षभरात ६१.१८ कोटींचा कर जमा; शास्तीमाफी योजनेत १७.१८ कोटी वसूल वसुलीच्या चांगल्या कामाबद्दल उपायुक्त, प्रभाग अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव नवीन वर्षात १०० कोटींहून अधिक वसुलीचे उद्दिष्ट : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे अहिल्यानगर – सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीची विक्रमी वसुली झाली आहे. वर्षभरात … Read more

शिर्डीत बनणार बॉम्बचं आवरण; सावळीविहीर खुर्दला १८० एकरामध्ये उभा राहणार प्रकल्प

शिर्डी- शिर्डीत डिफेन्स क्षेत्रात एक मोठं पाऊल पडलंय. इथे रणगाड्यांसाठी लागणाऱ्या बॉम्बचं आवरण म्हणजेच शेल फोर्जिंग तयार करण्याचा प्रकल्प सुरू झालाय. या प्रकल्पाचं भूमिपूजन खुद्द पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झालं. शिर्डी आता फक्त साईबाबांच्या दर्शनासाठीच नाही, तर देशाच्या संरक्षण क्षेत्रातही आपलं नाव कमवणार आहे. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेचा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील या गावाने केली शंभरटक्के कर्ज वसुली, १६ वर्षापासूनची परंपरा जोपासली!

अहिल्यानगर- जिल्ह्यातील हिवरे बाजार हे गाव आदर्श गाव म्हणून साऱ्या राज्यात प्रसिद्ध आहे. या गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने यंदाही मार्चअखेर शंभर टक्के कर्ज वसुली करून आपली परंपरा कायम ठेवली आहे. गेल्या सोळा वर्षांपासून ही कामगिरी सातत्याने सुरू असून, यंदाही गावाने हा मान मिळवला. सोसायटीच्या सर्व सभासदांनी मिळून तीन कोटी सहा लाख रुपये पीककर्जाची … Read more

अहिल्यानगर न्यायालयात खोटी साक्ष देणाऱ्याच्या आली अंगलट; गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश

अहिल्यानगर – न्यायालयात शपथेवर खोटी साक्ष देणाऱ्याला चांगलाच फटका बसलाय. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एल. एस. पाढेन यांनी अशा व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. अहिल्यानगरात एका मिळकतीच्या वादावरून अश्रू यादव नरोटे, नरेश विष्णुपंत कोडम आणि जयश्री नरेश कोडम यांच्यात दिवाणी न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्यात रूपेश प्रकाश कोडम याने नरेश विष्णुपंत … Read more

साई भक्तांसाठी शिर्डी विमानतळाचा होणार विस्तार! ५०० कोटी रूपये खर्च करून दोन वर्षात काम पूर्ण होणार!

शिर्डी – शिर्डी विमानतळाचा विस्तार ५०० कोटी रुपये खर्चून होणार आहे. हे विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवण्यात येणार असून, येथे चार ते पाच एरो ब्रिजची सोय असेल. २०२७ पर्यंत हे काम पूर्ण होईल, असा ठाम विश्वास माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलाय. गुढीपाडव्याच्या दिवशी शिर्डीत पहिलं नाईट लँडिंग झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. … Read more