शेतकऱ्यांची काळजी वाढवणारी बातमी; रब्बी पिकांना धोका अन्न धान्य साठवून ठेवा: गारपीट, भुकंप होण्याची शक्यता ?

अहिल्यानगर : यावर्षी मान्सून वेळेवर सुरु होईल, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान साधारण राहील. यावर्षी सहा भाग पाऊस नद्या व पर्वत असलेल्या भागात होईल तर उर्वरित चार भाग पाऊस भुभागावर पडेल, त्यामुळे अन्न धान्य साठवून ठेवा, असे भाकित कर्जत येथील श्री गोदड महाराज यांच्या संवत्सरीत वर्तविण्यात आले आहे. कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सद्गुरू गोदड महाराज … Read more

जगभरातील तब्बल ८५ पेक्षा जास्त देश चाखतात भारतातील ताज्या फळांची चव ;फळे निर्यातीत ‘हा’जिल्हा आहे आघाडीवर

अहिल्यानगर : भारतातील हवामान व नैसर्गिक अनुकुलतेमुळे भारतीय फळे व भाज्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भारताच्या फळांना असलेल्या अविट गोडीमुळेच आज जगभरातील तब्बल ८५ देश भारतातील ताज्या फळांची चव चाखत आहेत. यात महाराष्ट्रातील डाळिंबाचा देखील मोठा वाटा आहे. देशातल्या फळ निर्यातीमध्ये गेल्या ५ वर्षांत प्रचंड वाढ झाल्यानंतर, सरकार नवीन बाजारपेठा शोधत आहे. संयुक्त अरब … Read more

वृक्ष तोडीमुळे उत्पादनात घट मात्र यंदा गावरान आंब्याची गोडी चाखायला मिळणार

अहिल्यानगर : जिल्ह्यातील विविध भागात यंदा गावरान आंब्याला चांगला मोहोर आलेला आहे. परिणामी ठिकठिकाणी आता झाडांना कैऱ्या लागल्या आहेत. यंदा आंब्याचे उत्पादन चांगले मिळण्याची शक्यता असल्याने आंबा उत्पादकांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. चोखंदळ खवय्यांनाही यंदा गावरान आंब्याचा गोडवा चाखण्यास मिळणार आहे. ग्रामीण भागात अनेक शेतशिवारात आंब्याची मोठमोठी झाडे दिमाखात उभी आहेत. या झाडांना चांगल्या प्रमाणावर … Read more

‘श्रध्दा अन सबुरी’चा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत राजस्थानच्या माजी मंत्र्यालाच गंडवले ?

अहिल्यानगर : ‘श्रध्दा अन सबुरी’चा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत अनेकदा भाविकांची फसवणूक करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र आता ‘साईबाबा संस्थानचे सभासदत्व देतो,’ असे सांगून राजस्थान सरकारमधील माजी मंत्र्यालाच गंडवल्याचा प्रकार उघड झाला आहे जोगिंदरसिंग गिरवरसिंग अवाना (वय ५४, सध्या रा. नोएडा, जिल्हा गौतमबुद्ध नगर, दिल्ली) असे या माजी मंत्र्याचे नाव आहे . या प्रकरणी … Read more

राहूरी कृषी विद्यापीठामध्ये पडला बाॅम्ब, सुदैवाने कसलाही अनर्थ नाही, मात्र नेमके हे संपूर्ण प्रकरण काय आहे? वाचा सविस्तर

राहुरी- महात्मा फुले कृषी विद्यापीठात एक धक्कादायक घटना घडली. विद्यापीठाच्या वनशेती संशोधन प्रकल्पाच्या वरवंडी गटातल्या प्रक्षेत्रात एक जिवंत बॉम्ब सापडला. सुदैवाने बॉम्बचा नॅब उघडला गेला नव्हता, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पण ही घटना घडली तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. ही गोष्ट घडली नगर तालुक्यातल्या खारेकर्जुने गावात, जिथे कृषी विद्यापीठाची हद्द आहे. अचानक एक प्रचंड मोठा … Read more

अहिल्यानगरमधील श्रीरामनवमीची मिरवणूक या मार्गानेच निघणार, जर आडकाठी आणली तर शहर बंद पाडू, आमदार संग्राम जगतापांचा इशारा!

अहिल्यानगर- शहरात यंदाची श्रीरामनवमी मिरवणूक सकल हिंदू समाजाच्या वतीने काढली जाणार आहे. हा उत्सव आणि त्याची मिरवणूक म्हणजे शहरातल्या हिंदू समाजासाठी एक खास प्रसंग आहे. यावर्षी ही मिरवणूक नेहमीच्या जुन्या आणि पारंपरिक मार्गावरून, म्हणजेच आशा टॉकीज मार्गावरूनच निघणार आहे. पण जर प्रशासनानं यात काही अडथळे आणले किंवा कार्यकर्त्यांना त्रास दिला, तर अहिल्यानगर शहरात बंद पुकारू, … Read more

1500 स्क्वेअर फुटपर्यंत शास्तीकर माफ करा – आमदार सत्यजित तांबे

राज्यातील मध्यमवर्गीय आणि गोरगरीब नागरिकांना दिलासा देण्यासाठी 1500 स्क्वेअर फुटपर्यंतच्या घरांना शास्तीकर माफ करावा. शास्तीकरामुळे सर्वसामान्य नागरिकांवर वाढता आर्थिक बोजा पडत असून त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे. मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार तांबे म्हणाले की, अनेक कुटुंबे आपल्या कष्टाच्या पैशातून घर घेतात. … Read more

AMC News : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची नगररचना विभागासह सर्व विभागात झाडाझडती

AMC News : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागासह इतर विभागात आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी शुक्रवारी अचानक भेट देऊन झाडाझडती घेतली. यावेळी अनेक कर्मचारी जागेवर नसल्याने त्यांना आयुक्तांनी धारेवर धरत खडेबोल सुनावले. नगररचनासह इतर विभागात अनेक फायली, रेकॉर्ड अस्ताव्यस्त आढळून आले. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सर्व रेकॉर्ड येत्या आठवडाभरात व्यवस्थित लावण्याच्या, तसेच अनावश्यक … Read more

काष्टीचा जनावरांचा बाजार दुसरीकडे भरवला जाणार, सभापती अतुल लोखंडे यांचा थेट इशारा

श्रीगोंदा- तालुक्यातील काष्टी उपबाजाराची ओळख राज्यभरात आहे. या बाजारानं आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. पण काही स्थानिक पदाधिकारी आपल्या कृतींमुळे या बाजाराच्या नावाला काळिमा फासतायत, असा गंभीर आरोप श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी केलाय. जर हा त्रास असाच सुरू राहिला, तर काष्टीचा जनावरांचा बाजार दुसरीकडे हलवण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा थेट … Read more

अहिल्यानगरमधील महाराष्ट्र केसरी स्पर्धा पैलवानांनी गाजवली, उद्या होणार अंतिम सामना!

कर्जत- शहरात संत सद्‌गुरू गोदड महाराज क्रीडानगरीत बुधवारपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार सुरू झालाय. मागील काही वर्षांपासून कुस्तीप्रेमींसाठी ही स्पर्धा एक उत्सव बनली आहे. यंदाही मल्लांनी आपल्या कसलेल्या कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकलीत. बुधवार, २६ मार्चपासून कर्जतमधील दादा पाटील महाविद्यालयासमोरील मैदानात ६६ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आमदार रोहित … Read more

पारनेर तालुक्यातील १४ गावांना पाणी टंचाईच्या झळा, टँकरसाठी गावांचे मागणी अर्ज

पारनेर: उन्हाळा जवळ येताच पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार, सारोळा आडवाईसह १४ गावांना पाण्याच्या टंचाईचा त्रास भोगावा लागतोय. या गावांनी टंचाईचे प्रस्ताव सादर करताच गटविकास अधिकारी दयानंद पवार यांनी प्रत्यक्ष जाऊन उद्भवांची पाहणी केली. त्यांनी शासनाकडे तातडीनं अहवाल पाठवला आहे. तहसील आणि पंचायत समितीकडे टँकरची मागणी करणारे अर्जही दाखल झालेत. पारनेर तालुक्यातील अनेक गावांत पाणी पुरवठा … Read more

आधी घरावर पडत होते अचानक दगड, सीसीटीव्ही बसवताच दगड थांबली अन घडू लागला भलताच प्रकार ; संपूर्ण कुटुंबच नव्हे तर ग्रामस्थ देखील झालेत हैराण !

अहिल्यानगर : सध्या जिल्ह्यात रात्री तसेच दिवसा देखील चोरीच्या घटना घडत आहेत . त्यामुळे नागरिक चांगलेच भयभीत झालेले आहेत. मात्र आता जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर या गावात अत्यंत विचीत्र प्रकार घडत आहे. यामुळे ते कुटुंबच नव्हे तर आसपासचे शेजारी तसेच पोलीस देखील या अनोख्या प्रकाराने चक्रावून गेले आहेत. पाहूया नेमका काय प्रकार घडत आहे, श्रीरामपूर … Read more

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यातील सर्वच शाळा भरणार सकाळच्या सत्रात, असा असणार आहे वेळ? वाचा सविस्तर!

राज्यात सध्या उन्हाचा कहर वाढलाय. या उष्णतेच्या लाटेने सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत केलं असताना, विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेऊन सरकारने मोठा निर्णय घेतलाय. राज्यातील सर्व शाळा, मग त्या कोणत्याही व्यवस्थापनाखाली असल्या तरी, आता सकाळच्या सत्रातच चालणार आहेत. शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी (माध्यमिक व उच्च माध्यमिक) आणि शिक्षण संचालक शरद गोसावी (प्राथमिक) … Read more

अहिल्यानगरसह ‘या’ तालुक्याच्या सीमा पेटल्या ! मोठी वनसंपदा नष्ट: राहुरी तालुक्यातील संपूर्ण डोंगर खाक

अहिल्यानगर, राहुरी व नेवासा तालुक्याची सीमा इमामपूर घाट परिसरात आहे. या सीमेवर मोठी वनसंपदा पहावयास मिळते. खोसपुरी, गुंजाळे, इमामपूर, पांढरीपुल या हद्दीतील वनसंपदेला गुरुवारी लागलेल्या वणव्यात मोठी हानी पोहोचली आहे. आर्मीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले आहे तर वन विभागाच्या क्षेत्रालाही मोठी हानी बसल्याचे पहावयास मिळाले. दिवसभर वणवा भडकत होता. रात्री उशिरापर्यंत वणव्याने रौद्ररूप … Read more

Ahilyanagar News : ना वाहन क्रमांक, ना डेपोचे नाव तरीही लालपरी सुसाट ! परिवहन महामंडळाकडूनच नियम धाब्यावर

वाहतुकीसंदर्भात अनेक नियम बनवलेले आहेत. सर्वांनाच हे नियम सारखे आहेत. असे असताना राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडूनच हे नियम धाब्यावर बसविल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. असच काहीस दृश्य अहिल्यानगर शहरात पाहावयास मिळाले. एसटी बसच्या पाठीमागील बाजूस वाहन क्रमांक नाही, सदर बस कोणत्या डेपोची आहे, याचाही उल्लेख नाही. तरीही ही लालपरी सुसाट रस्त्यावर धावताना दिसली. सर्वसामान्यांचा प्रवासाचा … Read more

Ahilyanagar News : तहसीलदारांच्या निलंबनानंतर अहिल्यानगरमध्ये पुन्हा मोठी कारवाई ! ‘तो’ मोठा अधिकारी लाच घेताना ताब्यात

श्रीगोंदा : श्रीगोंद्यांचे दुय्यम निबंधक सचिन खताळ लाचलुचपतच्या जाळ्यात रंगेहात सापडले आहेत.पंधरा हजार रुपयांची मागणी करत तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना त्यांना पकडले आहे. तक्रारदार हे खरेदी विक्री व्यवसाय करत असल्याने त्यांची दुय्यम निबंधक कार्यालयात नियमित दस्त नोंदणी होत असते. त्यांच्याकडे दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणीसाठी पाच हजार व मागील दस्त नोंदणीची बाकी … Read more

संगमनेर खुर्द वि. का.सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड

संगमनेर तालुक्यात राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या संगमनेर खु वि.का. सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध झाली आहे. माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या सेवा सोसायटीने कायम सभासद व कर्जदारांचे हित जोपासत आर्थिक दृष्ट्या चांगली प्रगती साधली आहे. आणि आता या सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची … Read more

चंदनापुरी मध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत महानुभव सत्संग सोहळा सुरू

संगमनेर (प्रतिनिधी)– हजारो अनुयायांची उपस्थिती, शिस्तबद्ध वातावरण, पारंपारिक वाद्यांचा गजर, पुष्पवृष्टी, तसेच विद्यार्थ्यांच्या झांजरी पथकासमवेत झालेल्या मिरवणुकीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या महानुभव पंथातील सत्संगात श्रद्धेय परमपूज्य मोठे बाबा यांची भव्य मिरवणूक संपन्न झाली असून या मिरवणुकीचे स्वागत लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले. हा सत्संग सोहळा अध्यात्मिक ऊर्जा देणारा असल्याचे प्रतिपादन यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात … Read more