पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! 12 एप्रिलपासून ‘या’ रेल्वे गाड्या रुळावर धावणार नाहीत, कारण काय ?

Pune Railway News : मार्च महिना आता संपण्यात जमा आहे, लवकरच एप्रिल महिन्याला सुरुवात होणार आहे आणि त्याबरोबरच उन्हाळी सुट्ट्या देखील स्टार्ट होतील. असे असतानाच मात्र पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. पुढल्या महिन्यात अर्थातच एप्रिलमध्ये पुण्याहून कोलकाता कडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या काही काळ बंद राहणार आहेत. 12 एप्रिल पासून काही गाड्या … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ‘त्या’ दोन रस्त्यांची नावे बदलणार ! एकाचे नाव गोपीनाथ मुंडे मार्ग तर दुसऱ्याला….

अहिल्यानगर शहरातील दोन रस्त्यांचे नामकरण होणार आहे. यातील एकाला लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे मार्ग तर दुसऱ्याला स्व. रुक्मिणीबाई काळे आज्जी मार्ग असे नाव देण्यात येणार आहे. हे दोन्ही रस्ते अहिल्यानगर महापालिका हद्दीतील आहेत. प्रभाग २ मधील निर्मलनगर भागातील डॉ. पाऊलबुद्धे शाळा ते मुळे एसटीडी पर्यंतच्या मुख्य रस्त्याचे लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे मार्ग व निर्मलनगर परिसरातील … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘त्या’ रिंगरोड संदर्भात खासदार नीलेश लंके थेट नितीन गडकरी यांच्या भेटीला…

अहिल्यानगर : अरणगांव, ता. नगर हद्दीमधून गेलेल्या चारपदरी रिंगरोडची पूरक कामे मार्गी लाऊन अरणगांव व परिसरातील रहिवासी, शेतकरी, कामगार, विद्यार्थी यांच्या दैनंदिन दळणवळणामध्ये येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात तसेच वेळप्रसंगी होणारे अपघात टाळावेत अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्लीत भेट घेऊन केली. याच पूरक कामांसंदर्भात आपण दि.२२ जुलै रोजी आपणास पत्र … Read more

Ahilyanagar News : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध; राहुरी तालुक्यात कडकडीत बंद

काल (दि.२६) अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी घटना घडली. राहुरी शहरातील बुवासिंध बाबा तालिममधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची अज्ञात समाजकंटकाने विटंबना केली होती. या घटनेनंतर राहुरी तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. संतप्त शिवप्रेमींनी तालुका बंदची हाक दिली होती. तालुक्यात आज (दि.२७) कडकडीत बंद पाळण्यात आला. देवळाली प्रवरा येथे यात्रा उत्सव असल्याने दुपार पर्यंत बंद … Read more

अहिल्यानगर महानगरपालिकेत लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार आणि कोर्टाच्या आदेशानुसार २० कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान

अहिल्यानगर : महानगरपालिकेमध्ये लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार सफाई कामगार वारस हक्काची अंमलबजावणी व्हावी यासाठी युनियन च्या माध्यमातून पाठपुरावा केला असल्यामुळे त्याला यश आले आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असून कर्मचाऱ्यांनी देखील चांगले काम करून संस्थेचा नावलौकिक वाढावा. महापालिका प्रशासनाने देखील उत्पादनाची साधने शोधून आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पावले उचलावीत. महापालिका संस्था ही कर्मचाऱ्यांची असून … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित म्हशींच्या बाजाराला झाली सुरूवात

शिर्डी :सर्वसामान्य शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम कृषी उत्पन्न बाजार समिती करत आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सुरू झालेल्या प्रत्येक योजनेची अंमलबजावणी बाजार समितीला राज्यात वेगळं स्थान मिळवून देत आहे. नव्याने सुरू झालेल्या म्हैस बाजारामुळे परिसरातील म्हैस पालक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असं माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनी सांगितलं. … Read more

अहिल्यानगरात अतुल शहा यांचं मार्गदर्शन, शुध्द शाकाहार घेतल्यास आजारही आपल्यापासून दूर राहतात!

अहिल्यानगर – निसर्गाच्या जवळ राहून जर आपण शुध्द शाकाहारी आहार घेतला, तर कोणताही आजार आपल्या आसपासही फिरकणार नाही, असं मुंबईचे अतुल शहा यांनी आपल्या अनुभवातून सांगितलं. त्यांच्या या व्याख्यानाने उपस्थितांना निरोगी जीवन आणि रोगमुक्तीचा एक नवा दृष्टिकोन दिला आणि सगळेच मंत्रमुग्ध झाले. राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदऋषिजी महाराज यांच्या ३३ व्या पुण्यस्मृतीदिन आणि १२५ व्या जन्मोत्सवानिमित्त … Read more

आठवडे बाजारावर व्यापाऱ्यांच्या कब्जा, पिकवणारा शेतकरी उपाशी तर विकणारा व्यापारी मात्र तुपाशी!

ग्रामीण भागातले छोटे शेतकरी आपल्या शेतात काही गुंठ्यांवर भाजीपाला पिकवतात आणि तो आठवडे बाजारात विकायला आणतात. पण आजकाल हे आठवडे बाजार व्यापाऱ्यांनी ताब्यात घेतलेत. बाजारातल्या जागांवर त्यांचा कब्जा आहे, आणि शेतकऱ्यांना आपला माल विकायला जागाच मिळत नाही. शेतकऱ्यांनी जागेसाठी प्रयत्न केला, तर त्यांना दमदाटीचा सामना करावा लागतो. त्यामुळे जो शेतकरी माल पिकवतो, तोच उपाशी राहतो, … Read more

अहिल्यानगरमधील अमरधाम स्मशानभूमीचा अडीच एकरमध्ये होणार विस्तार, ७ कोटी ३४ लाखांचा निधी मंजूर

अहिल्यानगर- अहिल्यानगरातली अमरधाम स्मशानभूमी आता नव्या रूपात बहरणार आहे. तब्बल ६८ वर्षांनंतर या स्मशानभूमीचा अडीच एकरात विस्तार होणार असून, त्याचं नूतनीकरण आणि सुशोभीकरणही होणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून जिल्हास्तर सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी महापालिकेला ७ कोटी ३४ लाखांचा निधी मंजूर केलाय. आमदार संग्राम जगताप यांनी यासाठी खूप प्रयत्न केले, … Read more

श्रीगोंद्याच्या तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना केले निलंबित! नेमके संपूर्ण प्रकरण काय आहे? वाचा सविस्तर!

श्रीगोंदा – तालुक्यात एक मोठं प्रकरण समोर आलं आहे, जिथे द कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राइस्ट वेस्टर्न इंडिया या संस्थेची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे विकली गेली. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून, यात थेट तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. ही जमीन विक्री सहज व्हावी म्हणून तहसीलदारांकडून मालकी हक्क बदलण्याची परवानगी घेण्यात … Read more

बेकायदेशीररित्या झाडे तोडत असाल तर प्रत्येक झाडामागे भरावा लागणार १ लाख रूपयांचा दंड! सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आलीये. झाडांची कत्तल हा माणसाच्या हत्येपेक्षाही भयंकर गुन्हा आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने ठणकावून सांगितलंय. बेकायदा कापलेल्या प्रत्येक झाडासाठी एक लाख रुपये दंड भरावा लागेल, असा कडक आदेशही न्यायालयाने दिलाय. पर्यावरणाच्या बाबतीत आता कोणतीही नरमाई चालणार नाही, हे स्पष्ट झालंय. हा निर्णय ताज ट्रेपेजियम झोनमध्ये ४५४ झाडं कापल्याच्या प्रकरणात आला. … Read more

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार? संपूर्ण माहिती वाचा सविस्तर

राज्याच्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे! एक रुपयाच्या जुन्या पीक विमा योजनेतले गैरप्रकार लक्षात आल्यावर आता सरकार नवीन, सुटसुटीत आणि विश्वासार्ह पीक विमा योजना आणणार आहे. याबरोबरच ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळेल, असं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी विधानसभेत जाहीर केलं. एवढंच नाही, तर तृणधान्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी मिलेट बोर्डची स्थापना आणि शेतीत पाच हजार … Read more

अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा रंगला महाराष्ट्र केसरीचा थरार, शरद पवारांच्या उपस्थितीत होणार अंतिम सामना

कर्जत- शहरात बुधवारपासून ६६ व्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी कुस्ती स्पर्धा सुरू झाली आहे. संत सदगुरू गोदड महाराज क्रीडानगरीत राज्यभरातले नामवंत पैलवान दाखल झालेत. संध्याकाळी कुस्तीप्रेमी आणि कुस्तीगीर परिषदेच्या बड्या मंडळींनी हातात फुलं घेऊन आखाड्याचं पूजन केलं आणि स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ५७, ६५ आणि ७४ किलो वजनी गटातल्या चित्तथरारक कुस्त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. ही … Read more

अहिल्यानगरमध्ये बनावट शिक्के तयार करून ‘सीए’लाच घातला १६ लाखांचा गंडा

अहिल्यानगर- अहिल्यानगरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. बनावट शिक्के तयार करून एका चार्टर्ड अकाउंटंटची तब्बल १६ लाखांची फसवणूक झालीये. इन्कम टॅक्स आणि जीएसटीच्या परताव्याच्या नावाखाली ही रक्कम लंपास केली गेली. हा सगळा घोटाळा २०२१ ते २०२३ दरम्यान घडला. अखेर मंगळवारी याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला गेलाय. या प्रकरणात सचिन अप्पासाहेब दाभाडे (वय २९, … Read more

अहिल्यानगरमध्ये ८ वर्षांपासून गुंडागर्दी, डझनभर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असणाऱ्या आकाला अखेर पोलिसांनी केले जेरबंद

अहिल्यानगर- गुन्हेगारांना पकडायचं तर पोलिस काही मागेपुढे पाहत नाहीत, लगेच अटक होते आणि तुरुंगात डांबलं जातं. पण विजय पठारे नावाचा एक माणूस याला अपवाद होता. डझनभर गंभीर गुन्हे डोक्यावर असूनही हा माणूस गेल्या आठ वर्षांपासून शहरात गुंडागर्दी करत मोकाट फिरत होता. अखेर मंगळवारी रात्री तोफखाना पोलिसांनी त्याला एमपीडीए कायद्याखाली जेरबंद केलं आणि नाशिकच्या तुरुंगात पाठवलं. … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ३२ हजार आजी-आजोबांनी शाळेत जाऊन दिली परीक्षा, आता निकालाची प्रतिक्षा

अहिल्यानगर: इथल्या गावागावांतून निरक्षरांना साक्षर करायचं स्वप्न उल्लास नवसाक्षरता अभियानाने प्रत्यक्षात आणलंय. रविवारी (दि. २३) जिल्ह्यातील ३२ हजार ४९७ आजी-आजोबांनी शाळेत जाऊन परीक्षा दिली. आता आठवडाभरात त्यांचा निकाल लागणार आहे, आणि मग प्रमाणपत्रंही मिळणार आहेत. गावातला हा उत्साह पाहण्यासारखा होता. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या पुढाकाराने हे … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव लाखोंची वाहने मिळणार कमी किमतीत

शेवगाव तालुक्यात गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तहसील कार्यालयाने कठोर कारवाई केली आहे. या कारवाईत पकडण्यात आलेली काही वाहने तहसील कार्यालयात आणली गेली होती. मात्र, या वाहनांच्या मालकांनी दंड भरून वाहने नेण्यास टाळाटाळ केल्याने, आता ही पाच वाहने जाहीर लिलावाद्वारे विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा लिलाव बुधवार, २६ मार्च २०२५ रोजी … Read more

माव्यानंतर आता नशिली पानं अहिल्यानगर जिल्ह्यातील ह्या तरुणाईला लागलं नवं व्यसन!

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या पान टपऱ्यांभोवती तरुणांची गर्दी वाढताना दिसत आहे. गुटखा बंदीनंतर माव्याकडे वळलेली तरुणाई आता पानाच्या नशेकडे आकर्षित झाली आहे. ठराविक वेळेला या टपऱ्यांवर तरुणांचा गराडा पडतो, जे विशिष्ट प्रकारच्या पानांसाठी येतात.या पानांमध्ये नशायुक्त घटकांचा समावेश असल्याने त्याची सवय जडत असल्याचे दिसून येते. ही बाब समाजासाठी आणि तरुणांच्या … Read more