मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ! बिबट्या पिंजऱ्यात अडकला, त्याचे तीन साथीदार बिबटे आले आणि दरवाजा तोडून त्याला बाहेर काढून फरार झाले, अहिल्यानगरमधील थरार

अहिल्यानगरमधील एक गाव.. गावात एक दोन नव्हे चार चार बिबटे.. गावात सगळीकडे दहशत.. वनविभागाने पिंजरा लावला.. त्यात एक बिबट्या अडकला.. गावकरी व वनविभागाचे अधिकारी आले.. तेथे गावकऱ्यांनी इतरही बिबटे जेरबंद करा म्हणत वाद घालायला सुरवात केली.. तितक्यात त्या बिबट्याचे इतर तीन साथीदार बिबटे आले.. त्यांनी पिंजऱ्याला धडाका मारून मारून पिंजऱ्याच्या दरवाजाचे लॉक वाकून टाकले… आतला … Read more

अबब ! गवार १३६ रुपये, भेंडी, मिरची ५० रुपये किलो; तर टरबूज, मेथी पालक फक्त ४ रुपयांना

मार्केटमध्ये सध्या भाजीपाल्याच्या दरात मोठी चढ उतार पाहायला मिळत आहे. काही भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले आहेत. तर काही भाजीपाल्याचे , फळांचे दर फार कमी झाले आहेत. यात गवार सध्या १३६ रुपये किलोपर्यंत गेली आहे. भेंडी, हिरवी मरीची ५० रुपयांपर्यंत गेली आहे. टरबूज, खरबूज, मेथी, पालक मात्र अत्यंत उतरले असून भाव ४ ते पाच रुपयांपर्यंत आले … Read more

Ahilyanagar News : ट्रक पलटी, दुचाकीवरून जाणार कुटुंब चेंगारल, आई ठार तर वडील व मुलगा गंभीर

नाशिकहून पुण्याकडे प्लायवूड घेऊन भरधाव वेगाने जाणारा मालट्रक संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात पलटी झाला. या ट्रकखाली दुचाकीवरून जाणार कुटुंब दबले गेले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा पती आणि मुलगा गंभीर जखमी झाले. पुणे-नाशिक बाह्यवळण राष्ट्रीय मार्गावर गुंजाळवाडी शिवारात पुलाच्या रुंदीकरणाचे काम चालू आहे. त्यामुळे दोन्ही बाजुची वाहतूक सर्व्हिस रस्त्याने वळवलेली आहे. नाशिकहून पुण्याकडे … Read more

कर्जतमध्ये पाणीटंचाईचा धोका ! ‘अवैध पाणी उपसा’ केल्यास थेट गुन्हा

कर्जत तालुक्यात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन तहसीलदार गुरू बिराजदार यांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने अनेक ठिकाणी जलस्रोतांची पातळी खालावली असून, ग्रामपंचायत हद्दीतील साठवण तलावांचे पाणी जून २०२५ पर्यंत पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या तलावांमधून अवैध आणि अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला असून, यासाठी … Read more

पाणी हक्कासाठी संघर्ष! ग्रामस्थांनी थांबवलं निळवंडे कालव्याचं काँक्रिटीकरण

संगमनेर: निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम धांदरफळ खुर्द आणि गोडसेवाडी (ता. संगमनेर) येथे सुरू होते. मात्र, बुधवारी (१९ मार्च २०२५) स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन हे काम बंद पाडले. पोटचारी पूर्ण होईपर्यंत लाभक्षेत्रात काँक्रिटीकरण करू नये, कालव्यामुळे बंद झालेले ओढे आणि रस्ते पुन्हा खुले करावेत, तसेच ओढ्यांना पाणी मिळण्यासाठी व्हॉल्व्ह बसवावेत, अशा मागण्या ग्रामस्थांनी … Read more

Onion Price : मागील वर्षापेक्षा कांद्याला चांगले दर: मार्चमध्ये टिकून, पण निर्यात शुल्कामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

Onion Price : श्रीरामपूर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये यंदा मार्च २०२५ मध्ये कांद्याला मागील वर्षाच्या तुलनेत चांगले दर मिळत आहेत. सध्या कांद्याचे दर प्रतिक्विंटल १६०० ते १८०० रुपये असून, शेतकऱ्यांना या दरामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. तज्ज्ञांच्या मते, केंद्र सरकारने सध्याचे २० टक्के निर्यात शुल्क हटवल्यास दर २,००० रुपये क्विंटलपर्यंत जाऊ शकतात. मात्र, यंदा कांदा लागवडीला … Read more

शिर्डी विमानतळावर रात्रीही उतरतील विमानं ! आता रात्री येता येणार शिर्डीत, पहाटेची आरती गाठणं सोपं

राहाता: शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली नाईट लँडिंग सेवा अखेर सुरू होत आहे. येत्या ३० मार्च २०२५ पासून ही सेवा कार्यान्वित होणार असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे. पहिल्या टप्प्यात हैदराबाद-शिर्डी विमान रात्री ९:३० वाजता शिर्डी विमानतळावर उतरणार असून, ९:५० वाजता पुन्हा उड्डाण घेणार आहे. आतापर्यंत नाईट लँडिंगच्या केवळ चर्चा होत होत्या, पण … Read more

जिवंत सातबारा मोहीम आणि अहिल्यानगरच कनेक्शन ! शेवगावचा सुपुत्र, राज्यात हिरो

शेवगाव: शेवगाव तालुक्यातील मूळ रहिवासी आणि सध्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले संतोष काकडे यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सुरू केलेली ‘जिवंत सातबारा’ मोहीम आता राज्यभर राबवली जाणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाला यासंबंधी शासकीय आदेश प्राप्त झाले आहेत. या मोहिमेमुळे शेतकऱ्यांच्या वारसांना होणारी ससेहोलपट संपुष्टात येण्यास मदत होणार असून, राज्यातील … Read more

अशोक गायकवाडांचा थेट अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

अहिल्यानगर: जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, मुळा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आणि आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली झाला. या प्रसंगी … Read more

तंत्रज्ञानाची साथ अन मेहनतीच्या जोरावर तरुण शेतकऱ्याने अवघ्या दहा गुंठ्यात कमावले दहा लाखांचे उत्पादन!

अहिल्यानगर: सध्या शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नाही, मजुरी खूप वाढली आहे, मालाला भाव मिळत नाही त्यामुळे शेती परडवत नाही. यामुळे बहुतेकजण शेती करणे नको रे बाबा असे म्हणत शेतीकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. एकीकडे शेतीपासून शेतकरी दूर पळताना दिसत असताना दुसरीकडे मात्र दुष्काळी असलेल्या जामखेड तालुक्यातील एका तरूण शेतकऱ्याने शेतीत नवीन प्रयोग करत अवघ्या दहा … Read more

माथेरानमध्ये गाड्यांना ‘नो एंट्री’! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

कर्जत तालुक्यातील माथेरान शहरातील विविध प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयात १६ ते १९ मार्च २०२५ दरम्यान सलग सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, माथेरान कोणत्याही परिस्थितीत मोटार वाहनांसाठी खुले होणार नाही. माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आणि मोटारमुक्त हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते, आणि ही ओळख कायम ठेवण्यासाठी न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर, … Read more

हिर्‍यांचे दिवस संपले ? दागिन्यांचा बाजार ठप्प ! फेब्रुवारीत तब्बल २१ हजार कोटींची घसरण

मुंबई: भारताच्या रत्ने आणि दागिने क्षेत्राला फेब्रुवारी २०२५ मध्ये मोठा फटका बसला आहे. अमेरिका आणि चीनमधील मागणीत सातत्याने घट झाल्यामुळे या महिन्यात रत्ने आणि दागिन्यांची निर्यात गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत २३.४९ टक्क्यांनी कमी झाली आहे. रत्ने आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या (GJEPC) आकडेवारीनुसार, फेब्रुवारी २०२५ मध्ये निर्यात २,४२२.९ दशलक्ष डॉलर्स (२१,०८५.०३ कोटी रुपये) इतकी झाली, … Read more

भोंग्यावर टीका केल्याची शिक्षा ? अहिल्यानगर जिल्ह्यातील पत्रकाराला घरासमोरच जबर मारहाण

श्रीरामपूर शहरातील मिल्लतनगर परिसरात १९ मार्च २०२५ रोजी एका वरिष्ठ पत्रकारावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्याकडून रोकड आणि सोन्याची चैन हिसकावण्यात आली आहे. हल्ल्यामागचे कारण शांतता कमिटीच्या बैठकीत मशिदीवरील भोंग्याच्या आवाजावर केलेली टीका असल्याचे समोर आले आहे. या घटनेने पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत … Read more

‘अब इसको जिंदा नही छोडेंगे’ असे म्हणत तरुणाच्या डोक्यात केले कोयत्याने अन चोपरने वार

अहिल्यानगर : तू खूप माजला आहेस, आमच्याकडे रागाने का पाहतोस, आम्हाला ओळखत नाहीस काय, असे म्हणून शिवीगाळ करून चौघांनी एकास लाथाबुक्क्यांनी व लाकडी काठीने मारहाण करुन लोखंडी कोयता, चॉपरने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना क्लेरा ब्रूस बॉईज होस्टेलच्या समोरील रोडवर १९ मार्च रोजी मध्यरात्री घडली. याबाबत अलजैद रहीम शेख (वय २२,रा. … Read more

रात्री महामार्गावर वाहनचालकाला मारहाण करत लुटले अन भल्या पहाटेच पोलिसांनी उचलले

अहिल्यानगर : नगर पुणे महामार्गावर नगर तालुक्यातील चास गावाच्या शिवारात रात्रीच्या वेळी वाहनचालकाला रस्त्यात अडवून मारहाण करत लुटल्याची घटना दि. १९ मार्चला रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत केडगाव येथील तीन आरोपींना पहाटेच्या सुमारास पकडले आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. याबाबत तौफिक शरीफ … Read more

कोपरगावच्या विजेचा प्रश्न मार्गी! २.६८ कोटींचा निधी मंजूर; शेतकऱ्यांना दिलासा

कोपरगाव मतदारसंघातील शेतकरी आणि नागरिकांच्या मागणीनुसार वीजपुरवठा सुधारण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक विकास निधीअंतर्गत २.६८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, त्याअंतर्गत नवीन वीज रोहित्र बसविणे, वीज वाहिन्यांचे स्थलांतर, तसेच नवीन पोल टाकण्याची कामे केली जाणार आहेत. या निर्णयामुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली. … Read more

Ahilyanagar Crime : पूर्ण कुटुंबास जेसीबी खाली चिरडून टाकण्याची धमकी !

अहिल्यानगर तालुक्यातील कौडगाव येथे शेतजमिनीवरील ताबेमारीच्या वादातून एका कुटुंबाला जीवघेणी धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संशयित आरोपींनी दोघांना जातीवाचक शिवीगाळ करत संपूर्ण कुटुंबाला जेसीबीखाली घालून संपवण्याची धमकी दिली. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विक्रम भाऊसाहेब पाटोळे (वय ३८, रा. कौडगाव, ता. नगर) यांनी … Read more

सिंधुदुर्गकरांसाठी खुशखबर ! बंद पडलेली Mumbai Sindhudurg विमानसेवा पुन्हा सुरू होणार – कधी होणार पहिलं उड्डाण?

Sindhudurga News : सिंधुदुर्गकरांसाठी आनंदाची बातमी आहे, परुळे-चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावरून मुंबईसाठी पुन्हा एकदा नियमित विमान सेवा सुरू होणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी यासंदर्भात खासदार नारायण राणे यांना सकारात्मक आश्वासन दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही सेवा बंद होती, त्यामुळे प्रवाशांना आणि पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला होता. सिंधुदुर्ग … Read more