पोलीस अधीक्षकांकडून माहिती ; शनी शिंगणापूर बनावट ऍप प्रकरण दोन कर्मचाऱ्यांच्या नावावर एक कोटी रुपये जमा

अहिल्यानगर : शनैश्वर देवस्थानशी संबंधित बनावट ऍप प्रकरणात चौकशीतून आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. या ऍपच्या माध्यमातून भाविकांची फसवणूक करून तब्बल एक कोटी रुपयांची रक्कम शनैश्वर संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा करण्यात आल्याचा मोठा खुलासा जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत केला. विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःहूनच शनिशिंगणापूर (ता. … Read more

राज्यस्तरीय जलतरण व पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत अहिल्यानगरच्या दिव्यांग खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी

शिर्डी- स्पेशल ऑलिंपिक भारत या संघटनेच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने पुणे येथील बालकल्याण संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय जलतरण व पॉवर लिफ्टिंग निवड चाचणी स्पर्धेत राज्यभरातील दिव्यांग खेळाडूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. अहिल्यानगर येथील शाखेच्या पाच खेळाडूंनी यामध्ये सहभाग नोंदवत दोन खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. स्विमिंग स्पर्धेत बाबू … Read more

बालसंगोपन योजनेचा दोन ते तीन वर्षांपासून निधी रखडला, साऊ एकल महिला समितीने दिला उपोषण करण्याचा इशारा

श्रीरामपूर- विविध कारणामुळे आई किंवा वडील अथवा दोन्ही पालक गमावलेल्या लेकरांच्या शिक्षण व संगोपनासाठी असलेल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेला दोन ते तीन वर्षांपासून पुरेसा निधी नाही. त्यामुळे येत्या क्रांती दिनी ९ ऑगस्टला लाभार्थी लेकरांसह पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तालयासमोर उपोषण करण्याची तयारी राज्यातील एकल महिलांनी सुरू केली आहे. साऊ एकल महिला समितीचे … Read more

कोपरगाव शहरातील बसस्थानकाचे स्व.बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गंत करण्यात आली पाहणी

कोपरगाव- स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत येथील बस स्थानकाचे परीक्षण राज्य परिवहन महामंडळाचे नागपूर प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभणे, वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी आदमाने, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड, महेश देशपांडे यांनी नुकतेच केले. अहिल्यानगर जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या सहा अ वर्ग बसस्थानकांचे परीक्षण सोमवारपासून सुरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात कोपरगाव, श्रीरामपूर, नाशिक येथील बस … Read more

थोरांताचे फ्लेक्स फाडणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा, शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पोलिसांना निवेदन

संगमनेर- लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी मागील ४० वर्ष अथक प्रयत्नातून संगमनेर तालुका वैभवशाली बनविला. तालुक्याचा लौकिक राज्यात वाढवला. मात्र, काही लोक आता तालुक्याची संस्कृती मोडू पाहत आहे. त्यामुळे फ्लेक्स फाडणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी येथील शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काल मंगळवारी पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात … Read more

गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या साई व शनी भक्तांची मोठी संख्या, गुजरात-महाराष्ट्र रेल्वे गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी

सुपा- गुजरात श्रमजीवी कामगार युनियनचे प्रमुख कामगार नेते कल्याणशेठ शहाणे यांनी गुजरात ते महाराष्ट्र प्रवासादरम्यान रेल्वे गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, अहमदाबाद ते वडोदरा, अंकलेश्वर, सुरत, महाराष्ट्रालील नंदुरबार मार्गे अमळनेर, जळगाव, मनमाड ते अहमदनगर ते कर्नाटकातील यशवंतपूर पर्यंत आठवडयातून यशवंतपूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही … Read more

कोरडगाव परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट, कोरडगाव येथे पोलीस चौकीस मंजूरी देण्याची मागणी

पाथर्डी- कोरडगाव येथे पोलीस चौकीस मंजुरी द्यावी, अशी मागणी कोरडगावचे सरपंच रवींद्र उर्फ भोरूशेठ म्हस्के व परिसरातील जिरेवाडी, दैत्यनांदूर, तोंडोळी, औरंगपूर, कोळसांगवी, निपाणी जळगाव, येथील सरपंचांनी पोलीस उपनिरीक्ष महादेव गुट्टे यांची भेट घेऊन केली आहे. कोरडगाव हे बाजारपेठेचे गाव असून, शेजारी असणारे जिरेवाडीला येताना कोळसांगवी, निपाणी जळगाव, औरंगपूर, तोंडोळी, कळसपिंपरी, या गावांतील दैनंदिन व्यवहारासाठी अनेक … Read more

अहिल्यानगर महानगरपालिकेने केलेली गाळे भाडेवाढ रद्द करावी, भाजपा व्यापारी आघाडीची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी

अहिल्यानगर- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनता दरबारात भाजपा व्यापारी आघाडी च्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष महेश गुगळे यांनी मनपाच्या जुने दाणे डबरा व गंजबाजार, गाळे भाडे वाढीबाबत पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अॅड. धनंजय जाधव, नीरज राठोड, हर्षल बोरा, हेमंत पवार, आनंद लहामगे, सुरेश लालबागे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, महानगरपालिका जुने दाणे … Read more

श्रीगोंदा तालुक्यात नवीन बांधलेल्या रस्त्याची दोन महिन्यांतच झाली चाळण, निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी

श्रीगोंदा- तालुक्यातील लिंपणगाव – रेल्वे स्टेशन रस्त्याचे दोन महिन्यापूर्वी काम पूर्ण झाले. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा रस्ता पहिल्याच पावसात खराब होऊन खड्ड्यांमुळे या रस्ताची चाळण झाली आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोट्यवधी रुपये पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्याच्या ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून … Read more

माजी खासदार सुजय विखेंनी कुस्तीच्या आखाड्यात बसून पैलवानांना टाळ्यांच्या गजरात दिले प्रोत्साहन

अहिल्यानगर- हिंदुत्व युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने शहरातील नालेगाव येथे आयोजित भव्य जंगी निकाली कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला डॉ. सुजय विखे पाटील यांनी भेट देऊन मल्लांचा उत्साह वाढवत आखाड्यात बसून कुस्तीचा थरार अनुभवला. कुस्तीतील प्रत्येक डावपेच त्यांनी बारकाईने पाहत पैलवानांना टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहन दिले. हिंदुत्व युवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी नालेगाव येथे जंगी निकाली कुस्त्यांचा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्याचे लवकरच विभाजन होणार?, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संघर्ष समितीला आश्वासन

राहुरी- शासन दरबारी गेली ४४ वर्षे प्रलंबित असलेली श्रीरामपूर जिल्ह्याची मागणी आणि देवळाली- श्रीशिवाजीनगर तालुका निर्मितीचा सामाजिक प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करून या मागण्यांकडे लक्ष वेधले. राजेंद्र लांडगे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले, की अहिल्यानगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे गोवा आणि दिल्ली … Read more

घोडेगाव येथील उर्दू शाळेत शाळा संपल्यानंतर दारूड्यांकडून रंगताय पार्ट्या, बंदोबस्त करण्याची मागणी

घोडेगाव- येथील शाळेच्या आवारात उर्दू माध्यम वर्गाच्या व्हरांड्यात शाळा संपल्यावर जुगाऱ्यांचा वर्ग भरत असल्याचे नुकतेच आढळुन आले आहे.सोमवारी सकाळी वर्ग सुरू होताना उर्दू माध्यम वर्गाच्या व्हरांड्यात पत्त्यांचे दोन कॅट, गुटख्याच्या पुड्या, एनर्जी ड्रिंकच्या बाटल्या, सिगारेटची मोकळी पाकिटे, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टीकचे ग्लास आढळून आले. त्यामुळे येथे मद्यपान होत असल्याची शक्यता आहे. जुगाऱ्यांनी गुटखा, मावा खाऊन फरशीवर … Read more

नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवा, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

अहिल्यानगर- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांच्या समस्या जनता दरबारातून जाणून घेतल्या. प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन आलेल्या प्रत्येक अर्ज निर्धारीत वेळेत कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अहिल्यानगर येथील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयात रविवारी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. अतिरिक्त जिल्हाधिकरी शैलेंद्र हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, … Read more

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून झालेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्यात

संगमनेर ( प्रतिनिधी ) काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यात विकासाच्या अनेक पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. नाशिक पुणे महामार्गावरील इंजिनिअरिंग कॉलेज गेट समोरील हॉटेल स्टेटस च्या समोर उड्डाणपूल अत्यंत गरजेचा होता. यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी 38 कोटी रुपये मंजूर करून घेतले होते आणि त्यातून … Read more

श्रीगोंदा तालुक्यात दारू दुकानच्या स्थलांतरासाठी नागरिकांचे आंदोलन, परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांना मनस्ताप

श्रीगोंदा- शहरातील रविवार पेठेतील भरवस्तीत असलेल्या परवानाधारक दारूच्या दुकानामुळे परिसरात दारुड्यांकडून परिसरातील नागरिकांना विनाकारण मनस्ताप होत असल्याने दारूच्या दुकानाचे स्थलांतर करावे. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस, सतिष बोरुडे यांच्यासह नागरिकांकडून अहिल्यानगर येथील अधीक्षक राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. दरम्यान राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रमोद सोनवणे यांनी सदर वाईन्स दुकान पाच … Read more

राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरणप्रकरणी मदत करणाऱ्या पोलिसांनी केली अटक

राहुरी- येथे अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी सहाय्य करणारा आरोपी अमोल बाळासाहेब डोंगरे याला राहुरी पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यास ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की दिनांक २९ जून २०२५ रोजी सायंकाळी १ वाजता फिर्यादीच्या राहत्या घरातून फिर्यादीची अल्पवयीन मुलगी लग्नाचे आमिष दाखवून … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदाराने नोंदवला निषेध, आंदोेलनाचा दिला इशारा

अहिल्यानगर- शासकीय कामाचे पेमेंट न मिळाल्याने सांगली येथील नवोदित युवा कंत्राटदार हर्षल पाटील यांनी नुकतीच आत्महत्या केली. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहिल्यानगर शाखेच्यावतीने या घटनेचा तीव्र निषेध केला. नगर शाखेचे अध्यक्ष संजय गुंदेचा व माजी अध्यक्ष महेश गुंदेचा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता भारत बाविस्कर यांना आंदोलनाच्या इशाऱ्याचे निवेदन दिले. जिल्हातील कंत्राटदारांचे शासनाकडे १२३१ … Read more

अहिल्यानगरच्या कृषी उत्पन्न बाजारात २४२० क्विंटल भाजीपाल्याची आवक, टोमॅटोच्या भावात वाढ, जाणून घ्या आजचे दर?

अहिल्यानगर- नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी विविध भाजीपाल्याची २४२० क्विंटल आवक झाली होती. यावेळी टोमॅटोच्या भावाची तेजी कायम आहे. टोमॅटोची २२२ क्विंटल आवक झाली होती. यावेळी टोमॅटोला प्रतिक्विंटल १००० ते ४००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मागील आठ दिवसांपासून टोमॅटोच्या भावात वाढ होत असल्याचे दिसून आले. बटाट्याची ६०४ क्विंटलवर आवक झाली होती. बटाट्याला प्रतिक्विंटल १००० ते … Read more