Numerology Love : ह्या तारखेला जन्म झालेल्या लोकांचे होते लव्ह मॅरेज ! तुमची जन्मतारीख सांगेल…

अंकशास्त्रानुसार, जन्म तारखेला अनन्यसाधारण महत्त्व असते आणि याचा व्यक्तीच्या वैवाहिक जीवनावरही प्रभाव पडतो. विवाह हे दोन प्रकारचे असतात – प्रेम विवाह आणि अरेंज मॅरेज. काही लोक प्रियकर किंवा प्रेयसीसोबत प्रेम विवाह करण्यास प्राधान्य देतात, परंतु काही वेळा परिस्थितीमुळे तसे घडत नाही. अंकशास्त्रानुसार, मूलांक ३, ५, ६ आणि ९ असणारे लोक प्रेम विवाह करण्याची जास्त शक्यता … Read more

सणासुदीच्या काळात दुधात भेसळ वाढली? अन्न-औषध प्रशासनाच्या धडक कारवाईने उडाली खळबळ!

सणासुदीच्या काळात बाजारात भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री वाढते, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न-औषध प्रशासनाने जानेवारीपासून विशेष पथक तैनात केले आहे. नगर जिल्हा दूध उत्पादनात आघाडीवर असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात दूध आणि त्याचे उपपदार्थ खपतात. म्हणूनच प्रशासनाने ग्राहकांना वितरित केल्या जाणाऱ्या दुधाचे नमुने गोळा करून त्यांची तपासणी सुरू केली आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळीच्या … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात वीस एकरांवर श्रीराम सृष्टी ! एतिहासिक प्रकल्पाने सर्वांचे लक्ष वेधले!

कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावाला ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभलेला आहे. असे मानले जाते की प्रभू श्रीराम वनवासाच्या काळात या ठिकाणी काही काळ वास्तव्याला होते. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आणि भावी पिढ्यांना रामायणाच्या महान परंपरेची जाणीव करून देण्यासाठी गावकऱ्यांनी ‘श्रीराम सृष्टी’ उभारण्याचा निर्णय घेतला. या कल्पनेला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर संपूर्ण गावाने एकत्र येऊन … Read more

अहिल्यानगर कर इकडे लक्ष द्या ! शहरात पाणीपुरवठा बंद पाहा संपूर्ण वेळापत्रक!

Ahilyanagar City Water : अहिल्यानगर शहरातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे, महावितरणच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी शनिवारी (२५ मार्च) पाणी योजनेवरील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित होणार आहे. या भागांमध्ये नियोजित दिवशीच पाणीपुरवठा केला जाणार असल्याने नागरिकांनी पूर्वतयारी करावी. वीजपुरवठा बंद राहणा शनिवारी सकाळी … Read more

Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्ग झाल्यावर काय होईल ? धक्कादायक माहिती समोर…

Shaktipeeth Expressway : राज्यातील महायुती सरकारने पवना ते पत्रादेवी असा ७८० किलोमीटर लांबीचा सहापदरी शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित केला आहे. हा महामार्ग नागपूर ते गोवा या मार्गावरून १२ जिल्ह्यांमधून जाणार आहे. हा महामार्ग स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थांच्या मागणीशिवाय त्यांच्या माथी मारला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात महामार्ग उभारणीसाठी जंगलतोड होणार असून, त्यामुळे … Read more

Toyota Vellfire : अहिल्यानगरमध्ये आली देशातील पहिली कार ! टोयोटा वेलफायरचे मा.आ. अरुणकाका जगताप यांना वितरण

Toyota Vellfire in Ahilyanagar : आरामदायक, हायब्रिड टेक्नोलॉजी आणि प्रगत तंत्रज्ञानाने सजवलेल्या इंटिरिअर, आकर्षक डिझाइन, आणि उच्च-गुणवत्तेच्या फीचर्सचा समावेश असलेल्या टोयोटाच्या वेलफायरचे वितरण मा.आ. अरुणकाका जगताप यांना करण्यात आले. नुकतीच लॉन्च झालेली पाचव्या जनरेशनची भारतातील पहिल्या कारचे नगर शहरात वितरण करण्यात आले आहे. केडगाव येथील वासन टोयोटा शोरुममध्ये वेलफायरच्या कारचे वितरण मा.आ. जगताप यांना शोरुमचे … Read more

भू-जल पाणी पातळी वाढली : पाट पाण्याची मागणी घटली !

१४ मार्च २०२५ गणोरे : अकोलेमधील आढळा धरणाच्या दोन्ही कालव्यांच्या लाभक्षेत्रातल्या या रब्बी हंगामात अवघ्या सुमारे तीनशे हेक्टर क्षेत्रावर पाट पाण्याचे सिंचन केले गेले.जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढली असल्यामुळे विहीर बागायतदार शेतकऱ्यांकडून पाट पाण्याच्या मागणीत मोठी कमतरता निर्माण झाली आहे. एक हजार ६० दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या धरणाच्या उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील दोन हजार ४२२ हेक्टर तसेच … Read more

लहान मुलांना होणारा पॅरामिक्झोव्हायरस विषाणू संसर्ग ; ‘एमएमआर’ लस हाच प्रभावी उपाय

१४ मार्च २०२५ संगमनेर : गालफुगी होणे किंवा गालगुंड हा लाळेच्या ग्रंथीचा संसर्गजन्य आजार आहे.हा आजार पॅरामिक्झोव्हायरस या विषाणूमुळे होत असतो.ही लाळ ग्रंथी कानाच्या खाली आणि कानाच्या समोरच्या भागात असते. या आजाराचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे शिंका, खोकला किंवा लाळेतून आणि स्पर्शातून विषाणूचा संसर्ग निरोगी मुलांना होत असतो.हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे व्यवस्थित काळजी घ्यायला … Read more

मागेल त्याला काम ! अन् तरुण बेरोजगार शिक्षक झाले ‘रोहयो’ चे कामगार

१४ मार्च २०२५ अहिल्यानगर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत सध्याच्या घडीला ३ हजार ५३७ कामे चालू आहेत.या कामांवर २६ हजार ६०७ मजूर काम करत असून जिल्ह्यात मनरेगा मार्फत ७ लाख ५९ हजार २६२ मजुरांनी नोंदणी केलेली आहे.यामध्ये मनरेगाच्या कामांमध्ये डीएड,बीएड शिक्षित बेरोजगार तरुण काम करत आहे. बेरोजगारी घालवण्यासाठी केंद्र सरकारने मागेल त्याला … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या ११ जणांवर गुन्हा दाखल

१४ मार्च २०२५ नगर :आंदोलनाबद्दल जिल्हा प्रशासनाला कोणतीही सूचना न देता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन आणि घोषणाबाजी करणाऱ्या निर्भया महाराष्ट्र पार्टीचे पदाधिकारी आणि आंदोलकांवर तोफखाना पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.या प्रकरणाबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड कंपनीचे कर्जदार यांनी निर्भया महाराष्ट्र पार्टीचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ११ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून धरणे आंदोलन … Read more

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही : महाराष्ट्रभर १८ मार्च पासून आंदोलन

१४ मार्च २०२५ नगर : संभाजी ब्रिगेडच्या नावाबद्दल शिवधर्म फाउंडेशन १८ मार्च पासून पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करणार आहे तसेच २८ मार्च रोजी अहिल्यानगरमध्ये मोर्चा काढला जाणार आहे अशी माहिती शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांनी दिले आहे. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व छत्रपती शिवाजी महाराजांचे वीर पुत्र तसेच स्वराज्याचे दूसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी … Read more

लाडकी बहीण योजनेमुळे सरकार अडचणीत ! पैसे देण्यासाठी काय काय बंद केलं ?

१४ मार्च २०२५ मुंबई: राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेमुळे अन्य विभागांच्या अर्थसंकल्पीय वाटपावर मोठा परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. या योजनेसाठी आवश्यक निधी उभारण्यासाठी अर्थ विभागाने सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचा मोठा हिस्सा वळवला आहे. इतर निधीवर कात्री योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा तब्बल ३,००० कोटी आणि आदिवासी विभागाचा ४,००० कोटींचा निधी वळवण्यात … Read more

श्रीगोंद्यात शिर नसलेल्या मृतदेहाने खळबळ ! पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर

श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे आढळलेल्या मृतदेहाच्या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. या मृतदेहाला शीर, हात आणि एक पाय नसल्याने ओळख पटवणे कठीण बनले आहे. मात्र, काही प्राथमिक सुत्रांच्या आधारे हा मृतदेह दाणेवाडी येथील बेपत्ता असलेल्या माउली सतीश गव्हाणे (वय १९) याचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी यासंदर्भात माउलीच्या वडिलांची डीएनए चाचणी घेतली असून … Read more

अपहरण, खून आणि गँगस्टर टोळी ! लपका सोमवंशीसह ९ आरोपींना नाशिक कारागृहात हलवले ! खरं कारण काय ?

अहिल्यानगरातील सावेडी भागात झालेल्या तरुणाच्या हत्या प्रकरणात अटक केलेल्या लपकासह नऊ आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. स्थानिक सबजेलमध्ये जागा उपलब्ध नसल्याने या आरोपींना नाशिक येथील कारागृहात हलवण्याचा आदेश देण्यात आला आहे. वैभव नायकोडी खून प्रकरण 22 फेब्रुवारी रोजी सावेडी येथील वैभव नायकोडी याचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासानंतर … Read more

विखे पाटलांच्या एका फोन कॉलमुळे थांबले आंदोलन आणि मिळाले १ कोटी रुपये

१४ मार्च २०२५ श्रीरामपूर : अशोकनगर फाटा ते अशोकनगर हा रस्ता गेल्या ३० वर्षापासून दुरुस्त होत नसल्याने अशोकनगर रस्ता संघर्ष समितीच्या वतीने सामुहिक मुंडण आंदोलन पुरकारले होते. मात्र, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आठ दिवसात या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून दोन टप्प्यात या रस्त्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन … Read more

मढीची यात्रा सुरू; मुस्लिम समाजातील व्यापाऱ्यांनी देखील थाटली दुकाने !

अहिल्यानगर : राज्यातील भटक्याची पंढरी म्हणून ओळखली जाणारी श्रीक्षेत्र मढी येथे सुरू होणारी यात्रा होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत चालते. कैकाडी समाजाची मानाची काठी सकाळी मंदिराच्या कळसाला पारंपारिक पद्धतीने वाद्यांच्या गजरामध्ये टेकवण्यात आली. त्यानंतर अधिकृतपणे यात्रा सुरू झाली. यंदा प्रथमच यात्रेत दुकाने लावण्याबाबत ग्रामसभेने घेतलेल्या ‘त्या’ निर्णयामुळे याबाबत चांगलीच चर्चा झाली. मंदिराच्या मुख्य कळसाला फक्त कैकाडी समाजाचीच काठी … Read more

वाढत्या उन्हाचा जनावरांच्या देखील शारीरिक तसेच प्रजनन क्षमतेवर होतोय परिणाम ; अशी घ्या काळजी

अहिल्यानगर : शेतकऱ्यांनी पशुधनाची काळजी घ्यावी. कारण सध्या ४२ अंशापेक्षा अधिक तापमान होत चालले आहे. या उन्हाच्या परिणाम मनुष्याप्रमाणेच जनावरांनाही पडत असतो. त्यामुळे पशुपालकांनी जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. जनावरांना मुबलक प्रमाणात पिण्याचे थंड पाणी उपलब्ध करावे, आदी सूचना करण्यात आल्या आहेत. जनावरांमध्ये आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता पशुपालकांनी आपल्या पशुधनाची विशेष काळजी घ्यावी. उन्हामुळे … Read more

‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजने’च्या निकषात बदल करण्यासह आ.तांबे यांनी केली ही मागणी

अहिल्यानगर : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४’ ही योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज दिली जाते. मात्र, सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत या योजनेच्या निकषांमध्ये बदल करून १५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांनाही मोफत वीज देण्याची मागणी केली आहे. राज्यातील ५०% पेक्षा जास्त शेतकरी हे ७.५ … Read more