जिल्हाधिकारी कार्यालयामागील घरात भरदिवसा धाडसी चोरी

७ मार्च २०२५ अहिल्यानगर : शहरातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयामागील गॅलेक्सी बिल्डिंगमध्ये घुसून तीन महिला व एक पुरुषाने २८ हजार रुपयांच्या साहित्याची चोरी केली. ही घटना १ मार्च रोजी सकाळी घडली. याबाबत चार जणांवर बुधवारी (दि.५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जीनत बेगम जीशान सय्यद (रा. गॅलेक्सी बिल्डींग, नवीन कलेक्टर ऑफिस मागे, अ.नगर) यांनी तोफखाना … Read more

मुंडेंचा राजीनामा पुरेसा नाही; त्यांच्यावर गुन्हा दाखल करा ; भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

७ मार्च २०२५ अहिल्यानगर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनानंतर जे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, ते पाहता हा खून अत्यंत निघृणपणे केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी केवळ धनंजय मुंडे यांच्या राजीनामा पुरेसा नाही; त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व अख्ख्ये राज्य मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्य … Read more

एप्रिल महिन्यात होणार नगर येथील नवीन विस्तारित एमआयडीसीचे भूमिपूजन!

विळद, तालुका नगर येथील नवीन होणाऱ्या विस्तारित एमआयडीसीचे भूमिपूजन समारंभ एप्रिल महिन्यात नामदार उद्योग मंत्री उदय सामंत व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. आज उद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालय येथे सदर बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार मोनिकाताई राजळे आमदार काशिनाथ दाते, डॉ. सुजय विखे पाटील, … Read more

दक्षिण मुंबईत पार्किंगसाठी उपाययोजना उच्च न्यायालय परिसरात रोबोटिक भूमिगत पार्किंग सुरू होणार

मुंबई : दक्षिण मुंबईतील भूमिगत पार्किंगवर उपाययोजना म्हणून बहुस्तरीय रोबोटिक सार्वजनिक भूमिगत पार्किंग सुरू केले जाणार आहे. हे पार्किंग हुतात्मा चौकातील अप्सरा पेन शॉपजवळ असणार आहे. याचे काम पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालय आणि लगतच्या परिसराजवळील पार्किंग समस्या कमी होणार आहे. हुतात्मा चौक आणि न्यायालयाच्या परिरात पार्किंगची समस्या वाढली आहे. या परिसरात पार्किंगची समस्या ओळखून पालिकेने … Read more

सायन-पनवेल महामार्गावरही ब्लॉक ७ मार्चच्या रात्रीपासून सात तासांसाठी वाहतूक बंद

सायन-पनवेल महामार्ग गुरुवार, ७ मार्च ते शुक्रवार, ८ मार्च या कालावधीत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सात तासांसाठी बंद राहील. गेल्या महिन्यात झालेल्या अपघातात नुकसान झालेल्या सानपाडा फूट ओव्हरब्रिज (एफओबी) वरील दुरुस्तीचे काम करण्यासाठी हे निर्बंध आवश्यक आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने नवी मुंबई महानगरपालिका (एनएमएमसी) आणि वाहतूक पोलिसांना आगामी वाहतूक निर्बंधांबद्दल माहिती दिली आहे. … Read more

जेवणासाठीच नव्हे, तर कांद्याचे इतर ५ फायदेही जाणून घ्या

जेवण बनताना कांद्याचा वापर होणार नाही हे केवळ अशक्यच. जेवण बनवताना कांदा हा महत्त्वाचा घटक मानला जातो. कांदा हा भारतातच नव्हे तर परदेशात देखील चवीसाठी वापरला जातो. पण आम्ही सांगू इच्छितो की, कांदा हा खाण्यासाठीच नव्हे तर इतर गोष्टींसाठी देखील वापरतात. कांद्याचा वापर हा स्वच्छतेसाठी, दुर्गंधी दूर करण्यासाठी आणि इतर लहान गोष्टींसाठी केला जातो. अशा … Read more

२,१०० रुपयांचा निर्णय प्रस्तावानंतर

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत येत्या अर्थसंकल्पात महिलांना २,१०० रुपये देऊ, अशी घोषणाच केली नव्हती, अशी माहिती महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सभागृहाला दिली. विरोधकांनी या संदर्भातील लक्षवेधी मांडत सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केला. मात्र, तटकरे यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. त्यामुळे २,१०० रुपयांसाठी योग्य तो प्रस्ताव मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री उपस्थित … Read more

अवघ्या ३६ मिनिटांत केदारनाथ यात्रा !

नवी दिल्ली: केंद्र सरकारने उत्तराखंडमधील सोनप्रयाग ते केदारनाथ (१२.९ किमी) आणि – गोविंदघाट ते हेमकुंड साहिबजी (१२.४ किमी) अशा दोन रोपवे प्रकल्पांना मंजुरी दिली. या दोन प्रकल्पांवर एकूण ६८११ कोटी – रुपये खर्च येईल. या प्रकल्पांमुळे दोन्ही तीर्थस्थळांपर्यंत पोहोचण्याचा कालावधी कमी होऊन पर्यटनाला चालना मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार … Read more

घडा भरला ! निघोजच्या धोंड्या टोळीला मोक्का !!

नगर: विशेष प्रतिनिधी निघोजच्या जत्रा हॉटेल मालकावर सशस्त्र हल्ला, शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बैंक ऑफ महाराष्ट्राची रोख रक्कम तसेच दागिण्यांची लुट, साकूर ता. संगमनेर येथील सराफाची लुट यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा मास्टरमाईंड असलेल्या निघोजचा घोड्या व त्याच्या टोळीचा घडा भरला आहे त्यांच्याबर मोळांतर्गत कारवाई करण्यात आली असून तालुक्यातील मिथुन उंबऱ्या काळे याचाही त्यात समावेश आहे. दरम्यान … Read more

अल्पवयीन टोळीची पाथर्डीत दहशत सराईत गुन्हेगार देतात अल्पवयीन टोळीला आश्रय

पाथर्डी पाथर्डी शहर व तालुक्याची ओळख आता गुन्हेगार टोळीचे शहर म्हणून ओळख होवू पहात आहे. समाज कल्याण विभागाच्या गर्भगिरी मुलांच्या वसतीगृहातील एका विद्यार्थ्यांस अल्पवयीन मुलांच्या टोळीने बेदम मारहान केल्याची घटना रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी की, रविवारी रात्री दहाच्या सुमारास मोटारसायकलवर आलेल्या … Read more

राहुरीत साडेपाच हजार घरकुले मंजूर ग्रामपंचायतीच्या तांत्रिक चुकांमुळे अडिचशे लाभार्थी वंचित, सर्वांना लाभ देण्याची मागणी

राहुरी : तालुक्यातील घरकुल मंजूर झालेल्या जवळपास २५० लाभार्थ्यांना तांत्रिक गडबडीचा बळी ठरवून त्यांच्या घरकुल योजनेतून मिळणाऱ्या घराच्या आशा मावळल्याचे निदर्शनास आले आहे. सन २०२४-२५ या वर्षात राहुरी तालुक्यात विविध गावामध्ये पात्र लाभार्थ्यांना ५७३८ घरकुल शासनाच्या यंत्रणेकडून मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी २५० लाभार्थ्यांनी जॉब कार्ड काढलेले नसल्याने त्यांच्या सर्वेक्षणात इतर नागरिकांचे जॉब कार्ड वापरून … Read more

शेअर बाजाराच्या नावाखाली लाखोंना गंडा

अहिल्यानगर : क्लासिक ब्रीज मनी सोल्युशन प्रा. लि. या संस्थेच्या नावाखाली गुतवणूक दारांना १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास भाग पाडले व त्यानंतर एक रुपयाही न देता गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केली. त्यामुळेया संस्थेचा चेअरमन संदीप सुधाकर थोरात याच्यासह ६ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच … Read more

सिद्धार्थनगर येथे गळफास घेत तरुणाची आत्महत्या

अहिल्यानगर : राहत्या घराच्या छताच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेत एका ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. ही घटना ४ मार्च रोजी सायंकाळी शहरातील सिद्धार्थनगर येथे घडली. बंडू मधुकर ठोकळ (रा. सिद्धार्थनगर, अ.नगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ठोकळ यांच्या कुटुंबातील मुलीचे ४ मार्च रोजी लग्र होते. त्यामुळे सर्व कुटुंबीय विवाहस्थळी गेलेले होते. मयत बंडू … Read more

‘क्लासिक ब्रीज मनी सोल्यूशन’कडून गुंतवणूकदारांची ‘लाखोंची फसवणूक

नगर क्लासिक ब्रीज मनी सोल्युशन प्रा.लि. या संस्थेच्या नावाखाली गुंतवणूकदारांना १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर एक रुपयाही न देता गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी या संस्थेचा चेअरमन संदीप सुधाकर थोरातसह ६ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चेअरमन … Read more

संगमनेर मतदारसंघात राबविणार आमदार आपल्या गावात अभियान

५ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : सर्वसामान्यांसाठी गाव पातळीवरील विविध प्रश्न सोडविण्यासाठी संगमनेर विधानसभा मतदार संघात लवकरच ‘आमदार आपल्या गावात’ हे अभियान सुरु करणार असल्याची घोषणा आमदार अमोल खताळ यांनी केली.तालुक्यातील डिग्रस येथे एकलव्य जयंती व प्राथमिक शाळा खोली भूमिपूजन आ. खताळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक हरी कोरडकर … Read more

सांस्कृतिक भवन पाडल्याप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांसह सर्वांची चौकशी ! महसूलमंत्र्यांचे विभागीय आयुक्तांना आदेश

५ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगरः बु-हाणनगर येथील अंबिका देवीच्या मंदिरासमोरील सांस्कृतिक भवन कोणतीही नोटीस न बजावता पाडल्या प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यासह सर्वांची चौकशी करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक विभागाचे आयुक्त प्रवीण गेडाम यांना दिले आहेत, अशी माहिती अॅड. अभिषेक भगत यांनी दिली. अॅड. भगत म्हणाले, बुऱ्हाणनगर या ठिकाणी २० फेब्रुवारी रोजी नगरचे प्रांताधिकारी सुधीर … Read more

वॉचमनचे हात-पाय बांधून पळविली ७ लाखांची कॉपर वायर ! दिघोळ फाटा येथील घटना; आतंरजिल्हा टोळी जेरबंद, खर्डा पोलिसांची कामगिरी

५ फेब्रुवारी २०२५ खर्डा : जामखेड तालुक्यातील दिघोळ फाटा येथील पॉवर प्रा. लि. या सोलर कंपनीच्या वॉचमनचे हात-पाय बांधून व मारहाण करुन कंपनीतील सुमारे ६ लाख ७५ हजार रुपयांची कॉपर वायर ५ ते ६ चोरट्यांनी पळविली होती. यातील ५ आरोपीना खर्डा पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. तसेच आरोपींकडून चोरी गेलेला मुद्देमाल व एक पिकअप असा … Read more

अल्पवयीन मुलीचे वडगावातून अपहरण

५ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : वडगाव गुप्ता शिवारातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची घटना २ मार्च रोजी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी घरात दिसून न आल्याने तिच्या घरच्यांनी तिचा वडगाव गुप्ता परिसरात, तिच्या मैत्रिणीकडे व नातेवाईकांकडे चौकशी करत शोध घेतला. मात्र ती कोठेही … Read more