‘नाशिक-पुणे रेल्वे’ला लोकप्रतिनिधींच्या एकीचे इंजिन ! प्रस्तावित बदलाला विरोध; कृती समिती स्थापन, पूर्वीप्रमाणेच कामाची मागणी

५ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : ‘पुणे-नाशिक : हायस्पीड रेल्वेमार्गा’ च्या प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी आज मुंबईत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत रेल्वेमार्गाच्या प्रस्तावित बदलांवर सखोल चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात आली. तसेच, सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला ‘पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गा’तील सर्व लोकप्रतिनिधी पक्षीय मतभेद विसरून एकत्र आले.या … Read more

‘त्या’ टोळीवर खंडणीचाही गुन्हा

५ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : तपोवन रोडवरून वैभव शिवाजी नायकोडी (वय १९, रा. ढवणवस्ती, तपोवन रस्ता) याचे अपहरण करून त्याचा खून करणाऱ्या टोळीनेच आणखी एका १९ वर्षीय युवकाचे अपहरण करत त्याच्या आई-वडिलांकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी भागाजी वाळुंज (वय १९, रा. सम्राटनगर, चेतना कॉलनी, नवनागापूर, एमआयडीसी ) याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या … Read more

वैभव नायकोडी हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर… एकाच दिवशी दोघांचे

अहिल्यानगरमध्ये झालेल्या वैभव नायकोडी हत्या प्रकरणात नवा खुलासा झाला असून, आरोपींनी एका दिवसात दोन तरुणांचे अपहरण केले होते, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींवर आता अजून एक गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपहरण करून अमानुष मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. संदेश भागाजी वाळुंज (वय १९, रा. सम्राटनगर, चेतना कॉलनी, … Read more

जिल्हापरिषद शाळांचे भवितव्य धोक्यात अनेक गावातील शाळा बंद होणार ?

गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घटत आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार संचमान्यता आता केवळ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर आधारित राहणार नाही, तर आधार पडताळणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार ठरवली जाईल. याचा थेट परिणाम अनेक शाळांवर होणार असून, काही शाळा शिक्षकांअभावी बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. नवीन संचमान्यतेमुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती राज्य शासनाने … Read more

एक कोटी सोळा लाखांची फसवणूक! शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली लोकांना लुबाडणारा आरोपी अखेर अटकेत!

५ फेब्रुवारी २०२५ शेवगाव : पोलिसांनी सात महिन्यांपासून फरार असलेल्या शेअर मार्केट ट्रेडिंग घोटाळ्यातील आरोपीला अटक केली आहे. या आरोपीने निव्वळ शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 1 कोटी 16 लाख रुपयांची फसवणूक केली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता आणि त्याचा शोध घेत असलेल्या पोलिसांना अखेर मोठे यश मिळाले. पळून जाण्याच्या … Read more

अवघ्या २५ मिनिटांत भंडारदरा धरण पोहून पार : शाळकरी मुलांची कमाल !

५ फेब्रुवारी २०२५ भंडारदरा : अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक भंडारदरा धरण अवघ्या २५ मिनिटांत पोहून पार करण्याची किमया शाळकरी मुलांनी केली आहे. या अपूर्व कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे.भंडारदरा धरण हे ब्रिटिशकालीन असून, उन्हाळ्यात येथे पोहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. शेंडी गावातील चार शाळकरी मुले सार्थक विनोद आरणे, आर्यन संजय मदने, मेघराज पप्पू पवार आणि निशांत … Read more

करंजी, तिसगावमधील अतिक्रमणे हटवली

५ फेब्रुवारी २०२५ करंजी : करंजी ते भोसे रोडवरील अतिक्रमणे मंगळवारी आठवडे बाजारच्या दिवशीच हटवण्याची मोहीम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतल्याने छोट्या मोठ्या व्यावसायिकांची तारांबळ झाली; परंतु बहुतांश व्यापाऱ्यांनी आठ दिवसांपूर्वीच स्वतः अतिक्रमण काढून घेतल्याने अतिक्रमण हटाव मोहीम शांततेत पार पडली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वसंतराव बडे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजी भोसे रोडवरील दुतर्फा बाजूने मोठ्या … Read more

अपहरणाच्या प्रकाराकडे दुर्लक्ष करणारा पोलिस कर्मचारी रडारवर ; चौकशी होणार

५ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : वैभव नायकोडी याच्या अपहरण व खून प्रकरणातील आरोपींवर संदेश भागाजी वाळुंज (वय १९, रा. सम्राट नगर, चेतना कॉलनी, नवनागापूर) याचे अपहरण करून मारहाण केल्याचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात एका पोलिस कर्मचाऱ्याने घटनेची माहिती असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्याची व हलगर्जीपणा केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याची … Read more

सावधान ! हॉटेल रूममध्ये लपवलेला कॅमेरा शोधायचा आहे ? या पद्धतीने ताबडतोब तपासा !

Hidden cameras in hotel : तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक आधुनिक उपकरणे उपलब्ध झाली आहेत, जी आपल्या दैनंदिन जीवनात सोयीस्कर ठरतात. मात्र, याच तंत्रज्ञानाचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, एअरबीएनबी अपार्टमेंट्स किंवा भाड्याच्या घरांमध्ये काहीवेळा लोकांच्या परवानगीशिवाय गुप्त कॅमेरे बसवले जातात. विशेषतः हॉटेल्समध्ये, लपवलेले सीसीटीव्ही बल्ब किंवा इतर उपकरणे वापरून गोपनीय क्षणांची चोरी केली … Read more

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया उपांत्य सामना: भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना हा संपूर्ण क्रिकेटप्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. भारताने या स्पर्धेत जबरदस्त खेळ करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. मात्र, आता मोठा प्रश्न असा आहे की भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्या प्लेइंग ११ सह मैदानात उतरणार? गेल्या सामन्यात भारतीय संघाने चार फिरकीपटूंना संधी दिली होती आणि केवळ एक प्रमुख वेगवान गोलंदाजासह खेळले … Read more

Ind Vs Aus : भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनलसाठी पावसाचा धोका ? सामना रद्द झाला तर भारत फायनलमध्ये

Ind Vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना हा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील सर्वात महत्त्वाचा आणि चर्चेचा सामना मानला जात आहे. दोन्ही संघ अत्यंत बलाढ्य आहेत, आणि नॉकआउट फेरीत त्यांच्यातील लढत नेहमीच रंगतदार ठरली आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट आहे, आणि जर सामना रद्द झाला, तर कोणता संघ अंतिम फेरीत पोहोचेल, हा … Read more

लाडकी बहीण’ योजनेतील रक्कम २१०० रुपये होणार? अदिती तटकरे यांची मोठी घोषणा !

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ८ मार्च महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जमा केला जाणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. अडीच कोटी महिलांना लाभ या योजनेच्या अंमलबजावणीबाबत विरोधकांनी टीका केली असली तरी, महायुती सरकारने जवळपास अडीच कोटी महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवला आहे. जानेवारी महिन्यात … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग : पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू

अहिल्यानगरः घरासमोरील हौदात पाय घसरून पडल्याने महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना केडगाव उपनगरातील शाहूनगर येथे २ मार्च रोजी दुपारी घडली. सुमन गोरखनाथ लोखंडे (वय ४०, रा. शाहूनगर, केडगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. सुमन लोखंडे या त्यांच्या घरासमोर असलेल्या हौदात पाणी घेण्याकरिता गेल्या असता त्यांचा पाय घसरून पडल्याने त्या पाण्यात बुडून बेशुद्ध झाल्या. त्यांच्या … Read more

७०० कोटींचा हिशोब गुलदस्त्यात ! १४ वर्षांचा हिशोब कुठे ? मुळा-प्रवरा वीज संस्थेतील पैशांवर प्रश्नचिन्ह

मुळा-प्रवरा सहकारी वीज संस्थेला गेल्या १४ वर्षांत ७०० कोटी रुपयांहून अधिक निधी प्राप्त झाला आहे, मात्र या निधीचा हिशोब गुलदस्त्यात राहिलेला आहे. संस्थेचे ऑडिट अनेक वर्षांपासून झालेले नाही, त्यामुळे या निधीचा योग्य वापर झाला की गैरव्यवहार झाला, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भात संस्थेच्या कामकाजाची स्वतंत्र यंत्रणेकडून चौकशी व्हावी, अशी मागणी विधिज्ञ अजित काळे … Read more

श्रीरामपूर-पुणे बसेस नफ्यात, तरीही नवीन बसेस नाहीत ! प्रवाशांची गैरसोय कधी संपणार?

श्रीरामपूर आगाराला नवीन बसेस मिळण्याची अपेक्षा असतानाही अद्याप कोणतीही गाडी दाखल झालेली नाही. जिल्ह्यातील तारकपूर, शेवगाव आणि पाथर्डी या आगारांना नवीन बसेस मिळाल्या असताना श्रीरामपूर आगार मात्र उपेक्षित राहिले आहे. येथील आगारप्रमुखांनी २० नवीन बसेसची गरज असल्याची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे, मात्र त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. जुन्या बसेस, वारंवार बिघाड आणि प्रवाशांचा … Read more

सौरऊर्जा ग्राहकांची लूट ! ३ रुपयांना वीज द्या, १७ रुपयांना परत खरेदी करा

सौरऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांना महावितरणच्या नव्या प्रस्तावामुळे मोठा फटका बसणार आहे. जर एखाद्या ग्राहकाने स्वतःच्या घरावर सौरऊर्जा प्रकल्प बसवून वीज निर्माण केली, तर महावितरण त्याच्याकडून ती वीज फक्त ३ रुपये प्रति युनिट दराने खरेदी करेल. पण, जर त्याच ग्राहकाला महावितरणकडून वीज खरेदी करायची असेल, तर त्यासाठी १७ रुपये प्रति युनिट एवढा जादा दर मोजावा लागेल. या … Read more

गर्भनिरोधक गोळ्या आणि स्ट्रोकचा संबंध – महिलांसाठी धोक्याची घंटा!

भारतासह कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये स्ट्रोकमुळे मृत्यू आणि अपंगत्वाची समस्या गंभीर होत चालली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या २०२३ च्या लॅन्सेट जर्नलच्या अभ्यासानुसार, २०५० पर्यंत स्ट्रोकमुळे १ कोटी मृत्यू होऊ शकतात. भारतातील वैद्यकीय अहवालांनुसार, स्ट्रोक हे मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आणि अपंगत्वाचे सहावे प्रमुख कारण ठरले आहे. स्ट्रोक हा मेंदूला … Read more

Mutual Fund Investment : शेअर बाजारातील अस्थिरता वाढली ; म्युच्युअल फंड गुंतवणुकीत मोठी वाढ

Mutual Fund Investment : गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजार मोठ्या चढ-उतारांचा सामना करत आहे. सततच्या घसरणीमुळे अनेक गुंतवणूकदारांनी थेट इक्विटीमधील गुंतवणुकीला फाटा दिला आहे. बाजारात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, अल्पकालीन गुंतवणूकदार घाबरताना दिसत आहेत. परिणामी, दीर्घकालीन आणि कमी जोखमीच्या गुंतवणुकीकडे लोकांचा कल वाढत आहे. त्यामुळेच म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीत मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत … Read more