अहिल्यानगरमध्ये लवकरच १५ कोटी रूपयांचे संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही

अहिल्यानगर- शहरातील नवीन टिळक रस्त्यावर लवकरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावेला साजेसे असे संविधान भवन उभारले जाईल. त्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून ५ कोटी रुपये व राज्य शासनाकडून १० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी दिली. अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड चौक येथील भारतरत्न डॉ. … Read more

राष्ट्रीय सहकार धोरणामुळे भारताच्या प्रगतीत भर पडणार, युवा नेते विवेक कोल्हे यांचे प्रतिपादन

कोपरगाव- नुकतेच जाहिर झालेले राष्ट्रीय सहकार धोरण हे देशाच्या प्रगतीत भर घालणारे आणि सहकाराच्या आर्थिक बळकटीसाठी पोषक असल्याची प्रतिक्रिया इफकोचे संचालक तथा युवा नेते विवेक कोल्हे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय स्तरावर सहकारमंत्री अमित शहा यांच्या मार्फत सहकार क्षेत्राच्या उत्कर्षासाठी स्वतंत्र खाते निर्माण करून राष्ट्रीय सहकार धोरण जाहिर केले. ते … Read more

कांद्याला २००० रूपये हमीभाव मिळावा तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी स्वाभिमानीकडून उपमुख्यमंत्री पवारांना निवदेन

राहुरी- स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नाफेडमार्फत कांद्याला प्रतीक्विंटल २००० रुपये हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, अशी ठाम मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी नुकतेच राहुरी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादर केले. उपमुख्यमंत्री पवार राहुरी येथील बाजार समितीमधील एका कार्यक्रमासाठी आले असता, त्यावेळी त्यांना हे निवेदन देण्यात आले. … Read more

संगमनेर तालुक्यातील निझर्णेश्वर मंदिराच्या विकासासाठी भरीव मदत करणार, आमदार अमोल खताळ यांची ग्वाही

संगमनेर- निझर्णेश्वर देवस्थान परिसराचा विकास सर्वांगिण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरू आहेच. मात्र, या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडून या विकासासाठी भरीव मदत केली जाईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील निझर्णेश्वर महादेव मंदिरात काल श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले. याच दिवशी आमदार अमोल … Read more

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाची त्वरीत अंमलबजावणी करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा व्यापाऱ्यांचा इशारा

श्रीरामपूर- शहरातील अतिक्रमणाच्या नावाखाली विस्थापित करण्यात आलेल्या लहान व्यापाऱ्यांनी अखेर संताप व्यक्त करत प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांना नुकतेच निवेदन दिले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या पुनर्वसनाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हे व्यापारी रोजगारापासून वंचित आहेत. श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन आणि मर्चेंट असोसिएशनचे … Read more

नेवासा तालुक्यात अवैध मुरूमाचे उत्खनन, पोलिसांनी छापा टाकत तिघांना केली अटक

नेवासा- फत्तेपूर शिवारात अवैध मुरूम उत्खनन करणारे तीन आरोपी शिंगणापूर पोलीस पथकाने सोमवारी पेट्रोलिंग करीत असताना छापा टाकून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून जेसीबी मशीन, डंपर व मुरूम, असा एकूण ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत शनिशिंगणापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी सोमवारी पहाटे पेट्रोलिंग करीत असताना फत्तेपूर शिवारात प्रदीप फुलारी, अनिल कणगरे, रवींद्र … Read more

जाती धर्माच्या नावावर सुसंस्कृत संगमनेर शहराला बदनाम करणाऱ्या विकृत प्रवृत्तींचा बंदोबस्त करा

महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासातून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहराची ओळख राज्यामध्ये शांतता, सुरक्षितता, शैक्षणिक आणि प्रगतशील शहर म्हणून आहे. मात्र मागील आठ महिन्यांपासून काही विघातक प्रवृत्तींनी डोके वर काढले असून संगमनेरातील शांतता बिघडवण्याचे काम हे लोक करत असून माजीमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांचे नागपंचमीचे शुभेच्छा फलक फाडून विकृत … Read more

कर्जत तालुक्यात वीटभट्टी चालकाकडून अवैध पद्धतीने शेतीतून सुपिक मातीचा उपसा, प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष

कर्जत- तालुक्यातील दूरगाव शिवारात वीटभट्टी चालकांकडून शेतजमिनीतील सुपीक मातीचा मोठ्या प्रमाणावर अवैध उपसा सुरू असून, यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतरही प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने संतप्त भावना निर्माण होत आहेत. विषेश म्हणजे या वीटभट्टया विना परवाना सुरू आहेत. या परिसरात अनेक वीटभदूया उभारण्यात आल्या असून, त्यांना लागणाऱ्या मातीची अवैधरित्या उपसा … Read more

श्रीगोंदा तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणाऱ्या कंपनीच्या एजंटची गुंतवणूकदारांची फोडली चारचाकी, चर्चांना उधाण

श्रीगोंदा- शेअर बाजारात गुंतवणूक करून जादा परताव्याच्या आमिषाने ‘इन्फिनाइट बिकन’ या प्लॅटफॉर्म वरती एजंटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार रक्कम परत मिळविण्यासाठी आक्रमक झाले असून, गुंतवणूकदारांच्या ससेमिऱ्यापासून सुटका होण्यासाठी पसार झालेल्या कंपनीच्या एजंटची आलिशान चारचाकी गाडी काही दिवसांपूर्वी फोडली असल्याची चर्चा आहे. श्रीगोंदा तालुक्यात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली असताना श्रीगोंदा पोलिस ठाण्यात केवळ ७८ … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात कांद्याला मिळतोय १६०० रुपयांपर्यंत भाव, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये सोमवारी ३१ हजार १३१ क्विंटल गावरान कांद्याची आवक झाली होती. यावेळी कांद्याच्या भाव भाव पडलेलेच असल्याचे दिसून आले. व्यापाऱ्यांनी केलेल्या लिलावात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल ११०० ते मिळाला. दोन नंबर कांद्याला ८०० ते ११०० रुपये भाव मिळाला. तीन नंबर कांद्याला ५०० ते ८०० रुपये भाव मिळाला. … Read more

अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते महाआरती

अहिल्यानगर- शहराचे ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या श्री विशाल गणेश मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली. त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आदी उपस्थित होते. महाआरतीनंतर माळीवाडा पंचमंडळ देवस्थान धर्मफंड ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना निवेदन देत मंदिर परिसरात भक्तनिवास बांधण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. … Read more

भिंगार नगरपालिकेचा पहिला नगराध्यक्ष भाजपचाच झाला पाहिजे, त्यासाठी पूर्ण ताकदीने उतरा- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर- छावणी परिषदेमुळे भिंगारचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच भिंगारमध्ये नव्याने नगरपालिका करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता भिंगारच्या विकासाचा मार्ग खुला झाला आहे. लवकरच नव्या नगरपालिकेच्या निवडणुकाही होतील. या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरून पहिला नगराध्यक्ष हा भाजपचाच झाला पाहिजे, यासाठी आजपासूनच नियोजन करावे. प्रत्येक कार्यकर्त्याने निवडणुकीची तयारी सुरु … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात १५० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमानिमित्त महावितरणची प्रभावी अंमलबजावणी, अनेक तक्रारीचे निवारण

अहिल्यानगर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गतिमान प्रशासनासाठी १५० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमाची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या अहिल्यानगर मंडलाने नवीन वीज जोडणी, नावात बदल, पत्यात दुरुस्ती, वीजबिल बाबत तक्रार निवारण आणि वीजपुरवठा खंडित तक्रार निवारण अशा प्रकारची विविध ग्राहकांची कामे गतीने पूर्ण केली. गतिमान सेवेसोबत तक्रारींचे जलद निवारण करीत ही मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा बसस्थानकाचे होणार सर्वेक्षण, बाळासाहेब ठाकरे स्वच्छ-सुंदर बसस्थानक अभियानातर्गंत होणार परिक्षण

अहिल्यानगर- प्रवासी सेवा अधिक सुखकर व्हावी, या दृष्टीने राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे स्वच्छ-सुंदर बसस्थानक अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा ‘अ’ वर्ग बसस्थानकांचे परीक्षण सोमवारपासून सुरू झाले आहे. परीक्षण समितीचे सदस्यांनी सोमवारी (दि.२८) तारकपूर, स्वस्तिक चौक व माळीवाडा या तीन बस स्थानकांचे परीक्षण केले. उर्वरित तीन बस स्थानकांचे परीक्षण … Read more

राहुरीतील तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

राहुरी- राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या इमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमात कृषी व सहकार क्षेत्रातील योजनांची माहिती देताना त्यांनी राहुरीच्या डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सहकार्याचे स्पष्ट आश्वासन दिले. या भाषणातून शेतकऱ्यांच्या हिताचा स्पष्ट दृष्टिकोन उमटला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. एम. पानसरे होते. यावेळी आमदार काशीनाथ दाते, माजी … Read more

राहुरी तालुक्यातील २३ वर्षीय विवाहितेचा सासरकडून शारीरिक व मानसिक छळ, तिघांविरोधात गुन्हा दाखल

राहुरी- राहुरीतील मुलनमाथा भागात राहत असलेल्या २३ वर्षीय विवाहित तरुणी खुशबू सिमरान पिंजारी हिचा पती, सासू आणि सासऱ्याने शारीरिक व मानसिक छळ केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या छळानंतर पीडित महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की दि. २० जुलै २०२५ … Read more

अहिल्यानगरमध्ये अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांच्या विशेष पथकाने पकडले, ३ लाख ९९ हजारांचा मुद्देमाल घेतला ताब्यात

अहिल्यानगर- पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने एलआयसी ऑफिस ते जामखेडकडे जाणाऱ्या आर्मी एरियातील रोडवरील रस्त्यावर अवैध दारूची वाहतूक करणारी मोटारकार पकडली. दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ३ लाख ९९ हजार ५४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २६ जुलै रोजी करण्यात आली. पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक हे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये … Read more

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत २०१५ क्विंटल भाजीपाल्याची आवक, जाणून घ्या भाजीपाल्याचे सविस्तर दर?

अहिल्यानगर- नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी विविध भाजीपाल्याची २०१५ क्विंटल आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक ३८४ क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. यावेळी टोमॅटोला ८०० ते ४००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मागील आठ दिवसांपासून टोमॅटोच्या भावात वाढ होत असल्याचे दिसून आले. बटाट्याची ३७१ क्विंटलवर आवक झाली होती. बटाट्याला प्रतिक्विंटल ९०० ते २००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. वांग्याची … Read more