अहिल्यानगर शहरात घुसला बिबट्या सीनानदी लगत आढळले बिबट्याच्या पावलांचे ठसे

अहिल्यानगर : नगर शहराजवळील आयुर्वेद कॉर्नर ते काटवन खंडोबाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सीनानदीच्या पुलाखाली २२ जानेवारीला रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या सुमारास काही युवकांना बिबट्या दिसला. त्यानंतर २४ जानेवारी रोजी दुपारी वनविभागाच्या पथकाने या परिसरात पाहणी केली असता सीना नदी लगतच्या शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. याबाबत वरिष्ठांना अहवाल देत बिबट्याला पकडण्यासाठी या परिसरात पिंजरा … Read more

बंद पडलेल्या बसला दुचाकीची धडक ; एक ठार ! मदत करणाऱ्याऐवजी बघ्यांची गर्दी ; स्थानिक नागरिकांचा संताप

२५ जानेवारी २०२५ : श्रीगोंदा : तालुक्यातून गेलेल्या जामखेड ते न्हावरा या राष्ट्रीय महामार्गावरील श्रीगोंदा ते काष्टी रस्त्यादरम्यान अपघातांची मालिका सुरूच असून हा रस्ता मृत्यूचा सापळाच बनला आहे.लिंपणगाव शिवारात श्रीगोंदा ते काष्टी रस्त्यावर बंद पडलेल्या श्रीगोंदा आगाराच्या बसला पाठीमागून दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात एकजण ठार झाला. या अपघातात दुचाकीस्वार डॉ. नवनाथ अशोक साबळे (वय- … Read more

शेतकऱ्यांचा आंतरपीक घेण्यावर भर ; पाण्याच्या उपलब्धतेमुळे कांदा व गहू पिकाकडे ओढा

२३ जानेवारी २०२५ निंबेनांदूर : आंतरपीक लागवड, त्यातून मिळालेल्या उत्पादनातून शेतकऱ्यांचा ऊस लागवडीचा प्राथमिक खर्च निघतो. शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी काही प्रमाणात हे आंतरपीक निघाल्यानंतर आर्थिक मदत होते. तसेच द्विदल आंतरपीक घेतल्यानंतर जमिनीचा पोत सुधारतो, त्यामुळे अनेक शेतकरी पूर्वहंगामी उसामध्ये आंतरपीक घेतात. उसाची चांगली वाढ होईपर्यंत कांदा, गहू, भुईमूग, हरभरा, कोथिबीर ही पिके कमी कालावधीत निघणारी … Read more

मतदारसंघातील रस्त्यांची कामे लवकरच मार्गी लागणार : आ. राजळे

२३ जानेवारी २०२५ पाथर्डी : पैठण पंढरपूर रस्ता, शेवगाव शहर बाह्यवळण रस्ता व खरवंडी ते नवगणराजुरी रस्ता, या तीनही रस्त्यांची कामे मार्गी लागावी, यासाठी आ. मोनिकाताई राजळे यांनी मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत व प्रमुख अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन चर्चा केली, त्यामुळे वरील तिनही रस्त्यांची कामे लवकरच मार्गी लागतील,अशी माहिती आ. राजळे यांनी … Read more

तलाठ्याला हाताशी धरून बनावट व्यक्ती उभी करून जमीन खरेदी

२३ जानेवारी २०२५ श्रीगोंदा : तालुक्यातील चिखली येथील सुमारे २ हेक्टर ४९ आर शेतजमीनीची तत्कालीन तलाठ्याला हाताशी धरून बनावट व्यक्ती उभे करत संगनमताने परस्पर विक्री केली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पोपट सोनावणे रा.निर्वी ता. शिरूर यांच्या फिर्यादीवरून नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत. शिवाजी सुखदेव लंके, अरुण सुखदेव लंके, … Read more

जिल्हा बँक भरती : ११ हजार उमेदवारांची परीक्षेला दांडी

२३ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची विविध श्रेणीतील ७०० जागांसाठी सरळसेवा नोकरभरती अंतर्गत मे. वर्कवेल इन्फोटेक प्रा.लि.या एजन्सी मार्फत पुणे येथील विविध परीक्षा केंद्रांवर दि.९ ते १३ व १९ जानेवारी या तारखांना उमेदवारांच्या ऑनलाईन परीक्षा पार पडल्या असल्याची माहिती बँकेचे सरव्यवस्थापक जयंत देशमुख यांनी दिली. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, … Read more

ठाण्यात बर्ड फ्लूचा शिरकाव ; कोपरीत ५ फेब्रुवारी पर्यंत चिकन, मटण विक्रीला बंदी

२३ जानेवारी २०२५ ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून, ठाणे पूर्व येथील कोपरी परिसरात देशी प्रजातीतील कोंबडी आणि टर्की कोंबडी यांचा १४ जानेवारीला मृत्यू झाला होता.हा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून ठाणे महापालिकेला प्राप्त झाला आहे.या पार्श्वभूमीवर कोपरी परिसरात सुरक्षेचा उपाय म्हणून कोंबडी आणि मटण विक्रीला ५ … Read more

अहिल्यानगरच्या पानवाल्याची मुलगी ‘यक नंबर’ चित्रपटात

२३ जानेवारी २०२५ नगर : अहिल्यानगर एमआयडीसी मधील पानाचे दुकान चालवणाऱ्या पंकज आकडकर या सर्वसामान्य व्यवसायिकाची मुलगी कु. श्रिशा पंकज आकडकर ही ११ वर्षीय बालकलाकार २६ जानेवारी रोजी दूरचित्रवाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या येक नंबर या चित्रपटात अभिनयाच्या माध्यमातून झळकली असून सोनी मराठी वाहिनीवरील ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत देखील कु. श्रिशा ने मालिकेच्या विविध भागांमध्ये अभिनय करून … Read more

मंत्री विखे पाटील यांचा ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने आज सन्मान

२३ जानेवारी २०२५ राहाता : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाकडून ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानाची पदवी देवून गुरुवारी सन्मानित करण्यात येणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या २६ वा पदवीदान समारंभ गुरुवारी रोजी संपन्न होत असून, राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. … Read more

‘आप’त्तीपासून मुक्त झाल्यास दिल्लीचा विकास – मोदी ; पराभवाच्या भीतीपोटी आपकडून घोषणांचा पाऊस

२३ जानेवारी २०२५ नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या ‘आप’ त्तीपासून मुक्तता मिळाली तरच दिल्ली ही विकसित भारताची राजधानी बनू शकेल,असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केला.दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला आतापासूनच पराभवाची चाहूल लागली आहे. त्यामुळे त्यांच्याद्वारे दररोज एका नव्या लोकप्रिय घोषणेचा पाऊस पाडला जात असल्याचा टोला मोदींनी लगावला. दिल्लीला ‘आप’त्तीने संकटात लोटले. … Read more

‘लाडक्या बहिणीं ‘कडून लाभ परत घेण्याचा निर्णय नाही ; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले स्पष्ट

२३ जानेवारी २०२५ मुंबई : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’ तील अपात्र लाभार्थीकडून योजनेचे पैसे परत घेण्यात आलेले नाहीत. तसा कोणताही निर्णय शासनाने घेतला नसल्याचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी विविध विभागांच्या मदतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more

४५ हजार शेतकऱ्यांना डिजिटल ओळख ! दोन लाख ५९ हजार शेतकऱ्यांची नोंदणी : २८ फेब्रुवारीपर्यंत नोंदणीचे उद्दिष्ट

२३ जानेवारी २०२५ चंद्रपूर : शेतकऱ्यांना आधारकार्ड प्रमाणे स्वतंत्र नोंदणी क्रमांक असलेले डिजिटल ओळखपत्र देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याअंतर्गत ‘अॅग्रिस्टॅक’ या शेती क्षेत्रासाठी असलेल्या डिजिटल उपक्रमांतर्गत देशातील ११ कोटी शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत ‘फार्मर आयडी’ देण्यात येणार आहे. सप्टेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’ देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, आतापर्यंत राज्यातील केवळ ४५ हजार … Read more

भारतीय तोफांची मारक क्षमता ६० किलोमीटरपर्यंत विस्तारणार ! मद्रास आयआयटीने विकसित केले तंत्रज्ञान

२३ जानेवारी २०२५ नाशिक : भारतीय तोफखान्याच्या भात्यातील बोफोर्स, धनुषसह अन्य १५५ मिमी तोफांमधून डागलेले तोफगोळे क्षमतेपेक्षा १५ ते २० किलोमीटर अधिक अंतरावर मारा करू शकतील,असे तंत्रज्ञान मद्रास आयआयटीने विकसित केले आहे. नियमित तोफगोळ्याच्या खालील भागात ‘रॅमजेट’ कवच बसवून तोफांची मारक क्षमता ६० किलोमीटरपर्यंत नेण्याची तयारी केली जात आहे.यासंदर्भातील माहिती देवळाली कॅम्प स्थित तोफखाना स्कूलमध्ये … Read more

नगरमधून दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवले ; अज्ञात व्यक्तींच्या विरोधात पोलिस ठाण्यात पुन्हा २ गुन्हे दाखल

२३ जानेवारी २०२५ नगर : नगर शहरासह जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेण्याच्या घटना वाढतच असून अशाच आणखी दोन घटना नगर शहरात घडल्या आहेत.तारकपूर बसस्थानकातून एका १५ वर्षीय तर केडगावच्या नेप्ती रोड परिसरातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याच्या घटना ताज्या असताना २१ जानेवारीला सकाळी काटवन खंडोबा परिसरातून १६ वर्षीय … Read more

“वाळूच्या गाड्या चालू द्या!” वक्तव्यानंतर मंत्री विखेंची सारवासारव

‘वाळूच्या गाड्या चालू द्या, थोडसं दुर्लक्ष करा. काही फरक पडत नाही. सगळे आपलेच लोक आहेत’, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूरमधील एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते. मात्र, त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. तसेच त्यांच्या या विधानानंतर मोठी चर्चा रंगली. विरोधकांनीही टीकेची झोड उठवली. यानंतर अखेर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या … Read more

अजितदादांचा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना डोस ; वादग्रस्त विधाने टाळा, शासनाच्या धोरणात्मक बाबींवर बोलू नका

२३ जानेवारी २०२५ मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी शासनाच्या कोणत्याही धोरणात्मक बाबींवर बोलू नये, तसेच माध्यमांशी बोलताना काळजी घ्यावी आणि वादग्रस्त विधाने टाळावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी रात्री देवगिरी निवासस्थानी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बैठकीत दिले. ‘शासनाच्या कुठल्याही योजनेत २-४ टक्के भ्रष्टाचार होतो,’ या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून वादळ उठले आहे. … Read more

मल्टीकॅप, ईएलएसएससह ब्लूचिप योजनांनी दिला अधिक परतावा

२३ जानेवारी २०२५ मुंबई : गेल्या काही दशकांमध्ये भारत कृषीप्रधान अर्थव्यवस्थेपासून सेवा आणि उत्पादन क्षेत्रात जागतिक शक्ती म्हणून विकसित झाला आहे. तरुण लोकसंख्या, जलद शहरीकरण, तांत्रिक प्रगती आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या विकासामुळे हे परिवर्तन घडत आहे. आर्थिक वाढीचा शेअर बाजारावर खोलवर परिणाम झाला आहे. निफ्टी ५० सारखे निर्देशांक सातत्याने नवीन उच्चांक गाठत आहेत, ज्याद्वारे देशाची … Read more

अबब..तारकपूर परिसरात पावसाळ्यासारखे घरात गुडघ्याइतके पाणी ! मनपाच्या जलवाहिनीतील गळतीने नागरिकांची गैरसोय…

२२ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : अबब.. शहरातील तारकपूर परिसरात ऐन पावसाळ्यात जसे घरात पाणी शिरते अन् नागरिकांची दाणादाण होते, तशाच पद्धतीने गुलाबी थंडीत नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.ही किमया निसर्गाने नव्हे तर महानगरपालिकेच्या जलवाहिनीच्या गळतीने झाली आहे.मनपा प्रशासनाचा अनागोंदी कारभार या निमित्ताने पुढे आला आहे. एकिकडे मनपा प्रशासन पाणीपट्टीची भरमसाठ वाढ … Read more