विधानसभा निवडणुकीत माघार घेण्याचे विवेक कोल्हेंना मिळाले फळ, फडणवीसांकडून गणेश सहकारी कारखान्यासाठी ७४ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर

कोपरगाव- श्रीगणेश सहकारी साखर कारखान्यासाठी एन. सी. डी. सी. (नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) अंतर्गत ७४ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे हा निधी मिळाला असल्याची माहिती मिळाली आहे. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली श्रीगणेश कारखान्याच्या संचालक मंडळाने नागपूर येथे … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात ४५० बिबटे ! १५ लोकांचा घेतला बळी, ९ हजार प्राण्यांचा फडशा

अहिल्यानगर जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही बिबट्यांची अगदी उच्छाद मांडला आहे. प्राण्यांवर हल्ले सुरूच आहेत परंतु आता माणसांवर देखील हल्ले सुरू आहेत. जिल्ह्यातील अनेक भागात बिबट्यांची मोठी दहशत पाहायला मिळते. वनविभागाच्या मते अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची संख्या अंदाजे ४५० इतकी आहे. मागील तीन वर्षांचा अंदाज जर पाहिला तर एक अंदाजे १५ व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. … Read more

Ahilyanagar News : शिर्डीत ५०० पेक्षाही अधिक दलितांची घरे पाडली ; संतप्त नागरिकांचा बिऱ्हाड मोर्चा, प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरच पेटवल्या चुली

शिर्डीतील ५०० पेक्षाही अधिक दलित बांधवांची घरे बुल्डोजरच्या सहाय्याने पाडले गेले. याच्या निषेधार्थ व या सर्वांचे पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी प्रांताधिकारी कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी तेथेच ठिय्या मांडत तेथेच चुली पेटवून स्वयंपाकही केला. शिर्डीतील ५०० पेक्षाही अधिक दलित बांधवांची घरे बुल्डोजरच्या सहाय्याने पाडण्याचा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. ६०-७० वर्षांपासून हे बांधव नियमितपणे … Read more

अहिल्यानगरमध्ये लॉजिस्टिक पार्क उभारा उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे खा. लंके यांची मागणी

अहिल्यानगर दक्षिण लोकसभा हा कृषी प्रधान क्षेत्र असलेला मतदारसंघ असून विविध तालुक्यांतील शेतकरी, फामर्स प्रोडयुसर कपंन्यांना अधुनिक कृषि सुविधांसह लॉजेस्टिक पार्कच्या पाठबळाची आवष्यकता असल्याने नगर दक्षिण मतदारसंघात लॉजेस्टिक पार्क उभारण्याची मागणी खा. नीलेश लंके यांनी उद्योग व वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे गुरूवारी निवेदनाद्वारे केली. गोयल यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये नमुद करण्यात आले आहे की, … Read more

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत धक्का! 1500 ऐवजी फक्त 500 रुपये? योजनेत मोठा बदल

Ladki Bahin Yojana :- महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मोठा निर्णय घेतला असून, “लाडकी बहीण” योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदतीचा लाभ दिला जात आहे. राज्यभरातील लाखो महिलांना या योजनेतून दरमहा आर्थिक सहाय्य मिळत आहे. ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने 1 जुलैपासून लागू करण्यात आली असून, पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची मदत दिली जात होती. महिलांना आर्थिकदृष्ट्या … Read more

मुंबई-पुणे एक्स्प्रेवर नियम मोडणे एसटी चालकांना पडणार महागात, आता चालकांच्या वेतनातून होणार दंड वसुली

मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्रातील वाहतुकीचा कणा मानला जातो. मात्र, या मार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसगाड्यांवर दररोज दंड आकारला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, हा दंड आता चालकांच्या वेतनातून वसूल करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे … Read more

नागपूरकरांसाठी खुशखबर! आता 24 तास सुरू राहणार नागपूर विमानतळावरील विमानसेवा

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली असून आता नागपूर विमानतळ २४ तास उड्डाणांसाठी खुला झाला आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले ‘रि-कॉर्पेटिंग’ काम ३१ मार्च २०२५ रोजी पूर्ण झाले. यामुळे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत विमानसेवा बंद ठेवण्याची आवश्यकता संपली आहे. धावपट्टी कार्यान्वित झाल्यामुळे नागपूर विमानतळावरून नव्या विमानसेवा … Read more

शक्तिपीठ महामार्गाविरोधात कागल तालुक्यातील शेतकऱ्यांचा एल्गार, तहसीलवर भव्य मोर्चा काढत सरकारला ठणकावलं

कागल : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात कागल तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. कागल बसस्थानकापासून सुरू झालेल्या या मोर्च्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांच्या संतप्त घोषणांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देत हा महामार्ग त्वरित रद्द करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली. मोर्चाचे नेतृत्व माजी … Read more

मुंबईकरांनो सावधान! कबुतरांना दाणे टाकल्यास होणार दंड, महापालिकेने घेतला निर्णय

मुंबई- मुंबईतील नागरिकांनी आता सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना किंवा इतर प्राण्यांना खाऊ घालण्यापूर्वी दोनदा विचार करावा लागणार आहे. मुंबई महापालिकेने (BMC) नव्या नियमावलीनुसार सार्वजनिक ठिकाणी कबुतर, कुत्री, मांजरी किंवा गायी यांना अन्न टाकणाऱ्या नागरिकांवर ५०० रुपयांपर्यंत दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या नव्या सुधारित नियमावलीत ही तरतूद कायम ठेवण्यात आली असून, याची कठोर अंमलबजावणी करण्याचा … Read more

शेतकऱ्यांचा प्रचंड विरोेध असतांनाही शक्तिपीठ महामार्गाच्या धाराशीव-कोल्हापूर टप्प्यासाठी केंद्र सरकारची पर्यावरणीय परवानगी

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या उभारणीसाठी मोठी झेप घेतली आहे. या महामार्गाच्या धाराशीव-कोल्हापूर टप्प्यासाठी पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकनाला केंद्र सरकारने अटी आणि शर्तींसह मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या टप्प्यातील पर्यावरणीय अभ्यासाला अधिकृत सुरुवात झाली आहे. येत्या तीन-चार महिन्यांत हा अभ्यास पूर्ण करून अंतिम पर्यावरणीय परवानगी घेतली जाणार आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या … Read more

मुंबईकरांसाठी खुशखबर! कामावर जायला उशीर होतोय तर तुमच्यासाठी मुंबई मेट्रोने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर माहिती!

मुंबई- मुंबईत राहणाऱ्या आणि रोज कामावर जाणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावर सध्या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या गर्दीचा विचार करून मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (MMOPL) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर अतिरिक्त मेट्रो फेऱ्या सुरू करण्यासाठी चाचण्या सुरू झाल्या आहेत. या चाचण्या यशस्वी झाल्यास येत्या सोमवारपासून म्हणजेच … Read more

कोल्हापूरहून थेट बिहारला विशेष रेल्वे! महाराष्ट्रामधील या ठिकाणी थांबणार, असं असेल संपूर्ण वेळापत्रक

कोल्हापूर- उन्हाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत मध्य रेल्वेने कोल्हापूरहून कटिहारकडे जाणारी विशेष साप्ताहिक एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे 6 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान प्रत्येक रविवारी धावेल. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास ही गाडी कायमस्वरूपी सुरू करण्याचा विचार केला जाणार आहे. कोल्हापूर रेल्वे … Read more

मुंबईतील ‘या’ भागात फक्त 20 लाखात घर, म्हाडाचा मुंबईजवळचा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी ठरणार फायदेशीर

Mhada News : मुंबईत घर घेणे हे आपल्यापैकी अनेकांचे स्वप्न असेल. मात्र मुंबईत घर घेणे काही सोपी बाब नाही. मुंबईतील घरांच्या किमती गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. शहरात घरांच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत की, मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी राजधानीत आपले स्वतःचे घर खरेदी करणे एक आव्हान बनले आहे. अनेकजण होम लोन घेऊन घर घेण्याचे स्वप्न … Read more

अक्षय तृतीयेच्या आधीच मुंबईकरांसाठी मोठी गुड न्यूज! 10 एप्रिलला सुरू होणार मुंबई मधील ‘हा’ महत्त्वाचा मेट्रो मार्ग

Mumbai Metro : महाराष्ट्रात नुकताच गुढीपाडव्याचा मोठा सण साजरा झाला. 30 मार्च रोजी गुढीपाडव्याचा सण साजरा झाला असून आता 30 एप्रिल ला अक्षय तृतीया चा सण साजरा होणार आहे. दरम्यान अक्षय तृतीयेच्या आधीच देशाच्या आर्थिक राजधानीला अर्थातच मुंबईला एक मोठी भेट मिळणार आहे. मुंबईकरांसाठी एक नवा मेट्रो मार्ग लवकरच खुला केला जाणार असल्याची माहिती समोर … Read more

Maruti Suzuki च्या कार झाल्या महाग ! जाणून घ्या कोणत्या कारची किंमत किती वाढली ?

Maruti Suzuki Car Price Hike : भारतातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या Maruti Suzukiने त्यांच्या गाड्यांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 8 एप्रिल 2025 पासून या नवीन किमती लागू होणार असून, कंपनीच्या सात लोकप्रिय मॉडेल्सवर याचा परिणाम होणार आहे. याआधीही कंपनीने वर्षाच्या सुरुवातीला किमतीत वाढ केली होती, मात्र आता पुन्हा एकदा ही वाढ … Read more

Hyundai ची नवी पेशकश ‘हायड्रोजन इलेक्ट्रिक कार’, देते जबरदस्त रेंज

Hydrogen Car : ऑटोमोबाईल क्षेत्रात हायड्रोजन फ्यूलवरील वाहने भविष्यातील प्रमुख पर्याय मानले जात आहेत. Hyundai ने या दिशेने एक मोठे पाऊल उचलत आपली नवीन Hyundai Nexo Hydrogen Electric Car सादर केली आहे. आकर्षक डिझाईन, अत्याधुनिक इंटीरियर आणि जबरदस्त परफॉर्मन्ससह ही कार हायड्रोजन इलेक्ट्रिक वाहनांच्या युगाची नवी ओळख निर्माण करत आहे. ही कार ऑक्टोबर 2024 मध्ये … Read more

आयकर रिटर्न दाखल करण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल, जाणून घ्या काय बदलणार?

Income Tax Changes 2025 : वित्तीय वर्ष 2025-26 पासून आयकर रिटर्न दाखल करण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता नवीन कर रचना डिफॉल्ट मोडमध्ये लागू केली गेली आहे, त्यामुळे करदात्यांना आयटीआर भरण्याच्या वेळी नवीन टॅक्स रीजीम स्वयंचलितपणे दिसेल. मात्र, ज्यांना जुन्या कर प्रणालीचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना पर्याय निवडून तो बदल करावा लागेल. नव्या … Read more

‘आरटीई’ प्रवेशात ‘या’ जिल्ह्याने मारली बाजी, प्रवेश संख्येत झाली मोठी वाढ!

RTE Admissions 2025 : महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीच्या शिक्षणहक्क कायदा (RTE) अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रियेत पुणे जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे. खासगी शाळांमधील 25% राखीव जागांसाठी झालेल्या प्रवेश प्रक्रियेत पुण्यातील पालकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश दिला जातो, मात्र यंदा पुणे जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थी या योजनेअंतर्गत दाखल … Read more