अहिल्यानगरच्या शिरपेचात मानाचा तुरा, श्रीरामपूरच्या ‘या’ सुप्रसिद्ध चित्रपट गीतकाराची कविता अभ्यासक्रमात

श्रीरामपूर येथील सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार निसर्ग कवी बाबासाहेब सौदागर यांची कविता सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अभ्यासक्रमा साठी निवडली गेली आहे. पुणे विद्यापीठाच्या बी.ए.प्रथम वर्षा करीता ही सातशे महाविद्यालयात शिकविली जाणार आहे. विद्यापीठ अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ.संदीप सांगळे यांनी ही माहिती दिली. अभ्यासक्रम मंडळाचे सर्व संचालक आणि जेष्ठ विचारवंत समीक्षक प्रा. डॉ.सुधाकर शेलार यांनी हे पुस्तक … Read more

अखेर ‘सिस्पे कंपनी’च्या संचालक मंडळावर सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ; जादा परताव्याच्या आमिषाने ४५० कोटींची फसवणूक

‘सिस्पे कंपनी’, ट्रेडज इन्व्हेस्टमेंट प्रा.लि. या कथित फायनान्स कंपन्यांनी पारनेर तालुक्यातील २१ हजार ३६१ गुंतवणूकदारांची तब्बल ४५० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अधिक परताव्याचं आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली असून या प्रकरणी १ ऑगस्ट रोजी पहाटे कंपनीच्या संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या कंपनीवर काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा आणि … Read more

अहिल्यानगरजवळ ‘या’ एमआयडीसीत सुरू होता पैसे छापायचा कारखाना, ५९ लाखांच्या बनावट नोटांसह अडीच कोटी नोटांचे साहित्य जप्त

भारतीय चलनातील ५०० रुपयांच्या नोटांसारख्या हुबेहूब बनावट नोटा छापण्याचा कारखाना नगर तालुका पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. बनावट नोटांचे हे रॅकेट चालविणाऱ्या एकूण ७ सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून ५९ लाख ५० हजार रुपयांच्या ५०० च्या बनावट चलनी नोटा, २ कोटी १६ लाखांच्या बनावट नोटा तयार झाल्या असत्या एवढे कागद व शाई इत्यादी … Read more

शिर्डीत “नक्शा” प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू ड्रोन सर्व्हेक्षणाद्वारे मिळकतींचे अचूक नकाशीकरण, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

शिर्डी, दि. १ – केंद्र शासनाच्या ‘नक्शा’ प्रकल्पांतर्गत शिर्डी नगरपरिषद हद्दीत ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू असून, प्रत्येक मिळकतीचे नकाशीकरण व माहिती संकलनाचे काम प्रगतीपथावर आहे. नागरिकांनी स्वतःच्या जमिनीचे सातबारा उतारे, खरेदीखत व मिळकत पत्रिका आदी दस्तऐवज सादर करून सहकार्य करावे, असे आवाहन राहाता भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश थोरात यांनी केले आहे. ‘नक्शा’ प्रकल्प केंद्र शासनाच्या … Read more

केंद्रीय विश्वविद्यालयासाठी खा. लंके यांचे साकडे केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांची घेतली भेट

अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय विश्वविद्यालयाची स्थापना करण्याची मागणी करत खासदार नीलेश लंके यांनी एक महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा प्रस्ताव केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्याकडे सादर केला. महाराष्ट्रात सर्वसामान्यांसाठी एकही केंद्रीय विश्वविद्यालय नसताना खा. लंके यांनी अहिल्यानगरमध्ये केंद्रीय विश्वविद्यालय स्थापना करण्याची औपचारिक मागणी केली आहे. खा. लंके हे अहिल्यानगरमध्ये केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करण्यासाठी पूर्वीपासूनच आग्रही … Read more

मलेरियाचे रुग्ण वाढले ; १४ जुलैपर्यंत राज्यभरात ८,९८३ जणांना मलेरियाचा डंख

अहिल्यानगर : राज्यासह जिल्हयात यंदा मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली, सध्या देखील अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. मात्र या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात देखील डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी आज अनेक भागात मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया सारख्या साथीच्या मात्र हंगामी आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, १४ जुलै २०२५ … Read more

समाजात आजही मुलगी ‘नकोशी’च ; महाराष्ट्रातील स्थिती चिंता निर्माण करणारी ? एक ‘ हजार मुलांमागे अवघ्या ९१५ मुली

अहिल्यानगर : मुलगा म्हणजे वंशाचा दिवा ही मानसिकता कायम असल्याने आजही अनेक कळ्यांना गर्भातच खुडण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. परिणामी मुलींची संख्या कमी झाल्याने अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या. त्यातून समाज धडा घ्यायला तयार नाही. आजही मुलगाच हवा, हा अनेकांचा अट्टाहास कायम आहे. त्यामुळे राज्यात नव्हे तर देशात मागील काही वर्षांत मुलींची घटणारी संख्या … Read more

जिल्ह्यात १ लाख ५ हजार टन खतांचा साठा उपलब्ध मात्र लिकिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट

अहिल्यानगर : जिल्ह्यात ९४ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या झाल्या असून सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांकडून युरिया खताची मागणी होते. परंतु कृषी सेवा केंद्र चालकांकडून युरिया खतासोबत अन्य १९/१९/१९ हे नत्र, स्फूरद व पालश असलेले खत व मायक्रोन्यूटन खते घेण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची एकप्रकारे कृषी केंद्र चालकांकडून लूट होत आहे. … Read more

प्रवाशांना वाटेत अडवून लुटणारा ‘बज्या’ गजाआड ; अनेक गुन्ह्यांची होणार उकल

अहिल्यानगर: पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे शिवारात एका शेतकऱ्याला रस्त्यावर थांबवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत चाकूचा धाक दाखवून ५० हजार रुपये रोख आणि मोबाईल लुटणाऱ्या बज्या उर्फ शिवराज हरिश्चंद्र मरकड (रा. निवडुंगे, ता. पाथर्डी) याला अखेर पाथर्डी पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अटक केली आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी, पोपट तुकाराम तांदळे (वय ३२, रा. इंदिरानगर, पाडळी, ता. पाथर्डी) हे … Read more

धाकट्यावारीत पंढरपूरच्या पूजेचा मान अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ शिक्षक दाम्पत्याला

अहिल्यानगर : वारीत पंढरपूरच्या पांडुरंगाच्या शासकीय पूजेचा मान मुख्यमंत्री व त्यांच्यासोबत एका वारकरी कुटुंबास दिला जातो. यानंतर येणाऱ्या धाकट्या वारीला देखील अशीच पूजा केली जाते व त्या देखील पूजेचा मान वारकरी कुटुंबास दिला जातो. यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पाथर्डीच्या पोपटराव फुंदे व अनुराधा फुंदे यांना पंढरपूरच्या धाकट्यावारीत विठ्ठलाच्या महापूजेचा … Read more

जिल्हा परिषदेच्या ७८१ शाळांमध्ये १६०८३ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती सराव परीक्षा

अहिल्यानगर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने मिशन आरंभ अंतर्गत शनिवारी जि. प. च्या ७८१ शाळांत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील पाचवीच्या १४ हजार ९४९ व आठवीच्या ११३४ अशा एकूण १६ हजार ८३ विद्यार्थ्यांनी ही शिष्यवृत्ती सराव परीक्षा दिली, अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर पाटील यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक … Read more

ज्याला लोक अशक्य समजत होते, ते आम्ही प्रत्यक्षात आणलं” – डॉ. सुजय विखे पाटील

डोराळे, कोराळे, वाळकी, गोरक्षवाडी आणि मोरवाडी या भागांत पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या गावांमध्ये पाणी येईल, असा विचार पूर्वी कोणीच केला नव्हता. मात्र आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे आणि सखोल नियोजनातून हा प्रश्न मार्गी लागला, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. गावागावांमध्ये पाणी पोहोचवण्याच्या कामाला अनेकांनी अशक्य मानलं होतं विरोधक, … Read more

Ahilyanagar News : नगर तालुक्यातील ५४ गावांचा कारभार महिलांच्या हाती ग्रामपंचायतच्या आरक्षण सोडतीने कही खुशी कही गम !

अहिल्यानगर: नगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी (दि. २३) दुपारी काढण्यात येवून आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. १०५ पैकी ५४ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिला राखीव झालेले असून या ठिकाणी महिलाराज येणार आहे तर ५१ ठिकाणी पुरुष अथवा महिला यापैकी कोणालाही सरपंच होता येणार आहे. या १०५ पैकी ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारीला झालेल्या असून … Read more

Ahilyanagar News : सुट्टीवर घरी येताना श्रीगोंद्याच्या जवानाचा कलकत्ता येथे अपघाती मृत्यू कलकत्ता येथेच होणार लष्करी इतमामात अंत्यविधी

अहिल्यानगर : श्रीगोंदा तालुक्यातील घुटेवाडी येथील लष्करी जवानाचा सुट्टीवर घरी येत असताना अपघाती मृत्यू झाल्याची घटना दि.१६ जुलै रोजी घडली. ज्ञानदेव सुखदेव अंभोरे (वय ३७, रा. घुटेवाडी, ता. श्रीगोंदा) असे या जवानाचे नाव आहे. त्यांचा अंत्यविधी हावडा कलकत्ता पश्चिम बंगाल येथे होणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी, श्रीगोंदा तालुक्यातील घुटेवाडी येथील ज्ञानदेव … Read more

जयहिंद लोकचळवळीच्या वतीने सप्तशृंगी गडावर 55000 देशी वृक्षांचे रोपण

जयहिंद लोकचळवळीच्या वतीने सप्तशृंगी गडावर 55000 देशी वृक्षांचे रोपण महाराष्ट्राचे साडेतीन पिठांपैकी महत्त्वाच्या असलेल्या सप्तशृंगी गडावर जय हिंद लोक चळवळीच्या वतीने 55 हेक्टर क्षेत्रामध्ये 55 हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात व मा आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली जयहिंद लोकचळवळ पर्यावरण संवर्धनासाठी करत असलेले काम हे अत्यंत कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार … Read more

सोशल मीडियावर संस्थेची बदनामी करणाऱ्या वर गुन्हा दाखल शाळेबाबत खोटी बदनामी केल्याने गुन्हा दाखल

संगमनेर (प्रतिनिधी)–राज्यातील सर्व आदिवासी शाळांसाठी अत्यंत आदर्शवत असणारी आणि राज्य पातळीवर सातत्याने गुणवत्तेमध्ये विविध पुरस्कार मिळवणारी जय हिंद आदिवासी आश्रम शाळा कोळवाडे ही राज्यात नामांकित आहे. मात्र काही लोकांनी सोशल मीडियावर खोटी आणि चुकीचा मजकूर पसरविल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडिया हे व्यक्त होण्याचे साधन आहे .मात्र अनेक जण त्यावर कोणताही विचार … Read more

अहिल्यानगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण सोडत २३ जुलैला

अहिल्यानगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पंचवार्षिक कार्यकाळ २०२५ ते २०३० या कालावधीसाठी हा कार्यक्रम २३ जुलै २०२५ रोजी नियोजित असून, यासंबंधीची माहिती अहिल्यानगरचे तहसीलदार यांनी दिली आहे. आरक्षण सोडत २३ जुलै रोजी दुपारी १२ वाजता, नियोजन भवन, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे पार पडणार आहे. हा सोडत … Read more

पवार कुटूंबियांच्या स्वागताने भारावले निवृत्त शिक्षक शिक्षकांचा शरद पवारांशी मनमोकळा संवाद

संसद पाहण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील २०० शिक्षकांना दिल्लीला घेऊन गेलेल्या खासदार नीलेश लंके यांनी मंगळवारी सकाळी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घडवून आणली. शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी केलेल्या स्वागतामुळे हे सर्व शिक्षक अरक्षशः भारावून गेले. पवार यांच्या निवासस्थानी भेटीप्रसंगी पवार यांनी अत्यंत सहज आणि हृदयस्पर्शी भाषेत शिक्षकांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही … Read more