अहिल्यानगरच्या शिक्षिकेच्या पुस्तकाची हुबेहूब कॉपी करून विक्री, चौघांविरोधात पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल

Ahilyanagar News: श्रीरामपूर- तालुक्यातील पढेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षिका मिना सुनिल गिरमे यांनी लिहिलेल्या ‘चला वाचुया झटपट’ या लोकप्रिय पुस्तकाची हुबेहूब नक्कल करून ती परस्पर विक्री केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शिरूर येथील परीघ प्रकाशनचा संचालक अरूण कैलास गवळी, पाथर्डी येथील विवेक बुक डेपोचा चालक ज्ञानेश्वर प्रल्हाद चिकणे आणि … Read more

अहिल्यानगरमध्ये शासकीय ठेकेदाराची १४ लाखांची फसवणूक; खोट्या GST इनव्हॉइसचा मोठा प्रकार उघडकीस

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहरात एका शासकीय ठेकेदाराची सिमेंट पुरवठादाराने जीएसटीच्या नावाखाली १४ लाख ८७ हजार ६२४ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासकीय कंत्राटदार रोहन श्रीकांत मांडे (वय ४२, रा. साई कॉलनी, फुलारी मळा, सावेडी) यांनी शनिवारी (२१ जून २०२५) तोफखाना पोलिस ठाण्यात मे. आदित्य इंटरप्रायजेस आणि त्यांचा प्रतिनिधी नीलेश आकरे यांच्याविरुद्ध फिर्याद … Read more

राम शिंदेकडून आमदार रोहित पवारांचा पुन्हा एकदा करेक्ट कार्यक्रम, कर्जत तालुका दूध संघावर मिळवली एकहाती सत्ता

Ahilyanagar News: कर्जत- तालुक्यातील सहकारमहर्षी रावसाहेब उर्फ बाळासाहेब पाटील सहकारी दूध व्यावसायिक प्रक्रिया संघाच्या निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी पुन्हा एकदा आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. ही निवडणूक बिनविरोध पार पडली असून, शिंदे यांच्या समर्थक १५ संचालकांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना एकही उमेदवार उभा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची केंद्रामार्फत तपासणी होणार, जि.प.सीईओ आनंद भंडारी यांची माहिती

Ahilyanagar News: अहिल्यानगर- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ उपक्रमामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींची घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती आणि लोकसहभागाच्या आधारे तपासणी होणार आहे. केंद्र शासनामार्फत त्रयस्थ संस्थांद्वारे ही पाहणी केली जाईल, ज्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीचे १,००० गुणांवर मूल्यमापन होईल. या पाहणीतून जिल्हा आणि राज्याचे स्वच्छता गुणांकन निश्चित होईल. मुख्य … Read more

धर्मांतर आणि लव्ह जिहादविरोधी कडक कायदा आणावा, आमदार संग्राम जगताप यांची हिंदू जनआक्रोश मोर्च्यात मागणी

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहरात हिंदूंच्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी आणि लव्ह जिहादच्या कथित घटनांविरुद्ध कडक कायदा आणण्याच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली रविवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात शेकडो हिंदू बांधव सहभागी झाले. मार्केटयार्ड चौकात झालेल्या सभेत आ. संग्राम जगताप, आ. गोपीचंद … Read more

वाहनधारकांनो! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी ‘ही’ आहे आता शेवटची तारीख, प्लेट न बसवल्यास होणार थेट कारवाई

वाहनधारकांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भीमनवार यांनी गुरुवारी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, या मुदतीनंतरही एचएसआरपी न बसविल्यास वायुवेग पथकाकडून कठोर कारवाई केली जाईल. या निर्णयामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला असला, तरी अद्याप लाखो वाहनांना ही प्लेट बसवणे बाकी आहे.  एचएसआरपीची गरज आणि महत्त्व … Read more

अहिल्यानगरच्या तरूणाच्या चित्रपटाचा जर्मनीत बोलबाला, चित्रपटाची जर्मनीतील २२ व्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड 

Ahilyanagar News: पारनेर- तालुक्यातील वासुंदे येथील तरुण निर्माते सुदेश झावरे यांनी मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या पहिल्याच प्रयत्नात आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाची मोहोर उमटवली आहे. त्यांच्या ‘अबीर’ या मराठी चित्रपटाची २२व्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल, जर्मनी येथे निवड झाली असून, जगभरातील १९४ देशांमधून आलेल्या हजारो चित्रपटांमधून केवळ तीन भारतीय चित्रपटांना स्थान मिळाले आहे. यामध्ये ‘अबीर’ हा एकमेव मराठी … Read more

शिर्डीत साईदर्शनात मोठा बदल! VIP ब्रेक दर्शनासाठी ठराविक वेळा निश्चित, संस्थानाकडून नवीन वेळापत्रक लागू

Ahilyanagar News: शिर्डी- साईबाबा मंदिरात व्हीआयपी आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या दर्शनामुळे सामान्य भक्तांना होणारा त्रास कमी करण्यासाठी साईसंस्थानच्या तदर्थ समितीने नवीन ‘ब्रेक दर्शन’ व्यवस्था लागू केली आहे. यापूर्वी व्हीआयपी दर्शनासाठी कधीही दर्शन रांग थांबवावी लागत होती, ज्यामुळे सामान्य भक्तांना ताटकळत रहावे लागत होते आणि प्रशासकीय यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत होता. आता निश्चित वेळांमध्ये व्हीआयपी दर्शनाची व्यवस्था … Read more

पाथर्डी शहरात मावा बनवणाऱ्या कारखान्यांवर विशेष पोलिस पथकाची धाड, कारखाने उद्ध्वस्त करत लाखोंचा मुद्देमाल केला जप्त

Ahilyanagar News: पाथर्डी- शहरात सुगंधी तंबाखू आणि मावा तयार करणाऱ्या अवैध कारखान्यांवर अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तीन ठिकाणांहून ३ लाख ९४ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असली, तरी एकजण फरार झाला … Read more

अहिल्यानगरचे मनसे जिल्हाध्यक्ष देवीदास खेडकर यांचे दु:खद निधन

Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) जिल्हाध्यक्ष देवीदास खेडकर यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु काल संध्याकाळी ८ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. खेडकर यांच्या निधनाने अहिल्यानगर जिल्ह्यासह पाथर्डी तालुक्यात शोककळा पसरली आहे. राजकीय कारकीर्द आणि योगदान देवीदास खेडकर यांनी आपल्या … Read more

दूध व्यवसायातील अडचणीवर सरकार कायमचा तोडगा काढणार, दुग्ध विकासमंत्री अतुल सावे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

Ahilyanagar News: कोपरगाव- महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, परंतु सहकारी आणि खासगी दूध संघांमधील वाढती स्पर्धा आणि इतर आव्हाने यामुळे या उद्योगासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सहकारी दूध संघांना आवश्यक संरक्षण मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असताना, दुग्ध विकासमंत्री अतुल सावे यांनी या समस्यांवर सर्वंकष तोडगा काढण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी दूध संघ … Read more

अहिल्यानगरमधील ‘या’ पर्यटनस्थळासोबत गडांवर फिरण्यासाठी वन्यजीव विभागाकडून घालण्यात आली बंदी

Ahilyanagar News: अकोले- तालुक्यातील निसर्गरम्य हरिश्चंद्रगड, रतनगड आणि साम्रद येथील सांदण दरी ही पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेली ठिकाणे सध्या वन्यजीव विभागाने बंद केली आहेत. पावसाळ्यातील जोरदार पाऊस, धुके आणि धोकादायक परिस्थितीमुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  पावसाळ्यातील निसर्ग  भंडारदरा आणि हरिश्चंद्रगड परिसरात सध्या मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. या पावसामुळे परिसरातील निसर्गाने हिरवेगार रूप … Read more

ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट! सुजय विखेंची दर्जेदार आरोग्यसेवेसाठी तयारी

ग्रामीण रुग्‍णालयाच्‍या विस्‍तारीत इमारतीचे काम निर्धारित वेळेत पुर्ण करुन, आरोग्‍य सेवा सक्षम आणि दर्जेदारपणे मिळावी या दृष्‍टीनेच सर्व सुविधांची उभारणी करण्‍याच्‍या सुचना डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिल्‍या. जलसंपदा मंत्री ना.डॉ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उपलब्‍ध करुन दिलेल्‍या निधीच्‍या माध्‍यमातून राहाता येथील ग्रामीण रुग्‍णालयाच्‍या विस्‍तारीत इमारतीचे काम तसेच आधिकारी, कर्मचा-यांच्‍या निवासस्‍थानाच्‍या नियोजित जागेची पाहाणी डॉ.विखे पाटील यांनी … Read more

अहिल्यानगरच्या बाजारात पहिल्यांदाच खजुराची ७ क्विंटल आवक, प्रतिक्विंटल मिळतोय एवढे रुपये भाव?

Ahilyanagar News: अहिल्यानगर- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शुक्रवारी (२० जून २०२५) विविध फळांची एकूण २४८ क्विंटल आवक नोंदवली गेली, ज्यामध्ये आंब्याची सर्वाधिक आवक होती. डाळिंब आणि सफरचंद यांना उच्च भाव मिळाले, तर खजुराची प्रथमच ७ क्विंटल आवक झाली. डाळिंबाला प्रतिक्विंटल १४,००० रुपये आणि सफरचंदाला २३,००० रुपये इतका उच्च भाव मिळाला, ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगला … Read more

जामखेड येथे धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण, तिघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

Ahilyanagar News: जामखेड- तालुक्यातील नान्नज गावात १७ जून २०२५ रोजी सायंकाळी एका किरकोळ कारणावरून धक्कादायक मारहाणीची घटना घडली. हॉटेलमध्ये पाणी घेण्यासाठी गेलेल्या विक्रम बबन कोळी या तरुणाला धक्का लागल्याच्या कारणावरून तीन जणांनी लाकडी ठोकळ्याने आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत विक्रम गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात … Read more

ज्ञानेश्वर साखर कारखाना उसाला जिल्ह्यात एक नंबर भाव देणार, कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले यांची शेतकऱ्यांना ग्वाही!

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आश्वस्त केले आहे की, भविष्यात ऊस भावात हा कारखाना जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर राहील. त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित सभेत त्यांनी हे विधान केले. या कार्यक्रमात कारखान्याच्या उद्योग समूह … Read more

अहिल्यानगर महापालिकेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी डाॅ. अनिल बोरगेंच्या अडचणीत वाढ, अपहाराची चौकशी करण्यासाठी राज्यस्तरीय समितीची नियुक्ती 

Ahilyanagar News: अहिल्यानगर- महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या १५ व्या वित्त आयोगाच्या १६.५ लाख रुपयांच्या निधीचा अपहार झाल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, शहर लेखा व्यवस्थापक विजयकुमार रणदिवे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना अटक झाली होती. आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय … Read more

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेवगा आणि गवारीला मिळाला उच्चांकी भाव, जाणून घ्या भाजीपाल्यांचे दर?

Ahilyanagar News: अहिल्यानगर- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शुक्रवारी (२० जून २०२५) एकूण २०३४ क्विंटल विविध भाजीपाल्याची आवक झाली, ज्यामध्ये बटाटे आणि टोमॅटो यांचा मोठा वाटा होता. याशिवाय, २२,१२९ विविध पालेभाज्यांच्या जुड्यांची आवक नोंदवली गेली. बाजारात बटाट्याची सर्वाधिक ५१५ क्विंटल आणि टोमॅटोची ३३५ क्विंटल आवक झाली, तर शेवग्याच्या शेंगा आणि गवारी यांना उच्चांकी भाव … Read more