वांबोरी चारीला उद्यापासून पाणी सुटणार, आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मागणीची पालकमंत्री विखे पाटलांनी घेतली तात्काळ दखल

करंजी- शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून मुळा धरणातून बुधवार (दि. २३) रोजी वांबोरी चारीला पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आ. शिवाजीराव शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. मुळा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे मुळा धरणात २० हजार दशलक्षघन फूट पाणीसाठा झाला असून, उजवा व डाव्या कालव्यामधूनदेखील ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आलेले आहे. वांबोरी चारी लाभक्षेत्रात पाऊस कमी असल्यामुळे … Read more

ड्रोनचा गैरवापर खपवून घेतला जाणार नाही विखे पाटील यांचा कडक इशारा

श्रीरामपूर आणि राहाता तालुक्‍यात बेकायदेशि‍रपणे रात्री ड्रोन व्‍दारे शुटींग घेणा-या व्‍यक्तिंचा शोध घ्‍या. ड्रोन यंत्रणेच्‍या विरोधात कराव्‍या लागणा-या कारवाईसाठी आवश्‍यक असलेली साधन सामुग्री उपलब्‍ध करुन, या व्‍यक्तिंविरोधात कठोर कारवाई करा अशा सुचना जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी पोलिस प्रशासनाला दिल्‍या आहेत. राहाता आणि श्रीरामपूर तालुक्‍यात रात्री उशिरा ड्रोनव्‍दारे घि‍रट्या घालून भितीचे वातावरण निर्माण … Read more

अहिल्यानगर शहरातील वडगाव गुप्ता आणि एमआयडीसीमध्ये अपघात, अपघातात दोघांचा मृत्यू

अहिल्यानगर- शहरातील वडगाव गुप्ता बायपास रस्त्यावर आणि एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे अपघात सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर इशारा देत असून, वाहतूक शिस्त आणि पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. उपचारादरम्यान मृत्यू एमआयडीसी येथील गजानन कॉलनीजवळ १६ जुलै रोजी घडलेल्या एका अपघातात मधुकर प्रल्हाद तंमचे (वय ४९, रा. … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातीत खरिप पिके पावसाअभावी धोक्यात

जेऊर- अहिल्यानगर तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत. अनेक भागात पिके कोमजण्यास सुरुवात झाली आहे. पावसाच्या ताणामुळे उत्पन्नात मोठी घट होणार आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार असून, तत्काळ नुकसान होत असलेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी निंबळक सरपंच सौ. प्रियंका लामखडे यांनी केली आहे. अहिल्यानगर तालुक्यात मे महिन्यात … Read more

आमदार हेमंत ओगले यांच्या वक्तव्यावरून स्थानिक नागरिक संतप्त, फोटोला जोडे मारत केले आंंदोलन

श्रीरामपूर- पावसाळी अधिवेशनात काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांनी टिळकनगर इंडस्ट्रीज संदर्भात केलेल्या विधानावरून परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. त्यांनी दिलेली माहिती चुकीची व दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करत दत्तनगर, टिळकनगर, एकलहरे आणि रांजणखोल येथील ग्रामस्थांनी टिळकनगर चौफुलीवर अनोखे आंदोलन केले. ‘जोडे मारो’ आंदोलनाद्वारे निषेध प्रतिकात्मक पद्धतीने आमदार ओगले यांच्या फोटोला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात … Read more

वकिल्यांच्या खोट्या नोटीसी अन् धमकीच्या फोनने अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिक हैराण, सावधानता बाळगण्याचे आवाहन

अहिल्यानगर- अनेक नागरिकांना कोणतेही कर्ज किंवा फायनान्स न घेतल्यासुद्धा वकिलांच्या नावाने ऑनलाईन नोटिसा आणि पैसे भरण्याबाबत धमकीचे फोन येत असल्याने जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेषतः ग्रामीण भागात ही समस्या अधिक तीव्र बनली असून, शहरांमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या तरुण-तरुणींना कारणीभूत ठरवत, त्यांच्या पालकांना आर्थिक देणी चुकवल्याचा बनावट दावा करून पैसे उकळण्याचे प्रकार घडत आहेत. सोशल … Read more

महायुतीला जनादेश, पण कार्यकर्त्यांचा ‘अति उत्साह’ महागात पडतोय विखे पाटलांचा टोला

राज्यात आम्ही महायुती म्हणून आम्ही काम करतो.ज्या पक्षाकडून चुका होतात त्यांनी त्या दुरूस्त केल्या पाहीजेत.महायुतीवर या गोष्टीचा परीणाम होतो.राज्यातील जनतेने महायुतीला जनादेश दिला आहे.त्याचा आदर केला पाहीजे चुकीच्या पध्दतीने वागणार्या कार्यकर्त्यांना अटकाव केला पाहीजे असे मत जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रसारीत झालेल्या व्हीडीओ … Read more

जिल्ह्यात केंद्रीय विश्वविद्यालयाची स्थापना करा खासदार नीलेश लंके यांची संसदेत ठाम मागणी

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करण्याची महत्वपूर्ण आणि दुरदर्शी मागणी खासदार नीलेश लंके यांनी सोमवारी संसदेमध्ये केली. त्यांनी जिल्ह्यात केंद्रीय विश्वविद्यापीठ स्थापन करण्याची आवष्यकता असल्याचे ठामपणे अधोरेखित केले. खासदार लंके यांनी आपल्या मागणीत स्पष्ट केले की, अहिल्यानगर हा जिल्हा मध्यवर्ती असून येथे केंद्रीय विश्वविद्यालय सुरू केल्यास मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची … Read more

शिक्षकांचे संसद दर्शन; लोकशाहीचा थेट अनुभव खासदार नीलेश लंके यांची अभिनव संकल्पना

शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असतो. आपल्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या मनावर संस्काराची, ज्ञानाची आणि चारित्रयाची मोहोर उमटविणाऱ्या या शिक्षकांचा गौरव करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. हेच भान ठेवत खासदार नीलेश लंके यांनी एक विलक्षण आणि अभूतपूर्व उपक्रम राबवत २०० पेक्षा अधिक निवृत्त शिक्षकांसाठी संसदेच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले आहे. दि. १९ जुलै रोजी सकाळी अहिल्यानगर रेल्वे … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन एका ठिकाणी झाले असतांना पुतळा दुसऱ्या ठिकाणी बसवायचा घाट का? आमदार हेमंत ओगले यांचा सभागृहात सवाल

श्रीरामपूर- शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात सदर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नेहरू भाजी मंडई येथे स्थापित का करण्यात आला, असा सवाल आमदार हेमंत ओगले यांनी विधिमंडळामध्ये चर्चेदरम्यान काल बुधवारी उपस्थित केला. यावेळी आमदार ओगले म्हणाले की, सर्व श्रीरामपूर वासियांची गेल्या अनेक वर्षापासूनची इच्छा होती … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील आकारी पडित शेतकऱ्यांना जमीनी परत मिळाव्यात, शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

माळवाडगाव- खंडकरी शेतकऱ्यांप्रमाणे आकार पडित शेतकऱ्यांच्या हरेगाव मळ्यातील जमीनी शेतकऱ्यांना परत मिळाव्यात, यासाठी मान्यता देण्याची विनंती आकारी पडीत वारसदार शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांना केली. यावेळी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने राजभवन येथे त्यांची भेट घेतली. आकारी पडित शेतकरी शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या बराबेर सविस्तर … Read more

शहिद जवान मेजर संदीप घोडेकर यांचे संगमनेर तालुक्यात स्मारक उभे राहावे, संगमनेर शहर काँग्रेस कमिटीची मागणी

संगमनेर- तालुक्यातील मेजर संदीप घोडेकर यांचे देशसेवा बजावत असताना हृदयविकाराने नुकतेच निधन झाले. मेजर संदीप घोडेकर यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा विचार करून त्यांचे संगमनेर तालुक्यात स्मारक व्हावे, अशी मागणी संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काल बुधवारी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विश्वासराव … Read more

कोपरगाव तालुक्यातील वनविभागाच्या वखारीवर धाडी, धडक कारवाईमुळे वखारी व आरामिल चालकांची उडाली धांदल

पुणतांबा- कोपरगाव वनपरीक्षेत्रातील पुणतांबा आणि रुई येथे अवैधरित्या लाकूड कटाई आणि अवैध आरागिरणी चालू असल्याबाबत तक्रारी वाढल्या होत्या. या वाढत्या तक्रारींमुळे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या नेतृत्वाखाली व सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव वनपरिक्षेत्रातील पथकाने पुणतांबामधील वखारींवर नुकतीच धडक कारवाई केली. या कारवाईमुळे वखारी व आरामिल चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणतांबामधील … Read more

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या 100 बेड घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात आणखी सुविधा – आ.सत्यजित तांबे

संगमनेर ( प्रतिनिधी ) संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून तालुक्यातील नागरिकांना आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून येथील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात 100 बेड चे अत्याधुनिक रुग्णालयाचे काम सुरू असून घुलेवाडी व साकुर येथील आरोग्य केंद्रांमध्ये अत्याधुनिक सुविधा मिळाव्या या मागणीसाठी आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत मागणी केली असून … Read more

पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट आणि गणाच्या रचनेत पाच गावांची अदलाबदल, जाणून घ्या गावाची नावे?

पारनेर- गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिध्द केलेल्या पारनेर तालुक्यातील गट आणि गणाच्या रचनेमध्ये पाच गावांची गणांमध्ये अदलाबदल करण्यात आली असून, उर्वरित रचना पूर्वीप्रमाणेच असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसारः पूर्वी सुपे गटामध्ये असलेले शहाजापूर हे गाव ढवळपुरी गटात समाविष्ट करण्यात … Read more

पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये कोणताही बदल नाही, गाव पुढारी लागले तयारीला

पाथर्डी- तालुक्यात पाच जिल्हा परिषद गट व दहा पंचायत समिती गणाची प्रारुप यादी तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांनी प्रसिद्ध केली आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये कोणताही बदल झालेला नसल्याने त्याबाबत ठोस प्रतिक्रिया देण्यात आलेल्या नाहीत. मात्र, निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने ग्रामिण भागातील पुढाऱ्यांना आनंद झाला आहे. भालगाव, कासारपिंपळगाव, टाकळीमानूर, मिरी-करंजी, तिसगाव असे … Read more

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांच्या अपात्रतेला स्थगिती, आमदार विक्रम पाचपुतेंसह शिवसेना उपनेते साजन पाचपुतेंना मोठा धक्का

श्रीगोंदा- श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत जिल्हा निबंधक गणेश पुरी यांनी प्रवीण उर्फ अतुल लोखंडे यांच्या विरुद्ध काढलेल्या अपात्रतेच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली. या आदेशाने आमदार विक्रम पाचपुते तसेच बाजार समितीचे तत्कालीन संचालक शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांना मोठा धक्का बसला आहे. बाजार समितीचे … Read more

महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे पाथर्डीत तालुक्यात शाॅक लागून म्हशीचा मृत्यू, शेतकऱ्याचे १ लाखांचे नुकसान

करंजी- पाथर्डी तालुक्यातील धारवाडी बसस्थानकाजवळ महावितरणचा विजेचा पोल उभा असून, त्या पोलसाठी तान म्हणून असलेल्या तारेमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने नारायण सोनवणे यांच्या म्हशींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या म्हशीच्या मृत्यूमुळे सोनवणे यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गाय-बैल म्हैस हा शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा आर्थिक आधार म्हणून ओळखले जातात. मात्र, अशा काही … Read more