अहिल्यानगर जिल्ह्यातील ५९ हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या आशेपायी बँकांचं १३६२ कोटी रूपयांचं कर्ज थकवलं, बँका आर्थिक अडचणीत

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढतच चालला आहे. सुमारे ५९ हजार ७०६ शेतकऱ्यांकडे १३६२ कोटी ६२ लाख रुपयांची कर्जथकबाकी असून, यामुळे जिल्ह्यातील ३२ राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँका आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. लाडकी बहीण योजनेप्रमाणे हे आश्वासन पूर्ण होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, सत्तेत आल्यानंतर … Read more

मुलगा शाळेत गैरहजर राहिला तर पालकांना लगेच मोबाईलवर SMS येणार, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षण विभागाचा नवा आदेश

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने कठोर पावले उचलली आहेत. जिल्हा परिषद तसेच खासगी आणि इतर व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर काटेकोर लक्ष ठेवण्यासाठी दिवसातून तीन वेळा हजेरी घेणे, गैरहजर विद्यार्थ्यांच्या पालकांना तातडीने एसएमएसद्वारे माहिती देणे, शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे … Read more

शेतकऱ्यांनो! पावसाळ्यात जनावरांची काळजी घ्या, पोटात जंत झाले असतील तर हे उपाय अन् औषधे माहित असू द्या!

महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून, सलग चार दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. यंदा अवकाळी पावसाने आधीच शेतकऱ्यांचे आणि पशुपालकांचे नुकसान केले, आणि आता मान्सूनच्या आगमनाने पशुपालकांना जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. पावसाळ्यात ओलसर वातावरणामुळे जनावरांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव वाढतो, ज्यामुळे त्यांची वाढ खुंटते, दूध उत्पादन घटते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते. पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यापूर्वी … Read more

मतदार संघात मल्टीमोडल लॉजिस्टिक हब हवा खासदार नीलेश लंके यांची आग्रही मागणी

Ahilyanagar News : नगर-श्रीगोंदे-कर्जत परिसरात मल्टीमोडल लॉजिस्टक हब स्थापन करून पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवे बळ देण्याची आग्रही मागणी खासदार नीलेश लंके यांनी मंगळवारी केंद्रीय नौवहन, बंदर व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे केली. खा. लंके यांनी मंत्री सोनोवाल यांना या मागणीचे निवेदनही सादर केले. खा. लंके यांनी यासंदर्भात मंत्री सोनोवाल यांची भेट घेत शेती, उद्योग … Read more

अहिल्यानगर तालुक्यात पावसाचा हाहाकार! अनेक गांवाना पुराचा वेढा, नागरिक अडकले तर वाहने,जनावरं गेली वाहून

Ahilyanagar News: अहिल्यानगर-नगर तालुक्यात मंगळवारी (दि. २७ मे २०२५) पावसाने असा जोरदार हाहाकार माजवला की, अनेक गावांना पुराचा तडाखा बसला. सलग पाच तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील पूर्णा आणि वालुंबा नद्यांना पूर आला. या पुराने खडकी गावाला पाण्याचा वेढा पडला, भोरवाडीचा संपर्क पूर्णपणे तुटला, तर वाळकीच्या बाजारपेठेतही पाणी घुसले. नगर-दौंड महामार्ग गेल्या पन्नास वर्षांत प्रथमच … Read more

अहिल्यानगरमधील पोलिस बदल्यांना अखेर मुहूर्त भेटला, 223 अंमलदारांच्या बदल्यांसाठी आज भरणार दरबार

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्हा पोलिस दलात प्रशासकीय बदल्यांच्या प्रक्रियेला वेग आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्वीकारताच पोलिस उपनिरीक्षक, सहायक फौजदार, हवालदार, पोलिस नाईक, शिपाई आणि चालक यांच्या बदल्यांसाठी बुधवार, २८ मे २०२५ रोजी पोलिस मुख्यालयात दरबार आयोजित केला आहे. अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी मंगळवारी यासंदर्भातील आदेश जारी केले असून, … Read more

अहिल्यानगरमध्ये मंतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या भाकपच्या बड्या नेत्याला शेवगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Ahilyanagar Crime: शेवगाव- तालुक्यातील एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. भाकप (भारतीय कम्युनिस्ट पक्ष) राज्य कौन्सिल सदस्य संजय नांगरे याला एका मतिमंद मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी मंगळवार, २७ मे २०२५ रोजी मुंबई येथून अटक केली. या प्रकरणात पीडित मुलीच्या बहिणीच्या तक्रारीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने … Read more

अहिल्यानगरमध्ये शरद पवारांना मोठा धक्का, ‘हा’ मा.आमदार करणार आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Ahilyanagar Poliitics : श्रीगोंदा- तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार राहुल जगताप आणि ठाकरे शिवसेनेतील नेते तसेच नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे बुधवारी (दि. २८ मे २०२५) अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात होणार आहे, … Read more

राहतं घर पाडलं, जमीन लाटली, न्यायासाठी सरोदे कुटुंबाचा दहा वर्षापासून संघर्ष; न्याय न मिळाल्यास गुरां-ढोरांसह तहसीलमध्ये राहायला येण्याचा इशारा

Ahilyanagar News: अहिल्यानगर- तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील कौसाबाई मारुती सरोदे यांच्या कुटुंबाने त्यांच्या मालकीच्या 51 गुंठे जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरून बेकायदेशीरपणे कमी केल्याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गट नंबर 1026 मधील या जमिनीचा ताबा घेऊन त्यांचे घर पाडल्याचा आरोप करत, गेल्या दहा वर्षांपासून न्यायासाठी पाठपुरावा करणाऱ्या सरोदे कुटुंबाने आता थेट तहसील कार्यालयात शेळ्या, मेंढ्या, गुरे-ढोरे … Read more

अहिल्यानगर बाजार समितीत गवारीने खाल्ला भाव, शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ‘एवढ्या’ हजारापर्यंत मिळतोय दर

Ahilyanagar News: अहिल्यानगर- बाजार समितीत 26 मे 2025 रोजी पालेभाज्या आणि इतर भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली, ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगले भाव मिळाले. सोमवारी पालेभाज्यांच्या 16,532 जुड्यांची आवक झाली, तर विविध भाजीपाल्याची 1,080 क्विंटल आवक नोंदवली गेली. यामध्ये गवारीला प्रतिक्विंटल 2,000 ते 10,000 रुपये, मेथीच्या जुडीला 10 ते 20 रुपये आणि कोथिंबिरीच्या जुडीला 5 ते 30 … Read more

कर्जतच्या हनुमान मंदिराजवळील अतिक्रमण अखेर जमीनदोस्त, आमदार जगताप आणि पडळकरांच्या दबावानंतर मोठी कारवाई!

Ahilyanagar News: कर्जत- शहरातील प्राचीन दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातील अनधिकृत अतिक्रमण अखेर 26 मे 2025 रोजी स्थानिक प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात जमीनदोस्त केले. या अतिक्रमणविरोधी कारवाईपूर्वी अखंड हिंदू समाजाच्या वतीने 10 दिवसांचे बेमुदत उपोषण आणि 16 मे रोजी कर्जत बंद आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात आमदार संग्राम जगताप आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचा सक्रिय … Read more

नेवासा तालुक्यात यंदा ५४ हजार हेक्टरवर खरीप लागवड, कपाशी-तुरीचे क्षेत्र वाढणार तर सोयाबीनला शेतकऱ्यांचा नकार!

Ahilyanagar News: नेवासा- तालुक्यात यंदा मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज असून, गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे खरीप हंगामाच्या मशागतीला वेग आला आहे. तालुक्यात 54,905 हेक्टर क्षेत्रावर खरीप नियोजन करण्यात आले आहे. यंदा सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात घट होऊन कपाशी, तूर आणि मका यांसारख्या पिकांच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात सोयाबीनला कमी बाजारभाव मिळाल्याने शेतकरी … Read more

अहिल्यानगरकरांनो सावधान! पुढील पाच दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस, तर ‘या’ दिवसांपासून पावसाला विश्रांती

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यासह मराठवाड्यात पुढील पाच दिवस  जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहतील, असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे 26 मे 2025 रोजी आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हा अंदाज व्यक्त केला. या पावसानंतर 1 ते 5 जूनपर्यंत पाऊस विश्रांती घेईल आणि 6 जूनपासून … Read more

शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी! फळबाग लागवड करा अन् १०० टक्के अनुदान मिळवा, जाणून या सविस्तर माहिती आणि प्रकिया

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) यांच्या समन्वयातून मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवड केली जात आहे. चालू वर्षात हजारो हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड पूर्ण झाली आहे, ज्यामध्ये लिंबू, आंबा, डाळींब आणि पेरू यांसारख्या फळपिकांचा समावेश आहे.  या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 100 … Read more

पारनेर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस! नदी-नाल्यांना पूर, रस्ते बंद तर शेती पिकांचे मोठे नुकसान

Ahilyanagar News: पारनेर- तालुक्यातील तिखोल आणि काकणेवाडी परिसरात रविवारी (25 मे 2025) रात्री ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजवला. या मुसळधार पावसामुळे नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला, तर रस्तेही काही काळ बंद राहिले. एकाच दिवसात 62 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. टोमॅटो, वाटाणा, कोबी, फ्लॉवर आणि भुईमूग यांसारख्या पिकांमध्ये पाणी साचल्याने … Read more

खासदार निलेश लंके यांनी योग्य ठिकाणी आवाज उठवावा, आमदार विक्रम पाचपुते यांचा सल्ला

Ahilyanagar Politics: श्रीगोंदा- तालुक्यातील निमगाव खलू येथील टोल नाक्यावर स्थानिक वाहनांना टोलमाफी मिळावी यासाठी खासदार निलेश लंके यांनी केलेल्या आंदोलनावर आमदार विक्रम पाचपुते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी खा. लंके यांना टोलमाफीचा शासकीय आदेश आणून देण्याचे आव्हान देत, योग्य ठिकाणी आवाज उठवण्याचा सल्ला दिला आहे. जर असा आदेश असेल, तर आपण स्वतः पुढाकार घेऊन टोलमाफी … Read more

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा न करणाऱ्या पुढाऱ्यांना आगामी निवडणुकीत गावात घुसू देऊ नका, शेतकरी संघटनेचा इशारा 

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने आणि बाजारातील खराब परिस्थितीने आधीच हैराण केले आहे, त्यातच जिल्हा बँकेच्या कर्जवसुलीच्या तगाद्याने त्यांची अडचण वाढली आहे. निवडणुकीपूर्वी भाजपच्या नेत्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आणि कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात कर्जवसुलीसाठी बँकेची पथके शेतकऱ्यांवर दबाव टाकत आहेत. यामुळे संतापलेल्या शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी सातबारा कोरा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात पॉलिटेक्निकच्या ७ हजार जागेसाठी प्रवेश सुरू, १६ जून असणार अंतिम तारीख, अर्ज कसा करायचा जाणून घ्या सविस्तर!

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात दहावीचा निकाल लागल्यानंतर पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेला 20 मेपासून सुरुवात झाली आहे. तांत्रिक शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. जिल्ह्यातील सात हजार जागांसाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे, पण प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्यासाठी आता धावपळ सुरू झाली आहे.  तहसील कार्यालयांमध्ये विद्यार्थी आणि पालकांची गर्दी वाढत आहे. ऐनवेळी कागदपत्रांची पूर्तता करताना होणारी … Read more