तीन लाख रूपये देऊन आळंदीत लग्न केलं, मात्र लग्नानंतर काही दिवसांत घरातील रोख रक्कम घेऊन पसार झालेल्या नवरीला श्रीगोंदा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

श्रीगोंदा- तालुक्यातील घोगरगाव येथील तरुणाशी एजंटच्या मदतीने तीन लाख रुपये घेत बनावट लग्न करून काही दिवस राहून घरातील रोख रक्क्म चोरुन घेऊन जाणाऱ्या बनावट नवरीसह नवरीच्या मावस भावाची भूमिका निभावणाऱ्या आकाश तोताराम सुरोशे (वय३१ वर्षे रा. दहिद बुद्रुक ता.जि. बुलढाणा) या दोघांना श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद करत बनावट लग्न करुन फसवणाऱ्या अंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. या … Read more

बाळासाहेब थोरातांच्या पत्राची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेंनी घेतली तात्काळ दखल, निळवंडे धरणाच्या दोन्ही कालव्यातून सोडले पाणी

संगमनेर- निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातून लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी सोडावे, अशी मागणी केल्यानंतर काल प्रशासनाच्या वतीने डाव्या व उजव्या दोन्ही कालव्यांना पाणी सोडल्याने लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने यावर्षी जुलै महिन्याच्या … Read more

माननीय विखे.. आपला बाळासाहेब ! थोरातांनी सांगताच विखे धावले, प्रश्नही तात्काळ सोडवला..

संगमनेर : माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातून लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केल्यानंतर प्रशासनाच्या वतीने डाव्या व उजव्या दोन्ही कालव्यांना आज (दि.१५) पाणी सोडण्यात आले. त्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने यावर्षी जुलै … Read more

Ahilyanagar News : गर्भवती विवाहिता मुलासह शेततळ्यात मृतावस्थेत ! अहिल्यानगरमधील ‘या’ गावातील घटना

राहुरी तालुक्यातील गुहा येथील सहा महिन्याची गर्भवती असलेल्या विवाहितेसह पाच वर्षाचा मुलगा शेततळ्यात मृतावस्थेत आढळून आले. दरम्यान या घटनेबाबत शासकीय यंत्रणेस माहिती न देता मृतदेहांचे शवविच्छेन न करता हिंदू धर्माच्या रीतिरिवाजपणे अंत्यसंस्कार विधी न करता मृतदेहाची अप्रतिष्ठा केल्याप्रकरणी पती व सासू सासरे व नातेवाईकांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संजय रामभाऊ बारहाते, … Read more

श्रीगोंदेतील मातब्बर नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश, स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकांचे गणित बदलणार; आ.पाचपुते यांची राजकीय खेळी

मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेत्यांचा आज (दि.१५) भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांच्या व तालुक्यातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला. श्रीगोंदा खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुभाषराव काळाने, बेलवंडीचे माजी सरपंच उत्तम डाके तसेच तांदळी दुमालाचे सरपंच संजय निगडे, तांदळी दुमालाचे माजी सरपंच देविदास … Read more

बातमी आली की कारवाई होते! विखे पाटलांच्या स्टाईलची सध्या प्रशासनात जोरदार चर्चा

नागरीकांच्या समस्यांचा निपटारा तसेच सार्वजनिक प्रश्न सोडविण्यासाठी जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नव्या पॅटर्नची जोरदार चर्चा सध्या प्रशासानात सुरु आहे. नागरिकांच्या समस्यांबाबत तसेच शासनाच्‍या विरोधात दिशाभूल करणा-या वृत्तपत्रात येणा-या बातम्यांची गांभीर्याने दखल घेत यावर संबंधित विभागाच्या अधिका-यांना तातडीने खुलासा करुन प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करण्‍याची नवी यंत्रणा त्‍यांनी कार्यान्वित केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

गट व गण रचना जुन्याच स्वरुपात ठेवावी खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील गट व गण रचना २०१७ साली अस्तित्वात असलेल्या जुन्याच स्वरुपात कायम ठेवावी, अशी जोरदार मागणी खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, २०१७ साली ज्या गट व गण रचनेच्या आधारे जिल्हा परिषद व … Read more

खा. लंकेंच्या आंदोलनास जिल्हाभरातून पाठिंबा दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच खा. लंके यांच्या ठाम भूमिकेमुळे प्रशासनाची धावपळ

नगर-मनमाड महामार्गाच्या ७५ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे तात्काळ काम सुरू करावे या मागणीसाठी शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या खासदार नीलेश लंके यांच्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी जिल्हाभरातून पाठिंबा मिळत आहे. प्रत्यक्ष काम सुरू झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका खा. लंके यांनी घेतल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ सुरू असून या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न … Read more

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ; मात्र लंकेंकडून श्रेय ‘लाटण्याचे’ राजकारण सुरूच !

वाळकी : पुणे-अहिल्यानगर या महत्वाकांक्षी रेल्वेमार्गाच्या डीपीआरचा (सविस्तर प्रकल्प अहवाल) रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून सर्वेक्षण पूर्ण करून रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे. हा अहवाल सादर होणं म्हणजे या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. या यशामागे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न केले असताना खा . निलेश लंके श्रेय लाटण्याचे … Read more

Ahilyanagar Breaking : आ. सुरेश धस यांच्या मुलावर अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल, कारणही धक्कादायक

आष्टी (जि. बीड) येथील भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांच्या कारने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत हॉटेल व्यावसायिक तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ७ जुलै रोजी रात्री १०.३० च्या सुमारास नगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यात घडली. आ.धस यांचा मुलगा सागर सुरेश धस हा कार चालवत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध सुपा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

पुणे अहिल्यानगर रेल्वेचा डीपीआर सादर खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याचे यश

पुणे-अहिल्यानगर या महत्वाकांक्षी रेल्वेमार्गाचा डीपीआर अर्थात प्रकल्प अहवाल रेल्वेच्या बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून रेल्वे बोर्डाला सादर केला असून या मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्याखासदार नीलेश लंके यांच्या प्रयत्नांचे ते मोठे यश मानले जात आहे. या प्रकल्प अहवालानुसार हा रेल्वेमार्ग सध्याच्या पुणे-अहिल्यानगर मार्गाला समांतर असेल. नवा मार्ग झाल्यानंतर सध्याच्या रेल्वे मार्गाच्या अंतरापेक्षा नगर ते पुणे हे अंतर … Read more

संगमनेरात वृक्षारोपणावर आधारित ‘कार्बन क्रेडिट’ प्रकल्प राबवावा — आमदार सत्यजित तांबे.

थोर स्वातंत्र्य सेनानी स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून 2006 साली संगमनेर तालुक्यात व शहरात ‘दंडकारण्य अभियान’ ही पर्यावरणपूरक चळवळ सुरू झाली. त्यानंतर सौ. दुर्गाताई तांबे यांनी नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर मागील 18 ते 20 वर्षांत शहरामध्ये व्यापक प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली. या नियोजनबद्ध वृक्षारोपणामुळे संपूर्ण शहराचे सुशोभीकरण झाले असून संगमनेर अधिक आकर्षक आणि हरित बनले … Read more

प्रवरा नदीकाठच्या गावांनी सतर्क रहा – डॉ जयश्रीताई थोरात यशोधन कार्यालयाच्या वतीने नागरिकांना आवाहन

संगमनेर (प्रतिनिधी)–भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणाच्या क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे निळवंडे धरणातून 6570 क्यूसेस पाणी सोडण्यात आली असून आगामी काळात पावसाच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे म्हणून नदीकाठच्या गावांनी व नागरिकांनी अधिक सतर्क राहावे असे आवाहन युवा काँग्रेसचे अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते … Read more

महाराष्ट्रात सुख-समृद्धी, बंधूभाव नांदू दे, राज्यात भरपूर पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पांडुरंगा चरणी प्रार्थना!

संगमनेर-पंढरपूरचा पांडूरंग हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. आषाढी वारीला शेकडो वर्षांची परंपरा असून वारकरी संप्रदायाने बंधूभाव आणि मानवतेची शिकवण सर्वांना दिली आहे. ही संस्कृती मानवतेला साद घालणारी असून महाराष्ट्रात सुख-समृद्धी, बंधूभाव नांदू दे. राज्यात भरपूर पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे, अशी प्रार्थना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पांडुरंग चरणी केली आहे. संगमनेर मधील चैतन्य … Read more

आईबापानं पोत अन् गंठण शिवून पोराला शिकवलं, पोरानं सीए होत आईबापाच्या कष्टाचं पांग फेडलं, संगमनेरच्या विशालची प्रेरणादायी यशोगाथा

संगमनेर- शहरातील गंठण काम करणाऱ्या पांडुरंग आणि सुवर्णा मिठ्ठा यांचा मुलगा विशाल याने सीए फायनलची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे. आर्थिकदृष्ट्या अत्यंत बेताच्या परिस्थितीत वाढलेल्या विशालने आपल्या कठोर परिश्रम आणि आई-वडिलांच्या त्यागातून मिळवलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ‘आई-वडिलांनी कर्ज काढून माझे शिक्षण पूर्ण केले,’ असे सांगताना विशालच्या डोळ्यांत अश्रू तरळले, तर मुलाच्या यशाने पांडुरंग … Read more

संगमनेरमध्ये रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या ६० जणांवर करण्यात आली दंडात्मक कारवाई, सहकार्य न केल्यास फौजदारी कारवाईचा इशारा

संगमनेर- नगरपरिषदेच्या हद्दीत रस्त्यांवर कचरा फेकणाऱ्या ६० जणांवर आतापर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सामान्य नागरिकांपासून ते विविध व्यावसायिक आणि काही प्रतिष्ठित व्यक्तींचाही समावेश आहे. शहर आणि उपनगरात दररोज घंटागाड्या घरोघरी येऊन सर्व प्रकारचा कचरा संकलित करत असतानाही काही लोक रस्त्यांवर कचरा टाकतात, ज्यामुळे शहराच्या सौंदर्याला आणि आरोग्याला धोका निर्माण होतो. संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी … Read more

पंढरीची वारी करून माघारी परततांना अहिल्यानगरमधील पती-पत्नीला ट्रॅक्टरने दिली जोराची धडक, अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू

श्रीगोंदा- पंढरपूरची वारी करून घरी परतत असताना श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे गावातील वारकरी मल्हारी बाजीराव पवार (वय ५७) आणि त्यांच्या पत्नी पंखाबाई मल्हारी पवार (वय ५४) यांचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला. रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापूर-पुणे रस्त्यावर भिगवणजवळ एका अनोळखी ट्रॅक्टरने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या दुर्दैवी घटनेने येळपणे गावावर शोककळा पसरली असून, … Read more

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! युरियाचा ५०% बफर स्टॉक सरकारने केला खुला, युवानेते विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश

कोपरगाव : खरीप हंगामात शेतकऱ्यांना युरियाचा पुरेसा पुरवठा व्हावा, यासाठी सरकारने युरियाचा ५० टक्के बफर स्टॉक खुला केला आहे. त्यामुळे सहकारी संस्था आणि खाजगी डीलर्सकडे युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध होईल. यासाठी विवेक कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. परिणामी, शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याने विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. यावेळी खरीप … Read more