पाच कोटींच्या विकासकामांसाठी सत्तारांनी ७५ लाख घेतले, तर आमदार राजळेंनी काम रोखले, मनसे जिल्हाध्यक्षांच्या पत्नीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Ahilyanagar News: अहिल्यानगर- अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण भागातील ४८ विकासकामांसाठी मंजूर झालेल्या पाच कोटींच्या निधीप्रकरणी गंभीर आरोप समोर आले आहेत. मनसे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांनी हा निधी मंजूर करून आणला, पण तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांना मध्यस्थामार्फत ७५ लाख रुपये कमिशन म्हणून दिल्याचा दावा त्यांच्या पत्नी सविता खेडकर यांनी केला आहे.  कामे अंतिम मंजुरीच्या टप्प्यात … Read more

रस्ते अपघातात जखमी झालात तर सरकारकडून दीड लाखांपर्यंत मिळणार मोफत उपचार!  जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती

रस्ते अपघातामुळे जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना दीड लाख रुपयांपर्यंत रोखरहित (कॅशलेस) उपचार मिळणार आहेत. ही योजना ५ मे २०२५ पासून देशभर लागू झाली असून, सामान्य कुटुंबांना आर्थिक संकटातून दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे अपघातग्रस्तांना तात्काळ उपचार मिळण्यास मदत होणार आहे, … Read more

अहिल्यानगरमधील १४ हजार जणांनी घर बांधण्यासाठी वर्षभरात घेतलं ९७२ कोटींचं कर्ज, हप्ते थकवल्यामुळे काहींवर जप्तीची कारवाई

Ahilyanagar News: अहिल्यानगर- घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील बँकांनी अनेकांना आर्थिक आधार दिला आहे. गेल्या वर्षभरात १४ हजार १०२ जणांनी घर बांधण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतले. पण, यापैकी ११०६ जणांनी कर्जाचे हप्ते थकवल्याने बँकांचे ७० कोटींहून अधिक रुपये अडकले आहेत. आता बँकांनी वसुलीसाठी तगादा लावला असून, थकबाकीदारांना नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे. गृहकर्जाचे वाटप आणि थकबाकी … Read more

जामखेडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, शेती आणि फळबागांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची मदतीची मागणी

Ahilyanagar News: जामखेड- तालुक्यात मागील काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. मे महिन्यात सलग पाच दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. या पावसाने शेती, फळबागा आणि जनजीवनावर गंभीर परिणाम झाला आहे. शेतकरी हवालदिल झाले असून, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे. शेती आणि फळबागांचे नुकसान … Read more

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले! अहिल्यानगर तालुक्यात फळबागांचे मोठे नुकसान, श्रीगोंद्यातही जोरदार पाऊस

Ahilyanagar News: अहिल्यानगर-  नगर तालुक्यातील गुंडेगाव परिसरात मंगळवारी पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने फळबागांना जबरदस्त फटका बसला आहे. आंबा, डाळिंब आणि संत्र्याच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे, तर श्रीगोंदा तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई … Read more

चालकाचे अपहरण करून बेदम मारहाण, माजी महापौर कळमकरांसह आठजण फरार तर एकाला पोलिसांनी केली अटक

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर- भिंगार कॅम्प पोलिसांनी एका धक्कादायक अपहरण आणि मारहाण प्रकरणात मच्छिंद्र झेंडे या व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणात माजी महापौर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यासह अन्य आठ आरोपी फरार असल्याची माहिती आहे. रवींद्र रामराव शेळके या चालकाला अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली, तसेच त्यांच्या स्वाक्षऱ्या जबरदस्तीने … Read more

पर्यावरणदिनी पर्यावरण परिषदेचे आयोजन आत्मनिर्धार फाउंडेशनचा पुढाकार

अहिल्यानगर : सातत्याने होणारी तापमान वाढ, प्रदूषण, वातावरणातील बदलामुळे पर्जन्यमान चक्र विस्कळीत झाल्याने निर्माण होणारी अस्मानी संकटे यासह येत्या काळात मानव समुदायावर ओढवणाऱ्या पर्यावरणीय समस्यांवर चर्चा आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी तालुक्यातील पर्यावरणप्रेमी मंडळींनी पुढाकार घेत पर्यावरण परिषदेचे आयोजन केले आहे. ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. हेच औचित्य साधून … Read more

अहिल्यानगरकरांनो! ओढ्या- नाल्यात कचरा टाकलात तर कडक कारवाई होणार, महापालिका आयुक्तांनी दिला इशारा

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहरातील पावसाळ्यापूर्वी ओढे आणि नाल्यांची साफसफाई पूर्ण करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले आहेत. सध्या शहरातील प्रमुख नाल्यांची ५० टक्के साफसफाई पूर्ण झाली आहे. मात्र, साफसफाईदरम्यान नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि इतर कचरा आढळून आला आहे, ज्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होतो. यापुढे ओढे आणि नाल्यांमध्ये कचरा … Read more

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांची रजेचे पैसै मिळण्यासाठी फरफट सुरूच, पैश्यासाठी वर्षाभरापासून कर्मचारी आहेत वेटिंगमध्ये

Ahilyanagar News: अहिल्यानगर- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या शिल्लक रजेच्या पैशांसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. वर्ष-दीड वर्ष उलटूनही हे पैसे मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. प्रशासकीय प्रक्रियेत होणारा विलंब आणि निधीअभावी ही रक्कम वेळेवर मिळत नाही.  अहिल्यानगर विभागातील साडेचार हजारांहून अधिक कर्मचारी या समस्येने त्रस्त असून, कर्मचारी संघटना … Read more

जागतिक मधमाशी दिन: मोबाईल टॉवर, रसायने आणि तापमानवाढीमुळे मधमाशी नष्ट होण्याच्या मार्गावर?

निसर्गसौंदर्य आणि जैवविविधतेत मधमाशी हा एक महत्त्वाचा घटक आहे. २० मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो, ज्यामुळे मधमाश्यांचे शेती आणि पर्यावरणातील योगदान अधोरेखित होते. मधमाशी ही केवळ मध आणि मेण निर्माण करणारी किटक नसून, परागसिंचनाद्वारे शेती उत्पादन वाढवणारी निसर्गाची देणगी आहे. मात्र, वाढते तापमान, रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर, जंगलातील आग, मोबाइल टॉवर्समधील चुंबकीय … Read more

श्रीरामपूरमध्ये विनापरवाना डीजे वाजवला तर पोलिसांची थेट कारवाई होणार, ड्रोनवरही घातली बंदी

Ahilyanagar News: श्रीरामपूर-  शहर आणि परिसरात वाढते ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. विनापरवाना लाऊडस्पीकर, साऊंड सिस्टीम आणि ड्रोन उड्डाण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यामुळे नागरिकांना … Read more

अवकाळी पावसामुळे शेतपिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी अडचणीत, तातडीने मदत देण्याची किसान सभेची राज्य आणि केंद्र सरकारकडे मागणी

Ahilyanagar News: अकोले- तालुक्यासह महाराष्ट्रात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने आर्थिक आणि मानसिक धक्का दिला आहे. यामुळे फळबागा, भाजीपाला आणि उभी पिके उद्ध्वस्त झाली, तसेच शेतजमिनी आणि बांध वाहून गेले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि अखिल भारतीय किसान सभेने राज्य आणि केंद्र सरकारकडे … Read more

श्रीरामपूर-मुंबई एसटी बससेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांचे हाल, तातडीने बस सुरू करावी अन्यथा आंदोलन करण्याचा रिपाईंचा इशारा!

Ahilyanagar News: श्रीरामपूर- श्रीरामपूर ते मुंबई आणि मुंबई ते कल्याण या मार्गांवरील एसटी बस गेल्या वर्षभरापासून बंद असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. या बंदमुळे विशेषतः महिला, वृद्ध आणि लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं)च्या वतीने देण्यात आला आहे. सोमवारी, १९ … Read more

अहिल्यानगरच्या उत्तर भागात पावसाचा तडाखा कायम; झाडे उन्मळून पडली, विजेच खांब कोसळले, शेतीपिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान!

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील उत्तर भागात सोमवारी दुपारनंतर आलेल्या वादळी पावसाने शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांना मोठ्या संकटात टाकले. संगमनेर, राहाता, राहुरी, नेवासा, अकोले, कोपरगाव, आणि श्रीरामपूर तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याने थैमान घातले. कांदा, भुईमूग, बाजरी, डाळिंब, आंबा, आणि जांभूळ यांसारख्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले.  आठवडे बाजारातील दुकाने उध्वस्त झाली, झाडे कोसळली, विजेच्या … Read more

अहिल्यानगरमध्ये सलग १८ दिवसांपासून अवकाळी पावसाचे थैमान, ३२५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, जिल्ह्यात आणखी मुसळधार पावसाचा इशारा

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात गेल्या १८ दिवसांपासून अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. नगर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत पाऊस आणि वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. कांदा, टोमॅटो, आंबा, डाळिंब, केळी, आणि भाजीपाला पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. १ ते १८ मे या कालावधीत ६१२ शेतकऱ्यांच्या ३२५.४८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे … Read more

अहिल्यानगरमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान; पाण्यात भिजून कांदा सडला, नुकसान भरपाई देण्याची मागणी

Ahilyanagar News: अहिल्यानगर- तालुक्याच्या दक्षिण भागात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. कांदा चाळीवरील पत्रे उडाली, घरांवरील पत्रे कोसळली, आणि शेतात काढून ठेवलेला कांदा पाण्याने भिजून सडला.  भोरवाडी, अकोळनेर, सारोळा कासारसह इतर गावांमध्ये शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. या अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे … Read more

शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! अवकाळी पावसानं झोडपलं आणि कांद्याने रडवलं, अहिल्यानगरच्या नेप्ती मार्केटमध्ये कांद्याला मिळतोय एवढा भाव

Ahilyanagar News : अहिल्यानगर-  अहिल्यानगरमधील नेप्ती उपबाजारात कांद्याच्या भावाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. सोमवारी, १९ मे रोजी बाजार समितीत कांद्याची मोठी आवक झाली, पण भाव मात्र मातीमोल मिळाले. त्यातच अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान केले आहे. एकीकडे नैसर्गिक संकट, तर दुसरीकडे बाजारात मिळणारे कमी भाव यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यंदा कांद्याच्या … Read more

कर्जमाफीची वाट पाहता पाहता शेतकरी पुन्हा सावकारांच्या दारात! पेरणीसाठी खतं-बियाणे आणायचे कसे? शेतकऱ्यांपुढं प्रश्न

राज्यातील शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीने शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनामुळे शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीची आशा निर्माण झाली होती. परंतु, सत्ता स्थापन झाल्यानंतरही कर्जमाफीची घोषणा प्रत्यक्षात आली नाही.  परिणामी, शेतकऱ्यांना खरिपाच्या हंगामासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुन्हा सावकारांचा आधार घ्यावा लागत आहे. कृषी आणि कृषिपूरक … Read more