…अन्यथा आजपासून उपोषणाला बसणार,  खासदार निलेश लंके यांचा अधिकाऱ्यांना इशारा!

Ahilyanagar News : श्रीगोंदा- तालुक्यातील आढळगाव शिवारात जामखेड ते शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्णावस्थेत रखडले आहे. यामुळे वाहनचालकांना आणि स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याचे काम रखडले असून, येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सुभान तांबोळी यांनी दोन दिवसांपासून आढळगाव येथे उपोषण सुरू केले आहे. या … Read more

दिल्ली येथील काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या बैठकीस महाराष्ट्रातून बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध करून भारताच्या सैन्य दलाला पूर्ण पाठिंबा व्यक्त करत दहशतवादांना लवकरात लवकर पकडावे अशी मागणी करताना पाकिस्तान विरुद्ध भारताची प्रतिउत्तरात्मक कारवाई अचानक का थांबली अशी चिंता व्यक्त करताना या सर्व बाबींवर देशाला उत्तरे हवी आहेत अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या बैठकीत करण्यात आली. नवी दिल्ली येथे काँग्रेस पक्षाच्या … Read more

बाल्कनी की टेरेस? AC चा काँम्प्रेसर नेमका कुठे ठेवायचा? स्फोट होण्यापासून नेमके कसे वाचायचे?

यंदा उन्हाळा एवढा होता की प्रत्येक घरात किमान फॅन, कुलर किंवा थेट एसी चालू होते. ज्यांना एसी शक्य होता, त्या अनेकांनी एसी बसवत बाहेरच्या कडक उन्हापासून स्वतःचे संरक्षण केले. एसी अनेक प्रकारांत व अनेक क्षमतांचा येतो. एसीचा परफाँर्मन्स हा त्याच्या युनिटवर म्हणजे कंप्रेसर कुठे बसवता, यावर अवलंबून असते. कंप्रेसर चुकीच्या ठिकाणी बसवला, तर तो वीज … Read more

शेतीसाठी कुकडीचे आवर्तन १६ मे पासून सुरू होणार, राजेंद्र म्हस्के यांच्या उपोषणाला यश, अधिकाऱ्यांनी दिले लेखी आश्वासन

Ahilyanagar News: श्रीगोंदा- तालुक्यातील फळबागांना तातडीने पाणी मिळावे आणि कुकडी प्रकल्पाचे आवर्तन सुरू व्हावे, या मागणीसाठी पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी मंगळवारी (दि. १३ मे २०२५) तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. कर्जतआधी श्रीगोंद्याला पाणी मिळावे, अशी त्यांची प्रमुख मागणी होती. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन १६ … Read more

पुण्यामध्ये पैश्यांचा पाऊस पाडण्यासाठी सुरू होता जादूटोणा, अचानक तोतया पोलिस आले अन् मांत्रिकासह ५ लाखांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले

Pune News: पुणे- जिल्ह्यातील शिक्रापूर आणि आळेफाटा परिसरात मंगळवारी (दि. १३ मे २०२५) एका चित्रपटाला शोभेल असा थरारक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवत तिघांनी संतोष भुजबळ नावाच्या व्यक्तीला जादूटोण्याच्या नावाखाली पाच लाख रुपये लुटले. जादूटोणा सुरू असताना चौथा साथीदार पोलिसांच्या वेशात आला आणि मांत्रिकासह पैशांचा मुद्देमाल घेऊन पळाला. मात्र, फसवणूक झाल्याचा … Read more

श्रीरामपूरमध्ये ३० धोकादायक इमारती मालकांना नगरपरिषदेने पाठवल्या नोटिसा, पावसाळ्यापूर्वी इमारती खाली करा नाहीतर…

  Ahilyanagar News: श्रीरामपूर- शहरातील जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारतींमुळे पावसाळ्यात नागरिकांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे श्रीरामपूर नगरपरिषदेने धोकादायक इमारतींची पाहणी करून आतापर्यंत ३० इमारत मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांद्वारे मालकांना आणि रहिवाशांना धोकादायक भाग दुरुस्त करणे, काढून टाकणे किंवा इमारत खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र नगरपरिषद, … Read more

श्रीगोंद्यात मल्टिनिधी कंपनीने जास्त परताव्याचे आमिष दाखवून अनेकांची केली कोट्यवधींची फसवणूक

Ahilyanagar News: श्रीगोंदा- तालुक्यातील अनेक नागरिकांना मल्टीस्टेट कंपनीच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा घालण्यात आला आहे. चार वर्षांपूर्वी थाटामाटात सुरू झालेल्या या कंपनीने लाख रुपये गुंतवल्यास महिन्याला १० ते १५ हजार रुपये परतावा मिळेल, असं आमिष दाखवलं. यामुळे अनेकांनी आपली बचत, कर्ज किंवा जमीन-जागा विकून या कंपनीत पैसे गुंतवले. सुरुवातीला काही काळ परतावा मिळाला, पण गेल्या दोन-तीन … Read more

अहिल्यानगर भाजप शहर जिल्हाध्यक्षपदासाठी रस्सीखेच, इच्छुकांनी मुंबईत जाऊन प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन अहवाल केला सादर

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. उत्तर आणि दक्षिण जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीचा तिढा सुटल्यानंतर आता शहर जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी तीव्र केली आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्यासह शहर उपाध्यक्ष सचिन पारखी, माजी महापौर बाबासाहेब वाकळे आणि धनंजय जाधव यांनीही या पदासाठी दावेदारी सादर केली आहे. या इच्छुकांनी … Read more

अहिल्यानगरमध्ये १०० हून जास्त कत्तलखाने! घरातून होम डिलिव्हरीद्वारे गोमांस विक्री, दुसऱ्या मजल्यावरही सुरू आहेत कत्तलखाने

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहरात आणि जिल्ह्यात अवैध कत्तलखान्यांचं जाळं पसरलं आहे. शहरातच शंभरहून अधिक कत्तलखाने सक्रिय आहेत. पोलिसांनी गेल्या काही महिन्यांत कारवाईचा फास आवळल्यानं उघडपणे चालणारी ही कत्तलखानं आता घरात, अगदी दुसऱ्या मजल्यावर लपून-छपून सुरू झाली आहेत. इतकंच नाही, तर गोमांसाची होम डिलिव्हरी दुचाकीवरून होत आहे, आणि काही ठराविक भागात बेकरी, किराणा दुकानातून एक-दोन किलोच्या … Read more

राम शिंदे आणि रोहित पवार यांच्या राजकीय वादात करोडोच्या उद्यान प्रकल्पाची झाली दुर्दशा; झाडे जळाली, कोनशिलाही गायब

Ahilyanagar News: कर्जत- शहरातील समर्थ गार्डन, जे एकेकाळी हिरवळीने नटलेलं आणि शहरवासीयांचं आकर्षण होतं, आज मात्र ओसाड आणि उद्ध्वस्त अवस्थेत आहे. झाडं कोरडी पडली, गवत पिवळं झालं, करंज्यांवर धूळ साचली आणि कचऱ्याचे ढीग लागलेत. पाण्याच्या नियोजनाअभावी आणि देखभालीच्या कमतरतेमुळे हे गार्डन आज केवळ सांगाड्याच्या स्वरूपात उभं आहे. स्थानिकांच्या मते, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे … Read more

स्व. अरूणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ अहिल्यानगरमध्ये ६६ हजार झाडे लावले जाणार

Ahilyanagar News: अहिल्यानगर- माजी आमदार अरुणकाका जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात बुधवारी (दि. १४ मे) शोकसभा झाली. या सभेत पद्मश्री पोपटराव पवार यांनी सर्वांना आवाहन केलं की, अरुणकाकांच्या स्मृती जपण्यासाठी येत्या वर्षभरात ६६ हजार झाडे लावून त्यांचं संगोपन करावं. आजच्या राजकारणात द्वेष वाढत असताना अरुणकाकांनी कधीही द्वेषाचं राजकारण केलं नाही, विरोधकांनाही आपलंसं … Read more

कोपरगावला पाणी टंचाईची झळ, गावतळे आणि शेततळे भरून देण्याची आमदार आशुतोष काळे यांची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी

Ahilyanagar News: कोपरगाव- तालुक्यातील पूर्व भागात सध्या तीव्र पाणी टंचाईने नागरिक आणि शेतकरी हैराण झाले आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी अहिल्यानगर येथे ११ मे २०२५ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. त्यांनी नांदूर मध्यमेश्वर जलद कालवा आणि पालखेड कालव्यातून गावतळे आणि शेततळे भरून देण्याची मागणी केली, जेणेकरून पावसाळ्यापर्यंत … Read more

विद्यार्थी आणि पालकांनो अकरावी प्रवेश परिक्षेसाठी अडचण येतेय? शिक्षण विभागाने सुरू केलाय हेल्पलाइन नंबर, फोन करून घेऊ शकता माहिती

महाराष्ट्रातील दहावीच्या निकालानंतर विद्यार्थी आणि पालकांची अकरावीच्या प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. चांगल्या कनिष्ठ महाविद्यालयात आणि इच्छित शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांना आणि पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाने हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. यंदा अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पूर्णपणे ऑनलाइन पद्धत लागू करण्यात आली असून, कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी … Read more

धरणातील गाळ काढण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण करा- विखे पाटील

धरणातील गाळ काढण्यासाठी अन्य राज्यांनी केलेले धोरण व महाराष्ट्र राज्याचे या बाबतचे असलेले धोरण याचा तुलनात्मक अभ्यास करून राज्याचे सर्व समावेशक असे नवीन धोरण तयार करावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार्या मोहीमेत सहा प्रकल्पांत जिल्ह्यातील मुळा धरणाचा समावेश करण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात … Read more

नाशिकमध्ये कृषी विभागाकडून खरीप हंगामाची जोरदार तयारी, शेतकऱ्यांसाठी युरिया आणि डीएपीचा मोठा साठा करणार

Nashik News: नाशिक- जिल्ह्यात खरीप हंगाम जवळ येत असताना कृषी विभागाने रासायनिक खतांचा तुटवडा टाळण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. यंदाच्या हंगामासाठी ६,३०० मेट्रिक टन युरिया आणि १,२०० मेट्रिक टन डीएपीचा साठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असली, तरी यामुळे शेतीमालाचे नुकसानही झाले आहे. तरीही, या पावसामुळे … Read more

देवस्थान जमिनीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! जमिनींच्या खरेदी-विक्रीवर घातली बंदी, अध्यादेश काढण्याचे महसूलमंत्र्यांचे निर्देश

महाराष्ट्रातील देवस्थानच्या जमिनींच्या खरेदी-विक्रीवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंगळवारी (१३ मे २०२५) मंत्रालयात झालेल्या बैठकीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नोंदणी विभागाला याबाबत कठोर आदेश दिले. या निर्णयानुसार, शासन धोरण ठरेपर्यंत देवस्थानच्या जमिनींचे सर्व व्यवहार थांबवण्यात येणार असून, तातडीने यासंदर्भात अध्यादेश जारी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या … Read more

सीसीटीव्ही नसेल तर खासगी शाळांची मान्यता रद्द होणार! राज्य सरकारचा मोठा निर्णय जाहीर

बदलापूर येथील शाळेत लहान मुलांवर झालेल्या अत्याचाराच्या धक्कादायक घटनेनंतर राज्य सरकारने खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक केले आहे. शाळेच्या परिसरातील मोक्याच्या ठिकाणी हे कॅमेरे लावावे लागतील, अन्यथा शाळेचे अनुदान रोखले जाईल किंवा मान्यता रद्द होईल. सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी सीसीटीव्ही बसवण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून शालेय शिक्षण विभागाला पाच टक्के निधी राखीव ठेवण्यास … Read more

अहिल्यानगर मनपाच्या क्षेत्रातील ५३ टक्के सर्वेक्षण पूर्ण, क्षेत्रफळात ३० टक्के वाढ, जुलै अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश

Ahilyanagar News: अहिल्यानगर- महानगरपालिका (मनपा) क्षेत्रातील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण सध्या जोमाने सुरू आहे. या सर्वेक्षणातून मालमत्तांचे क्षेत्रफळ, इमारती आणि घरांचे नव्याने मोजमाप करून मूल्यांकन केले जात आहे. आतापर्यंत ५३ टक्के सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, मालमत्तांच्या क्षेत्रफळात सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. यामुळे मालमत्ता कराच्या उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे. मनपा … Read more